शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*

 *🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳

                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : gajanan gopewad

                                                   

➿➿➿➿➿➿➿➿➿

🚩🤺🚩🇮🇳👳‍♀️🇮🇳🚩🤺🚩


                   *नरवीर*

    *तानाजी काळोजीराव मालुसरे*

         ( शिवरायांचे सरदार )


       *जन्म : इ.स. १६२६*

*(जावळी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत)*


       *वीरमरण : ४ फेब्रुवारी १६७०*

   *(सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत)*


टोपणनाव : तान्हाजी

अपत्ये : रायबा


तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सरदार होते. त्यांनी स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.


🙎‍♂️ *बालपण*

                   सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडवली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले.


🤺 *कामगिरी*

         अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.


🤺 *नरवीर तानाजी मालुसरेची एक अपरिचित लढाई*

                  तानाजी मालुसरे असे नाव घेतले की लोकांना त्याच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवण होते. सर्वसामान्यांसाठी त्यांचे चरित्र या एकट्या प्रसंगापुरतेच मर्यादित झाले आहे. परंतु त्याने केलेल्या इतर पराक्रमांविषयी सर्व सामान्यांना अजिबातच माहिती नाही. तानाजी मालुसरेचे संगमेश्वरचे युद्ध हे असेच अपरिचित युद्ध आहे. या युद्धाला हवे आहे तेवढे महत्त्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडले नाही. हा तानाजींवर झालेला अन्यायच आहे.


संगमेश्वरी असतांना शत्रूने केलेल्या अकस्मात हल्ल्यादरम्यान तानाजीने कमालीचे धाडस दाखविले होते. त्या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन पुढीलप्रमाणे :


दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर काबीज झाले, राजापूर लुटले गेले. ह्या बातम्या धडाधड आदिलशाहाच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच शृंगारपूरच्या सूर्याजीस आदेश केला. तो त्याला म्हणाला_ "तो (शिवाजी महाराज)आमचा उघड शत्रू, राजापुरावर चालून जात असताना त्यास तू का अडविले नाहीस? असो ते जाऊ दे, तो आता परत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हा त्यास तेथे अडव व त्याच्याशी युद्ध कर,'. आदिलशाहाच्या दबावाखाली सूर्याजीने शिवाजी महाराजांच्या विरोधात उघडउघड शत्रुत्व धारण केले.

                        तेव्हा सूर्याजीं सुर्वे शृंगारपूरला होता. त्याने लगेच शिवाजी राजांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोलला. संगमेश्वरी शिवाजी राजांचे सैन्य अल्पसे होते. या अल्पशा सैन्याला सूर्याजीच्या सैन्याने चोहो बाजूंनी घेरले. शिवरायांनी या सैन्याचे नेतृत्व तेव्हा पिलाजी निळकंठरावाकडे दिले होते. आपले सैन्य शत्रूने चारही बाजूंनी घेरले आहे, असे जेव्हा पिलाजीला समजले तेव्हां पिलाजीं फ़ार भयभीत झाला. शत्रूला सामोरे जाऊन त्याच्याशी युद्ध करण्यापेक्षा युद्धातून पळून जाणेच त्यांनी योग्य ठरवले. ते आपला जीव वाचवण्याच्या भीतीने संगमेश्वरहून पळून जाऊ लागले. तोच भीतीने कापणाऱ्या त्या पिलाजीला आपल्या लोकांना मागे सोडून पळून जातांना तानाजी मालुसरेने पाहिले. तानाजींसारख्या प्रतापी पुरुषाला हे अजिबात खपणारे नव्हते. तानाजीने भ्याड पिलाजीला पळताना पाहताच त्याचा पायीच पाठलाग करून त्याला हातात धरले आणि त्याचा उघड धिक्कार केला. तानाजी मालुसरे पिलाजीस म्हणाला_ "या युद्धात मी तुझा साह्यकर्ता आहे. तू आपल्या लोकांना संकटात टाकून पळून जातोयस, ही खरच खेदाची गोष्ट आहे. आजपर्यंत तू तुझ्या परराक्रमांच्या एवढ्या बढाया मारत होतास त्या सगळ्या बढाया कुठे गेल्या? ज्या शिवाजी महाराजांनी तुला मोठेपण व सन्मानाची देऊन सांभाळले, तू त्यांचा सरदार असतांनाही सैन्य टाकून स्व:तच पळून जातोयस? आणि याची तुला खंतही वाटत नाही...." असे कित्येक कठोर शब्द बोलून तानाजीने पिलाजीला कैद केले. पिलाजीं घाबरलेला पाहुन तानाजीला वाटले की पिलाजीची ही दशा पाहून इतर मावळ्यांचीही हिंमत खचेल. त्यामुळे पिलाजीला मोकळे सोडण्यापेक्षा कैदेतच ठेवणे योग्य असा विचार करून तानाजीने पिलाजीला जवळच असलेल्या एका दगडाला दोरखंडाने बांधून ठेवले. पिलाजीला दगडाला बांधुू ठेवल्यानंतर तानाजी मालुसरेने स्व:तच सैन्याचे नेतृत्व केले.

