गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

डिजिटल बँनर बातमी मुडाणा

 ▪️जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम

 https://www.purogamisandesh.in/news/19793

👆👆👆👆👆👆👆👆👆

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

----------------------------------------------

🔹पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क🔹

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

डिजिटल बँनर मुडाणा चिकटवतांना गजानन गोपेवाड

 *🔰जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा, या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम*


      👇

 ◼️https://chandrapursaptarang.in/news/11188

सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

गणिताचा श्रीगणेशा श्रीनिवास रामानूज

▪️गणिताचा श्रीगणेशा – श्रीनिवास रामानूज https://www.purogamisandesh.in/news/19029 👆👆👆👆👆👆👆👆👆 ✒️लेेखक:-गजानन गोपेवाड (पदवीधर शिक्षक) जि, प, केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा, पंचायत समिती महागांव, जि, यवतमाळ ---------------------------------------------- 🔹पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क🔹

शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

सुदर्शन न्युज विद्यार्थी सत्कार गजानन गोपेवाड बातमी

*यवतमाळ । वन विभाग परिक्षेत्र महागाव यांच्या वतीने पक्षी सप्ताहाचे आयोजन । News15 मराठी* *👇🏻पहा सविस्तर👇* https://youtu.be/u8OBsURdBN0 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा...* *📲👉🏻 प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*

विद्यार्थी सत्कार गजानन गोपेवाड

▪️पक्षी सप्ताह निमित्त मुडाना येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार https://www.purogamisandesh.in/news/18892 👆👆👆👆👆👆👆👆👆 ✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क) ---------------------------------------------- 🔹पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क🔹

रविवार, १३ डिसेंबर, २०२०

विद्यार्थी विद्यानिकेतन प्रवेश पत्र देताना गजानन गोपेवाड

 जि.प.उच्च प्राथमिक शाळा मुडाणा येथील पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन  गुणवत्ता यादीत स्थान मिळवून यशस्वी झाले आहेत.तीन मुली व दोन मुले परीक्षेत उत्तीर्ण झाले असून दोन मुलांना शासकीय विद्यानिकेतन केळापूर येथे प्रवेशासाठी नियुक्ती पत्र आले ते पत्र अमोल विशाल जाधव व साहील शरद पवार या विद्यार्थ्यांना व पालकांना सुपूर्द करण्यात आले.. त्यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, मुख्याध्यापक अवधुतराव वानखेडे, रामलाल जाधव प.शि., गजानन गोपेवाड प.शि.,पी.डी.राठोड वर्गशिक्षक उपस्थित होते.🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

वाचण प्रेरणा दिवस 15/10/2020

 1)गट क्रमांक::1

वर्ग,1*5 https://forms.gle/JnaQkDfG8HkVfGGF9

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,


2)गट क्रमांक ::2

वर्ग :6*8


https://docs.google.com/forms/u/0/d/1jFhh_9zy-HmaSUiUuyYhme7GeertIafAHBKNbY6ooRs/viewform?edit_requested=true

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गट क्रमांक :3

वर्ग :9*10

https://docs.google.com/forms/u/0/d/1urxBFkzTqaLJrNXKg07gOJJObmUDu5P_vM-w_ZzJ2FM/viewform?edit_requested=true

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ,,,,,,,,,,,,  ,,

वाचण प्रेरणा दिवस, पेपर संच, यामध्ये, वाचन हेच मुख्य उद्देश्य आहे, 



,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,भारतरत्न डॉ ए, पी, जे, अब्दुल कलाम सर यांचे जयंती निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात येत आहे .

,,,,,,,,,,यामध्ये प्रश्न संच गट क्रमांक ,

1) वर्ग 1ते 5 हा एक गट

2), वर्ग, 6/8 हा एक गट,

3)वर्ग 9/10 हा एक गट 

4)परिक्षा वेळ सकाळी ठिक ,9:00 ते रात्री 9:00

5)परिक्षा दिनांक 15'/10/2020

6) सकाळी 9:00 वा सुरु करण्यात येत आहे व रात्री ठिक 9:00 वा बंद .करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी .

7)इ मेल टाकणे बंधनकारक कारण प्रमाणपत्र ईमेल वर पाठवण्यात येणार आहे . 

8)पेपर फक्त एकदाच सोडवणे, परत परत सोडवू नये.

9)पेपर सोडून झाले की, सदर पेपर आपल्या वर्ग मित्रांना शेअर करा, इतरांना *वाचन प्रेरणा दिवस या निमित्ताने साजरे करुयात.*


🌷आयोजन🌷 

गजानन गोपेवाड

 राज्य समन्वयक महाराष्ट्र 

अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (यवतमाळ)

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

आदरणीय जिल्हा समन्वयक सविता माळी जिल्हा समन्वयक रत्नागिरी यांची बातमी

 *◼️अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र चा वाचन प्रेरणा दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम*


     👇

 https://chandrapursaptarang.in/news/9463


      ◦●◉✿ *चंद्रपूर सप्तरंग* ✿◉●◦

*ll न्यूजपेपर ll ई पेपर ll वेब साईट ll*

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

जिल्हा समन्वयक गुलाब बिसेन कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक यांची बातमी

 अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या कोल्हापूर जिल्हा समन्वयकपदी गुलाब बिसेन http://newsprabhat.in/?p=28511

         👆🏻👆🏻 *क्लिक करें*  👆🏻👆🏻

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

                   🚨🚨🚨


      🔥 *www.newsprabhat.in* 🔥


🌍 *न्यूज डिजिटल न्यूज नेटवर्क* 🌍

        🌴🌳🌱 😷🌱🌳🌴

निवड करण्यात आले असे विभाग प्रमुख जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयक यांना निवड पत्र वितरण सोहळ्यात सहभागी झाले होते

 ▪️अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्रचा निवडपत्र वितरण सोहळा

 https://www.purogamisandesh.in/news/12275

👆👆👆👆👆👆👆👆👆

✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

नारायण भिलाने तालुका समन्वयक निवड प्रमाणपत्र बातमी

 अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या साक्री तालुका समन्वयकपदी नारायण भिलाणे यांची निवड…. https://newsprarambh.in/?p=6262

सविता माळी जिल्हा समन्वयक रत्नागिरी अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पदी निवड बाबत बातमी

 *◼️अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र चा निवडपत्र वितरण सोहळा संपन्न*


    👇

 https://chandrapursaptarang.in/news/9183


       ◦●◉✿ *चंद्रपूर सप्तरंग* ✿◉●◦

*ll न्यूजपेपर ll ई पेपर ll वेब साईट ll*

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

आँनलाईन शिक्षणाचा लागला लळा गजानन गोपेवाड

 ▪️ऑनलाईन शिक्षणाचा लागला लळा

 https://www.purogamisandesh.in/news/11282

👆👆👆👆👆👆👆👆👆

▪️पुरोगामी संदेश व मराठी साहित्य मंच आयोजित विशेष उपक्रमातील लेख

---------------------------------------------

✒️लेखक:-गजानन गोपेवाड, राज्य समन्वयक

अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य

----------------------------------------------

🔹पुरोगामी संदेश न्युज 

आँनलाईन शिक्षणाचा लागला लळा

 ▪️ऑनलाईन शिक्षणाचा लागला लळा

 https://www.purogamisandesh.in/news/11282

👆👆👆👆👆👆👆👆👆

▪️पुरोगामी संदेश व मराठी साहित्य मंच आयोजित विशेष उपक्रमातील लेख

---------------------------------------------

✒️लेखक:-गजानन गोपेवाड, राज्य समन्वयक

अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य

----------------------------------------------

🔹पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क🔹

आदरणीय विद्या नाईक विभागीय समन्वयक कोकण यांच्या कविता

 [9/16, 5:31 PM] विद्या नाईक वसई ( पालघर): जुन्या वहीची पानं चाळताना

मोरपीस हातात पडतं

मोरपीस गालावर फ़िरताना

आठवणींशी नातं जडतं


या आठवणींत बुडुन जाताना

आजचं नाही उरत भान

क्षण ते परत ना येतील आता

तीच होती सुखाची खाण


आठवणी असतात अनेकांच्या

तुमच्या, माझ्या, सर्वांच्या

प्रत्येकाची असते एकतरी आठवण

दु:खाची अथवा सुखाची साठवण


माझ्याही आहेत अशाच आठवणी

पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या

जीवन झाल्या त्याच आठवणी

सुवर्णरुपी गतकाळाच्या


ह्रुदयात या रुजुनि गेल्या

काही त्यातल्या बुजुनही गेल्या

मनात काहींनी घर केले

पण...

क्षण आता ते उडुन गेले


आठवणी आठवाव्या लागत नसतात

आपोआप त्या आठवत असतात

पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे

सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात

[9/16, 5:33 PM] विद्या नाईक वसई ( पालघर): पाणी या एका शब्दावरून  विविध अर्थनुरूप केलेलं काव्य

'पाणी'शब्द हा असे प्रवाही

वळवू तिकडे वळतो हा

जशी भावना मनात असते

रूप बदलते कसे पहा


नयनामध्ये येते'पाणी'

अश्रू तयाला म्हणती

कधी सुखाचे,दुःखाचे कधी

अशी तयांची महती


चटकदार तो पदार्थ दिसता

तोंडाला या'पाणी'सुटते

खाता खाता ठसका लागून

डोळ्यांतून मग 'पाणी' येते


धनाढ्याघरी लक्ष्मी देवी

म्हणती अविरत 'पाणी'भरते

ताकदीहूनी वित्त खर्चिता

डोक्यावरूनी 'पाणी'जाते


वळणाचे 'पाणी' वळणावरती

म्हण मराठी एक असे

बारा गांवचे 'पाणी' प्याला

चतुराई यातूनी दिसे


लाथ मारूनी'पाणी'काढणे

लक्षण हे तर कर्तृत्वाचे

मेहनतीवर 'पाणी' पडणे

चीज न होणे कष्टाचे


उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो

'पाण्या'त पाहणे गुण खोटा

'पाणी'दार ते नेत्र सांगती

विद्वत्तेचा गुण मोठा


शिवरायांनी कितीक वेळा

शत्रूला त्या 'पाणी'पाजले

नामोहरम करून अपुले

मराठमोळे 'पाणी'दाविले


टपोर मोती दवबिंदूचे

चमचम 'पाणी'पानावरती

क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे

अळवावरचे अलगद 'पाणी'


कळी कोवळी कुणी कुस्करी

काळजाचे'पाणी'होते

ओंजळीतूनी 'पाणी'सुटता

कन्यादान...पुण्य लाभते


मायबाप हे आम्हां घडविती

रक्ताचे ते 'पाणी'करूनी

विनम्र होऊन त्यांच्या ठायी

नकळत दोन्ही जुळती 'पाणि'


आभाळातून पडते 'पाणी'

तुडुंब,दुथडी नद्या वाहती

दुष्काळाचे सावट पडतां

सारे'पाणी..पाणी'करती


अंतीम समयी मुखात 'पाणी'

वेळ जाणवे निघण्याची

पितरांना मग 'पाणी' देऊन

स्मृती जागते आप्तांची


मनामनांतील भावनांचे

'पाण्या'मध्ये मिसळा रंग

प्रतिबिंबीत हे होते जेव्हा

चेहर्या‍वरती उठे तरंग

[9/16, 5:37 PM] विद्या नाईक वसई ( पालघर): एक विनंती आहे...

दूरच जायचे असेल तर...

