शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

जाडेपणा म्हणजे नेमके काय ?*


═════════════

   *📒📒📒 @ संकलन 

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════ 

📙 *जाडेपणा म्हणजे नेमके काय ?* 

************************************

शरीरातील चरबीचे प्रमाण नको एवढे वाढत गेले, तर जाडी व वजन वाढते. चरबी प्रत्येकाच्या शरीरात असतेच, पण तिचे सर्व शरीरभर योग्य त्या पद्धतीत विवरण करण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली असते. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त खाऊ लागतो, तेव्हा ही व्यवस्था बिघडायला सुरुवात होते. खाण्यात आलेल्या अन्नातून उष्मांक मिळतात. हे उष्मांक जेव्हा रोजच्या रोज खर्च होत नाहीत, तेव्हा शरीर ते साठवू लागते. ही साठवण्याची शरीराची पद्धत म्हणजे चरबीचा साठा वाढवणे.


पोटावर, मांड्यांमधील जागेत, नितंबांवरील व हातांच्या दंडामागील भागात प्रथम चरबी साठू लागते. पुरुषांमध्ये जाड माणसाला सफरचंदाचा, तर स्त्रियांमध्ये पीअर या फळाचा आकार प्राप्त होऊ लागतो. सर्वसाधारण आकडेवारीनुसार उंची, वय व वजन यांचे जेवढे प्रमाण असायला हवे, त्यापेक्षा वजन जास्त असेल, तर माणूस जात आहे, त्याने चरबी साठवायला सुरुवात केली आहे, असे समजावे. याखेरीज कातडीमधील चरबीचा साठा रास्त व जास्त आहे, हे ठरवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे चिमटेही मिळतात. या बाबतीत सोपा घरगुती अंदाज म्हणजे दंडामागील कातडी छोट्या चिमटीत पकडता आली तर चरबीचा साठा रास्त व न आली तर जास्त, असे समजावे !

प्रत्येक प्राण्यामध्ये चरबीचा साठा करणे व वापरणे यांवर निसर्ग नियंत्रण ठेवतो. पण माणूस त्याच्या अति खाण्याने व ऐदी वागणुकीने हे नियंत्रण झुगारू पाहतो. साखर, लोणी व मोटार वाहन वापर यांमुळे मानवाने स्वतःचे संतुलन घालवले आहे, असे डॉक्टर मंडळी म्हणतात. वाहनांमुळे हालचाल संपली, साखरेने नको असलेले उष्मांक पोटात वाढू लागले, तर लोण्यामुळे चक्क चरबीच पोटात वाढू लागली. विसाव्या शतकात जाड माणसांचे प्रमाण व त्यातून उद्भवणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.


जाड माणसाला जास्त घाम येतो. घामाला वास येत राहतो. थकवा जाणवतो, धाप लागते, जास्त तहान लागते, सतत खावेसे वाटते, खाऊनही समाधान होत नाही. या साध्या साध्या लक्षणानंतरही लक्ष दिले नाही, तर हळूहळू जाड माणसाच्या शरीरात मधुमेह, रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे विकार व त्यांतूनच उद्भवणारा हृदयविकार यांचा शिरकाव होतो. वजन जास्त वाढल्याने सांध्यांची झीज होत जाऊन सांधेदुखी, तर पायांतील रक्तवाहिन्यांना शिथिलपणा आल्याने पायांत रक्त साचून पाय दुखणे, सूज येणे सुरू होते. जाड माणसे अपघाताला जास्त निमंत्रण देतात. रस्ता ओलांडताना अचानक आलेले वाहन धडकणे, जिन्यावर तोल न सावरता येणे यांतून हे अपघात घडतात.


पूर्ण उपवासाने जाडी कमी करणे हे सोपे आहे. पण कमी केलेली जाडी तशीच टिकवणे हे मात्र अत्यंत कठीण काम आहे. एका आकडेवारीनुसार जाडी कमी केलेल्यांतील जेमतेम ५ टक्के लोकच ती तशीच टिकवण्यात यशस्वी होतात. एकंदरीत खाण्यापिण्याच्या पद्धतीत व जीवनपद्धतीत अत्यंत नियमितपणा आणून सुयोग्य व्यायाम केला, तरच जाडी आटोक्यात राहू शकते.


स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर, विद्यार्थ्यांत बैठे काम सुरू झाल्यावर, मध्यम वयात म्हणजे चाळीस ते पन्नास या दरम्यान वजन वाढू लागते. नियमित व्यायाम केल्यास आणि तेलकट, तळकट व गोड खाणे मोजकेच ठेवल्यास जाड होण्याची भीती बाळगायची गरज नाही. हजारभर जाड माणसात एखाद्याचीच जाडी अनुवांशिक असते. ती आटोक्यात आणणे मात्र डॉक्टरांनाच शक्य असते. पण उरलेले सर्वजण मात्र 'हे कोणालाच शक्य नाही', अशा समजुतीत वावरतात.


जगातील सर्वात जाड इसम 'जॉन मुनाॅक' याचे वजन होते सहाशे पस्तीस किलोग्रॅम. १९८३ साली त्याचे जेमतेम बेचाळीसाव्या वर्षी निधन झाले. हा विक्रम आजही अबाधित आहे.


*'सृष्टी विज्ञानगाथा' 

श्री.ष.ब्र.१०८ प.पू.वसुंधरारत्न,राष्ट्रसंत, सदगुरु.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महास्वामिजी* (वीरमठ अहमदपूर) यांचे आज १०५ जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम...!!

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🚩🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🚩🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

    *श्री.ष.ब्र.१०८ प.पू.वसुंधरारत्न,राष्ट्रसंत, सदगुरु.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महास्वामिजी* (वीरमठ अहमदपूर) यांचे आज १०५ जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम...!! 


  *धन्य तुमची जीवनगाथा...!*

     *येथे झुकतो प्रत्येकाचा माथा...!!*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

   सर्व प्रथम माझे गुरुमाऊली, वसुंधरा रत्न, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा आज २५ फेब्रुवारी २०२२ ला १०६ व्या जयंती निमित्त ....सतत मनी राष्ट्रभाव ठेऊन देशासाठी तथा लिंगायत समाजाच्या ऐक्यासाठी राञदिवस समाज प्रबोधन करीत असलेले महान तपस्वी दैवी शक्तीस शत् शत् नमन्...

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

       ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस भगवंताचा अवतार या पृथ्वीवर होतो.बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांचा, त्यानंतर मन्मथ माऊलिंचा,आणि या कलियुगामध्ये राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा.

    धन्य तुमची जीवनगाथा...!

येथे झुकतो प्रत्येकाचा माथा.. !!राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात पदयात्रा मार्ग मार्गक्रमन करत आहे . ज्यानी आपल्या वयाची १०४ वर्ष केवळ जीवाचा उद्धार व भक्तांचे कल्याण करण्यासाठी चंदनाप्रमाणे झिजवली.विश्वातील समग्र मानवाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची अध्यात्मिक दृष्टी दिली. माऊलिंच्या वर्णणासाठी सद् गुणांचे दृष्टांतही अपूरे पडतात. त्याग,विरक्ती,ज्ञान,प्रेम,शांती, भक्ती,परोपकार,आनंद,याचेसह दृष्टांत अपूरे पडतात.अध्यात्म विकास आणि विकासाची सांगड म्हणजेच राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज.महाराजांची गोरगरिबाविषयी तळमळ, बंधु प्रेमाची शिकवण, 

उत्साह,संस्कार,मन मोकळे मतप्रदर्शन,आचरणशुद्धता ही गुणवैशिष्ट्ये समाजमनाला बांधणारी आदर्श आहेत.ज्ञानसूर्य प.पू.गुरूमाऊली समाजात सत्प्रेरणा,सदभाव व सत्प्रवृत्तीचा मुळ स्ञोत म्हणजेच माऊली.जे सूर्याप्रमाणे संपूर्ण सद्भक्तांना आत्मज्ञानाचा प्रकाश देत आहेत.आधुनिकतेच्या तापाने तप्त अशा मानव समाजाला चंद्रासारखी शितलता देत आहेत.प्राणीमाञाची पिडा ज्यांना स्वतःची पिडा वाटते,असे राष्ट्रसंत आज संपूर्ण समाजाला जीवनाची योग्य दिशा दाखवत होते.म्हणूनच...!!

*धन्य तुमची जीवनगाथा...!!*

*येथे झुकतो प्रत्येकांचा माथा..!*

*मौलिक तुमच्या विचारधारा,सुगंधित आहे. आसंमत सारा..,*

*विनम्र होऊनी शतजन्मी,शब्दफुलांची ओंजळ वाहतोत,आज तुमच्या चरणी...!!*

प.पू.गुरूमाऊलिंना कोटी कोटी नमन्...!!

संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय...!!!

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय....!!!!!

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

आयपॅड, आयफोन, स्मार्टफोनचा संशोधक*

 *📲📲📲स्टीव्ह जॉब्स📲📲📲*

📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱

*आयपॅड, आयफोन, स्मार्टफोनचा संशोधक*

📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱

*जन्मदिन - २४ फेब्रुवारी इ.स. १९५५*

📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲

   स्टीव्ह जॉब्स (इंग्लिश: Steve Jobs) (२४ फेब्रुवारी इ.स. १९५५; सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया,अमेरिका - ५ ऑक्टोबर इ.स. २०११; पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा काही काळ पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज‎चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ॲपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक🖥️🖥️ तयार केला. ॲपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ॲपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ॲपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृति अस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले[ संदर्भ हवा ].

स्टीव जॉब्सला उपभोक्ता संगणकक्षेत्रातील नवीनतेचा व अविष्कारचा जनक म्हणून संबोधले जाते. मृत्यू स्टिव जॉब्सचा कर्क रोगामुळे मृत्यू झाला.