                     तानाजीने व त्याच्या सोबती मावळ्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. शत्रूनेही तानाजीस रोखण्याच्या दिशेने पुढे सरसाव केला. आता दोन्ही सैन्य एकमेकांना भिडणार आणि रक्ताच्या चिळकांड्या उडणार तोच मराठ्यांच्या मागच्या तुकडीने तानाजीच्या रक्षणासाठी शत्रूवर बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे तानाजीच्या समोर येणारी शत्रुची तुकडी घायाळ झाली आणि याचा फ़ायदा उचलत तानाजीच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी शत्रुची दाणादाण उडवली. तानाजीची मागची तुकडी शत्रूच्या पुढे सरसावणाऱ्या तुकड्यांवर बाणांचा वर्षाव करी व बाणांनी जखमी झालेल्या शत्रुच्या सैन्याला तानाजी सोबती मावळे कापून काढीत. मावळ्यांनी तानाजीच्या नेतृत्वाखाली शत्रूशी रात्रभर झुंज दिली व शत्रूच्या हातपाय कापलेल्या व धडापासून मुंडके वेगळे पडलेल्या शवांचे ढीगच्या ढीग मावळ्यांनी रणांगणात रचले. शेवटी सूर्याजीला या युद्धात मोठे नुकसान सोसावे लागले. त्याला त्याच्या सैन्याची सर्वत्र दशा झालेली दिसताच त्याने युध्दातुन पळ काढला. शेवटी वीर तानाजी मालुसरेंचा व सोबती मावळ्यांचा या युध्दात विजय झाला.

संदर्भ - शिवभारत

            स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन तो राहिला होता. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्याने सहभागी करून घेतले.


🤺 *कोंढाण्याची लढाई*

                स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा तो स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होता. त्याने ती तयारी अर्धवट सोडली. स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेऊन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. तो कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाला. *"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."*  हे त्याचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत.

                      कोंढाणा गडावरचा किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे याच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजीने गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.

           तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजीला त्याच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले  *"गड आला पण सिह गेला".* अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठे' 

 (पोलादपूरजवळ)  या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले.


🗽 *तानाजीची स्मारके*

                    तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.

पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.

रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.


📚 *पुस्तक*


दुर्ग सिंहगड - आनंद पाळंदे

गड आला पण सिंह गेला - ह.ना. आपटे

नरवीर तानाजी मालुसरे (बालसाहित्य) - पंडित कृष्णकांत नाईक

तानाजी (अमर चित्र कथा -६८२)

मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण भोसले, नरसिंह पब्लिकेशन्स

राजाशिवछत्रपती - ब.मो. पुरंदरे, पुरंदरे प्रकाशन

सिंहगड - पुरंदरे प्रकाशन

सिंहगड - प्र. के. घाणेकर

सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे - दत्ताजी नलावडे


🎖️ *पुरस्कार*


तानाजीच्या नावे शिवाजी ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.


🎞️ *चित्रपट*


▪️"तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर" (हिंदी चित्रपट, सन २०२०, तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण); दिग्दर्शक - ओम राऊत.