 जवळच येऊ नको...!

busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर ...

वेळच देऊ नको...!


एक विनंती आहे...

साथ सोडुन जायचचं असेल तर...

हाथ पुढे करुच नको ...!

मनातुन नंतर उतरवायचचं असेल तर...

मनात आधी भरुच नको...!


एक विनंती आहे....

चौकशी भरे,call,काळजी वाहू,sms यांचा कटांळाच येणैर असेल तर ...

कोणाला नंबर देऊ नको...!

Memory full झालिये सांगून delete च करायचा असेल तर...

नंबर save च करु नको...!


एक विनंती आहे...

मौनर्वत स्वीकारायचं असेल तर...

आधी गोडगोड बोलूच नको...!

Secrets share करायचीच नसतील तर...

मनाचं दार उघडूच नको...!


एक विनंती आहे...

माझ्या काळजी करण्याचा ञासच होणार असेल तर...

अनोळखी होऊनचं वागायचं असेल तर...

माझ्याबद्दल सगंळ जाणून घेऊचं नको...!


एक विनंती आहे...

अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर...

आधी डाव मांडूच नको...!

रागावून निघून जायचचं असेल तर...

आधी माझ्याशी भांडूच नको...!

एक विनंती आहे...

सवयीच होईल म्हणून तोडायच असेल तर...

कृपया नातं जोडून नको...!

फाडून फेकून द्यायचं असेल तर...

माझ्या मनाचं पान उलगडूच नको....!!


सौ विद्या नाईक

पालघर विरार

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा देत आहे आपला गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र

 [9/5, 1:13 AM] सत्यमेव जयते: ▪️आजचे गुरूजी हाय टेक

 https://www.purogamisandesh.in/news/10214

👆👆👆👆👆👆👆👆👆

✒️लेखक:- गजानन गोपेवाड, राज्य समन्वयक महाराष्ट्र

----------------------------------------------

🔹पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क

[9/5, 1:13 AM] सत्यमेव जयते: ▪️जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले…

 https://www.purogamisandesh.in/news/10218

👆👆👆👆👆👆👆👆👆

✒️लेखक:-गजानन गोपेवाड

         राज्य समन्वयक महाराष्ट्र

----------------------------------------------

🔹पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क🔹

शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा देत आहे आपला गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र दिनांक 5/09/2020

 [9/5, 1:01 AM] सत्यमेव जयते: 📲 *शिक्षकदिन विशेष - आजचे गुरूजी हाय टेक......*


✒️ *लेखक - गजानन गोपेवाड*

▪️ *राज्य समन्वयक महाराष्ट्र*


https://aamchavidarbha.blogspot.com/2020/09/Teachers-Day-Special-Todays-Guruji-Hi-Tech.html



🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*वाचकांना आवाहन - कृपया बातम्या शेयर करा*

अधिकाधिक वाचकांपर्यत बातम्या निःशुल्क पोहोचविण्यास मदत करा. 

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


👇👇

*आमचा विदर्भ*

[9/5, 1:01 AM] सत्यमेव जयते: *◼️वैचारीक लेख :-*

*◼️जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले..*

*◼️✍️ गजानन पोपेवाड, गोंदिया*


  👇

 https://chandrapursaptarang.in/news/8004


      ◦●◉✿ *चंद्रपूर सप्तरंग* ✿◉●◦

*ll न्यूजपेपर ll ई पेपर ll वेब साईट ll*

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

आज भारतीय क्रिडा दिनाच्या निमित्ताने हार्दीक शुभेच्छा देत आहे गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र

 🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏃‍♀🏃‍♂🏌‍♂️🏂⛷️🏇🤺🏌‍♀️🏄‍♂🏋‍♂🏋‍♂🚴‍♀🚴‍♂🏋‍♀🤼‍♂🤸‍♀🤸‍♂🤼‍♀🤽‍♂🤽‍♀


आज दिनांक 29/08/2020 *भारतीय क्रिडा दिन व मेजर ध्यानचंद जन्मदिन* संपूर्ण भारतात क्रिडा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे, 

यवतमाळ जिल्ह्यातील क्रिडा शिक्षक व विद्यार्थी यांना क्रिडादिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे 

आपण आपल्या शाळेच नाव लौकिक करावे त्या सोबतच आपल नाव पण,,,, आरोग्याच्या दृष्टीने पण कसरत करने गरजेचे आहे.  

आपणास क्रिडा क्षेत्रातील नाव उंचावण्यासाठी सुभेच्छा ❗❗

 सूभेच्छुक 

शिक्षणाधिकारी 

जिल्हा परिषद यवतमाळ 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ 

अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य परिवार

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

शिक्षक वैचारिक लेख दिनांक 26/8/2020

 *◼️वैचारीक लेख :-*

*◼️जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले..*

*◼️✍️ गजानन पोपेवाड, गोंदिया*


  👇

 https://chandrapursaptarang.in/news/8004


      ◦●◉✿ *चंद्रपूर सप्तरंग* ✿◉●◦

*ll न्यूजपेपर ll ई पेपर ll वेब साईट ll*

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

डॉ ए पी जे अब्दूल कलाम यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या शिक्षक शिक्षिका यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे

 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇

*डॉ, ए पी अब्दुल कलाम सर यांचे पाचव्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 27/07/2020 ला विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या ऊपक्रमशील शिक्षक/शिक्षिका ,व विद्यार्थी यांची नावे व क्रमांक जाहिर करण्यात आनंद होत आहे. आपणाकडुन असेच दर्जेदार नवोपक्रम घडोत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे* 

                 

                  *_धन्यवाद_* ❗


1)   *_नरेश सिद्धार्थ रामटेके_* 

       (विषय शिक्षक )

 शाळा : *जि प उच्च प्राथ.शाळा नांदळी* 

प स कोरची, जि गडचिरोली 


       ( प्रथम क्रमांक) 


2)  *_संदीप मधुकरराव कोल्हे_*

           (सहाय्यक शिक्षक )

 शाळा :: *जि प प्राथ.शाळा सुकळी* 

*प स कळंब जि यवतमाळ* 

     

        ( प्रथम क्रमांक) 



3)   *_अविनाश काशिनाथ पाटील_*


शाळा :: *बापूसाहेब डी.डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी* *ता.धुळे जि. धुळे*

    

        (प्रथम क्रमांक) 


 

4)   *_हेमराज फकिरा अहिरे_* 

 शाळा :: *महादेव आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा अनेर डॅम* 

*तालुका. शिरपूर .जिल्हा धुळे* 

     

           (प्रथम क्रमांक) 




5)  *_सिंधू महेश मोटघरे_*

       (पदवीधर शिक्षक)

शाळा :: *जी.प .व. प्रा. शाळा*

  *तुमखेडा बु. ता.गोरेगाव जि.गोदिया* 

     

         ( प्रथम क्रमांक) 



 

6)  *_हुमेंद्र रमेश चांदेवार_* 

शाळा :: *जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा परसोडी,* 

*पं स सडक अर्जुनी,जिल्हा गोंदिया* 


          (प्रथम क्रमांक) 



7)   *_दामोधर डहाळे_*

शाळा::  *जि प पुर्व माध्य,शाळा मांडवी* 

      

            (प्रथम क्रमांक) 


8)    *_सुशांत प्रभाकर जगताप_*


शाळेचे नाव : *सर्वोदय माध्यमिक विदयालय गुढे,*

 *ता.भडगांव . जि . जळगांव*

     

             (प्रथम क्रमांक) 




9)   *_निलेश दिवाकर गिरडकर_* 

(विषय शिक्षक )

शाळा :: *जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मलेरा* 

*पं स मूलचेरा जिल्हा गडचिरोली* 


          (प्रथम क्रमांक) 



10.)   *_भारती दिनेश तिडके_*

                  (पदवीधर शिक्षिका) 

शाळा :: *जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घुमराऀ,* 

*पंचायत समिती गोरेगाव जिल्हा गोंदिया.*

      

                 (प्रथम क्रमांक) 


11)  *_जयश्री विजय खोण्डे._*

.(माध्यमीक शिक्षिका) .

शाळा :: *धर्मराव कृषी विध्यालय.* *अहेरी तालुका अहेरी* *जिल्हा*गडचिरोली*   


       (प्रथम क्रमांक) 



12)  *_अविनाश रमेश खैरनार_*


शाळा :: *सर्वोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हेंदरुण मोघन* 

*ता.धुळे, जि .धुळे*


        (प्रभम क्रमांक) 


 *खालील सहभागी विद्यार्थी क्रमांक प्राप्त आहे* 


1)  _दिपाली लक्ष्मण गवळी (10वी)_ 

  ( प्रथम क्रमांक) 


2)  _चेतन गोकुळ पाटील (10वी)_

      (द्वितीय क्रमांक )



13)   _रोशनी राजाभाऊ दाते_

      (पद::प्राथ शिक्षिका )

 

शाळा :: *जि प उ प्राथ शाळा भिमपूर,*  

*ता- कोरची, जिल्हा- गडचिरोली*


         (प्रथम क्रमांक) 


14)   *_नारायण पुंडलिक भिलाणे_* (माध्यमिक शिक्षक)

 शाळा :: *नूतन माध्य.विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय दोंडाईचा* 

*ता. शिंदखेडा जि. धुळे*


           (प्रथम क्रमांक) 



15)    *_मंजुषा सिद्धार्थ नंदेश्वर_*  (पदवीधर शिक्षिका)

 शाळा:: *जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव* 

*केंद्र देव सर्रा*

 *तालुका. तुमसर .जिल्हा भंडारा.*


          (प्रथम क्रमांक )


*कुमारी संजीवनी बनकर*

         (तृतीय क्रमांक) 


 *कुमार अमर सात देवे* 

       (प्रथम क्रमांक )


 प्रिया , दिव्या, संजीवनी 

    (अनुक्रमे सहभागी प्रमाणपत्र)


  *कुमार वेदांत  चौधरी*

         (व्दितीय क्रमांक) 




      *कुमार गिरीश इठुले*

         (सहभागी प्रमाणपत्र) 



16)   *_राजेंद्र धर्मदास बन्सोड_*


शाळा :: *जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा*

*पंचायत समिती गोरेगाव*

*जिल्हा परिषद गोंदिया*


        (द्वितीय क्रमांक )




17)  *_दत्तात्रय जालिंदर गव्हाणे_*

(प्रभारी मु.अा.)