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬ *📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱* ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬ 🔭🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸🔭 ══════════════════════ *📒📒📒 @ संकलन @📒📒📒* *श्री. संदिप अंबादास शेंडे नागपूर (TSS)* ══════════════════════ 🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ══════════════════════ 🦷 *दात* 🦷 ************* कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये ठळकपणे उठून दिसतात ते त्या व्यक्तीचे केस, डोळे, नाक आणि दात. या चारही घटकांपैकी केस, डोळे, नाक हे तिन्ही घटक सुंदर असले आणि दात मात्र वेडेवाकडे किंवा फारच पुढे असले तर मात्र बाकी सर्व घटक हजर असूनही वेड्यावाकड्या दातांमुळे चेहऱ्याला कुरुपता येते आणि चर्वण क्षमता कमी होते. मनुष्याचा आहार, मनुष्याची पचनक्रिया, मनुष्याची भाषा, शब्दोच्चार या गोष्टीसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दातच कारणीभूत ठरतात म्हणूनच दातांना महत्त्व मोठं आहे. *दातांची काळजी कशी घ्यावी* *माणूस आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरी तो आपल्या दातांची काळजी सहज घेऊ शकतो. त्यासाठी अगदी वेगळा वेळ काढावा असं काही नाही. दातांवर जेवणाचे कण अडकू न देणं, सकाळी आणि रात्री नियम‌ीत दात घासणं, जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणं, डॉक्टरांनी सांगितलेल्या पध्दतीनेच दात स्वच्छ करणं या सर्व गोष्टींमुळे दातांवरचे जेवणाचे कण निघून जातात. जर दातांतील जेवणाचं कण साठून राहिले तर त्याला फूड लॉजमेंट (food lodgement) म्हणतात. *मुखाचे दोन प्रकारचे आजार•दात कीडणं (झाडाला कीड लागणं)•दातांच्या हिरड्या आणि हाड खराब होणं (जमिनीला कीड लागणं) *दातांचे हाड आणि हिरड्या खराब होण्याच्या आजाराला पायोरिया (Periodontitis/Pyorrhoea) असं म्हणतात. असा हिरड्या आणि हाड खराब होण्याचे आजार जेवणाचे कण अडकल्यामुळेच होतात. जसं की हिरडीला सुज येणे, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणं, तोंडातून दुर्गंधी येणं, दात हालणं. *दात स्वच्छ करण्याची पध्दत : *१. ब्रशला दातांच्या मानेवर आणि हिरडीवर ४५ अंश कोनात १०/१५ वेळा हलक्या हाताने ब्रश मागे-पुढे करणं. *२. दातांच्या आतल्या बाजूस ब्रश करणंही आवश्यक असते. *३. दातांच्या चावण्याचा पृष्ठभागावरही (Top surface) ब्रश करणं आवश्यक असतं. *४. ब्रशच्या शेंड्याचाही वापर करणं गरजेचं असतं. *बरेच रुग्ण सांगतात की, ते २-३ वेळा दात घासूनही त्यांना दातांचा आणि हिरडीचा त्रास आहे. रुग्णांची जर दात घासण्याची पध्दतच चुकीची असेल तर अनेक वेळा दात घासूनही उपयोग नाही. दात दिवसातून २-३ वेळा डॉक्टरांनी सांगितलेल्या पध्दतीने घासले गेले पाहिजेत किंवा प्रत्येक जेवणानंतर दात घासले तर अति उत्तम. प्रॉक्सा ब्रश आणि डेंटल फ्लॉस (Proxa Brush/ Dental floss)चा उपयोग केला तर अति उत्तम. आपल्या नेहमीच्या ब्रशने दात घासल्यानंतर Dental floss किंवा Proxa ब्रशने प्रत्येक दोन दातांमधील अडकलेले जेवणाचे कण स्वच्छ करावेत. नंतर गुळणी करुन शेवटी Chlorchoxidin mouth washने गुळण्या करणं फायदेशीर ठरेल. माऊथ वॉशचा वापर केल्याने तोंडातला आम्ल‌कि PH नाहीसा होतो. त्यामुळे दातांवर आणि हिरडीवर असलेले कीडजन्य जंतू कमी होण्यास मदत होते. (डायबेटीसच्या रुग्णाने अशा पध्दतीचे अवलंब करणं गरजेचं आहे). ब्रश हिरड्यांवरुनही हलक्या हाताने फिरवला पाहिजे. जेणेकरुन हिरड्यांची मसाज होऊन हिरड्यांमधील रक्तप्रवाह वाढतो. गैरसमजूती- बऱ्याच रुग्णांमध्ये असा गैरसमज निर्माण झाला आहे की, डॉक्टरांकडून दात स्वच्छ केल्याने दात ढिले होतात. पण याउलट दात स्वच्छ केल्यानेच दात पक्के होण्यास मदत होते आणि सगळ्या रुग्णांमध्ये दात स्वच्छ करण्याची गरज नसते. दात स्वच्छ केल्यानंतर सुरुवातीला काही दिवस दात ढिले झाल्याची जाणीव होते. कारण दातांवरचे किटाणू निघाल्यानंतर दात आणि हिरड्या तात्पुरत्या स्वरुपात मोकळ्या होतात. पण काही दिवसांनी या हिरड्यांची नव्याने वाढ होऊन दात पुन्हा पक्के होण्यास मदत होते आणि दातांचे आयुष्य वाढते. हे डॉक्टरांकडून स्वच्छ केलेले दात डॉक्टरांनी सांगितलेल्या ब्रशिंग पध्दतीचाच उपयोग करुन दैनंदिन घरच्या घरी व्यवस्थ‌ति अवलंब करावा. - डॉ. विशाल ठाकूर, दंतरोग तज्ज्ञ ═══════════════════════ *📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱* ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬ ⚜🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​⚜ ═══════════════════════ 🎯🗝 *धरुनी कास तंत्रज्ञानाची*, *प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯 ═══════════════════════


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🦷 *दात* 🦷

*************

कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये ठळकपणे उठून दिसतात ते त्या व्यक्तीचे केस, डोळे, नाक आणि दात. या चारही घटकांपैकी केस, डोळे, नाक हे तिन्ही घटक सुंदर असले आणि दात मात्र वेडेवाकडे किंवा फारच पुढे असले तर मात्र बाकी सर्व घटक हजर असूनही वेड्यावाकड्या दातांमुळे चेहऱ्याला कुरुपता येते आणि चर्वण क्षमता कमी होते. मनुष्याचा आहार, मनुष्याची पचनक्रिया, मनुष्याची भाषा, शब्दोच्चार या गोष्टीसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दातच कारणीभूत ठरतात म्हणूनच दातांना महत्त्व मोठं आहे.


*दातांची काळजी कशी घ्यावी*


*माणूस आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरी तो आपल्या दातांची काळजी सहज घेऊ शकतो. त्यासाठी अगदी वेगळा वेळ काढावा असं काही नाही. दातांवर जेवणाचे कण अडकू न देणं, सकाळी आणि रात्री नियम‌ीत दात घासणं, जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणं, डॉक्टरांनी सांगितलेल्या पध्दतीनेच दात स्वच्छ करणं या सर्व गोष्टींमुळे दातांवरचे जेवणाचे कण निघून जातात. जर दातांतील जेवणाचं कण साठून राहिले तर त्याला फूड लॉजमेंट (food lodgement) म्हणतात.

*मुखाचे दोन प्रकारचे आजार•दात कीडणं (झाडाला कीड लागणं)•दातांच्या हिरड्या आणि हाड खराब होणं (जमिनीला कीड लागणं)

*दातांचे हाड आणि हिरड्या खराब होण्याच्या आजाराला पायोरिया (Periodontitis/Pyorrhoea) असं म्हणतात. असा हिरड्या आणि हाड खराब होण्याचे आजार जेवणाचे कण अडकल्यामुळेच होतात. जसं की हिरडीला सुज येणे, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणं, तोंडातून दुर्गंधी येणं, दात हालणं.

*दात स्वच्छ करण्याची पध्दत :

*१. ब्रशला दातांच्या मानेवर आणि हिरडीवर ४५ अंश कोनात १०/१५ वेळा हलक्या हाताने ब्रश मागे-पुढे करणं.

*२. दातांच्या आतल्या बाजूस ब्रश करणंही आवश्यक असते.

*३. दातांच्या चावण्याचा पृष्ठभागावरही (Top surface) ब्रश करणं आवश्यक असतं.

*४. ब्रशच्या शेंड्याचाही वापर करणं गरजेचं असतं.


*बरेच रुग्ण सांगतात की, ते २-३ वेळा दात घासूनही त्यांना दातांचा आणि हिरडीचा त्रास आहे. रुग्णांची जर दात घासण्याची पध्दतच चुकीची असेल तर अनेक वेळा दात घासूनही उपयोग नाही. दात दिवसातून २-३ वेळा डॉक्टरांनी सांगितलेल्या पध्दतीने घासले गेले पाहिजेत किंवा प्रत्येक जेवणानंतर दात घासले तर अति उत्तम. प्रॉक्सा ब्रश आणि डेंटल फ्लॉस (Proxa Brush/ Dental floss)चा उपयोग केला तर अति उत्तम. आपल्या नेहमीच्या ब्रशने दात घासल्यानंतर Dental floss किंवा Proxa ब्रशने प्रत्येक दोन दातांमधील अडकलेले जेवणाचे कण स्वच्छ करावेत. नंतर गुळणी करुन शेवटी Chlorchoxidin mouth washने गुळण्या करणं फायदेशीर ठरेल. माऊथ वॉशचा वापर केल्याने तोंडातला आम्ल‌कि PH नाहीसा होतो. त्यामुळे दातांवर आणि हिरडीवर असलेले कीडजन्य जंतू कमी होण्यास मदत होते. (डायबेटीसच्या रुग्णाने अशा पध्दतीचे अवलंब करणं गरजेचं आहे). ब्रश हिरड्यांवरुनही हलक्या हाताने फिरवला पाहिजे. जेणेकरुन हिरड्यांची मसाज होऊन हिरड्यांमधील रक्तप्रवाह वाढतो.


गैरसमजूती-


बऱ्याच रुग्णांमध्ये असा गैरसमज निर्माण झाला आहे की, डॉक्टरांकडून दात स्वच्छ केल्याने दात ढिले होतात. पण याउलट दात स्वच्छ केल्यानेच दात पक्के होण्यास मदत होते आणि सगळ्या रुग्णांमध्ये दात स्वच्छ करण्याची गरज नसते. दात स्वच्छ केल्यानंतर सुरुवातीला काही दिवस दात ढिले झाल्याची जाणीव होते. कारण दातांवरचे किटाणू निघाल्यानंतर दात आणि हिरड्या तात्पुरत्या स्वरुपात मोकळ्या होतात. पण काही दिवसांनी या हिरड्यांची नव्याने वाढ होऊन दात पुन्हा पक्के होण्यास मदत होते आणि दातांचे आयुष्य वाढते. हे डॉक्टरांकडून स्वच्छ केलेले दात डॉक्टरांनी सांगितलेल्या ब्रशिंग पध्दतीचाच उपयोग करुन दैनंदिन घरच्या घरी व्यवस्थ‌ति अवलंब करावा.