▪️यापूर्वी १९५२ साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 'नरवीर तानाजी' हा मराठी चित्रपट निघाला होता. चित्रपटात दुर्गा खोटे आणि मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या.


 🚩 *हर हर महादेव....!* 🚩


                                                                                                                                                                                                                                                            ➖➖➖➖➖➖➖➖➖  

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

३ फेब्रुवारी संशोधक जोहान्स गुटेनबर्ग स्मृतिदिन


३ फेब्रुवारी 

संशोधक जोहान्स गुटेनबर्ग स्मृतिदिन


जन्म - २४ फेब्रुवारी १३९८ (जर्मनी)

स्मृती - ३ फेब्रुवारी १४६८


सतत पुढे जाणाऱ्या आजच्या आधुनिक संगणकीय जगात छापील पुस्तके, वृत्तपत्रे यांचे स्थान किंचित कमी झाल्या सारखे वाटले तरी आपल्या दैनंदिन जीवनात ती अजूनही कायम आहेत. पुस्तकांच्या आणि वृत्तपत्रांच्या इ-आवृत्त्या आल्या तरी पुस्तकांचे मुद्रण पूर्वीसारखे चालू आहे. सर्वसामान्य माणूस आजही छापलेले पुस्तक आणि वृत्तपत्र हातात धरत आहे. हा लेख अत्याधुनिक मुद्रण यंत्राच्या साह्याने प्रत्यक्ष कागदावर छापला न जाता तुमच्या समोर आलेला आहे आणि मग तो आंतरजालाच्या माध्यमातून आज तुम्हाला संगणकाच्या पडद्यावर दिसत आहे. पण त्याचे मूळ कागदावर होते हे विसरून चालणार नाही.


कल्पना करा की आजचे मुद्रण तंत्र जन्मास येण्यापूर्वी काय परिस्थिती होती? पुस्तक ही एक अत्यंत महागडी व हाताने बनवण्याची बाब असल्यामुळे ती एक दुर्मिळ आणि तरीही सर्वांना हवीहवीशी वाटणारी चीज होती. मुद्रण तंत्रच अस्तित्वात नव्हते. म्हणून हातांनी लिहिलेल्या अक्षरांची पुस्तके बनवणे आणि मागाहून ती नकलून घेणे देशोदेशात होत असे. आपल्याकडे जे जे प्राचीन ग्रंथ, पोथ्या व पुराणे होती, ती सारी हस्तलिखिते होती. या अशा हाताने लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रतींची संख्या कितीशी असणार? त्या अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत असत आणि त्यांचे जतन जीवापाड हिऱ्या मोत्यांच्या मोलाने केले जात असे. भारतात सर्व धार्मिक ग्रंथ हातानेच केले जात आणि त्यासाठी लागणारा कागदही कुठे उपलब्ध असे? लिहिण्यासाठी ताडपत्रांचा उपयोग केला जात असे. प्राचीन काळी भूर्जपत्रे वापरली जायची.


त्याहीपूर्वीची  पुस्तके कशी असत बरे? मध्य आशियातील प्राचीन राजवटीत ओल्या विटांवर अक्षरे कोरून मग त्या भाजून विहिरी भोवती ओळीने लावून ठेवल्या जात असत, असे नमूद केलेले आहे.।इजिप्तची संस्कृती फार प्राचीन. त्या वेळची पुस्तके तर जुन्या पिरामिडस मधून प्रत्यक्ष पाहायला मिळाली आहेत. ती झाडांच्या सालीच्या लांबलचक पट्ट्यावर लिहिलेली आहेत. त्यांना पपाइरस (Papyrus) असे नाव होते. नुसती कल्पना करून बघा. एकेक पान नव्वद ते शंभर फूट लांब एका काठी सारख्या हाडा भोवती गुंडाळलेले उलगडत जायचे, वाचीत जायचे आणि दुसऱ्या हाडाभोवती मिटत जायचे. ही पुस्तके अर्थातच प्रचंड लाकडी पेट्यात ठेवली जात. आणि पुस्तकाचे कव्हर? ते चामड्याचे असे. बकऱ्याच्या नाहीतर कोकराच्या पातळ चामडीचे हे आवरण असे. प्राचीन मठातले भिक्षु पुस्तकाच्या प्रती नकलून काढायचे. अशा एकेका प्रतीला सात-सात आठ-आठ महिने लागत असत. अशा आहेत प्राचीन हस्तलिखित पुस्तकांच्या गोष्टी.