शाळा :: *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव ताडजिल्हा. देऊळगाव.*

*तालुका.भोकरदन जिल्हा.जालना*


            (प्रथम क्रमांक) 


18)   *_राजश्री दयानंद कांबळे._* 

     (पद -उपशिक्षिका) 

शाळा :: *जि. प. प्राथ. केंद्रशाळा अहिरे* 

*ता. खंडाळा जि, सातारा* 


       (प्रथम क्रमांक) 


टिप ::नाव व शाळा नाव, व ईतर माहिती हि तपासून बघावी जेणेकरून प्रमाणपत्रावर चुका होणार नाही, नंतर एकदा प्रमाणपत्र दिले तर परत दुरूस्ती करून मिळणार नाही व नजरचुकीने कुणी राहिले असतील अशांनी लक्षात आणून द्यावी ही नम्र विनंती आहे 

→_→→_→→_→→_→→_

 *अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य*


1)गजानन गोपेवाड 

राज्य समन्वयक महाराष्ट्र 

2)जयश्री शिरसाठे 

महिला राज्य समन्वयक महाराष्ट्र 

३) ओंकार चेके 

निवड समिती सदस्य 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

जागतिक छायाचित्रकार दिवस निमित्ताने माझा लेख

 🔘 *📸जागतिक छायाचित्र दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या !*



*◼️ प्रासंगिक लेख*

*◼️✍️ गजानन गोपेवाड*

  👇

 https://chandrapursaptarang.in/news/7732

◦●◉✿ ᴄʜᴀɴᴅʀᴘᴜʀ sᴀᴘᴛʀᴀɴɢ ✿◉●◦

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

जागतिक स्तनपान दिवस निमित्ताने जनजागृती लेख लिहिला आहे आदरणीय सर्व मातेस अर्पण करण्यात येत आहे धन्यवाद आपला गजानन गोपेवाड

[8/1, 7:19 AM] 🇾🇪सत्यमेव जयते 🇾🇪: 🔸जीवनामृत जागतिक स्तनपान दिवस
 https://www.purogamisandesh.in/news/7484
👆👆👆👆👆👆👆👆👆
           🔸प्रासंगिक लेख🔸
✒️लेखक:-गजानन गोपेवाड
अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र
----------------------------------------------
🔹पुरोगामी संदेश न्युज
[8/1, 7:19 AM] 🇾🇪सत्यमेव जयते 🇾🇪: https://www.publicpanchanama.com/2020/07/blog-post_367.html?m=1

*जिल्हा - प्रतिनिधी*
      *विलास मोहिनकर*

जागतिक स्तनपान दिवस या निमित्ताने माझा लेख समस्त आई स अर्पण करण्यात येत आहे

*◼️ प्रासंगिक लेख :-*
*◼️ “जीवनामृत जागतिक स्तनपान दिवस”*
*◼️✍️ गजानन गोपेवाड, यवतमाळ*
     *अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य* https://chandrapursaptarang.in/news/6773

जागतिक स्तनपान दिवस निमित्ताने जनजागृती लेख लिहिला आहे

"जीवनामृत जागतिक स्तनपान दिवस"—गजानन गोपेवाड https://newsprarambh.in/?p=3031

मंगळवार, २८ जुलै, २०२०

डॉ ए पी जे अब्दूल कलाम यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दिनांक 27/7/2020

1)रोषनी दाते
पं. स. कोरची 

2)निलेश  गिरडकर 
पं स मूलचेरा 

3)सुशांत जगताप 
पं स, भडगाव 

4)दामोधर डहाळे
प,स तुमसर

5)संदिप कोल्हे 
पं स कळंब

6)हूमेंदं चांदेवार 
पं स सडक अर्जुनी 

7)निलेश रामटेके 
पं स कोरची

8)हेमराज अहिरे 
पं स शिरपुर

9)सिंधू मोटधरे 
पं  स मोरेगांव

10)अविनाश खैरनार 
पं स धुळे 

11)नारायण भिलाने
पं स साक्री 

12)अविनाश पाटिल
पं स धुळे

शनिवार, २५ जुलै, २०२०

डाँ, कलाम सरांच्या पुण्यतिथि निमित्ताने महाराष्ट्र राज्य मध्ये उपक्रम घेण्यात येणार आहे

🔥अग्निपंख फाऊंडेशन च्या सर्व उपक्रमशील शिक्षकांसाठी एक सुवर्ण संधी 🔥🔥🔥
   दि. 27 जुलै ला डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी निमित्त आपल्यासर्वांसाठी एक महत्वपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्याला 27 जुलै ला डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त सध्या लाकडाऊन असल्याने सर्व नियमांचे पालन करित आपापल्या परीने कार्यक्रम घेऊन त्याचा व्हिडीओ, सोबत आपलं पुर्ण नाव, शाळेचे नाव, मोबाइल क्रमांक व इमेल सह खाली दिलेल्या क्रमांकावर  सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत दिलेल्या नंबरवर पाठवायचं आहे.
 प्रत्येक तालुक्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
  सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे रराज्यसमन्वयक अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य
क्र 9423414686
--------—-------------------
गजानन गोपेवाड राज्यसमन्वयक अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य 
 क्र. 7378670283

गुरुवार, २३ जुलै, २०२०

पहाटेची अमर्याद ताकद

*पहाटेची अमर्याद ताकद*...💪💪💪

*तुम्ही सकाळी किती वाजता उठता?*
 
झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं!

मोठी माणसं सांगायची,
*“लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे !”*
आणि ते खरं आहे, 

*हेल एरॉल्ड* नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती.

पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.

पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?

*“हेल, तु सकाळी लवकर उठ!”* “बाकी सगळं आपोआप होईल”
या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, 
काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन *त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली,*

आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!

*पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का?*

इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय.

*"S-A-V-E-R-S"*

*ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत.*

१) *Silence – (ध्यान)*

- शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!

- स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!

- मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!

- मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!

- माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!

- अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान! 

२) *Affirmations – (सकरात्मक स्वयंसूचना)*

- अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!

- स्वतः स्वतःला सुचना देणं,

- प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!
- येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!

*- स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.*

- अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.

- आपले पूर्वज म्हणायचे, शुभ बोल नाऱ्या!..किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलु तसेच घडते, जिभेवरचे देवता तथास्तु म्हणते, वगैरे वगैरे 

- या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, ह्यामागे मनोविज्ञान आहे.

*- एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?* 

- वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!... 

३) *Visualize – (चांगल्या कल्पना मनात घोळवणे.)*

तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!

*- कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.*

- कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.

- दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.

- पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.

- ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे. 

- मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.

- प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, *“यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!”* 

४) *Exercise – (व्यायाम)*

*- शरीरातून आळसाला पळवून  लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम!*

*- शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!*

*- व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त मैथुनाकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.*

- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  

- तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.

- ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा. 

- शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

५) *Reading – (वाचन)*

*- पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.* 

- पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.

*- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.*

६) *Scribing – (लिहिणे.)*

- माझे ठाम मत आहे, की माझ्या आयुष्यातल्या खडतर काळात मी जर लिहीत राहीलो नसतो तर मी आज जिवंत राहीलो नसतो.

*- लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.*

- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.

- लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.

- म्हणून संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.

*- लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.*

*- लिहिल्याने विचार पक्के होतात.*

*- सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,*

- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत,

- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.

- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,

- आणि रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.

*- लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!*

- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.

- अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

*ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे.*

*वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत.*? 
 
मला ह्या सगळ्या सवयींचा खूप खूप फायदा झाला .
तुम्हालाही ह्या सवयी उपयुक्त ठरतील.

सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने म्हणा, पण आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे...तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे...
कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो...आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत..
तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू....
अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.....
वेळ आहे स्वतःवर काम करण्याची....स्वतःसाठी जगण्याची.....आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याचा.. 

*काळजी घ्यायची आहे,काळजी करायची नाही.*
आपला
गजानन गोपेवाड 
राज्य समन्वयक महाराष्ट्र 

बुधवार, २२ जुलै, २०२०

"अस्तित्व "तु भिकारी नाही व्यापारी आहेस

*💫अस्तित्व💫*


✨ *_तू भिकारी नाही व्यापारी आहेस....!_*✨

👆एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसले, ते होते, *महामानव विश्ववरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर.* त्यांना पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा माणूस बराच श्रीमंत दिसतो, यांना भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी त्यांच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्यांना भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून *डॉ. बाबा साहेब आंबेडकर* म्हणाले :-  *_“तू तर नेहेमी इतरांना काहीना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला कांही देतोस तरी का?”_*

*डॉ. बाबा साहेब आंबेडकर* म्हणाले :- 
 तेव्हा तो भिकारी म्हणाला :-  *_“साहेब, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागत फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?”_*
 
*बाबा साहेब आंबेडकर* म्हणाले :- 
 *_"अरे, तू जर कुणाला कांहीच देऊच शकत नाही, तर तुला भीक मागण्याचाही कांही अधिकार नाही. मी स्वतः वकील आहे, आणि माझा व्यवसाय लोकांना सल्ला देण्याचा व बदल्यात मोबादला घेण्याचा आहे. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन.”_* साहेब उत्तरले.

इतक्यात स्टेशन आले आणि साहेब स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी साहेबांच्या बोलण्यावर विचार करू लागला. साहेबांनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की साहेब म्हणाले ते बरोबर असावे. मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना कांही ना कांही दिल्याशिवाय केवळ भिकच मागत राहायची?
बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भिक घालील त्याला कांही ना कांही मी जरूर देईन. पण काय द्यायचे? *_जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे, ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल?_*

 दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता, पण त्याला उत्तर सापडत नव्हतं.
विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेव्हढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली.
तो गाडीत शिरला आणि नेहेमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कुणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे. ती सुगंधी, ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली.
कांही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे. तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक त्याला भीक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असतांना त्याला तेच सुटाबुटात *महामानव डॉ.भीमराव आंबेडकर* पुन्हा दिसले. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला :- *_“साहेब, आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत. तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन._*  साहेबांनी त्याला कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून साहेब खुश झाले होते. ते म्हणाले :- *_“व्वा! क्या बात है? आज तू ही माझ्यासारखा एक व्यावसायिक झालास.”_* एव्हढं बोलून साहेब गाडीतून स्टेशनवर उतरून निघुन गेले. पण त्या साहेबांनी बोललेले एक वाक्य, *_“आज तू ही माझ्यासारखा एक व्यावसायिक झालास?",_*  भिका-याच्या मनात घर करून गेलं. तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.
विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, *_“नाही, मी भिकारी राहिलेलो नाही व्यावसायिक आहो, व्यावसायिक. मी सुद्धा त्या साहेबांन सारखा एक छान व्यावसायिक होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो.”_* आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.
साधारणपणे एक वर्षा नंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार 🙏केला आणि स्मितहास्य😊 करीत विचारले :- *_"ओळखलंत मला साहेब?_*
आता त्याच्याकडे पाहत *डॉ. भीमराव आंबेडकर* उत्तरले :- *_“नाही, मला कांही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत.”_*
पहिला :-  *_“नाही, नाही! साहेब. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत.”_*
*डॉ. भीमराव आंबेडकर* :-  *_“असं? मला तर कांही आठवत नाहीये. या आधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो?”_*
पहिला माणूस हसून उत्तरला :-  *_“ह्या आधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्याच स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितले. आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितले होते. आठवतंय?”_* 🌹 *_"आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यवसाईक झालोय आणि माझ्या_* *_व्यावसाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय._*
*_पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला कांही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं कांही तरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे._* *_मीच मला नेहेमी भिकारी समजत राहिलो. यापलीकडे मी कांही विचार केलाच नव्हता._* *_दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं. आणि मग मात्र मला असं पक्केपणे वाटू लागलं की मी भिकारी नाही,_* *_व्यावसायिक आहे. हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवलात. आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय.”..._*🌹🌹🌹

*👉तुम्ही स्वतः कडे कसं बघता यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे...👈👍*

*🤳उठा आणि कामाला लागा ..🤳*
*🤳नशिबाला उगचं दोष देत बसू नका...🙂🤳*
(हे लिखाण *अस्तित्व* ह्या विश्ववरत्न महामानव डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या लेखनीतून  घेतलेले आहे. जे 1980 साली न्यू- यार्क टाइम मधे *उद्योग व नेतृत्व*  ह्या लेखात प्रसिद्ध झाले होते.) 
*उद्योगसंस्कार*
आपला 
गजानन गोपेवाड
राज्य समन्वयक महाराष्ट्र 

शनिवार, १८ जुलै, २०२०

हुशार लग्नानंतर मुली जातात कुठ?