- डॉ. विशाल ठाकूर, दंतरोग तज्ज्ञ

═══════════════════════

  

जायरोस्कोप म्हणजे काय ?*


══════════════════════

              

📙 *जायरोस्कोप म्हणजे काय ?* 

************************************

होकायंत्र ज्यावेळी स्थिर राहू शकत नाही, हेलकावे, वळणे, हिंदकळणे यांमुळे त्याचा लोहचुंबक दिशा नीट दाखवायला जेव्हा असमर्थ ठरू लागतो, त्या वेळी जाइरोस्कोप वापरावा लागतो. जमिनीला समांतर स्वरूपात होकायंत्र स्थिर असेल, तेव्हा त्यावरून नेमकी दिशा ज्ञात करून घेता येते. पण पाण्यावर जेव्हा एखादे जहाज वादळात सापडून सतत हेलकावू लागते, तेव्हा आपण पकडलेली दिशा कोणती, असा प्रश्न उद्भवतो. अशीच काहीशी स्थिती विमानात येते.

जायरोस्कोप म्हणजे एक जड, स्वतःभोवती फिरणारे चक्रच असते. एका विशिष्ट अक्षाभोवती हे चक्र अत्यंत वेगाने फिरू शकते. या अक्षाची दिशा त्याभोवती असलेल्या मोजपट्टीवर पाहिजे त्या ठिकाणी स्थिर करून मग हे चक्र फिरवायला सुरुवात करतात. थोडक्यात म्हणजे होकायंत्रावरून प्रवासाचे अक्षांश रेखांश पक्के ठरले की सुकाणूची दिशा पकडण्यासाठी जायरोस्कोप स्थिर करून त्याचे चक्र फिरवायला सुरुवात केली जाते. एकदा का चक्र वेगाने फिरू लागले की, याची दिशा हलवणे व त्याचा फिरणारा चक्राचा पृष्ठभाग अक्ष बदलून फिरणे ही जवळपास न होणारी गोष्ट बनते.


चक्राने घेतलेला स्वतः भोवतीचा वेग केंद्रीभूत होऊन अशी काही अक्षाभोवती पकड घेतो की ती पकड हलणे व्यवहारत: अशक्य असते. यालाच जायरोस्कोपिक इनर्शिया' किंवा 'जडत्व' असे म्हणतात. यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे चक्राचा फिरण्याचा वेग अबाधित राखणे. हा वेग जर काही कारणाने कमी होऊ लागला, तर मात्र ज्या आधारावर जायरोस्कोप उभा केलेला, आधारलेला असतो, त्यालाच तो संथपणे गोलाकार फेरी घालू लागतो.


 जायरोस्कोपचा वापर होकायंत्राच्या जोडीला सर्व प्रकारच्या लांब पल्ल्याच्या जल व हवेतील प्रवासासाठी केला जातो. होकायंत्र वाचणे व त्याचा वापर करणे हे तल्लख खलाशाचे व अधिकाऱ्याचे काम; पण या ऐवजी जाइरोस्कोप दाखवेल ती दिशा पकडणे ही मात्र कोणाही माणसाला जमणारी गोष्ट असू शकते. हाही महत्त्वाचा उपयोग नाही काय ? 

 

 अंतराळ प्रवासात होकायंत्र बिनकामी ठरते; पण जाइरोस्कोप वापरता येतो.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*


मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ════════════ 📙 *जायरोस्कोप म्हणजे काय ?*


            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

════════════  

📙 *जायरोस्कोप म्हणजे काय ?* 

*******************

होकायंत्र ज्यावेळी स्थिर राहू शकत नाही, हेलकावे, वळणे, हिंदकळणे यांमुळे त्याचा लोहचुंबक दिशा नीट दाखवायला जेव्हा असमर्थ ठरू लागतो, त्या वेळी जाइरोस्कोप वापरावा लागतो. जमिनीला समांतर स्वरूपात होकायंत्र स्थिर असेल, तेव्हा त्यावरून नेमकी दिशा ज्ञात करून घेता येते. पण पाण्यावर जेव्हा एखादे जहाज वादळात सापडून सतत हेलकावू लागते, तेव्हा आपण पकडलेली दिशा कोणती, असा प्रश्न उद्भवतो. अशीच काहीशी स्थिती विमानात येते.

जायरोस्कोप म्हणजे एक जड, स्वतःभोवती फिरणारे चक्रच असते. एका विशिष्ट अक्षाभोवती हे चक्र अत्यंत वेगाने फिरू शकते. या अक्षाची दिशा त्याभोवती असलेल्या मोजपट्टीवर पाहिजे त्या ठिकाणी स्थिर करून मग हे चक्र फिरवायला सुरुवात करतात. थोडक्यात म्हणजे होकायंत्रावरून प्रवासाचे अक्षांश रेखांश पक्के ठरले की सुकाणूची दिशा पकडण्यासाठी जायरोस्कोप स्थिर करून त्याचे चक्र फिरवायला सुरुवात केली जाते. एकदा का चक्र वेगाने फिरू लागले की, याची दिशा हलवणे व त्याचा फिरणारा चक्राचा पृष्ठभाग अक्ष बदलून फिरणे ही जवळपास न होणारी गोष्ट बनते.


चक्राने घेतलेला स्वतः भोवतीचा वेग केंद्रीभूत होऊन अशी काही अक्षाभोवती पकड घेतो की ती पकड हलणे व्यवहारत: अशक्य असते. यालाच जायरोस्कोपिक इनर्शिया' किंवा 'जडत्व' असे म्हणतात. यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे चक्राचा फिरण्याचा वेग अबाधित राखणे. हा वेग जर काही कारणाने कमी होऊ लागला, तर मात्र ज्या आधारावर जायरोस्कोप उभा केलेला, आधारलेला असतो, त्यालाच तो संथपणे गोलाकार फेरी घालू लागतो.


 जायरोस्कोपचा वापर होकायंत्राच्या जोडीला सर्व प्रकारच्या लांब पल्ल्याच्या जल व हवेतील प्रवासासाठी केला जातो. होकायंत्र वाचणे व त्याचा वापर करणे हे तल्लख खलाशाचे व अधिकाऱ्याचे काम; पण या ऐवजी जाइरोस्कोप दाखवेल ती दिशा पकडणे ही मात्र कोणाही माणसाला जमणारी गोष्ट असू शकते. हाही महत्त्वाचा उपयोग नाही काय ? 

 

 अंतराळ प्रवासात होकायंत्र बिनकामी ठरते; पण जाइरोस्कोप वापरता येतो.


*'सृष्टी विज्ञानगाथा' 

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

माघ मास,कृष्ण पक्ष,*सप्तमी*,विशाखा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,बसन्त ऋतु, युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २३ फेब्रुवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


          *"हर विषय, वस्तु, कार्य का श्वेत एवं श्याम पक्ष दोनों होता है। यह देखने वाले के ऊपर निर्भर है कि वो कौन सा पक्ष देखता है। हर कार्य में कुछ त्रुटि भी हो सकती है किन्तु जिसका स्वभाव आलोचनात्मक हो तो उससे आप अपने किसी भी कार्य की प्रशंसा की अपेक्षा नही कर सकते। स्मरण रहे कि आप कितना भी अच्छा कार्य का प्रयास करें किन्तु नकारात्मक व्यक्ति आपकी गलती ढूंढने के लिए अपनी सम्पूर्ण ऊर्जा लगा देंगे। अतः श्रेष्ठ यही है कि ऐसे व्यक्तियों की बातों पर ध्यान न दें, सहज एवं सरल रहें।"*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक* *स्वच्छतेचे पुजारी* *संत गाडगे महाराज*

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

              *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक*


               *स्वच्छतेचे पुजारी*  

             *संत गाडगे महाराज*


       *डेबूजी झिंगराजी जानोरकर*

                 (समाज सुधारक)


  *जन्म : २३ फेब्रुवारी १८७६*

 (शेणगाव,महाराष्ट्र,ब्रिटिश भारत)


 *निधन : २० डिसेंबर १९५६* 

                (वय ८०)

    ( वलगाव,अमरावती,महाराष्ट्र )


मुख्य स्वारस्ये : धर्म,कीर्तन,नीतिशास्त्र


प्रभाव : डाॕ. बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील , भाऊराव कृष्णाजी गायकवाड , तुकडोजी महाराज आणि मेहेर बाबा


गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.


संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.


गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.


समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.

 

👬 *गाडगेबाबा आणि बाबासाहेबांची भेट*


१४ जुलै १९४१ मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.

गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."

डॉ. बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.


📚 *गाडगे महाराजांची चरित्रे*


असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)

कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)

गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)

गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)

श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)

Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)

गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)

गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)

गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)

निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)

लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)

The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)

संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)

संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)

संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)

संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)

श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)

श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)

संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)

गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)

समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )

स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

🎥 *गाडगेबाबांच्या जीवनावरील  चित्रपट*


डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर

देवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त


📖 *साहित्य संमेलन*


महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते.


⏳ *मृत्यू*


गाडगे महाराजांचे अमरावती जवळ पेढी नदीच्या काठावर, वडगाव जि. अमरावती २० डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. 


🏵 *सन्मान* 


त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रकल्प २०००-०१ मध्ये सुरू केला. हा कार्यक्रम स्वच्छ गावे सांभाळणार्‍या ग्रामस्थांना बक्षिसे देतो.  याव्यतिरिक्त, भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ स्वच्छता व पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली.  त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.



🏵 *सन्मान*

भारताच्या टपाल खात्याने त्यांच्या नावावर स्मारक शिक्के जारी करुन गाडगे महाराजांचा गौरव केला होता.


