शुक्रवार, २२ जुलै, २०२२

*२२ जुलै - भारतीय राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला*

 ********************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*२२ जुलै - भारतीय राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला*

********************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. 


२४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख होते. त्यांनी ठरवले की कॉंग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.


भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा आणि निळा. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. 


एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४  आरे आहेत. 


मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण २:३ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.


ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.


मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य व पावित्र्याचा बोध होतो.


खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.


निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.


*फडकवण्याची नियमावली :*


भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मान पूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही,यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी भारतीयांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. 


राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की,तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोच. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.


संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो.प्लॅस्टिकचा ध्वज वापरण्यास मनाई असते.


राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की,मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.


संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात असावा.जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला,मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.


राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही,अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.त्यानुसार राजकीय व्यक्ती,केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.ध्वज कुठलेही वाहन,रेल्वे,जहाजावर लावला जाऊ शकत नाही.


ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये.कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.तसेच राष्ट्रध्वज गादी,रुमालावर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.


केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्यात ठेवून फडकविला जातो.राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल.सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

*******************************

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

बुधवार, २० जुलै, २०२२

स्मृतिदिन - २० जुलै १९३७* गुलियेल्मो मार्कोनीचा जन्म

*📬📬गुलियेल्मो मार्कोनी📬📬* 📧📧📧📧📧📧📧📧📧📧 *भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता* ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *स्मृतिदिन - २० जुलै १९३७* गुलियेल्मो मार्कोनीचा जन्म इटलीतील 'बोलोन्या' शहरात २५ एप्रिल १८७४ रोजी झाला. मार्कोनीच्या जन्माच्या आधी १८६८ मध्ये मॅक्‍सेल या शास्त्रज्ञाने विजेचा प्रवाह वातावरणात आहे,अशी कल्पना मांडली होती. या वीजप्रवाहाचे गुणधर्मही त्याने वर्णिले होते. पण बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मार्कोनीला लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबाबत कुतूहल होते. हाइनरिक हर्ट्‌‌‌झचे लेखही त्याने वाचले होते.१८९५ मध्ये मार्कोनी हर्ट्‌‌झच्या संशोधनावर आपल्या वडिलांच्या बोलोन्यातील मोठ्या वाड्यात काम करू लागला.तो आपला पहिला बिनतारी संदेश एक मैल लांब पाठवू शकण्यात यशस्वी झाला.२ जून १८९४ मध्ये इंग्लंडमधील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून मार्कोनीचे पहिले प्रात्यक्षिक करण्यात आले.सरकारी अधिकारी, पोस्टातील मान्यवर त्या वेळी उपस्थित होते. सॅल्सबरीमध्ये दुसर्‍या प्रात्यक्षिकाला वायुदल व सेनादलातील बरेच अधिकारी आले.आता दोन मैलांवरून बिनतारी संदेश दहा मैलांपर्यंत पोचू शकत होता. हळूहळू मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचे जाळे सर्वत्र पसरत गेले. १९१४ मध्ये पहिले जागतिक युद्ध पुकारले गेले. मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचा इटालियन नौदल, वायुदलास फार उपयोग झाला.जगातील सर्वांत मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनीने उभारले.मार्कोनीला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व इतर अनेक पारितोषिके मिळाली. 🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏 संकलन -) गजानन गोपेवाड  उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

सोमवार, १८ जुलै, २०२२

गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿ गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

विनम्र अभिवादन,अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य तर्फे व  गजानन गोपेवाड 

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                                        

   

    *साहित्यरत्न लोकशाहीर*   

          *अण्णाभाऊ साठे*


     *जन्म :  १ ऑगस्ट, १९२०*

(वाटेगाव,ता.वाळवा,जि. सांगली) 

        *मृत्यू :  १८ जुलै, १९६९*

                ( गोरेगाव, मुंबई )