*लग्नानंतर कुठे* 
*जातात या टॉपर मुली..?*

सगळ्याच गोष्टीत मूल पुढे आहेत.
मग ९०ते ९९% मार्क घेऊन *मुली जातात तरी कुठे..?*

मुली दहावीत टॉप..
बारावीत टॉप..
Engineering, MBBS, LLB, MBA, CA, CS, उत्कृष्ट खेळाडू ...
सगळ्या गोष्टीत मुली टॉप.

मग बहुतांश तज्ज्ञ आणि हुशार लोकांनाच प्रश्न असतो 
*कुठे जातात या टॉपर मुली..?* 

आज उत्तर देतो ...

त्या इकडेच असतात तुमच्या आजूबाजूला पण दिसत नाही कारण...
त्या *नाती* सांभाळत असतात, 
कोणी हातात बाळ घेऊन जगण्याशी लढत असतात, 
कोणी नवऱ्याचे डबे बनवत असतात आणि कोणी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी सुद्धा होत असतात....

*मुलींचं शिक्षण आपल्या आई वडिलांकडे असतात तोवर सुरळीत होत असते,*
 घरात कसलीही जबाबदारी नाही मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या करिअर संबंधी खूप विचार करतात, पैसा ओततात पण..
 मग २५ वय होताच अचानक लग्न होतं आणि 
*तिकडून टॉपर मुली गायब होण्यास सुरवात होते...*

काल क्लासेस वरून निघत असताना कित्येक वर्षाने एक मैत्रीण भेटली १ वर्षाच्या मुला सोबत तिला पाहून मी आश्चर्यचकित झालो..
इकडच्या-तिकडच्या गोष्टी करून तिने विचारलं 
तुझ्या क्लास मध्ये एखादा विषय आहे का शिकवायला, मी घेत जाईल क्लास, कमी पगार असला तरी चालेल"

हे ऐकून विचारात पडलो
अत्यंत हुशार, शाळेत कायम पहिली, कधी कुणाशी वैर नाही की कोणत्या मुलाशी भानगड नाही...

आई वडिलांनी भरपूर पैसे खर्च करून शिकवलं, मोठे क्लासेस, चांगले कॉलेज मधून शिक्षण ही भविष्यात काहीतरी करणार अशी सगळ्यांची आशा... असलेल्या मुलीची अशी अवस्था पाहून धक्काच बसला.
खूप विचारपूस केल्यावर समजलं तिच्या आई वडिलांनी खूप पैसा असलेल्या मुलाशी लग्न लावून दिलं,
 *लग्न नंतर शिकू देऊ, नोकरी करू देऊ सांगून लग्न लावून दिलं..*

पण घरात बायकोला थोडेफार पैसे देऊन सगळा हिशोब मागायचा... 

शिक्षण-नोकरी तर लांब राहिली स्वयंपाक आणि घरातली कामं यावरून तिची पारख होण्यास सुरुवात झाली..
*कारण लग्नानंतर सासरच्या लोकांसाठी टॉपर, हुशार, शिक्षण या सर्व गोष्टीं शून्य असतात* 

पण स्वयंपाक येत नसेल तर काय उपयोग एवढं शिकून..? साधा स्वयंपाक येत नाही... असा प्रश्न करतात

मग तिने कसतरी घरचं काम शिकून नोकरी करण्यास सुरुवात केली..

पण नंतर 
*खुशाल नोकरीवर जातेस सगळी कामं माझ्या आईला करावी लागतात* भांड्यांना साबण तसाच असतो,भाजीत केस निघाला.

 मी एवढी वर्षे संसार केला पण कधी भाजीत खडा निघाला नाही.
डोळे खाली करून बोलायचं, मोठ्या आवाज नको..??

मुल होण्यासाठी घाई केली आणि त्यात पूर्ण अडकवून दिलं, घरात रोजचे पाहुणे, त्यांचं आगत स्वागत, बाळाचा सांभाळ या सगळ्या चक्रव्यूहात अडकून गेली होती ती बाजूला राहील ते तीच शिक्षण आणि हुशारी...
कागदाचे तुकडे बनून राहिल्या होत्या तिच्या सर्व डिग्र्या...

नंतर मनात विचार आला कोणी पोटातून तर शिकून येत नाही आणि कालपर्यंत शिक्षण आणि करिअर मध्ये गुंतलेल्या मुलींना सगळं शिकायला आणि नीट जमायला थोडा वेळ तर लागेल हे का कोणी समजून घेतं नाही..??

याउलट जर फक्त घर आणि परिवार सांभाळण्यासाठी मुलगी हवी असेल तर.. *एखादी दहावी नापास पण स्वयंपाक उत्तम येत असेल अश्या मुलीशी लग्न का नाही करत..??* 
चार लोकांमध्ये अपमान होऊ नये म्हणून शिकलेल्या  मुलीशी लग्न करायचं आणि मग भाजीत तेल जास्त, मीठ कमी, मसाला कमी, पोळ्या कडक किंवा भाजी पातळ यावरून तिच्या शिक्षणाचं आकलन का करायचं..??

कधी कधी विचार येतो 
*लता मंगेशकर* खरंच यांनी लग्न केलं नाही कदाचित म्हणून त्यांचा कर्तुत्वाला थांबवू शकलं नाही कोणी..? 
की *मेरी कोम*  च्या नवऱ्याने घरातली अगदी स्वयंपाकपासून ते बाळ सांभाळण्याची जबाबदारी उचलली म्हणून ती जिंकत गेली..?? 

पण आता सगळं लक्षात आल की कुठे जातात या टॉपर मुली...
असतात या आपल्याच आजूबाजूला, डोक्यावर पदर घेऊन सासुसोबत पूजेला जात असतात तर कोणी नवऱ्याचा मित्रांना चहा नाश्ता बनवत असतात... कधी त्या आपल्यातच असतात..!!!

*ह्या टॉपर मुलीं अजून टॉप वर जाऊ शकतात फक्त हवेत उडण्या आधी त्यांचे पंख छाटू नका..!!*
आपला 
गजानन गोपेवाड 

अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य 


🙏🙏🙏

साहित्य रत्न अन्नाभाऊसाठे स्मृतिदिन साजरा करणारा लेख

*साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे* 
*-गजानन गोपेवाड*

प्रासंगिक लेख सविस्तर वाचा
 https://www.nivedaknews.in/2020/07/18_19.html

© Nivedak Kaninde, Kinwat

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

🚩 *थोर साहित्यिक आण्णाभाऊ

: 🚩 *थोर साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन*💐🙏 🚩
            तुकाराम भाऊराव साठे हे आण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते. एक समाज सुधारक, लोक कवी, शाहीर आणि लेखक म्हणून ते नावा रुपाला आले; आण्णाभाऊ हे मार्क्‍सवादी आंबेडकरवादी विचाराचे  होते, आण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला, आण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा, कादंबरी हे साहित्य प्रकार त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत; त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या वैजंता ( 1961 )टिळा लाविते मी रक्ताचा, डोंगरची मैना माकडीचा माळ, मुरळी मल्हारी रायाची (1959) चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, (1970 )अशी ही सातार्‍याची तर्‍हा (1974 )अलगुज आणि फकिरा ( 1958  ) चौथी पर्यंत शिक्षण असुनही, आण्णाभाऊनी मराठी साहित्याजगतातील लोकवांग्मय, कथा,लोकनाट्य ,कादंबरी, चित्रपट, पोवाडे, लावण्या, तमाशा-वग, गवळण, प्रवास वर्णन असे अनेक लेखन प्रकार हाताळले आहेत; तमाशा या लोकनाट्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय आण्णाभाऊ साठे यांनाच जाते. सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी या साहित्य प्रकाराचा उपयोग करुन घेतला. स्वातंत्र्या नंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जनजागृती केली होती; त्यात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो,  गोवा मुक्ती संग्राम असो या चळवळींमध्ये त्यांनी आपल्या शाहिरीतून मोठे योगदान दिले आहे
 " माझी मैना गावाकडे राहिली,
 माझ्या जीवाची होतीया काहिली" 
ही त्यांची अत्यंत गाजलेली लावणी होती. 
            आण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियन भाषेतून भाषांतर करून, पोवाड्यातून रशिया पर्यंत पोहोचवले आहे, रशियन राष्ट्राध्यक्षा कडून त्यांचा सन्मान देखील झाला होता; आण्णा भाऊंनी आपल्या लेखणीमधून 21 कथा संग्रह 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्यात त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपट ही निघाले आहेत,"फकीरा"कादंबरीला 1961 मधे राज्यशासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे; ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांनी या कादंबरीचे कौतुक केले होते, कोळसेवाला, घरगडी ,खानकामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार ,मजूर, तमाशातला सोंगाड्या, अशा विविध भूमिका अण्णांनी प्रत्यक्ष जिवनात वठविल्या होत्या; आण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर (मुंबई) झोपडपट्टीत काढले, याच झोपडपट्टीत आण्णा भाऊंच्या एकापेक्षा एक कला कृतींची निर्मिती झाली होती मुंबईत गिरणी कामगारांचे कष्टमय दुःखाचे जीवन तसेच मुंबईच्या झोपडपट्टीत उघडे-वाघडे बकाल जगणे, त्यांच्या जगण्यातील भयान वास्तव त्यांनी पाहिले होते; त्यांचा भुकेकंगालपणा आणि भुकेची आग शांत करण्यासाठी  होणारी ससेहोलपट, अवैध मार्गाचा अवलंब या साऱ्या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या आणि ते विदारक आणि अद्भुत वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. शिक्षणा पेक्षा अनुभव हाच मोठा गुरु असतो या गोष्टीची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणा ही त्यांनी अनुभवला होता.1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावा खाली येऊन ते कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते झाले होते
    आण्णाभाऊंनी अन्याया विरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचे स्मरण करून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलना साठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली होती, शाहीर अमर शेख यांच्या समवेत त्यांनी काम केले होते; आण्णा भाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सुक्ष्म होती, नाट्यमयता त्यांच्या लेखन शैलीचा आगळा-वेगळा भाग होता ज्या उपेक्षितांच्या जीवनातून आण्णा भाऊनी अनुभूती घेतली त्यातील अनुभव त्यांच्या लेखनातून जाणवतात; आण्णा भाऊंचा शेवटचा काळ मात्र अत्यंत हलाखीत गेलेला आहे, दारिद्र आणि एकाएकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले होते; मराठी साहित्य प्रतिष्ठाना कडून त्यांची नेहमी उपेक्षाच झालीय; सुरवाती पासूनच लेखणी प्रस्थापित लोकांच्याच हातात राहीलेली आहे; त्यामुळे साहित्यात देखील एक वर्गाचीच मक्तेदारी आजही दिसून येतेय मराठी व नाट्य संमेलनाच्या आजपर्यंतच्या अध्यक्षांच्या नावाची यादी पाहिली तर ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते; असे बरेच साहित्यीक आहेत की,फक्त पाश्चात्य इंग्रजी साहित्याचे मराठीत भाषांतर केलेले आहे व तीच पुस्तके स्वत: च्या नावे प्रकाशीत करुन मराठी साहित्याचे नावाजलेले साहित्यीक म्हणून प्रसिद्धी करुन घेतलेली आहे;
परंतु आण्णा भाऊंमध्ये लेखणाची व स्वनिर्मितीची कला होती अशा या महान पण नेहमी दुर्लक्षित केलेल्या प्रतिभावंत लेखकाचे शेवटचे दिवस अत्यंत वाईट अवस्थेत गोरेगावच्या सिद्धार्थ नगर मध्ये व्यथित केले होते..!
    अनेक विद्यापीठातून आण्णा भाऊंच्या साहित्यावर अनेक प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत; त्यांच्या कथा, कादंबर्‍यांची तर केवळ भारतीयच नव्हे तर 22 परकीय भाषांत भाषांतरे झालेली आहेत, हजारो वाचकांनी त्यांच्या कथा कादंबर्‍याची अक्षरशः पारायणे केलीआहेत; त्यांच्या साहित्यातून प्रकट झालेले सर्व सामान्य माणसा विषयीची आंतरिक तळमळ व त्यांच्या सुखदुःखाचे चित्रण करण्याची ओढ वाचकांच्या मनाला भुरळ आजही घालतेच आहे,
           मुंबई नगरी ग बडी बाका l जशी रावणाची दुसरी लंका ll
  वाजतो ग डंका l
      डंका चहूमूलकी ll 
   या शब्दात पठ्ठे बापूराव मुंबई माया नगरीचे वर्णन करतात. तर याच मुंबई नगरीचे वर्णन करताना आण्णाभाऊ लिहितात-
"मुंबईत उंचावरी l
   मलबार हिल इंद्रपुरी ll
  कुबेराची वस्ती तिथ ,सुख भोगती ll परळात राहणारे l रात दिवस राबणारे
  मिळेल ते खाऊन घाम गाळती ll 
   पठ्ठे बापूरावांना मुंबई गर्भ श्रीमंत दिसते, तर आण्णा भाऊंना तीच मुंबई विषम व्यवस्थेची प्रतीक वाटते; आण्णा भाऊंच्या वेगळ्या जीवन दृष्टीचा येथे प्रत्येय येत रहातो; *ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तोलली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे*' अशी आण्णा भाऊंची विज्ञाननिष्ठ भूमिका होती;
      'जग बदल घालुनी घाव lअस सांगून गेले मला भीमराव ll
     असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची निष्ठा होती; आण्णाभाऊ साठे यांचे सारेच लेखन उपेक्षितांच्या बाजूचे आणि त्यांच्या अटी-तटीच्या जगण्यातील संघर्षाचे व अनुभव विश्वाचे प्रखर वास्तव अधोरेखित करणारे आहे....... 
          18 जुलै 1969 रोजी मुंबईच्या चिराग नगरीच्या झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या अवस्थेत आण्णाभाऊ साठे त्यांचा मृत्यू झाला.
       *अशा या थोर साहित्यीकाला, बिनीच्या शिलेदाराला त्यांच्या स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन* 💐💐🙏🙏
  