थोडक्यात ज्या काळात पुस्तकांचे दुर्भिक्ष्य असायचे, त्या काळात बुद्धी व अलौकिक चिकाटी यांच्या जोरावर ज्याने मुद्रणाचे तंत्र शोधून काढले आणि जगातील पहिले छापलेले पुस्तक निर्माण केले, त्या जर्मनीच्या योहान गुटेनबर्ग (Johannes Gutenberg) या महापुरुषाला आपण कदापि विसरू शकत नाही. 


आजच्या आधुनिक मुद्रण तंत्राचा तो आद्य जनक मानला जातो. दुर्दैवाने आज गुटेनबर्ग विषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्याचे व्यक्तिमत्व म्हणजे एक गूढ आहे. तो केव्हा जन्मला तसेच त्याचे निधन कधी झाले हे नक्की कुणालाच माहीत नाही. त्याचे असे रेखाचित्र त्याच्या सबंध आयुष्यात काढलेले नाही. गुटेनबर्गच्या विषयीची माहिती गोळा करण्यासाठी लेखक व इतिहासकार यांना गुप्तहेराच्या भूमिकेत जावे लागले.


नैऋत्य जर्मनीत ऱ्हाईन नदीच्या काठावर वसलेल्या मेंझ (Mainz) या गावात गुटेनबर्ग जन्माला आला. त्याची नेमकी जन्मतारीख अद्यापही अज्ञात आहे. इ.स.१३९४ ते १३९९ या काळात तो जन्मला असावा. मूळात गुटेनबर्ग हे त्याचे आडनाव नाही. त्याचे गेन्सफ़्लाईश कुटुंब हे मेंझ गावातील खानदानी घराण्यातील होते. ते ज्या वाड्यात रहात होते, त्याचा उल्लेख डोंगरावरील घर गुटेनबर्ग हॉफ असा होत असे, त्यावरून त्याला योहान गुटेनबर्ग असे नाव पडले असावे. अर्थातच ज्याची व्यक्तीशः माहिती आपल्याला फार थोडी ठाऊक असली, तरी त्याची महान कामगिरी आपल्याला ज्ञात झालेली आहे. आजच्या मुद्रण तंत्राचा तोच खरा जन्मदाता आहे.


इ.स.१४०० च्या सुरुवातीस पुस्तके अजिबात नव्हती, असे नव्हे, ती दुर्मिळ असत आणि ती मिळवायला खूप वेळ व पैसा खर्चावा लागे. तेव्हाचे प्रत्येक पुस्तक हे हातांनी बनवलेले असे. अक्षरन् अक्षर लिहून काढलेले असे. १४१०-११ च्या हिवाळ्यात दहा बारा वर्षे वयाचा योहान खूप अस्वस्थ असे. बाहेर हिम वादळाने थैमान घातलेले असायचे. त्यामुळे योहान बाहेर जाउन खेळू शकत नव्हता. जवळच्या जंगलातही फिरायला जाणे मुश्कील झाले होते. कधी कधी सर्व रस्ते व झाडे बर्फाच्छादित झाल्यामुळे त्याची शाळा बंद होती. सुदैवाने घरात थोडी पुस्तके होती आणि योहान ती वाचू शकत होता. 


घरातली सर्व पुस्तके वाचून झाल्यावर तो मित्रांकडून पुस्तके आणत असे. जवळच्या चर्च मधली पुस्तकेही त्याला वाचायला मिळत असत. पण काही मौल्यवान पुस्तके तेथील टेबलांना साखळीने बांधून ठेवलेली असत. त्या काळातली सर्व पुस्तके धर्म, तत्वज्ञान, कायदा आणि तत्सम विषयांना वाहिलेली असत. छोट्या मुलांसाठी पुस्तके तर विरळाच. या दिवसात योहानचा थोरला भाऊ घरात बुद्धीबळाचा पट मांडून बसत असे, तर बहीण विणकामात मग्न असे. 