*🙏🌹 गोपाला... गोपाला... देवकीनंदन गोपाला... 🌹🙏*

        

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षणमंञी* *भारतरत्न* *अबुल कलाम आज़ाद*

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿ 

🇮🇳🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षणमंञी*

                  *भारतरत्न*

         *अबुल कलाम आज़ाद*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

     *जन्म : ११ नवम्बर १८८८*

            (मक्का,सउदी अरब)

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

    *मृत्यु : २२ फेब्रुवारी  १९५८*

                   ( दिल्ली)


पुर्ण नाव : मौलाना अबुलकलाम मुहीउद्दीन अहमद


अभिभावक : मौलाना खैरूद्दीन और आलिया


पत्नी : ज़ुलैख़ा


नागरिकता : भारतीय


प्रसिद्धि : स्वतंन्त्रता सेनानी, क्रांन्तिकारी, पत्रकार, समाजसुधारक, शिक्षा विशेषज्ञ


पार्टी : कांग्रेस


पद : भूतपूर्व शिक्षा मंत्री


भाषा : उर्दू, फ़ारसी और अरबी


पुरस्कार-उपाधि : भारत रत्न


विशेष योगदान : वैज्ञानिक शिक्षणाला प्रोत्साहन, नविन विश्वविद्यालयांची स्थापना, उच्च शिक्षण  आणि संशोधनाला प्रोत्साहन, स्वाधीनता संग्राम


रचना : इंडिया विन्स फ्रीडम अर्थात् भारतीय स्वातंत्र्याचा विजय, क़ुरान शरीफ़ चा अरबी मधून उर्दू मध्ये भाषांतर, तर्जुमन-ए-क़ुरान, ग़ुबारे-ए-खातिर, हिज्र-ओ-वसल, खतबात-ल-आज़ाद, हमारी आज़ादी और तजकरा


मौलाना अबुल कलाम आझाद  हे एक भारतीय प्रमुख राजकीय पुढारी होते. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही त्यांना ही उपाधि मिळाली. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौ. आझादांनी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान ह्यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला.१९०८ मध्ये ईजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, हे मत त्यांनी प्रतिपादिले. लोकजागृतीसाठी १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून १०,००० रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पडले. १९१५ साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले. त्यामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. मुसलमानांत त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले. १९२० साली त्यांची सुटका झाली. ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले. १९२१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली; पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले; १९२३ च्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. १९३० मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली. ह्या वेळी मुसलमान जमातीस सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच मिळाले. आझाद १९३९ ते ४६ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४५ साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली. १९४२ ची क्रिप्सयोजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत काँग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील तजकेरा,गुब्बारे खातिर्, कौले फैसल, दास्ताने करबला, तरजुमानुल कोरान ही प्रसिद्ध आहेत. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे. ह्याशिवाय त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (१९५९) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे;  मात्र त्यातील अप्रकाशित तीस पाने १९८८ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्यांची भाषणेही पुस्तकरूपाने अलीकडे प्रसिद्ध झाली आहेत.

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

अतुल चिटणीस👨‍💻🖥️👨‍💻* 🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️ *🖥️👨‍💻भारतीय संगणक अभियंता👨‍💻🖥️*

 *👨‍💻🖥️👨‍💻अतुल चिटणीस👨‍💻🖥️👨‍💻*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

*🖥️👨‍💻भारतीय संगणक अभियंता👨‍💻🖥️*

👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻

     *जन्मदिन - २० फेब्रुवारी १९६२*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

  अतुल चिटणीस (२० फेब्रुवारी १९६२ - ३ जून २०१३ ) हे जर्मनीत जन्मलेले भारतीय संगणक अभियंता होते. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सना *"लिनक्‍स सॉफ्टवेअर"* वापराची ओळख करून देण्याचा मान प्रथम चिटणीस यांच्याकडे जातो. त्यांनी प्रसिद्ध नियतकालिक *"पीसीक्वेस्ट"* साठी सहा वर्षे सल्लागार संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

कारकिर्द

तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभाराची गुरूकिल्ली हाती येते ; तरी कित्येकदा तंत्रज्ञानही मक्तेदारीमध्ये जखडून ठेवण्याची खेळी प्रस्थापितांकडून केली जाते. या जोखडातून कम्प्युटर तंत्रज्ञानाची सुटका करून ते सर्वांना उपलब्ध व्हावे ,याचा पाठपुरावा करण्यात ओपन सोर्सचे प्रणेते अतुल चिटणीस यांनी आपली कारकीर्द घडवली. फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे प्रणेते म्हणून १९९४ पासून अतुल चिटणीस हे नाव भारताला ठाऊक झाले. साधारण त्याच काळात उद्योगव्यवहारांमध्ये वह्यापेन्सिली आणि कागदी फायलींची जागा कम्प्युटर घेऊ लागला होता. कदाचित त्यावेळी , सॉफ्टवेअर कुणा कंपन्यांच्या मक्तेदारीत बांधलेले नसावे , या विचाराचे मोल सर्वांना तितकेसे उमजत नसावे. नंतर भारतीय भाषांच्या वापरातील अडचणी , परवान्यासाठी मोजावी लागणारी किंमत तसेच भारतीय डेटाची सुरक्षितता व परावलंबित्वाचे प्रश्न यामुळे ओपन सोर्सची गरज सर्वांना पटू लागली. अतुल चिटणीस यांनी मात्र १९८०पासूनच कम्प्युटर तंत्रज्ञानावर हुकुमत मिळविली होती. त्यामुळेच लिनक्स सॉफ्टवेअर तसेच फ्री व ओपन सोर्सचा नारा त्यांनी पुकारला. अतुल यांचे वडील भारतीय , तर आई जर्मनीची. त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षणही बर्लिनमध्ये झाले. त्यानंतर मात्र त्यांचे शिक्षण बेळगाव मिलिटरी स्कूलमध्ये झाले व गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बीई-मेकॅनिकल केले. वर्षभरातच त्यांचा प्रवास कम्प्युटरनिगडित तंत्रज्ञानाकडे झाला. कम्प्युटरनिगडित अनेक गोष्टींचा प्रथम पुरस्कार त्यांनी केला. मोडेमचा वापर शिकविला. इंटरनेटचा प्रसार होण्यापूर्वीच्या काळात डेटाकम्युनिकेशन ,नेटवर्किंग यांची सुरुवात त्यांनी केली. सीआयएक्स- बुलेटिन बोर्ड सिस्टिम ही भारतातील पहिली ऑनलाइन सेवा त्यांनी सुरू केली. ऑनलाइन संपर्क आणि समूहसंवादाचे ते आद्य माध्यम होते. १९९३ ते १९९७ या काळात त्यांनी पीसी-क्वेस्ट या कम्प्युटरआधारित नियतकालिकातून कम्प्युटरजागृतीचा वसा घेतला. भारत सरकारने बुलेटिन बोर्ड सिस्टिमला करांच्या कक्षेत आणण्याचा घाट घातला असताना चिटणीस यांनी इलेक्ट्रॉनिक चळवळीद्वारे त्यावर प्रहार केले. ही पहिलीच ऑनलाइन चळवळ यशस्वी ठरली. विविध व्यासपीठांवर त्यांनी लिनक्स आणि ओपनसोर्सविषयी जनजागरण केले. २१ व्या शतकातील नव्या तंत्रज्ञानानुसार त्यांनी मोबाइल कम्प्युटिंग , कन्व्हर्ज्ड कम्युनिकेशन यांतही उडी घेतली. पीसी क्वेस्टचे सल्लागार संपादक म्हणून विपुल लिखाण केले. ते स्वतः हौशी संगीतकारही होते व संगीताची तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याचे कसबही त्यांच्या अंगी होते. रेडिओव्हर्व हे इंटरनेट रेडिओ स्टेशन त्यांनी सुरू केले होते. त्यांच्या अकाली निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.  त्यांना कर्करोग झाल्याचे निदान ऑगस्ट २०१२ झाले होते. त्यांचे केमोथेरपीच्या उपचारादरम्यान ३ जून २०१३ रोजी निधन झाले.

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -) 

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

२१ फेब्रुवारी १९५३🔬🔬* 🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬 *फ्रांसिस क्लार्क व जेम्स डी. वॅट्सननी डी.एन.ए.च्या रेणूची रचना शोधली.*

 *🔬🔬२१ फेब्रुवारी १९५३🔬🔬*

🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬

*फ्रांसिस क्लार्क व जेम्स डी. वॅट्सननी डी.एन.ए.च्या रेणूची रचना शोधली.*

🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬🔬

🧫🧫🧫🧫🧫🧫🧫🧫🧫🧫🧫

   डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल (इंग्लिश: Deoxyribonucleic acid, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक अ‍ॅसिड ;) हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या केंद्रबिंदू मध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल होय. या प्रकारच्या आम्लांना न्यूक्‍लिइक [मराठी शब्द सुचवा] आम्ल असे म्हणतात. डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्लाच्या म्हणजेच डीएनए होय. डीएनए मध्ये जीवा बद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मानवी शरीर रचने मध्ये स्वरूप ठरव्यात हे महत्त्वाचे घटक असतात. जसे की मानवी रूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व घटक गुणसूत्रे ठरवतात. गुणसूत्रतंत्राधारे डीएनए चाचणीतून व्यक्ती ओळख करता येते करता येते. न्यायसहायक शास्त्रात (फोरेंसिक) याचा उपयोग होतो.प्रत्येक व्यक्तिच्या सेल न्युक्लिअस मध्ये डी एन ए आढळते. सन १८६९ मध्ये स्वीडिश फिजिशिअन फ्रायड्रीच माईसचर याने एका वापरलेल्या सर्जिकल बँडेजमधील पू व रक्त यामधून एक सुक्ष्म पदार्थ वेगळा केला. सेलच्या (पेशीच्या) न्युक्लिअसमध्ये त्याचे अस्तित्त्व असल्याने त्याला 'न्युक्लिईन' असे नाव दिले गेले. हेच न्यूक्लिईन पुढे डीएनए म्हणून ओळखले जाऊ लागले. डीएनए मध्ये कोडींग आणि नॉनकोडिंग असे क्रम असतात. नॉन कोडिंग डीएनए बेसेसचा क्रम प्रत्येक व्यक्तिंचा वेगळा असतो. व्यक्तिचे वेगळेपण या क्रमावर अवलंबून असते. त्यामुळे व्यक्तिची ओळख नॉन कोडिंग बेसेसच्या क्रमावरून होते. आई, वडील, मुलगा, मुलगी यांचे डीएनए ठसे समप्रमाणात आढळतात. सावत्र मुलाचे ठसे मात्र वेगळे असतात. आयडेन्टिकल जुळ्यांमध्ये डीएनए ठसे एकसारखेच असतात. डीएनए टेस्ट करताना व्यक्तीच्या रक्त, केस, वीर्य, इत्यादि नमुन्यातून डीएनए वेगळे केले जातात. त्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. त्यानंतर पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शनच्या सहाय्याने घेतलेल्या डीएनए नमुन्यातील मात्रा वाढवण्यात येते. व त्याचे तुकडे केले जातात. या प्रक्रियेला फ्रॅगमेंटेशन असे म्हणतात. नंतर इलेक्ट्रोफोरेसीनने हे तुकडे वेगळे करून त्यांचे सदर्न ब्लॉटिंग पद्धतीने नायलॉन मेंब्रेनवर स्थलांतरण करण्यात येते. त्या ठशांमध्ये स्पष्टपणा यावा यासाठी रेडिओअ‍ॅक्टिव्ह रसायनाने लेबलिंग करण्यात येते. मेंब्रेनवर एक्स रे फिल्म ठेवण्यात येते. आणि मग रेडिओ अ‍ॅक्टिव्ह किरणांनी ती डेव्हलप केली जाते. मग हे ठसे पट्ट्याच्या रुपात दिसू लागतात. अशा प्रकारे डीएनए ठसे मिळवले जातात.आणि मग ते ठसे इतर ठशांबरोबर जुळतात की नाही ते पाहिले जाते व निष्कर्ष काढले जातात. एखाद्या व्यक्तीची डीएनए चाचणी करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेणे मात्र अत्यावश्यक आहे. भारतात हैदराबाद, बंगलोर इत्यादी ठिकाणी अत्याधुनिक डीएनए चाचणी केंद्रे आहेत. सर्वसामान्यपणे शास्त्रीय पद्धतीने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डीएनए चाचणी केली जात असली तरी इतरही ठिकाणी ती चाचणी उपयुक्त ठरते.उदाहरणार्थ -- १) अनुवंशिक रोग, विकार, विकृती यांची माहिती नवजात बालकाच्या जन्माआधी डीएनए चाचणीने मिळावता येते. व त्यावर वेळीच योग्य उपचार करता येतात.