 माझी मैना गावावर राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना गावावर राहिली|
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना गावावर राहिली|
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना गावावर राहिली|
माझ्या जिवाची होतिया काहिली ||

ओतीव बांधा | रंग गव्हाला 
कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |
हसून बोलायची | मंद चालायची |
सुगंध केतकी | सतेज कांती |
घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची |
काडी दवन्याची | रेखीव भुवया |
कमान जणू इन्द्रधनुची |
हिरकणी हिरयाची काठी आंधल्याची |
तशी ती माझी गरीबाची |
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
नसे सुखाला वाण |
तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना......

गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची |
झाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची |
वेळ होती ती भल्या पहाटेची |
बांधाबांध झाली भाकर तुकड्याची |
घालवित निघाली मला माझी मैना चांदनी शुक्राची |
गावदरिला येताच कली कोमेजली तिच्या मनाची |
शिकस्त केलि मी तिला हसवण्याची |
खैरात केली पत्रांची | वचनांची |
दागिन्यांन मडवुन काडयाची |
बोली केली शिंदेशाही तोड्याची |
साज कोल्हापुरी | वज्रटिक |
गल्यात माळ पुतल्याची |
कानात गोखरे | पायात मासोल्या |
दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची |
परी उमलली नाही कली तिच्या आन्तरिची |
आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुम्बैची |
मैना खचली मनात | ती हो रुसली डोळ्यात |
नाही हसली गालात | हात उन्चावुनी उभी राहिली ||
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना.....

या मुम्बई गर्दी बेकरांची |
त्यात भर झाली माझी एकाची |
मढ़ेवर पडावी मुठभर माती |
तशी गत झाली आमची |
ही मुम्बई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंदिची, दाढ़ीची,
हडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या
तलम साडीची | बुटांच्या जोडीची |
पुस्तकांच्या थडीची | माडीवर माडी | हिरव्या माडीची |
पैदास इथे भलतीच चोरांची |
एतखाऊची | शिर्जोरांची |
हरामखोरांची | भांडवलदाराची |
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची |
पर्वा केलि नाही उन्हाची, थंडीची, पावसाची |
पाण्यान भरल खीस माझ |
वान माला एका छात्रिची |
त्याच दरम्यान उठली चलवल संयुक्त महाराष्ट्राची|
बेलगांव, कारवार, निपानी, गोव्यासह एकभाषिक राज्याची |
चकाकली संगीन अन्यायाची | फ़ौज उठली बिनिवारची |कामगारांची | शेतकरीयांची ।मध्यम वर्गियांची |
उठला मराठी देश | आला मैदानी त्वेष |
वैरी करण्या नामशेष |
गोळी डमडमची छातीवर सहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना.......
म्हणे अन्नाभाऊ साठे | घर बुडाली
गर्वाची | मी-तू पणाची | जुल्माची | जबरिची |
तस्कराची | निकुम्बलीला कत्तल झाली इन्द्रजिताची |
चौदा चौकड्याच राज्य गेले रावनाचे | लंका जलाली त्याची |
तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची |
अखेर झाली ही मुम्बई महाराष्ट्राची |
परलच्या प्रल्याची | लालबागच्या लढायची | फौंटनच्या चढ़ाइची |
झाल फौंटनला जंग | तिथे बांधुनी चंग |
आला मर्दानी रंग | धार रक्ताची मर्दानी वाहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना....

महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची |
दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची |
पारी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची
| गावाकडे मैना माझी | भेट नाही तिची |
तीच गत झाली आहे या खंडित
महाराष्ट्राची | बेलगांव, कारवार, डांग, उम्बरगावावर
मालकी दुजांची | धोंड खंडनीची | कमाल दंडलीची | चिड बेकिची | गरज एकीची |
म्हणून विनवणी आहे या शिवशाक्तिला शाहिराची |
आता वलु नका | रणी पलु नका | कुणी चलू नका |
बिनी मारायची अजुन राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली✍🏻💐🙏
आपला 
गजानन गोपेवाड अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य 

"आँनलाईन मोबाईल व आँनलाईन शिक्षण "