योहानला वडलांच्या संग्रहातली पुस्तके, मग ते इतिहासावरचे ग्रंथ असो, की महत्वाच्या घटनांची नोंद असलेल्या बखरी असो, त्या चाळण्याशिवाय गत्यंतर नसे. या ग्रंथातून मात्र त्याला भूतकाळातील घटना, थोर लोकांची वचने, त्यांच्या त्यांच्या कामगिरीची माहिती होत असे.


जर्मनीतील हे मेंझ शहर तत्कालीन रोमन साम्राज्याचा एक भाग होता. जर्मनीपासून उत्तर इटलीतील अनेक छोटी छोटी राज्ये व शहरे या साम्राज्यात सहभागी होती. ऱ्हाईन नदीवरील मेंझ हे शहर त्या काळी एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र होते. युरोप व बाहेरच्या प्रांतातील व्यापारी तेथे येऊन सौदे करत. योहानचे कुटुंबीय त्यांच्याकडून अनेक महागड्या चीजा, उदा. इटलीच्या काचा, चीनमधून आणलेले कागद, हिंदुस्थानातून आयात केलेले मसाले, युरोपातील इतर देशातून आलेली उत्तमोत्तम सुंदर पुस्तके खरेदी करत.


हे सर्व ग्रंथ म्हणजे लॅटिन भाषेतील धार्मिक ग्रंथ असायचे. ते लेखणी व शाईने लिहिलेले असत. हे अत्यंत सुबक अक्षरात लिहिलेले ग्रंथ पूर्ण होण्यास काही महिने लागत आणि अर्थातच ते खूप महाग असत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सहाशे वर्षां पूर्वीच्या एकेका उत्तम पुस्तकाची किंमत चक्क एखाद्या बऱ्या पैकी आकाराच्या शेतजमिनीइतकी असे. त्याशिवाय योहानचे पिताश्री स्थानिक लेखनिकांना पैसे मोजून काही ग्रंथांच्या नकला करून घेत. हे नकला केलेले सुटे कागद मग नीटस व सुंदर अशा शीर्षकांनी नटलेल्या आवरणात काळजीपूर्वक ठेवले जात.


कागदाचा शोध लागण्यापूर्वी बकरे, मेंढ्यांच्या कातडी पासून बनवलेल्या चर्मपत्रांवर हे लेखन केलेले असे. ही कातडी व्यवस्थितरित्या कमवून घेऊन हवी तशी ताणली जात आणि त्यांचा पृष्ठभाग गुळगुळीत केला जाई. असे हे चर्मपत्रांचे पुस्तक पूर्ण होण्यापूर्वी त्यावर अनेक कारागीर काम करत असत. योहानला आपल्या घरातील प्रत्येक पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण झाली. ते कसे कसे तयार झाले, त्याच्या हरएक प्रक्रियांचे त्याने बारीक निरीक्षण केले. ही लिहून झालेली सुटी चर्मपत्रे एका लेखनिकाकडून दुसऱ्या लेखानिकाकडे सोपवली जात. तो त्यावर प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक, मथळे, उपमथळे लाल रंगाच्या शाईच्या अक्षरात लिहित असे. ही लाल रंगातील अक्षरे काळ्या अक्षरांहून उठून दिसत. काही वेळा हे लेखनिक लाल रंगाच्या शाईने पहिल्या ओळीतील अक्षर अधोरेखित करत. या चर्मपत्राच्या शेवटी थोडी जरी जागा शिल्लक राहिली तरी लेखनिक आपले पुढील प्रकरण अगोदरच्या प्रकरणानंतर लगेच सुरू करत असे. 