 २) डीएनए चाचणीचा वापर करून बीबियाणे, तसेच विक्रीसाठी ठेवले मांस, मश्रुमसारखे पदार्थ यांचा दर्जा तपासता येतो.

 ३) डीएनए चाचणीवरून स्थलांतरित व्यक्तिचे, प्राण्याचे, वनस्पतीचे मूळ स्थान ओळखता येते.

 ४) डीएनए चाचणीमुळे व्यक्तीचे मातृत्त्व पितृत्त्व सिद्ध करता येते.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

गाथा बलिदानाची 🚩🚩* ➿➿➿➿➿➿➿➿➿➿ 🚩 *राजे शिवछत्रपती*

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🚩🚩 गाथा बलिदानाची 🚩🚩*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


   🚩 *राजे शिवछत्रपती* 🏇🚩

          

  *छत्रपती शिवाजी राजे भोसले*

  *जन्म : १९ फेब्रुवारी १६३०*

  *मृत्यू  : ३ एप्रिल १६८०*

  *राजधानी - रायगड*


🚩🏇🚩🤺🚩🏇🚩🤺🚩

*१९ फेब्रुवारी १६३०*

समस्त शिवभक्तांच्या दैवताचा जन्मदिन.

श्री शिवछत्रपती महाराज जन्मदिवस

किल्ले शिवनेरी, जुन्नर- जिल्हा -पुणे, महाराष्ट्र.

(तिथी प्रमाणे - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१).

शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ

यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेल्या शिवनेरी या

डोंगरी किल्ल्यावर

*इ.स. १९ फेब्रुवारी १६३० मध्ये "शिवाजीराजे"*

यांचा जन्म झाला.

*सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी..!*

*हर हर महादेवाची घुमली गर्जना गड किल्याच्या ओठी..!*

रायगडावर तुम्ही ऊभारली

...शिवराष्ट्राची गुढी!

राजे तुम्ही नसता तर

सडली असती हिंदुची मढी!

तुम्हा मुळे तर आम्ही

पाहतो देवळाचे कळस,

तुम्ही नसता तर नसती

दिसली अंगनात तुळस!

      गडावरील शिवाईदेवीच्या मंदिरातील शिवाई देवीच्या

नावावरून मुलाचे नाव ठेवले "शिवाजी"

         *"प्रौढ प्रताप पुरंदर"*

      *"महापराक्रमी रणधुरंदर"*

        *"क्षत्रिय कुलावतंस्"*

          *"सिंहासनाधीश्वर"*

          *"महाराजाधिराज"*

              *"महाराज"*

               *"श्रीमंत"*

                 *"श्री"*

                 *"श्री"*

                 *"श्री"*

              *"छत्रपती"*

              *"शिवाजी"*

              *"महाराज"* 

                 *"की"*

                 *"जय"*

*🚩!! जय भवानी ~ जय शिवाजी !!🚩*

      "इतिहासाच्या पानावर 

                    रयतेच्या मनावर 

       मातीच्या कणावर आणि

                  विश्वासाच्या प्रमाणावर 

राज्य करणारा राजा म्हणजे 

*राजा शिवछत्रपती..*


*ताठ होतील माना...*

*उंच होतील नजरा...*

*बहुजनाच्या राजाला माझा मानाचा मुजरा !*

 🚩🚩🚩🚩 🏇🤺🏇🚩🚩🚩🚩

🌿-----१६ व्या शतकात राजमाता राष्ट्रमाता  जिजाऊ च्या पोटी एक बाळ जन्माला आले व त्याचे संगोपन व शिक्षण स्वतःहा राजमाता जिजाऊ च्या तालिमात झाले, परकीय आक्रमण व स्व बंडाळी व रुडी परंपरा आणि अंदरश्रद्धा ने होरपळून गेलेल्या राज्यात एक पराक्रमी बाळ वाढू लागले वयाच्या १४ व्या  वर्षी मूठभर मावळे हाताशी घेऊन स्वराज्य संकल्पना शाहजी राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मांडली होती आई जिजाऊ च्या प्रशिक्षणातून ती मिळत गेली व प्रत्येक्षात उतरवण्यात माझा राजा यशस्वी झाला!


हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक , सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही  वंदिले जातात. शत्रुविरुध्द लढण्याकरीता  महाराष्ट्रातील डोंगरद-यांमध्ये  अनुकूल असलेली गनिमी काव्याची पध्दत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघल साम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त  स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती.  ते सरदार/किल्लेदार  जनतेवर अन्याय-अत्याचार  करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

छत्रपतींच्या व्यक्तीमत्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेतल्यास... शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन , कडक व नियोजनबध्द प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा... असे उच्चकोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तीमत्वात एकवटलेले दिसतात.


*छत्रपती शिवाजी महाराजांनी.....*


🚩 बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढविण्यासाठी स्वतः कष्ट घेतले.


🚩 पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला.


🚩 महाराष्ट्रातल्या १८ पगड जातीच्या सर्व मावळयांच्या सोबतीने धर्मनिरपेक्ष स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली, 


🚩 साध्या-भोळ्या मावळयांचा संघटन करुन त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला.


🚩 स्वतः शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या  कार्यात स्वतःला घट्टपणे बांधून घेतले.


🚩 महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले व नविन निर्माण केले.


🚩 योग्य त्यावेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्यावेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरुन अनेक शत्रुंना  नामोहरम केलेच, तसेच  फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला.


🚩 आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला.


🚩 सामान्य रयतेची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था ... अशा अनेक व्यवस्था लावुन दिल्या.


🚩 सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करुन हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली.


🚩 राजभाषा विकसित करण्याचा गांभिर्यपूर्वक प्रयत्न केला, विविध कलांना राजाश्रय दिला.


🚩तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.


🚩 सतीप्रथेला विरोध केला.


🚩 स्त्रियांना मान- सन्मान-प्रतिष्ठा देऊन त्यांचा आदर केला.


*या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात  !!*


सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला  प्रेरणा देते.


🚩 *स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा* 🚩


🚩🚩🚩🙏🚩🕉🚩🙏🚩🚩🚩


*🚩 तमाम भारतीय जनतेला शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा !!🚩*


🚩🚩 *हर हर...महादेव* 🚩🚩


🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

 संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ═════════════ 📙 *ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ?*


═════════════ @ संकलन @गजानन गोपेवाड 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════  

📙 *ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ?* 

***********************************

घरात घर हरघडीला ट्रान्सफॉर्मर लागतो, तर घराबाहेर, विशेषतः औद्योगिक पुरवठ्यासाठीही ट्रान्सफॉर्मरशिवाय भागत नाही. पण या दोन्हींमध्ये महत्त्वाचा फरक आहे. घरात वापरला जातो, त्यामध्ये विजेचा दाब कमी करून तीन, सहा, नऊ व बारा व्होल्ट्स इतका ठेवला जातो. या कमी केलेल्या दाबाचा वापर करून मग छोटे दिवे, नाइट लॅम्प, रेडिओ ट्रांजिस्टर, रेकॉर्ड प्लेअर, खेळणी यांचा उपयोग केला जातो. याउलट कारखान्यांना लागणारी वीज, शहराला दूरवरुन केला जाणारा पुरवठा हा अतिउच्च दाबाचा असतो. यासाठी ठिकठिकाणी दाब वाढवणारे ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात. वीजकेंद्रांपासून वीज आणण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.


ट्रान्सफॉर्मरमध्ये विजेचा दाब लहानाचा जास्त वा जास्तीचा लहान केला जातो. या दोन्हींसाठी पद्धत एकच वापरली जाते. ती म्हणजे दोन्ही लोखंडी पट्ट्यांच्या सांगण्यावर (core) शेजारीशेजारी तारांचे वेटोळे गुंडाळले जाते. एक असते प्राथमिक, तर दुसरे दुय्यम. विजेचा प्रवाह जितका कमी वा जास्त करावयाचा, दाब कमी वा वाढवायाचा, तितके वेटाळ्यातील वेढे कमी जास्त केले जातात. प्राथमिक वेटोळ्यापेक्षा दुय्यम वेटोळ्यामधील वेढे जास्त असले, तर प्रवाहदाब वाढतो. याउलट स्थितीत तो कमी होतो.


खरे म्हणजे दोन्ही वेटोळी ही पूर्णतः वेगळी असतात. पहिल्या वेटोळ्यात विद्युतप्रवाह येतो व बाहेर पडतो. हा अर्थातच अल्टर्नेटिंग करंट वा AC असतो. यामुळे सांगाड्यात विद्युतचुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याचा परिणाम होऊन शेजारील दुसऱ्या वेटोळ्यातून प्रवाह वाहणे सुरू होतो. याचा दाब वेटोळ्याच्या वेढ्यांच्या संख्येनुसार वाढतो वा कमी होतो.