*अँड्रॉइड मोबाईल व आँनलाईन शिक्षण*
आपण अँड्रॉइड मोबाइल वापरत आहोत म्हणजे आपले वडील गरीब होते. आपण स्वतः खूप कष्ट करून कमाई करत आहोत आणि आपल्या गरीबीमुळे आपण आपल्या इच्छेनुसार शिकू शकलो नाही. त्यामुळे आपणास जे बनायचे होते. ते आपल्या मुलाने बनावे. अशी आपली तीव्र इच्छा आहे. आपली कितीही पैसे खर्च करायची तयारी आहे. पण आपण मुलाला वेळ देऊ शकत नाहीत. आपण आपले स्वप्न साकार करायला निघालात तर हे करा.
 मुलांचे मित्र बना.करिअर करण्याच्या नादात घरातील संवाद कमी झाला. घरात टीव्ही आणि मोबाईल आल्यामुळे सिरीयल आणि मित्र-मैत्रिणींसोबत बोलण्यात खूप वेळ घालवतो. अनलिमिटेड टॉकटाईम आणि इंटरनेटच्या सुविधेमुळे व्हॉट्सॲप आणि फेसबुक वर चॅटिंग करण्यात स्वतःला "वेल सेटल", समजणार्‍या अनेक कुटुंबातील माता आणि पालक व्यस्त आहेत. त्यामुळे मुलाला अँड्रॉइड मोबाइल म्हणजे पर्वणीच होऊन बसली आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमाचे वेळापत्रक पाहण्यासाठी पालकांकडे वेळ नाही. त्यामुळे मुलं अनेकदा विचित्र गेम्समध्ये अडकतात व आत्महत्येकडे वळतात. इंटरनेटवर अश्‍लिल वेबसाईटचे जाळे पसरलेले आहे.
त्यामुळे पालकांनी वेळीच जागरूक होणे आवश्यक आहे व मुलांसोबत संवाद वाढवणे आवश्यक आहे. मुलगा मोबाईलवर अभ्यासाचंच पाहतो की आणखी दुसरं काही हे ही मधून मधून तपासणण्याची सवय ठेवा. आपण मोबाईलमुळे एखादी वाईट घटना घडली की मुलांचा मोबाईल तपासायला सुरुवात करतो. त्यामुळे मुलं मग आपल्याकडे संशयाने पहायला लागतात. अचानकच मोबाईल पहायला सुरुवात केल्यावर त्यांना आपला राग यायला लागतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच मोबाईल तपासण्याची सवय मुलाला होणे आवश्यक आहे. आपले वडील कधीही मोबाईल चेक करू शकतात. असे का आपल्या मुलांना माहित झाले तर मुलं इतर वाईट सवयींमध्ये गुरफटून जात नाहीत.
जबाबदारी झटकू नका.       बर्‍याचशा पालकांचं असं होतं की मुलांना मोबाईल घेऊन देतात आणि त्यांच्याकडे संपुर्णतः दुर्लक्ष करतात. परंतु जेव्हा मुलं टोकाची भूमिका घेतात तेव्हा त्यांचे कान उघडतात आणि तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हातातून गेलेली गोष्ट पुन्हा येणे शक्य नसते.आपला पाल्य मोबाईलवर काय करत आहे हे नेहमी तपासणे पालकांसाठी चांगली बाब आहे.
 मुलांची चाचणी कशी घ्यावी?
             अगदी सोप्प आहे. आपण जेव्हा बाहेरून आपल्या घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्या पाल्याकडे नजर टाकावी. जर का त्याची नजर कावरीबावरी झाली नाही तर आपण समजून जावे की  त्याचा अभ्यास सुरू आहे. आणि मोबाईलचे कव्हर बंद झाले किंवा  मोबाईल वरची बोटं चालू लागली तर समजून जावे की, काहीतरी गडबड सुरू आहे. कारण अभ्यास करणारा मुलगा पालक आल्यावर घाबरून जात नाही किंवा मोबाईल बंद करत नाही.
अँड्रॉइड मोबाईलचा वापर आपल्या नजरेखालीच करू द्या. मुलाच्या अभ्यासात व्यत्यय नको. म्हणून पालकांची इच्छा असते की मुलाला वेगळी स्टडी रूम असावी आणि ही स्टडी रूम नंतर मात्र आपल्यासाठी प्रश्नचिन्ह  होऊन बसते.
 मुलाला एकांतवास मिळाला की अभ्यासाचा वेळ संपल्यावर तो मोबाईलचा वेगळा उपयोग करायला लागतो.
 मोबाईल वापरण्याची वेळ ठरवा.महागडा मोबाईल घेऊन दिला की आपले काम संपले. असे बऱ्याच पालकांना वाटते आता तर मुले दिवसभर घरीच आहेत. त्यामुळे माता- पिता -पुत्र- पुत्री यांनी एकत्र येऊन ऑनलाइन अभ्यासाच्या वेळापत्रका विषयी चर्चा व्हावी व तेवढाच वेळ मोबाईलचा वापर व्हावा. यादृष्टीने नियोजन करावे. नाहीतर पुढील पाच दहा वर्षांत मुलांच्या एकलकोंडेपणामुळे व मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदू विकाराचे व मानसिक रुग्णांचे प्रमाण निश्चितच वाढेल. त्यामुळे मेंदू विकार तज्ञ व मानसोपचार तज्ञांकडे रांगाच्या रांगा लागण्यास वेळ लागणार नाही.
 मुलांचा कल ओळखा.
             आपल्या पाल्याचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हे पाहण्यासाठी लाॅकडाऊन च्या काळात वेळच वेळ आहे. त्यामुळे मुलांचा कल ओळखून त्यांना त्यांच्या इच्छेनुसार अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात यावे.
आपले व्यक्तिमत्त्व प्रसन्न बनवा.आपल्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम आपल्या आपल्यावर व कुटुंबावर निश्चितच होत असतो. त्यामुळे आपल्या दिवसभर केलेल्या कार्याचा तान चेहऱ्यावर न ठेवता प्रसन्न मुद्रेने आपण जर घरी परतलो व कुटुंबातील सदस्यांसोबत आपला थकवा गेल्यानंतर तासाने चर्चा केली तर त्यामुळे कुटुंबातील संवाद आपोआपच वाढेल. आपण घरी आल्यावर आपल्या चेहर्‍यावरील भाव मुद्रा जर चांगली असेल तर घरातील सर्व मंडळी सुखी राहतील. एखादे दिवशी आपणाला जर थकवा आला असेल तर घरातील मंडळींना सांगून द्यावे की मी आज थकलेला आहे. आपण अर्ध्या तासानंतर चर्चा करूया. परंतु असे होताना दिसत नाही त्यामुळे मुलांना आपली भावमुद्रा ओळखायला कधी वेळच मिळत नाही. आपण घरी केव्हा येतो आणि केव्हा बाहेर जातो याच्या निश्चित वेळा मुलांना माहीत नसल्यामुळे मुले बिनधास्त असतात. त्यामुळे आपली बाहेरून येण्याची वेळ निश्चित असेल आणि राहिलेली कामे नंतर केली तर मुले आपापल्या वेळेबद्दल जागरुक राहतात व त्यांना सुद्धा आपल्या हजरजबाबीपणाची सवय होऊन जाते.
         आपल्या मुलांच्या जुन्या स्वाध्यायपुस्तिका काढून त्या पूर्ण करून घ्या. कारण आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे बऱ्याच मुलांच्या मागील वर्षाच्या स्वाध्यायपुस्तिका अपूर्ण असतात आणि वर्ष संपून जाते. त्यामुळे त्याच्या काही न समजलेल्या बाबी स्वाध्याय पुस्तिका पूर्ण केल्यामुळे समजून जातात. आता घरबसल्या माता-भगिनी त्या स्वाध्याय पुस्तिका पूर्ण करून घेऊ शकतात.
 कच्चे दुवे शोधा
           मुलं आपले कच्चे दुवे सांगत नाहीत त्यामुळे त्यांचा एखादा विषय तसाच कच्चा राहतो म्हणून पायाभूत संकल्पना स्पष्ट करून घ्या. त्यासाठी अनुलेखन,  श्रुतलेखन, शुद्धलेखन, हस्ताक्षर, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, शाब्दिक उदाहरणे अशा गणितीय क्रियांचा सराव घ्यावा.
संकटांना सामना करायला शिकवा
        जीवनाचा प्रवास हा दीर्घ पल्ल्याचा असतो. प्रत्येक दिवस हा नवीन आव्हाने, बदल संकटे घेऊन येत असतो कोणत्याही परिस्थितीत निराश न होता नवीन धोरणं ठरवावी लागतात. आज-काल मुलांना एखादी गोष्ट नाही असं म्हटलं तर ती टोकाची भूमिका घेताना दिसतात. "हम दो हमारे दो" च्या काळात "केजी टू पीजी" पर्यंत मुलांना प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळत असल्याने त्यांना कधी समस्याच जाणवत नाही. पालकही आमच्या वेळी आम्हाला काहीही भेटले नाही पण आपल्याकडे आहे तर मुलांना दिलेच पाहिजे. या मानसिकतेत आहेत. त्यामुळे मुलांना त्या गोष्टींचे महत्त्व वाटत नाही. पण हे सर्व बालवयात ठीक आहे. पण मुलांच्या वयानुसार गरजसुद्धा वाढत जातात. त्या पुरवताना पालकांच्या नाकीनऊ येते. मग त्यांनी अँड्रॉइड मोबाईल साठी मागणी केली आणि दिला नाही तर मुलं पळून जाणे किंवा सुसाईड करण्यासारखे निर्णय घेताना दिसतात. म्हणून त्यांना समस्यांना सामोरे जाणे शिकवा. सुट्ट्यांचा यासाठी आवश्य फायदा होईल. मुलांना उनिवा भासुद्या, तेव्हा त्यांच्यात जाणीवा आपोआपच निर्माण होतील.
 मुलांना शिकवू नका त्यांना शिकू द्या.
          पालक आपल्या पाल्यासमोरच त्याला आपण किती नामवंत व खर्चिक शाळेत टाकले हे शेजाऱ्यांशी, मित्रांशी सांगत असतात. मी त्याला काहीही कमी पडू देणार नाही असं सांगतात. त्यामुळे मुलांना या गोष्टी आपल्या पालकांकडून इतक्या सहज मिळत असल्यामुळे गांभीर्य वाटत नाही व पालकांच्या इच्छेखातर प्रवेश घेतल्यामुळे ते आपल्या ऑफर वाढवत जातात. म्हणून पालकांना विनंती आहे की, त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकू द्या. तुम्ही त्यांना शिकवू नका. ज्याप्रमाणं अंडं जेव्हा आतून फुटतं, तेव्हा त्यातून नवीन जीव निर्माण होतो. आणि आपण अंडं बाहेरून फोडलं तर त्यातील जीव गुदमरून मरतो. तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याच्या बालमनावर दडपन टाकू नका. त्याला ज्या विषयात गोडी आहे त्या विषयाचा अभ्यास करू द्या.
 वेळेचा सदुपयोग  करा.
               कोरोना महामारीमुळे जो वेळ मिळत आहे. एवढा वेळ पुन्हा कधीच मिळणार नाही. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. याचा नकारार्थी विचार न करता तुम्हाला तुमच्या पाल्यासोबत जास्तीचा वेळ देण्याची एक उत्तम संधी आलेली आहे. लोकमान्य टिळक बीएला असताना त्यांची तब्येत ठीक राहत नव्हती. म्हणून त्यांनी मध्येच शिक्षण सोडून एक वर्ष व्यायाम केला होता. म्हणजेच यावरून असं लक्षात येतं की, आपल्या पाल्याचे सुद्धा एक वर्ष वाया गेल्यामुळे भले मोठे नुकसान होईल असे नाही.
                       
गजानन गोपेवाड 
राज्य समन्वयक महाराष्ट्र 
अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य

सोमवार, १३ जुलै, २०२०

🌳एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, झाडे लावा झाडे जगवा 🌳

🌳“वनराई वृक्ष लावा चळवळ” ही एक सामाजिक बांधिलकी https://www.purogamisandesh.in/news/5782
👆👆👆👆👆👆👆👆👆
            🔹विशेष लेख🔹
        ✍️गजानन गोपेवाड ✍️               (राज्य समन्वयक अग्निपंख फाउंडेशन ,महाराष्ट्र राज्य)
----------------------------------------------
🔹पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क🔹
            
----------------------------------------------
           🔸सुरेश डांगे🔸
              मुख्य संपादक
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

रसायन शास्त्रज्ञ दिनकर कर्वे यांची स्तुती दिवस 13 जूलै

*आजचे शास्त्रज्ञ*

*दिनकर धोंडो कर्वे*

*रसायन शास्त्रज्ञ*

*जन्मदिन - १३ जुलै १८९९*
************************

दिनकर धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे तृतीय पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव आनंदी होते. दिनकर कर्वे यांचे शिक्षण पुणे येथे झाले. ते बी. एस्सी. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांची रसायनशास्त्रविषयक जाण उत्तम असल्यामुळे, ते जर्मनीच्या लॅपझिग युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. तेथे त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना त्या विद्यापीठाने डी. फिल. पदवी प्रदान केली. डॉ.दिनकर कर्वे पुण्याला परत आल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे आजीव सदस्य झाले. ते रसायनशास्राचे नामवंत प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, विज्ञान प्रसारक होते. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे ते वीस वर्षे प्राचार्य होते.

शिक्षणक्षेत्रातच उत्तम कामगिरी करण्याचा ध्यास डॉ. कर्वे यांनी घेतला. फर्गसन महाविद्यालयामध्ये ते भौतिकी रसायनशास्त्र हा विषय शिकवीत होते. त्यांचा अनुभव, विज्ञानाधारित अभ्यासू वृत्ती आणि शिस्तप्रियता लक्षात घेऊन फर्गसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांमुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विषयामध्ये आवड निर्माण झाली. फर्गसन महाविद्यालयामधील त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. त्यांच्या कडक शिस्तप्रियतेचा अनुकूल परिणाम महाविद्यालयाच्या प्रांगणात दिसून आला. दर्जाबाबत डॉ.दिनकर कर्वे यांनी कधीही तडजोड केली नाही. ते त्यांचे एक वैशिष्ट्य ठरले. त्यांच्यामुळे दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये फर्गसन महाविद्यालयाचे नाव अग्रगण्य झाले.

त्या काळामधील विज्ञानाच्या समविचारी प्राध्यापकांचे सहकार्य मिळवून त्यांनी ‘सृष्टिज्ञान’ या नियतकालिकाचा दर्जा अधिकाधिक चांगला करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ‘सृष्टिज्ञान’मध्ये त्यांनी विज्ञान विषयावर बरेच लेख लिहिले. त्यायोगे विज्ञान प्रसारही केला. वीस वर्षे प्राचार्यपदाची जबाबदारी पार पाडून ते निवृत्त झाले. तथापि त्यांनी त्यानंतर सुमारे दहा वर्षे ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ या संस्थेचे भारतातील संचालक म्हणून कार्य केले.

डेक्कन महाविद्यालयामधील प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ प्रा.इरावती कर्वे या डॉ.दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी होत्या. ‘हिंदू सोसायटी - अ‍ॅन इंटरप्रिटेशन’ हा ग्रंथ प्रा. इरावती कर्वे यांनी लिहिला होता. त्याचे मराठीकरण डॉ.दिनकर कर्वे यांनी केले. ‘हिंदू समाज - एक अन्वयार्थ’ त्या ग्रंथाचे शीर्षक होते. त्याचे प्रकाशन असे ११ ऑगस्ट, १९७५ रोजी झाले होते. १९५९ साली त्यांचे ज्येष्ठ बंधू रघुनाथ कर्वे यांनी ‘संतती नियंत्रण: विचार व आचार’ हे पुस्तक लिहिलेले होते त्याची अभ्यासपूर्ण आणि विज्ञानाधिष्ठित प्रस्तावना  डॉ.दिनकर कर्वे यांनी लिहिलेली होती.