एकूण काय, चर्मपत्रावरील इंच न इंच जागेचा उपयोग केला जाई. यासाठी हे लेखनिक आपले लेखन कौशल्य पणाला लावीत. यानंतर ही चर्मपत्रे सजावट काराला दिली जात. तो पत्रांवरील समासात छोटी छोटी चित्रे, भूमितीच्या आकृत्या, पानाफुलांच्या सीमारेषा रेखाटून चर्मपत्रे सुशोभित करत असे. आकर्षक रंगीत चित्रे व प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभीचे मोठे अक्षर काढण्यासाठी जादा आकार द्यावा लागे. पुस्तक अधिक आकर्षक दिसण्यासाठी पातळ असे सोनेरी आवरण घालण्यात येई. मग हे पुस्तक बांधणीसाठी दिले जाई. तो कारागीर सर्व चर्मपत्रे एकत्र करून काळजीपूर्वक एकात एक  शिवून दोन पातळ लाकडी तुकड्यांमध्ये बांधत असे. या तुकड्यांवर कापडी, चामड्याचे अथवा अगदी सोनेरी, रुपेरी एवढेच नव्हे तर हस्तिदंती कोरीव काम केलेले आवरण घालण्यात येई. काही पुस्तकांच्या सजवलेल्या आवरणावर पुस्तकाचे शीर्षक पितळी अक्षरात बसवले जाई. अशा प्रकारे बनवलेली ही पुस्तके इतकी महाग असत, की  ती हाताळताना पुष्कळ काळजी घ्यावी लागे. ती कशीही हाताळणे परवडणारे नव्हते.


अशी ही पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत योहान वाट पाहत बसलेला असे. शेवटी शेवटी तर तो अगदी उतावीळ झालेला असे. कधी हे पुस्तक पूर्ण होते, याची त्याला घाई झालेली असे. पुस्तकाच्या प्रती नकलून देणारे लोक ते पुस्तक काही आठवड्यात देत असले, तरी सजावटकार पुस्तक पूर्ण करून द्यायला काही महिने तरी लावत असत. या सगळ्या लांबच लांब लागणाऱ्या प्रक्रियेवर काही तरी उपाय असला पाहिजे, असे योहानला राहून राहून वाटत असे. आणि खरोखर, एके दिवशी तो उपाय तोच शोधून काढणार होता.


हे सारे चालले असताना योहानच्या मागे त्याची शाळा, खेळ, सण, इतर काही कामे असत. त्याच्या वडिलांनी ठरवले होते की त्याच्या भावाला आणि त्याला उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. त्या काळात मुले चर्चने चालवलेल्या शाळात जात. तिथे धर्मगुरु त्यांना सर्वात कठीण असा लॅटिन हा विषय शिकवत. शाळेच्या वेळात शिक्षक व मुले त्याच भाषातून वाचत व बोलत. एखाद्या परकीय भाषेतून व्याकरण, भूगोल, अंकगणित शिकणे म्हणजे सोपे नव्हते.


शाळेत योहानने आपले योहान गुटेनबर्ग हे नाव धारण केले. त्याचा भाऊ व इतर कुटुंबीय मात्र गेन्सफ़्लाईश  (Gensfleisch) हे नाव लावत असत. गेन्सफ़्लाईश हे मोठे कुटुंब होते आणि मेंझ मधील अनेक व्यक्तींनी त्या वेळी ग्लेनफ़्लाईश हे नाव लावले होते. म्हणून कदाचित योहानने गुटेनबर्ग (Good Hill चांगली टेकडी ) हे नाव धारण केले असावे. (गेन्सफ़्लाईश याचा अर्थ Goose flesh हंसाचे मांस असाही होतो).


मध्ययुगीन काळातील घरांची रचना म्हणजे मध्यभागी आवार आणि सभोवार खोल्या असत. हिवाळ्यात वादळी हिमवर्षाव होत असे. त्या पासून बचाव करण्यासाठी कित्येक घरांच्या खिडक्यांना काचा लावलेल्या असतच असे नसे. तसेच प्रकाशासाठी मेणबत्या सर्वांना परवडत नसत. याचा परिणाम असा, की घराच्या अंतर्भागात काळोख व धुराचे राज्य असे. दिवसा जो काही प्रकाश छोट्या खिडक्यातून आलाच, तर तो खिडक्यांवरच्या तेल लावलेल्या फडक्यांमुळे अडत असे. रात्रौ आणि अति थंड तपमानामुळे दिवसाचा सारा काळ नैसर्गिक प्रकाश हा कधीच घरात येत नसे. घरात उबदारपणासाठी पेटवलेली शेकोटी हाच काय तो प्रकाशाचा मार्ग होता. स्त्रियांचा स्वयंपाक हा शेकोटीपाशी चाले आणि घरात सर्वत्र साचलेल्या धुरामुळे श्वास घेणे कठीण होउन  बसे.