ट्रान्सफॉर्मर छोटा असो वा मोठा; ज्यावेळी दाब कमी होतो, तेव्हा प्रवाह वाढतो; याउलट दाब वाढला, तर प्रवाहाची शक्ती कमी होत जाते. पण याचा फायदा वीज वाहून नेण्याच्या तारांच्या आकारमानात बदल करता आल्याने होतो. प्रवाहाची शक्ती कमी झाल्याने अतिदाबाच्या तारांची जाडी खूपच कमी ठेवता येते.


 ट्रान्सफॉर्मरचा वापर झाल्याने अनेक बाबतीत सोय होऊ शकते. वाहनांमध्ये जेमतेम बारा व्होल्टचा प्रवाह निर्माण होतो; पण त्यावर संस्कार करून, अतिदाबाच्या प्रवाहाची निर्मिती करून ठिणग्या पाडण्याचे व वाहन चालवण्याचे काम केले जाते, याउलट लहान मुले खेळताना चुकूनही धक्का बसू नये, अशी खेळणी वीज प्रवाहाचा दाब अत्यल्प ठेवून बनवली जातात.



प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

माघ मास,कृष्ण पक्ष,*द्वितीय*,पू.फा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,बसन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, १८ फेब्रुवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


         *"चाहे महर्षियों का जन्म स्थान हो, चाहे योगियों की तपोभूमि हो, अथवा वहाँ कितने ही श्रेष्ठ पुरुषों ने जन्म लिया हो, किन्तु जिस राष्ट्र के निवासियों में संगठन का बल एवं अटूट राष्ट्रभक्ति नही होती, वह राष्ट्र विश्व के लिए कभी वन्दनीय नही हो सकता।"*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

ज्योर्दानो ब्रुनो🔭 🧮* *इटलियन तत्वज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ*

 *🧮    🔭ज्योर्दानो ब्रुनो🔭   🧮*


*इटलियन तत्वज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ*

🧮🔭🧮🔭🧮🔭🧮🔭🧮🔭🧮

*स्मृतिदिन - १८ फेब्रुवारी, इ.स. १६००*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

ज्योर्दानो ब्रुनो (इटालियन: Giordano Bruno) (इ.स. १५४८ - १८ फेब्रुवारी, इ.स. १६००) हा रानिसां काळातील एक इटलियन तत्वज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. निकोलस कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यमालेच्या सिद्धांताच्या एक पाउल पुढे जाउन ब्रुनोने सूर्य हा एक तारा आहे अशी कल्पना प्रथम जगापुढे मांडली.

इ.स. १६०० साली कॅथलिक चर्च, येशू ख्रिस्त व ट्रिनिटीबाबत चुकीची मते प्रदर्शित केल्याच्या गुन्ह्यावरून त्याला दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. १८ फेब्रुवारी १६०० रोजी ब्रुनोला जिवंत जाळून टाकण्यात आले.

🙏🙏🙏शुभ सकाळ🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ══════════════════════ 🌕 *चंद्राची माहिती* 🌕


═════════════@ संकलन @

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

 🌕 *चंद्राची माहिती* 🌕

 ***********************

पृथ्वीचा उपग्रह म्हणून चंद्र आपल्याला माहित आहे. अवकाशातील सर्वात जवळची वस्तू व रोज रात्री साथसंगत करत प्रकाशणारी सर्वात मोठी वस्तू म्हणूनही चंद्र जवळचा वाटतो. पण हा चंद्र परप्रकाशी आहे, हे सांगितल्यावरच लक्षात येते. चंद्र आकाशात नसेल ती रात्र म्हणजे अमावस्येची रात्र आपल्याला नकोशी वाटते. याउलट पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात फेरफटका करायला, गप्पा मारायला कोणीही आनंदाने तयार असते. 


सूर्यमालिकेतील ग्रहांना उपग्रह आहेत त्यांची निर्मिती बहुधा ग्रहांबरोबरच झाली असावी. चंद्र हा पृथ्वीच्या साथसंगतीनेच वावरतो. पृथभोवती २९.५३ दिवसांतच प्रदक्षिणा घालत याच्या पृथ्वीबरोबर सूर्यप्रदक्षिणाही चालू असतात. पण यात एक मोठा फरक आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो व बरोबर तेवढ्याच वेळात स्वतःभोवती देखील फिरतो ! त्यामुळे पृथ्वीवरून चंद्राची फक्त एकच बाजू सतत दिसत असते. याचा परिणाम तापमानावरही होतो. सूर्याच्या बाजूचे तापमान खूपच उष्ण म्हणजे १२० अंश सेंटीग्रेड असते तर दुसऱ्या बाजूला उणे १५३ अंश सेंटीग्रेड इतके अतिथंड तापमान राहते. 


चंद्राचा आकार पृथ्वीच्यापेक्षा खूपच लहान म्हणजे एक पन्नासांश आहे. चंद्राचा व्यास ३,४३६ किलोमीटर आहे. पृथ्वीपासून चंद्रापर्यंत अंतर ३,८४,००० किलोमीटर इतके आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण आकारमानामुळे पृथ्वीच्या तुलनेत खूपच कमी म्हणजे एक षष्ठांश आहे. याचा अर्थ माणसाचे वजन पृथ्वीपेक्षा तेथे कमी भरते व त्याला तेथे वावरताना खूपच सुटसुटीत वाटते. हा अनुभव अंतराळवीरांनी तेथे प्रत्यक्षात घेतला आहे. अवजड पोषक अंगावर चढवूनही ते तेथे सहज वावरू शकले. पण याच कमी गुरुत्वाकर्षणाचा दुष्परिणाम म्हणजे चंद्रावर कसलेही वातावरण टिकू शकले नाही. वातावरण टिकवून धरण्याएवढे गुरुत्वाकर्षण नसल्याने तेथे वारे नाहीत, हवा नाही, आर्द्रताही नाही. यामुळेच चंद्र दुरून आकर्षक वाटला, तरी प्रत्यक्षात एक उजाड, बोडका, खाचखळग्यांचा प्रदेश आहे.


चंद्राचा जो भाग आपल्याला दिसत नाही त्याबद्दल अपार उत्सुकता अनेकांच्या मनात होती. तेथे तरी काही सापडेल, असे उगाचच वाटत होते. पण जेव्हा या अंतराळयानातून तेथेही फेर्‍या मारून छायाचित्रे घेतली गेली, तेव्हा दोन्ही पृष्ठभागांत काहीही फरक आढळला नाही. सुर्यप्रकाशामुळे फक्त तापमानातील बदल जाणवतात. विविध उल्कापातांमुळे चंद्राचा पृष्ठभाग खडबडीत झाला असावा. कित्येक मैल आकाराची गोलाकार विवरे त्यावर आढळतात. काही ठिकाणी अंतर्गत शीलारसातून उद्भवलेले डोंगरही आहेत, तर काही ठिकाणी घट्ट खडकपण आढळतात.


 चंद्राची रोज नव्याने दिसणारी अवस्था म्हणजेच चंद्राच्या बदलत्या कला. पौर्णिमेला संपूर्ण गोलाकार चंद्र आकाशात दिसतो, कारण त्या वेळी सूर्याला तो पूर्ण सामोरा असतो. याउलट अमावस्येचा चंद्र सूर्य व पृथ्वी यांमध्ये येतो वा पृथ्वीकडील भाग पूर्णतः प्रकाशाविना असल्याने, प्रकाशाचे परावर्तन न झाल्याने आपल्याला चंद्र दिसत नाही. 

 चंद्रावर पहिले मानवी पदार्पण २१ जुलै १९६९ रोजी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी केले. काव्यात्म चंद्र व प्रत्यक्षातला चंद्र यांत फारच तफावत आढळल्याने व तेथील शुष्क, वातावरणरहित पृष्ठभागाची पूर्ण जाणीव झाल्यापासून चंद्र हा शास्त्रज्ञांचा फारसा औत्सुक्याचा विषय राहिलेला नाही.

 

 चंद्राचे खडक म्हणजे चंद्रावरून पृथ्वीवर आणलेले खडक आज विविध देशातील संग्रहालयात ठेवलेले आहेत. त्यांचे पृथक्करणसुद्धा करून झाले आहे. चंद्र व पृथ्वी जरी एकाच मालिकेचे घटक असले, तरी दोघांच्या घडणीत, बनावटीत फरक आहे. घटकांच्या अभ्यासावरून निष्कर्ष असे सांगतो की, चंद्र पृथ्वीपासून वेगळा निघालेला भाग नक्कीच नाही.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*


आद्यक्रांतिकारक वासुदेव* *बळवंत फडके*

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           *गाथा बलिदानाची* 

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳  

⚔ *आद्यक्रांतिकारक वासुदेव*  

                 *बळवंत फडके* 

👳‍♀️👳‍♀️👳‍♀️👳‍♀️👳‍♀️👳‍♀️👳‍♀️👳‍♀️👳‍♀️👳‍♀️👳‍♀️

       *जन्म : ४ नोव्हेंबर १८४५*

 (शिरढोण, ता.पनवेल,जि. रायगड)

🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺

       *मृत्यू : १७ फेब्रुवारी १८८३*

                   (एडन, येमेन)


 *वडील : बळवंत फडके*


*प्रभाव : महादेव गोविंद रानडे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे*


     वासुदेव बळवंत फडके यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. येथे असतांना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती हे त्यांच्या लक्षात आले. त्याच वेळी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि  मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे रानड्यांना पटवून दिले.


     आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाई पर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. १८७० च्या दशकातील पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.


      १८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. २५ ते २७ फेब्रुवारी १८७९ रोजी लोणी व खेड वर दरोडा टाकून लुटमार केली. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला.  या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयांचे कापड मिळाले. यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही.


      फडक्यांनी मग तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. मातंग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालविला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. धानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितूरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले. याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले. या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्री विल्यम डॅनियेल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले. 


      १८७९ रोजी पंढरपूर कडे जात असताना कलदगी गावातील देवळात तुंबळ लढाई पश्चात इंग्रज सरकारने फडक्यांना जिवंत पकडले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दर्शवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. त्यांना अरेबियातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले. तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांना १७ फेब्रुवारी  इसवी सन १८८३ रोजी मृत्यू आला.