१९६४ साली प्रकाशित झालेल्या ‘ए हिस्टरी ऑफ एज्युकेशन इन इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान’ या पुस्तकाचे डॉ.दिनकर कर्वे सहलेखक होते. त्यांनी ‘दि न्यू ब्राह्मण्स: फाइव्ह महाराष्ट्रीयन फॅमिलीज’ महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेला होता. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या वडलांसह तत्कालीन सामाजिक कार्याला झोकून देणाऱ्या पाच कुटुंबीयांच्या कार्याचा आढावा  घेतला होता.

१९७४ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल विजेते शास्रज्ञ कोनराड झचारियस लॉरेंझ यांनी ‘सिव्हिलाइझ्ड मॅन्स एट डेडली सिन्स’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. डॉ.कर्वे यांनी त्याचे भाषांतर केले होते. मानववंश शास्त्रज्ञ ब्रोनिस्लाव्ह मॅलिनोवस्की यांनी लिहिलेल्या ‘सेक्स अ‍ॅन्ड रिप्रेशन इन सॅव्हेज सोसायटी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘असंस्कृत समाजातील लैंगिकता’ या शीर्षकाखाली डॉ.कर्वे यांनी केला. १९७८ साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे ते पुस्तक प्रकाशित झाले.

बुद्धिप्रामाण्य आणि विचारांची तर्कशुद्धता यांवर डॉ. दिनकर कर्वे यांचा संपूर्ण विश्वास  होता. त्याचा परिपाक म्हणून धार्मिक कर्मकांड; समाज ज्याला धर्म मानतो, त्याची सबंध चौकट, देवाच्या अस्तित्वावर विश्वास या सर्व गोष्टी त्यांनी नाकारल्या होत्या. ते कट्टर निरीश्वरवादी होते. आपल्या मतीला जे पटेल तेच करण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे ते प्रवाहपतित झाले नाहीत.


*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_संकलन : गजानन गोपेवाड*
राज्य समन्वयक 
अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य 
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_'सृष्टी विज्ञानगाथा' विज्ञान आणी दिनविशेष, वरून_*

शुक्रवार, १५ मे, २०२०

शनिवार, ९ मे, २०२०

दिनांक 9/5/2020कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्रपणे अभिवादन करत आहे गजानन गोपेवाड



9 मे 2020 ला महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहे गजानन गोपेवाड


जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे गजानन गोपेवाड राज्य समन्वयक

आज दिनांक 10/5/2020 जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे 

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

आज दिनांक 01/05/2020महाराष्ट्र दिन या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा देत आहे, गजानन गोपेवाड


  • आज 01 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा देत आहे गजानन गोपेवाड, (







पदवीधर शिक्षक,) 

आज दिनांक 01/05/2020महाराष्ट्र दिन या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा देत आहे, गजानन गोपेवाड


  • आज 01 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा देत आहे गजानन गोपेवाड, (







पदवीधर शिक्षक,) 

रविवार, १२ एप्रिल, २०२०

जालियन वालाबाग हत्या कांड स्मृतिदिन शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे गजानन गोपेवाड

अग्निपंख विज्ञान केंद्र मार्गदर्शक पदवीधर शिक्षक गजानन *📱अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य 📱*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
════════════════════
      🏇🤺 🇬🇧👸🤺🏇
➿➿➿➿➿➿➿➿➿➿
    🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ गजानन गोपेवाड, 7378670283
➿➿➿➿➿➿➿➿➿➿
      🔫🔫🇮🇳👨🏻🇮🇳🔫🔫   
                                             
 *जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतीदिन*
(जनरल डायरद्वारा केले गेलेले सामुहिक हत्याकांड)

एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० हून अधिक आहे.

✴️ *जालियनवाला बाग सभा*
अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. एप्रिल १० १९१९, रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होते दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणी, सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु, असे २ वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ह्या घोळ्क्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्त्वाची जाणीव करून देण्याऱ्या ईमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बॅंकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचा एक युरोपीयन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बॅंक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपीयन नागरीकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८-२० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. ह्या नंतररचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपीयन नागरीक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पन्जाब मध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला.

योगायोग असा की १३ एप्रीला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बान्धव सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता.

🔮 *जालियनवाला बाग हत्याकांड महत्त्वाचे मुद्धे*
20 जुलै 1905 रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली.
सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारांतून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते.
16 ऑक्टोबर रोजी कलकत्यात सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले.
कलकत्यांच्या अनेक रस्त्यांवरुन मिरवणुका निघाल्या व संध्याकाळी प्रचंड सभा झाली. तिला 50,000 लोक हजर होते.
बंगालच्या खेडयापाडयांतून न शहराशहरांतून सभा, मिरवणुका व निदर्शने यांचे पडसाद सतत उमटत होते.
परकीय बनावटीच्या सर्व वस्तुवर बहिष्कार व त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर हे या चळवळीचे सूत्र होते.
अनेक ठिकाणी परदेशी कापडाच्या होळया पेटवण्यात आल्या आणि परदेशी कापड विकणार्‍या दुकानांपुढे निदर्शने करण्यात आली.
शाळा, कॉलेजांवर बहिष्कार, न्यायालये व सरकारी नोकर्‍यांचा त्याग असे या असहकार आंदोलनाचे स्वरुप होते, मात्र कार्यक्रमांतील हा भाग परिणामकारकरीत्या अमलात येऊ शकला नाही, परकीय जोखडातून स्वातंत्र्य, अशीही नव्या नेतृत्वाने हाक दिली.
त्याचाच एक परिणाम म्हणजे डिसेंबर 1906 मधील कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना दादाभाई नौरोजींनी स्पष्ट केले की ‘स्वराज्य’ हेच कॉंग्रेसचे उद्दिष्ट आहेत.
खेडयातील आणि शहरातील सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा देण्यात नवे नेतृत्व विलक्षण यशस्वी झाले.
विशेषत: विद्यार्थी, महिला आणि शहरी भागातील कार्यकर्ते, मोठया उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले, स्वदेशी आणि स्वराज्य या घोषणा लवकरच इतर प्रांतांतही प्रसृत झाल्या.
परदेशी कापडावरील बहिष्काराचे आंदोलन तर अखिल भारतीय पातळीवर संघटित करण्यात आले.
समान सहानुभूती व समान राजकारण या बंधनांनी सारा देश आता एक होऊ लागला.
सरकारने दडपशाहीनेच या आंदोलनास उत्तर दिले. सभांवर बंदी घालण्यात आली.
वृत्तपत्रांचा आवाज दडपून टाकण्यात आला. राजकीय कार्यकत्र्यांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेक नेत्यांना परदेशी हद्दपार करण्यात आले आणि विद्याथ्र्यांना मारझोड करण्यात आली.
सरकारने जहालांपासून मवाळांना व हिंदूपासून मुसलमानांना वेगळे काढण्याचे प्रयत्न केले.
जनता आता जागृत झाली होती, पण तिला योग्य अशा संघटनेत बांधण्यात व लढयाला योग्य दिशा देण्यात नवे नेतृत्व अयशस्वी ठरले. उदाहरणार्थ नि:शस्त्र प्रतिकाराची चळवळ प्रत्यक्षात आली नाही.
अखेर लोकमान्य टिळकांना जेव्हा सहा वर्षे काळया पाण्याची शिक्षा झाली.
बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांनी राजकारण संन्यास घेतला व लाला लजपत राय परदेशी गेले तेव्हा सरकारला ही चळवळ दडपून टाकणे शक्य झाले.
मोठया जन आंदोलनात परिणामकारक सहभागाची संधी न मिळाल्याने व सरकारी दडपशाहीचा प्रतिकार करण्यास कोणताच बाब न राहिल्याने युवा वर्ग दहशतवादी क्रांतिकारी मार्गाकडे वळला आणि तिरस्करणीय अधिकार्‍यांची हत्या करणे हीच त्यांच्या राजकीय कार्याची पध्दत बनली. अनुशीलन व युगांतर हे त्या काळातील दोन प्रमुख दहशतवादी गट होते.
या क्रांतिकारी दहशतवाद्यांना जनतेच्या पाठिंब्याचा आधार नव्हता व म्हणूनच ती चळवळ फार काळ टिकू शकली नाही. पण राष्ट्रीय चळवळीतील त्यांचेही योगदान मोलाचे आहे.
इसवी सन 1909 पासून 1916 पर्यंत राष्ट्रवादी चळवळ सुप्त स्थितीत होती, पण पहिल्या महायुध्दाच्या काळात भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणार्‍या इंग्रज विदुषी अ‍ॅनी बेझंट यांनी आणि करावासातून मुक्त झालेल्या लोकमान्य टिळकांनी ‘इंडियन होमरुल लीग’ च्या संरक्षणासाठी सनदशीर मार्गाने अखिल भारतीय आंदोलन पुन्हा सुरु केले.
युध्दकाळात परदेशातील क्रांतिकारी कार्यकर्तेही क्रियाशील होते. त्यात अमेरिकेत व कॅनडात स्थापन झालेल्या व पूर्व आणि आग्नेय आशियात शाखा असलेल्या गदर पक्षाचा विशेष उलेख केला पाहिजे.
त्यानेच भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

🔫 *हत्याकांडाच्या प्रतिक्रिया*
भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली 'सर' ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले.

शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ'डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला.     
                                                                                                                                                                                                                                 
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳 
   🙏 *विनम्र अभिवादन*🙏

         

डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन करत आहे गजानन गोपेवाड



शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

म्, ज्योतिबा फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन करत आहे गजानन गोपेवाड

*📱अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य,  महाराष्ट्र📱*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
════════════════════
  ➿➿➿➿➿➿➿➿➿➿
    🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ गजानन गोपेवाड, 7378670283.
➿➿➿➿➿➿➿➿➿➿
      🏢📚🇮🇳👳‍♀️🇮🇳📝✍️   
                                             
          *जोतीराव गोविंदराव फुले*
     (भारतीय समाजसुधारक)


   *जन्म : ११ एप्रिल १८२७*
(कटगुण,ता.खटाव जि. सातारा,महाराष्ट्र)
*मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०*
         (पुणे, महाराष्ट्र)
                                                                      टोपणनाव : जोतीबा, महात्मा                                                                                     संघटना : सत्यशोधक समाज
प्रमुख स्मारके : भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे
धर्म :  हिंदू
प्रभाव : थॉमस पेन
प्रभावित : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील : गोविंदराव फुले
आई : चिमणाबाई फुले
पत्नी : सावित्रीबाई फुले
अपत्ये : यशवंत फुले
   महात्मा फुले नावाने प्रसिद्ध असलेले जोतीराव ऊर्फ जोतीबा गोविंदराव फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली.                                   'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले. आजही (२०२० साली) त्यांची ही ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरते आहे. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.

💁‍♂️ *बालपण आणि शिक्षण*
ज्योतीबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे. जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले. त्यातील एक "नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हं, कैसे सूद "

🔸 *शैक्षणिक कार्य*
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्त्तराती मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.

⚜️ *सामाजिक कार्य*
मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.

‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्त्वाची वचने लीहिली.

