गुरुवार, ३० जून, २०२२

३० जुन १९०५* *अल्बर्ट आइनस्टाइन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.*

 *३० जुन १९०५*


*अल्बर्ट आइनस्टाइन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.*


सापेक्षतावादाचा विशेष सिद्धान्त ३० जून  इ.स. १९०५ रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन यांनी मांडला. त्या सिद्धान्तामध्ये त्यांनी दाखवून दिले की सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेल्या गतीच्या नियमांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींची (यामध्ये प्रकाशकिरणांचादेखील समावेश होतो) वागणूक स्पष्ट करता येत नाही आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये सिद्धान्त कोलमडून पडतो. त्या परिस्थितीचे विश्लेषण, स्पष्टीकरण आणि अनुमान आइन्स्टाइन यांनी सापेक्षतावादाच्या विशेष सिद्धान्तात केले. त्यानंतर काही वर्षांनंतर त्यांनी याच सिद्धान्तामध्ये गुरुत्वाकर्षण बलाचासमावेश करून सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्तसांगितला. त्यामुळे केवळ सापेक्षतावादाचा सिद्धान्त असे म्हणणे बरोबर नाही तर सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त किंवा सापेक्षतावादाचा विशेष सिद्धान्त अधिक योग्य आहे. या दोन्ही सिद्धान्तांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींचा वेग सापेक्ष परिस्थितीमध्ये नेहमी स्थिर असतो आणि निरीक्षकाच्या वेगावर आणि स्थळावर अवलंबून नसतो. थोडक्यात (न्यूटनच्या गतीच्या नियमांनुसार) संदर्भाची निरपेक्ष चौकट (Frame of Reference (इंग्रजी आवृत्ती)) ही निरीक्षकाकडे न राहता सापेक्षतेच्या सिद्धान्तानुसार प्रकाशाचा निर्वात क्षेत्रातील वेग हाच ती निरपेक्ष चौकट बनला. *E=mc^2*

========================

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६