गुटेनबर्ग कुटुंबाच्या घरातील स्नानघर घराच्या मागील बाजूस असलेल्या खोलीत होते. सर्व मंडळी स्नाना साठी त्या खोलीचा वापर करीत. फक्त अतिथंड दिवसात आणि रात्रीच्या वेळी घरात एक मोठे घंगाळ ठेवले जाई. त्या काळात गावात सर्वजनिक स्नानगृहे होती. घरोघर रोजच्या रोज स्नानाची तितकीशी कुणाला सवय  नसे. गावातील रस्ते अरुंद व नागमोडी असत. शाळेत जाताना योहान रस्त्याने चालत जात असे. रस्त्यावर दुतर्फा ओळीने घरे असून तळमजल्या वर दुकाने असत. तीन चार मजल्यांच्या इमारती उंच असल्या तरी त्या प्रशस्त नव्हत्या. त्यांचे वरचे मजले रस्त्यावर पुढे झुकलेले असत. योहानेस रस्त्यावरून चालत जाताना त्याला जी अनेक दुकाने दिसत ती सारी कारागीर व व्यापा-यांच्या संघाची असत. या संघांना गिल्ड असे म्हणत. सुवर्णकारांचे, विणकरांचे, सुतारांचे संघ असत. व्यापा-यांचे संघ त्या त्या क्षेत्रातील कारागीरांना कच्चा माल पुरवीत. उदा. जड जवाहीर बनवणा-यांना सोने चांदी, विणकरांना कापड इ. व्यापा-यांच्या संघाकडूनच विकत घ्यावे लागे.


योहानचे कुटुंबीय मात्र कुठल्याही संघाचे सभासद नव्हते. ते खानदानी घराण्यातले असल्यामुळे त्यांच्यापाशी वडिलोपार्जित पैसाअडका आणि स्थावरजमिनी होत्या. त्यांना पोटापाण्यासाठी काम करण्याची आवश्यकता नव्हती. तरी त्यांच्यापैकी अनेक लोक शहराच्या कारभारात काम पाहत. 


योहानच्या कुटुंबाची गणना उच्च स्तरावरील लोकांमध्ये होत असे. त्यांचे कुटंब मेंझमध्ये कित्येक पिढ्यान पिढ्या असल्याने त्यांच्याकडे शहराच्या व्यवहारासाठी लागणाऱ्या चलनातली नाणी बनवणाऱ्या टांकसाळीची व्यवस्था होती. शहराचे व्यवस्थापन जे लोकांकडून करवसुली करत असे, त्याची जबाबदारी टांकसाळीकडे सोपवलेली होती.


त्या काळीही करवसुलीचे काम करणाऱ्या विषयी जनतेत अप्रियता असे. १४१० मधील हिवाळ्यात या खानदानी घराण्याच्या लोकांविषयी सर्व संघात असंतोष निर्माण झाला. कारण एकच होते, करवसुलीची सक्ती.


योहानचे पिता हे मेंझ नगरपरिषदेचे एक सदस्य होते. संघाचे प्रतिनिधी या नगरपरिषदेवर असूनही खानदानी घराण्याच्या मताधिक्यामुळे मेंझची सत्ता त्यांच्याकडे होती. परिषदेने बीअर, मद्य व धान्यावर कर बसवल्यामुळे संघाचे प्रतिनिधी संतापले.


१४११ च्या प्रारंभी मेंझच्या नागरिकांची परिस्थिती  खालावली. हिवाळा लांबल्याने लोकांना आपले पोट भरणे कठीण होउन बसले होते. त्यातच नगरपरिषदेने करवाढीचा प्रस्ताव मांडला. अगोदर रुष्ट असलेल्या संघाच्या प्रतिनिधींनी परिषदेवरची खानदानी लोकांची सत्ता हिसकावून घेतली. योहानचा पिता काळजीत पडला. मेंझचे काय होणार याची त्याला भीती वाटत होती. कारण गिल्डच्या सभासदांना कामकाजाची तितकीशी माहिती नव्हती. त्यांच्यातील अनेक तर निरक्षर होते.