संसाराविषयी फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देतात. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुध्दीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो.
स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे , प्रांताचे , देशाचे , खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वताच्या संबंधात , स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे .
आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे .
आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री - पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे . जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही , अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला 'सत्यवर्तन ' करणारा म्हणावे .
आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री - पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे . त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही , त्याप्रमाणे जबरी न करणारास सत्यवर्तन करणारे म्हणावे .
स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह , आपल्या भाऊबंदास , आपल्या सोयऱ्याधायऱ्यास आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत , त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .
स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात , परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .
महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते , ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता . त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणायचा होता .त्यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे . 'अखंड' या काव्यप्रकारात त्यांनी 'मानवाचा धर्म' , आत्मपरीक्षण , नीती , समाधान , सहिष्णूता , सदसदविवेक , उद्योग , स्वच्छता , गृहकार्यदक्षता , इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे . ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले , मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला. महात्मा फुले यांच्या समतावादी दृष्टिकोनामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली पुढे हा वारसा त्यांच्या अनुयायांनी चालू ठेवला त्यामुळे सामाजिक समतेचा जागर कायम राहिला
📺 *मालिका*
सावित्रीजोती ही फुले दाम्पत्यावरील मालिका सोनी मराठी वाहिनीवर ६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित होत आहे. ही मालिका दशमी क्रिएशनची निर्मिती आहे. सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार साकारत असून जोतीराव फुले यांची भूमिका ओंकार गोवर्धन साकारत आहेत. मालिकेचे दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे असून नितीन वैद्य यांची निर्मिती आहे. मालिकेच्या अभ्यासपूर्ण संहितेसाठी साहित्यिक व विचारवंत हरी नरके यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.
सत्यशोधक समाज संपादन करा
२४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.न्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.

✍️ *लेखन साहित्य*
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

रा.ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते.

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :-

*लेखनकाळ साहित्य प्रकार नाव*
इ.स.१८५५ नाटक तृतीय रत्‍न
जून, इ.स. १८६९ पोवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा
जून इ.स. १८६९ पोवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी
इ.स.१८६९ पुस्तक ब्राह्मणांचे कसब
इ.स.१८७३ पुस्तक गुलामगिरी
सप्टेंबर २४ , इ.स. १८७६ अहवाल सत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीकत
मार्च २० इ.स. १८७७ अहवाल पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
एप्रिल १२ , इ.स. १८८९ निबंध पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ
२४ मे इ.स. १८७७ पत्रक दुष्काळविषयक पत्रक
१९ ऑक्टोबर इ.स. १८८२ निवेदन हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
१८ जुलै इ.स. १८८३ पुस्तक शेतकऱ्याचा असूड
४ डिसेंबर इ.स. १८८४ निबंध महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत
११ जून इ.स. १८८५ पत्र मराठी ग्रंथागार सभेस पत्र
१३ जून इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक १
ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक २
१ ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक इशारा
२९ मार्च इ.स.१८८६ जाहीर प्रकटन ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर
२ जून इ.स. १८८६ पत्र मामा परमानंद यांस पत्र
जून इ.स. १८८७ पुस्तक सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी
इ.स. १८८७ काव्यरचना अखंडादी काव्य रचना
१० जुलै इ.स. १८८७ मृत्युपत्र महात्मा फुले यांचे उईलपत्र
इ.स. १८९१ (प्रकाशन) पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक
💁‍♂️ *फुलेंचा संपूर्ण जीवनक्रम*
अ.क्र. दिनांक / महिना इ.स. घटना
१) एप्रिल ११ इ.स.१८२७ जन्म (कटगुण, सातारा)
२) इ.स. १८३४ ते १८३८ पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण.
३) इ.स. १८४० नायगावच्या च्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येशी विवाह.
४) इ.स. १८४१ ते १८४७ मिशनरी शाळेत माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण.
५) इ.स. १८४७ लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार.
६) इ.स. १८४७ टॉमस पेन कृत “राईट ऑफ मॅन” या ग्रंथाचे मनन.
७) इ.स. १८४८ उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान .
८) इ.स.१८४८ शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा.
९) इ.स. १८४९ शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्‍नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग.
१०) इ.स. १८४९ मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणार्‍या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण.
११) इ.स. १८५१ चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.
१२) नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
१३) इ.स. १८४७ थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
१४) इ.स. १८४८ मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
१५) इ.स.१८४८ भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
१६) सप्टेंबर ७ इ.स.१८५१ भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
१७) इ.स.१८५२ पूना लायब्ररीची स्थापना.
१८) मार्च १५ इ.स.१८५२ वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१९) नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
२०) इ.स.१८५३ 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
२१) इ.स.१८५४ स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी.
२२) इ.स.१८५५ रात्रशाळेची सुरुवात केली.
२३) इ.स.१८५६ जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्‍न झाला.
२४) इ.स.१८५८ शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
२५) इ.स.१८६० विधवाविवाहास साहाय्य केले.
२६) इ.स.१८६३ बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
२७) इ.स.१८६५ विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
२८) इ.स.१८६४ गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
२९) इ.स.१८६८ दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
३०) २४ सप्टेंबर इ.स.१८७३ सत्यशोधक समाजची स्थापना केली.
३१) इ.स.१८७५ शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
३२) इ.स. १८७५ स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
३३) इ.स. १८७६ ते १८८२ पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
३४) इ.स. १८८० दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
३५) इ.स.१८८० नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
३६) इ.स.१८८२ 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
३७) इ.स.१८८७ सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
३८) इ.स.१८८८ ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
३९) ११ मे इ.स.१८८८ मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
४०) नोव्हेंबर २८ इ.स.१८९० पुणे येथे निधन.
🔮 *पश्चात प्रभाव (लीगसी)*
महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.

📝 *तृतीय रत्‍न*
तृतीय रत्‍न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. जोतिबांनी २८ व्या वर्षी इ.स.१८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली. "

या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.

आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.

🎭 *नाटकाचे स्वरूप*
या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वतःचे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसर्‍या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे.

नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ. कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल. दोन फेर्‍या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे. ठरावीक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. ‘पथनाट्य’ म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे.

या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे.

हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते.

महात्मा फुले लिखित ऐतिहासिक 'तृतीय रत्न' हे नाटक 2015 साली पुण्यामधून दिग्दर्शक सिद्धार्थ सिताराम मोरे यांनी बसवायला सुरुवात केली. यातील विदूषकाची भूमिका ते स्वतः करत होते. तर जोगबाईची भूमिका अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या करत होत्या. या नाटकाचे सुरुवातीचे निर्माते विजय कांबळे होते. काही कारणास्तव कांबळे साहेब यांनी माघार घेतली त्यानंतर सिद्धार्थ मोरे यांनी निर्मितीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन या नाटकाचे प्रयोग सादर केले.
📚 *महात्मा फुले यांच्यावर लिहिलेली पुस्तके*
असूड (मराठी नाटक) लेखक : डॉ. सोमनाथ मुटकुळे
क्रांतिजागर : महात्मा फुले यांची समग्र कविता (डॉ. रवींद्र ठाकूर)
क्रांतिबा फुले (नाटक) अनुवादक : फ.मुं. शिंदे. (मूळ आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्य अकादमीचे प्रकाशन)
गोष्टीरूप महात्मा फुले (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखक : बा.ग. पवार
महात्मा (मराठीत आणि इंग्रजीत, डॉ. रवींद्र ठाकूर)
महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक : ग.द. माळी
महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखिका : गिरिजा कीर
महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका : अनुराधा गद्रे
महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक : विठ्ठलराव भागवत
महात्मा जोतीबा फुले (चरित्र) लेखक : सुखदेव होळीकर
महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन साहित्य
महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन : नागनाथ कोतापल्ले
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : नागेश सुरवसे
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी
महात्मा ज्योतीराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम पाटील
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : वसंत शांताराम देसाई
महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर
महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन विभूते ; मनोविकास प्रकाशन
महात्मा जोतीराव फुले - वारसा आणि वसा. लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक सत्यधर्म (विश्वनाथ शिंदे)
महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा प्रकाशन
महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. बागडे
महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके
महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित). प्रकाशक : भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे
महात्मा फुले टीका आणि टीकाकार. लेखक : नीलकंठ बोराडे
महात्मा फुले दुर्मिळ वाङ्‌मय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा.गो. माळी
महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण
महात्मा फुले यांची कविता-एक विचार मंथन (शशिशेखर शिंदे)
महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे
महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक : विद्याकर वासुदेव भिडे
महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे
महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर
महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं.बा. सरदार
महात्मा फुले समग्र वाङ्मय - संपादक धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी
युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार
युगार्त (जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरी, लेखक - बाळ लक्ष्मण भारस्कर)
🎭🎞️ *नाटक, चित्रपट*
महात्मा फुले (मराठी चित्रपट) निर्माते-दिग्दर्शक आचार्य अत्रे.
महात्मा जोतीबा फुले (लोकनाट्य) लेखक : शंकरराव
महात्मा जोतीराव फुले (नजरियात और उनका अदब (उर्दू )लेखिका : डा नसरीन रमजान सैय्यद)
मी जोतीबा फुले बोलतोय (एकपात्री नाटक) : लेखक-सादरकर्ते कुमार आहेर. कुमार आहेरांना या कार्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्‍कार’ दिला आहे.
सत्यशोधक (मराठी नाटक) लेखक : गो.पु. देशपांडे; दिग्दर्शक अतुल पेठे
समारोप संपादन करा
विद्याध्यायनासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,

त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.

परि स्त्री शिक्षण; हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास,

या उक्तीप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्‍नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दांतच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.

🎖️ *सन्मान*

महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवन-कार्यावर आधारित, नाटक "मी जोतीराव फुले बोलतोय ..!" ...याची सुरुवात २००२पासून पुण्यातून झाली. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-संगीतकार-गीतकार आणि निर्माते सिद्धार्थ सीताराम मोरे हे आहेत तसेच महात्मा जोतिराव फुले यांची प्रमुख भूमिका सुद्धा सिद्धार्थ मोरे यांनीच साकारली आहे. तर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या आहेत. हे नाटक मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये सादर केले जाते. हे नाटक संपूर्ण देशभर देखील सादर झाले आहे. सन २०१० साली या नाटकाचा पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे ७५० वा प्रयोग सादर झाला.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही 'फुले आणि आंबेडकर' यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते.
जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर इ.स. १९५५ साली आचार्य अत्रे यांनी 'महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
जोतिबांच्या जीवनावर 'असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.
‘सत्यशोधक' नावाचा एक मराठी चित्रपट, दिग्दर्शक नीलेश जालमकर काढणार होते. त्यात संदीप कुलकर्णी महात्मा फुले यांची आणि सावित्रीबाई फुलेंची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे साकारणार होत्या. समता फिल्म्सचा हा चित्रपट २०१५ सालापासून रखडला.
महाराष्ट्रातले भाजप सरकार आणि केंद्र सरकार फुलेंच्या जीवनावर एक चित्रपट काढणार असल्याचे जाहीर झाले होते, पण फेब्रुवारी २०१७ नंतर त्या चित्रपटासाठी काही झाल्याचे दिसले नाही.
जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.
                                                                                                                             
                                         
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳 
   🙏 *विनम्र अभिवादन*🙏

         गजानन गोपेवाड, यवतमाळ