जन्म नाव -) तुकाराम भाऊराव साठे

टोपणनाव -) अण्णाभाऊ साठे

शिक्षण -) अशिक्षित

राष्ट्रीयत्व -) भारतीय 

कार्यक्षेत्र -) लेखक, साहित्यिक

भाषा -) मराठी

साहित्य प्रकार -) शाहिर,कथा,कादंबरीकार

चळवळ -) संयुक्त महाराष्ट्र चळवळ

प्रसिद्ध साहित्यकृती -) फकिरा

प्रभाव -) बाबासाहेब आंबेडकर, 

            कार्ल मार्क्स

वडील -) भाऊराव साठे

आई -)  वालुबाई साठे

पत्नी -) कोंडाबाई साठे,

           जयवंता साठे

अपत्ये -) मधुकर,शांता आणि शकुंतला


            तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते.साठे एका अस्पृश्य मांग समाजामध्ये जन्मलेले एक दलित व्यक्ती होते, त्यांची उपज आणि ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते.

       कथा,कादंबरी,लोकनाट्य,नाटक,पटकथा,लावणी,पोवाडे,प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे,तर आईचे नाव वालबाई होते.त्यांचे मूळ नाव तुकाराम.जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा,जि.सांगली).त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले.१९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे,मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी,अशी मिळतील ती कामे त्यांनी केली.मुंबईत कामगारांचे कष्टमय,दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले.त्यांचे संप,मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला.१९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले.

        मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली.पक्षाचे कामही ते करीत होतेच;तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर,पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले.तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले.पुढे १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकडवॉरंट काढले.पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले.मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले.त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला.त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

         संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला;  त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ?  ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.

           अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (१९६०), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह; त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा (१९४५) हीत्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांत फकिरा (१९५९, आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्यसूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले : वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता ), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी ),डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ ), मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ ), वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज ), फकिरा (कादंबरी फकिरा ). या शिवायव इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.

         उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हे त्यांचे गीतखूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या अजोड आणि अविस्मरणीय आहेत.

          अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’,असे ते म्हणत; आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणा स्रोत होता.मानवी जीवनातील संघर्ष,नाटय,दुःख,दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होते.त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते.त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माणझाली.त्यात बाबूराव बागूल,नामदेव ढसाळ,लक्ष्मण माने,यशवंत मनोहर,दया पवार,केशव मेश्राम,शरणकुमार लिंबाळे आदींचा अंतर्भाव होतो.

        अण्णाभाऊंची निरीक्षणशक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखन शैलीला मराठमोळा,रांगडा पण लोभस घाट आहे.नाट्यमयता हाही त्यांच्यालेखनशैलीचा एक खास गुण.ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो.लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता; त्यांनी ते विपुल केले.

         रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचाप्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.

          पुढे पुढे मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला प्रकर्षाने आले मराठी साहित्यातील प्रतिष्ठितांकडून त्यांची उपेक्षा झाली. विपन्नावस्थेत गोरेगाव (मुंबई) येथे त्यांचे निधन झाले.


महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध प्रसिद्घ केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१८ जुलै - दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचा जन्मदिन

*१८ जुलै - दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचा जन्मदिन* *जन्म - १८ जुलै १९१८* *मृत्यू - ५ डिसेंबर २०१३*;गांधीजींचा दक्षिण आफ्रिकेतील नागरी हक्कांचा लढा २० वर्षे चालू होता.तो १९१४ मध्ये संपला.त्यानंतर चार वर्षांनी मंडेला यांचा जन्म झाला.पीटरमारित्झबर्ग येथे महात्मा गांधींना ते कृष्णवर्णीय असल्याने रेल्वेतून फेकण्यात आले,त्या घटनेचा मंडेला यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता.मंडेला यांनी वर्णद्वेष विरोधी चळवळीत प्रेरणास्थान म्हणून नेहमी गांधीजींना समोर ठेवले होते. २७ वर्षे ते वर्णविरोधी लढय़ासाठी रॉबेन बेटांवर तुरुंगात होते. रिव्होनिया येथील खटल्यात त्यांना पन्नास वर्षांपूर्वी इतरांसमवेत दोषी ठरवण्यात आले होते. १९९९ मध्ये अध्यक्षपदाची एक कारकीर्द पूर्ण करून ते पायउतार झाले.महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट उलथवून लावणारे शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले नेते व दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी नागरी हक्कांसाठी दिलेला लढा हा मार्टिन ल्यूथर किंग व अब्राहम लिंकन यांच्या तोडीचा होता. या लढ्यात मंडेला यांनी एवढा त्याग केला होता की संयुक्त राष्ट्र्संघानेही रोबेन बेटाला जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे.जेथे मंडेलांना डांबले होते तेथे आजही टेबलवर लोखंडाचे एक ताट व कप ठेवलेला आढळतो.जगभरातील पर्यटक येथे गर्दी करतात. 