      त्यांच्या स्मरणार्थ भारतीय टपाल खात्याने फडक्यांचे चित्र असलेले ५० पैशांचे तिकीट प्रकाशित केलेले.


 मुंबईतील मेट्रो सिनेमा जवळच्या चौकाला वासुदेव बळवंत फडके यांचे नाव दिलेले आहे.


🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳


*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

  संकलन-)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा  - यवतमाळ ४४५२०६



मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ══════════════════════ 📙 *नलिकाविरहित ग्रंथी


══════════════════════

  @ संकलन @

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *नलिकाविरहित ग्रंथी* 📙 

***************************

आपल्या शरीरात दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. बहि:स्रावी ग्रंथीमध्ये तयार झालेला स्राव नलिकेद्वारे बाहेर पाठवला जातो. उदारणार्थ लाळग्रंथीत तयार झालेली लाळ तोंडात येते. याउलट अंत:स्रावी ग्रंथीत तयार झालेला स्राव ग्रंथीमधीलच रक्तवाहिन्यांत शोषला जातो. रक्तामध्ये शरीरात विविध भागांकडे पाठवला जातो. अशा अंतस्रावांस संप्रेरक, 'हार्मोन' असे म्हणतात. अशा नलिकाविरहित ग्रंथींना 'एंडोक्राइन' ग्रंथी असे म्हटले जाते.

शरीरात घडणाऱ्या असंख्य चयापचयाच्या क्रिया व महत्त्वाचे जीवनव्यापार यांवरचे नियंत्रण या ग्रंथींद्वारे राखले जाते. प्रत्येक ग्रंथीमधील स्रावाचे कार्य एखाद्या विशिष्ट लक्ष्यावर काम करते. सर्वात जास्त परिणाम त्या लक्ष्यावर घडून येतो. नलिकाविरहित ग्रंथींच्या प्राकृत व विकृत अभ्यासाची अतिविशिष्ट अभ्यासशाखा मानली जाते (एंडोक्रायनाॅलॉजी ही सुपर स्पेशालिटी). डॉक्टर मंडळी त्यात प्रावीण्य मिळवून काम करतात.


अशा नलिकाविरहित ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथी. (पिट्युटरी), कंठस्थ (थायरॉइड), उपकंठस्थ (पॅराथायरॉइड), मूत्रपिंडावरील (अॅड्रिनल), स्वादुपिंडातील (लँगरहॅन्स आयलेट) या ग्रंथी स्त्री व पुरुषांत सारख्याच असतात. पुरुषात वृषण (टेस्टीज) व स्त्रीमध्ये राज:पिंडे (ओव्हरीज) या वेगळ्या असतात. यांतील प्रत्येक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाला बहुदा त्या ग्रंथीच्या नावाने ओळखले जाते. उदाहरणार्थ पिट्युटरी हार्मोन.


या ग्रंथीमधील सर्वात महत्त्वाची म्हणजे पिट्युटरी शीर्षस्थ ग्रंथी. अन्य सर्व ग्रंथींवर तर तिचे नियंत्रण असतेच, पण शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या बाबी ती नियंत्रित करते. मूत्रपिंडाचे कार्य, हवेच्या तापमानाशी जोडून मुत्रनिर्मिती कमी वा जास्त राखणे व त्यानुसार शरीराला तहानेची जाणीव करून देणे हे काम तिच्याकडे आहे. स्नायूंवरचे नियंत्रण, विशेषत: गर्भाशयाचे स्नायू बाळाच्या जन्मासाठी कधी आकुंचित करायचे व आईचे दूध कधीपासून निर्माण करायला सुरुवात करायची, यांवरचे नियंत्रण ऑक्सिटोसीन व मॅमॅट्रोपिक हार्मोनने केले जाते. या सर्वांची निर्मिती शीर्षस्थ ग्रंथींच्या मागच्या भागातून होते. याशिवाय पुढील भागात अन्य ग्रंथींना उत्तेजक (ट्रोपिक) हार्मोनची निर्मिती केली जाते. थायरॉइडमधील स्रावांचे सतत नियंत्रण या हार्मोनने होत असते. नलिकाविरहित ग्रंथींचे नेतृत्वच शीर्षस्थ ग्रंथी करत असते. जेमतेम मोठ्या शेंगदाण्याएवढ्या असलेली ही ग्रंथी खरोखरीच जीवनाधार समजली जाते.


 थायरॉइड हार्मोन मुख्यतः आयोडिनयुक्त असते. खाण्यात, आहारात आयोडाइड्स कमी पडली तर हा स्राव कमी निर्माण होतो. शरीरातील चयापचयाची महत्त्वाची कार्ये व शरीराचे तापमान नियंत्रण आणि शक्तीसंपन्नता यांत ह्या हार्मोनचा महत्त्वाचा कार्यभाग असतो. गलगंड, मेंदूची अपूरी वाढ, मतिमंदत्व असे विकार होऊ नयेत, त्यांना प्रतिबंध करता यावा यासाठी मिठावाटे आयोडीनचा आवश्यक पुरवठा करावा, असे तज्ज्ञांना वाटते. रोज दोन चिमटी एवढेच मीठ आपण खात असल्याने नियंत्रित पुरवठा याद्वारे करणे शक्य होते. मिठाशिवाय जेवण, अळणी अन्नपदार्थ हा विचार आपल्या मनात तरी येतो का ? 

 

उपकंठस्थ वा पॅराथायरॉइड या कंठस्थ ग्रंथीमागे दोन छोट्या ग्रंथी असतात. कॅल्शिअम व फॉस्फरस या दोन्हींच्या चयापचयावर पॅराथाॅर्मोनचे नियंत्रण असते. हाडे, दात, शरीरातील सर्व स्रावांत या दोन्हींची गरज असते. त्यासाठी या ग्रंथीचे कार्य महत्त्वाचे ठरते.


मूत्रपिंडावरील अॅड्रिनल ग्रंथी मूत्रपिंडावर छोट्या टोपीप्रमाणे असतात. त्यांचा गाभा (मेड्युला) व बाह्यभाग (कॉर्टेक्स) हे दोन वेगवेगळ्या हार्मोन्सची निर्मिती करतात. जीवनावश्यक व हृदयासारख्या महत्त्वाच्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणारी अॅड्रीनॅलिन व नाॅर-अॅड्रीनॅलिन ही दोन हार्मोन्स गाभ्यात तयार होतात. 'मारा किंवा मरा', अशा समयी या स्रावांचे कार्य अवघ्या शरीराला जाणवते. स्नायूंचा रक्तपुरवठा वाढवणे, हृदयाची गती वाढवणे, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे, यकृतातील साखरेची म्हणजे ग्लायकोजेनची ग्लुकोज शर्करा बनवणे व अनिच्छावर्ती स्नायू शिथिल करणे ही मुख्य कामे या दोन स्रावांमुळे होतात. अॅड्रिनल ग्रंथीच्या बाह्य भागातून काॅर्टिकोस्टिराॅईड नावाची हार्मोन्स निर्माण होतात. यांतील अल्डोस्टिराॅन हे द्रव्य शरीरातील सोडियम व पोटॅशियम या घटकांच्या चयापचयावर नियंत्रण ठेवते. मज्जातंतूंचे कार्य, हृदयाचे कार्य, स्नायूंचे कार्य यांसाठी या दोन्हींची गरज असते. स्टिरॉइडमधील अन्य द्रव्ये पिष्टमय पदार्थांच्या चयापचयावर नियंत्रण राखतात. त्यांचे कार्य रक्तातील शर्करा जरुरीप्रमाणे वाढविण्याचे असते. प्रथिने व स्निग्ध यांच्या साठ्यांवरही त्यांचे नियंत्रण राहते. याशिवाय शरीरात कोठेही दाह झाल्यास यांचा दाहशामक म्हणूनही उपयोग होतो. विशेषतः सांध्यांचा दाह असल्यास स्टिरॉइडचा तोंडावाटे वा त्याजागी इंजेक्शन देऊन उपयोग होतो. अॅड्रिनल ग्रंथीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते.


स्वादुपिंडातील स्वादुरस पक्वाशयात नलिकेवाटे पोहोचवला जातो. मात्र लँगरहॅन्स आयलेट्स या पेशीसमूहातून इन्सुलिनची निर्मिती होऊन ती थेट रक्तात मिसळते. शक्ती व उष्णता उत्पन्न होण्यासाठी शरीरातील सर्व पेशीजालामध्ये प्राणवायूच्या साहाय्याने ग्लुकोज साखरेचे ज्वलन होते. यासाठी इन्सुलिनची मदत लागते. ती न मिळाल्यास रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होते. तसेच इन्शुलिनचे दुसरे कार्य म्हणजे रक्तातील जास्तीच्या साखरेचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करून ती यकृतात साठवणे. या दोन्ही संदर्भात या ग्रंथीचे महत्त्व आहे.


लैंगिक ग्रंथी पुरुष व स्त्रीमध्ये प्रत्येकी दोन असून त्यांना वृषण व राज:पिंड असे म्हणतात. वयात आल्यावर पुंबीजे व स्त्रीबीजे यांची यथायोग्य वेळी निर्मिती हे त्यांचे एक कार्य. दुसऱ्या कार्यात स्रावनिर्मितीचा म्हणजे हार्मोनचा सहभाग असतो. पुरुषातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे जननेंद्रियांची वाढ, दुय्यम लैंगिक लक्षणे म्हणजे दाढी मिशा उगवणे, आवाज फुटणे, स्नायूंचा भरदारपणा यात पूर्णता येते. स्त्रियांच्या राज:पिंडातून इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे दोन स्राव स्रवतात. त्यामुळे मासिक पाळी सुरू होते. स्तनांची व नितंबाची गोलाई वाढते, जननेंद्रियांचा आकार पुरेसा वाढतो. गर्भधारणा, गर्भाची वाढ, दूध पुरेसे येणे व गर्भधारणेच्या काळातील अन्य शारीरिक बदल यांवरही याच हार्मोन्सचे नियंत्रण राहते.