या सत्ताबदलामुळे खानदानी घराण्यातील लोकांबरोबर योहानच्या पित्याचे टांकसाळीतले काम गेले. कुटुंबीय रस्त्यातून जाता येतांना लोकांकडून त्यांची अवहेलना होऊ लागली. योहानचे वय त्या वेळी अवघे तेरा असूनही त्याची या प्रकारातून सुटका झाली नाही. या कारणामुळे १४११ मध्ये योहानच्या कुटुंबीयांनी मेंझ सोडून अन्यत्र स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. एल्टविले  (Eltville) या मेंझपासून साडेसात मैलांवर असलेल्या गावी त्यांचे आपले असे एक घर होते, तेथे ते सारे राहण्यास गेले.


मेंझच्या गढूळलेल्या वातावरणापासुन दूर अशा एल्टविले येथे योहानने तीन वर्षे काढली. १४१४ मध्ये गिल्ड व खानदानी लोकांमध्ये समेट झाला. गेन्सफ़्लाईश कुटुंब पुनः गुटेनबर्ग वाड्यात परतले. योहानच्या पित्याचे परिषदेचे सदस्यत्व गेले. मोठ्या मुश्किलीने त्याला टांकसाळीची नोकरी मिळाली.


आता योहान सोळा वर्षांचा झाला होता. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण होउन तो आपल्या पित्याबरोबर काम करू लागला होता. त्याला टांकसाळीतील कामात रस उत्पन्न झाला. तेथे मेंझसाठी नाणी बनवण्याबरोबर सरकारी शिक्के, सोन्याचांदीचे दागिने आणि चित्रांच्या चौकटी यांचे काम चालत असे. टांकसाळीतील सुवर्णकार व जवाहिरे यांच्याकडून योहानेसने तेथील कामाचे तंत्र शिकून घेतले.


सुवर्णकार मंडळी ही त्या काळातील शहरातली महत्वाच्या कारागीर संघापैकी मानली जात असत. ते काम शिकण्यासाठी खूप उमेदवारी करावी लागे. शिकाउ उमेदवार हे मुख्य कारागीराच्या घरी राहत असत. व्यवसायाच्या खाचाखोचा शिकत असताना त्याना बरीच वर्षे कोणतेही वेतन असे मिळत नसे. योहानला मात्र तो खानदानी घराण्यातला असल्यामुळे त्याला उमेदवारी करावी लागली नाही. तसे पाहता खानदानी लोक हे गिल्डचे सभासद कधीच नव्हते.


नाणी पाडण्याच्या कामासह सोन्याचांदीचे दागिने बनवण्याच्या तंत्रात योहान वाकबगार झाला. त्यात मौल्यवान रत्ने कशी कापावी व त्यांना पैलू कसे पाडावेत, हा महत्वाचा भाग असतो. उत्तमरित्या पैलू पाडलेला हिरा, मणी हा आकर्षकपणे चमकतो. योहानेसला या कामात उत्तम सराव होण्यासाठी आपल्या कुटुंबाकडे  जडजवाहीर असलेली रत्ने, माणके मिळाली होती.


नाणे व दागिन्यांचे काम करत असताना योहानच्या मनात अचानक एक कल्पना आली. पुस्तकाची बांधणी करणारे कारागीर ग्रंथांच्या कव्हरवर शीर्षकाची पितळी अक्षरे वापरत असत. साच्यातून बनवलेली ही अक्षरे पाहून योहानला वाटले, की हे तंत्र वापरून जलद गतीने पुस्तके का  बनवू नयेत? मग पुस्तके पुष्कळ संख्येने निर्माण होउ शकतील. ज्याचे स्वप्न योहान लहानपणापासून पहात आला होता, त्याचे भविष्य त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. यातून आपल्याला अगणित पैसे मिळतील. योहानने ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे मनावर घेतले.

    संकलनातून