‘लाँग वॉक टू फ्रीडम’ या आत्मचरित्रात मंडेला म्हणतात, ‘कोठडी तीन पावलांचीच होती. झोपायचे म्हटले तर डोके आणि पाय भिंतीला लागत.१९९० मध्ये मंडेला यांना भारतरत्न देण्यात आले होते.मंडेला यांना शांततेचा नोबेल पुरस्कार ही मिळाला होता. 


२००० मध्ये त्यांनी टाइम नियतकालिकासाठी लेख लिहिला होता, त्यात त्यांनी गांधीजींना भारताच्या अहिंसक लढय़ाचे पिता म्हटले होते व गांधीजींच्या लढय़ाची मुळे आफ्रिकेत होती,असेही म्हटले होते.ते एके ठिकाणी लिहितात की,गांधीजींचा जन्म भारतात झाला पण आम्ही त्यांना दत्तक घेतले.ते भारतीय व दक्षिण आफ्रिकी नागरिक होते. 


दोन्ही देशांनी त्यांच्या बौद्धिक व नैतिक घडणीत मोठा वाटा उचलला होता.त्यांनी अनेक देशांतील वसाहतवादी राजवटीविरोधातील लढय़ांना आकार दिला.नेल्सन मंडेला वकील होते व बॉक्सरही होते. 


नेल्सन मंडेला यांचे ५ डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले. त्यांना आदरांजली !

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

*******************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

बुधवार, १३ जुलै, २०२२

गोपाळ गणेश आगरकर* 🗞️📰🗞️📰🗞️📰🗞️📰🗞️📰🗞️ *जन्म : १४ जुलै १८५६ (टेंभू-सातारा)*

 *✒️🗒️🗞️गोपाळ गणेश आगरकर*

🗞️📰🗞️📰🗞️📰🗞️📰🗞️📰🗞️

*जन्म :  १४ जुलै १८५६ (टेंभू-सातारा)*

 *मृत्यू :   १७ जून १८९५*

         हे महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक होते.आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत गो.ग.आगरकर यांचे योगदान मोलाचे आहे.त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी,मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला.सामाजिक समता,स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌- निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती.मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला.असा लेख लिहिण्याचे धारिष्ट्य त्यापूर्वी कोणाचे नव्हते. बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव प्राधान्याने घ्यावी लागते महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.


गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.


*आरंभीचा काळ*

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात,एका गरीब देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला.घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले.कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्‍हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला.वर्तमानपत्रात लिखाण करणे,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे,शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करतांना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरु करायचे ठरवले होते.त्यात लोकमान्य टिळक,गोपाळ गणेश आगरकर,व विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.



*कारकीर्द*

आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.


पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते व लोकमान्य टिळक एकत्र आले. तोपर्यंत स्वदेशसेवेची प्रेरणा दोघांच्याही मनात जागी झाली होती. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.


पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले


*उल्लेखनीय कार्य*

१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापली.१८८८ साली त्यांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू केले.


गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता – ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते.



राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.



आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे – अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.


वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले


*पत्रकारिता*

१८८१ मध्ये ‘केसरी’ हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८८ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून ‘केसरी’त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे ‘केसरी’ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासुन ‘केसरी’चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.


आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले.सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला.तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.


=========================

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -) 

गजानन गोपेवाड