वयोमानानुसार लैंगिक ग्रंथींचे कार्य मंदावते. स्त्रियांमध्ये पन्नाशीनंतर, तर पुरुषात सत्तरीनंतर या ग्रंथी थकून जातात. त्याप्रमाणे स्त्रियांत रजोनिवृत्ती व पुरुषांत लैंगिक शैथल्य जाणवू लागते. मात्र जीवनाच्या अंतापर्यंत अन्य नलिकाविरहित ग्रंथी कार्यरत असतात. नलिकाविरहित ग्रंथींच्या कार्यकारणभावावर व त्यातील रोगांच्या उपचारांबद्दल आता खूपच प्रगती झाली असली, तरी प्रतिबंधक उपाय फारसे ज्ञात नाहीत.


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════


🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ══════════════════════ 📙 *साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी ते दहा कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा सजीवांचा इतिहास काय ?*


══════════════════════

    संकलन 

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी ते दहा कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा सजीवांचा इतिहास काय ?* 

***********************************

मानवी आयुष्याचा काळ जेमतेम ७०-८० वर्षांचा आहे. जास्तीत जास्त १०० वर्षे धरली, तरीही त्याच्या दृष्टीने हजारभर वर्षे म्हणजे फार पुरातन काळ होतो. पण पृथ्वीवरील सजीवांचा इतिहास व त्यांची आजवरची वाटचाल पाहावयाची झाली, तर किमान दहा कोटी वर्षे मागे जावे लागते. दहा कोटी वर्षे मागे जाण्याचे कारण म्हणजे सध्याची आपल्याला ज्ञात असलेली पृथ्वी, तिच्यावरील खंडे, तेथील हवामान हे या सुमाराला रंगरूपाला वा आकाराला येऊ लागले. त्याला आता दहा कोटी वर्षांचा काळ लोटला आहे. या आधीचे प्राणी, वनस्पती हे कसे होते आणि त्यांची सध्याच्या सजीवांशी कितपत जवळीक होती, यांची उत्तरे या अतिप्राचीन कालखंडामध्येच शोधावी लागतात. आपले घर कसे होते, कोणी बांधले, येथे पूर्वी काय होते, गाव वसले कधी, त्याआधी जंगल होते काय - या प्रश्नांची तशी सामान्य माणूस आपल्या वडील, आजोबा, पणजोबांकडे चौकशी करतो, त्यात आस्था दाखवतो, अगदी तशीच आस्था शास्त्रज्ञांना या गोष्टींबद्दल नेहमी वाटत आली आहे.


साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीची अलगी या स्वरूपातील वनस्पती ऑस्ट्रेलियातील शार्कबे या भागातील फॉसिल्समध्ये सापडली आहे. वनस्पतीजीवनाचा हा उपलब्ध झालेला सर्वात जुना पुरावा. पंचेचाळीस कोटी वर्षांपूर्वी गोड्या पाण्यात व त्याच्या काठावर वनस्पती फोफावू लागल्या होत्या. प्रत्यक्ष झाडे या स्वरूपात वनस्पतीजीवन आढळले आहे, त्याला यावरही तीन कोटी वर्षे जावी लागली. एकपेशीय वा बुरशीजन्य वनस्पतींपासून ही प्रगती होण्याला एवढा मोठा काळ गेला आहे. बेचाळीस कोटी वर्षांपूर्वी या वनस्पती सर्वत्र पसरू लागल्या. बहुधा याच सुमाराला या वनस्पतींवर वाढणारे व त्यांच्या कुजण्यातून अन्नपोषण मिळवणारे सजीव प्राणी निर्माण झाले असावेत. सुमारे सदतीस कोटी वर्षांपूर्वी या काळात या प्राण्यांतूनच काही पृष्ठवंशीय किंवा व्हटेंब्रेट्स निर्माण झाले असणार. सरपटणारे रेप्टाईल जातीचे हे पृष्ठवंशीय प्राणी सर्वत्र वावरू लागले, पण उंच डोंगर पार करण्याकरता त्यांना अजून काही कालखंड लागला. अंदाजे सव्वीस कोटी वर्षांपूर्वी या प्राण्यांचा आकार वाढत गेला व त्यांनी सर्व पृथ्वीवर फेरफटका मारायला सुरुवात केली. आता त्यांना जमिनीवरचे विविध अडसर अडवू शकत नव्हते. रेप्टाईल या प्रकारातील पृष्ठवंशीय प्राण्यांचे दोन प्रकारांत याच सुमाराला रूपांतर झालेले आढळते. सस्तन प्राणी व मॅमल जातीकडे एका प्रकारची वाटचाल सुरू झाली, तर दुसरा प्रकार डायनाॅसाॅर या प्रकारात रूपांतरित होत गेला.

आज वाचायला आश्चर्य वाटेल, पण संपूर्ण दिवसांवर या महाकाय डायनाॅसाॅरचेच राज्य असे व केवळ अंधारात यांना कमी दिसत असल्याने अन्य सस्तन प्राणी निकाराची भूमिका बजावत. नेमकी कारणे ज्ञात नाहीत; पण दहा कोटी ते सात कोटी वर्षांपूर्वीच्या दरम्यान हे महाकाय प्राणी पृथ्वीवरून अचानक नष्टप्राय झाले. त्यानंतरचा काळ म्हणजे सस्तन पृष्ठवंशीय प्राण्यांचा आहे. त्यांपैकीच एक म्हणजे माणूस. यांचे दिवसा व रात्री पृथ्वीवर अबाधित प्राबल्य आहे. निदान तसे आपण तरी समजतो.


 विविध कालखंडांचा क्रम पुढीलप्रमाणे : 

 डेव्हिनियन (३७ कोटी वर्षांपूर्वी)

 पर्मियन (२७ कोटी वर्षांपूर्वी) ज्युरासिक (१७ कोटी वर्षांपूर्वी) क्रेटेशन (१० ते ७ कोटी वर्षांपूर्वी)


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

ज्ञान-विज्ञान* 🌎 ══════════════════════ 📙 *कार्बन म्हणजे नेमके काय ?* 📙


══════════════════════

    @ संकलन @गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *कार्बन म्हणजे नेमके काय ?* 📙 

***********************************

'कोळसा कितीही उगाळला; तरी काळाच !' अशी मराठीत एक म्हण आहे. अंतर्बाह्य काळा असलेला कोळसा दिसायला फक्त काळा दिसतो. पण स्वच्छ चकचकीत हिरा, हिरवेगार गवत, आसपास दिसणारे प्राणी काय, पण आपण स्वतःसुद्धा मुलत: कोळशासारख्याच पदार्थातून बनलो आहोत, यावर विश्वास बसणे प्रथमदर्शनी कठीणच !

फरक आहे तो फक्त टक्केवारीचाच. कोळसा बनतो शंभर टक्के कार्बनपासून. या कार्बनने सर्व चराचर सृष्टी व्यापलेली आहे. या कार्बनवरच अनेक पदार्थांचे अस्तित्व अवलंबून आहे. तसाच नाशही कार्बनमध्ये व कार्बन-डायऑक्साइडमध्येच होणार असतो. वनस्पती सूर्याचा प्रकाश व कार्बन डायऑक्साइड वापरून स्वतःचे पोषण करतात. यामध्ये त्या स्वतःच्या शरीरात कार्बनच साठवतात. याच वनस्पती प्राणी भक्षण करतात. त्यांच्याही शरीरात कार्बन साठत जातो.


वनस्पतीपासून जेव्हा कोळसा तयार होतो, तेव्हा त्याच्या ज्वलनातून पुन्हा कार्बन डायॉक्साइड बाहेर टाकला जातो. प्राणी जेव्हा श्वासोच्छ्वास करतात, तेव्हा त्यातूनही कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो. याखेरीज प्राणी मेल्यानंतर त्याचे रूपांतर कार्बन डायऑक्साइडमध्ये सरतेशेवटी हळूहळू होत जातेच. ही क्रिया कुजणे वा ज्वलन या दोन्ही प्रकारातून होऊ शकते. थोडक्यात म्हणजे सौर ऊर्जेच्या मदतीने हे कार्बन डायऑक्साइडचे चक्र सतत फिरत राहते व हवेतील त्याचे प्रमाण कायम राखले जाते.

कार्बनची अगदी सोपी संयुगे असंख्य आहेत. जिकडे पाहावे तिकडे आपल्याला त्याचे अस्तित्वात जाणवू लागते. तेले, पेट्रोल, पॅराफीन, डिझेल, डांबर, क्रूड, स्वयंपाकाचा गॅस, गोबर गॅस या प्रत्येकात हायड्रोजनबरोबर कार्बन असतो. साखर, स्टार्च, दारू, व्हिनेगर यातील कार्बन कार्बोहायड्रेट या स्वरूपात हायड्रोजन व प्राणवायूबरोबर असतो. याखेरीज प्लॅस्टिकच्या पदार्थात, जंतूनाशकात, सर्व सुगंधी पदार्थातही कार्बन असतोच. या असंख्य पदार्थातला संयुक्त कार्बन त्यांच्या ज्वलनाने किंवा अन्य रासायनिक क्रियांतून पुन्हा कार्बन डाय ऑक्साइडमध्ये रुपांतर पावतो.


सजीव वस्तूंमधील कार्बनचे प्रमाण सतत बदलत असते. पण तीच वस्तू जेव्हा निर्जीव होते, तेव्हा मात्र निर्जीव होण्याच्या वेळचे कार्बनचे प्रमाण नंतर तसेच राहते. यातील काही अणू नेहमीच्या कार्बनचे वेगळे आयसोटोप्स असतात. त्यांतून उत्सर्जन होऊन त्यांचे कालांतराने इतर कार्बन अणूंमध्ये रूपांतर होणार असते. पण हा कालावधी फार लांबचा असतो. या अणूंची संख्या व त्यांचे रेडिओउत्सर्जन मोजून एखाद्या निर्जीव वस्तूचा कालावधी ठरण्यात बरेचसे यश मिळते. यालाच 'रेडिओकार्बनडेटिंग' म्हणतात. रेडिओकार्बनडेटिंग या विषयावर स्वतंत्र माहिती अन्यत्र विस्तृतपणे दिली आहे.


पुस्तकांची पांढरी पाने वा त्यांवरील शाई, मऊ ग्राफाइटचे पेन्सिलचे शिसे किंवा अत्यंत कठीण असा हिरा ही सगळी कार्बनची विविध रूपे मती खरोखरच गुंग करून सोडतात.


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

 

डासामुळे होणारे आजार


══════════════════════

    @ संकलन @

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *डासांमुळे होणारे आजार* 📙 

**********************************

मलेरिया, हत्तीरोग, चिकुनगुनिया, डेंग्यू या चार आजारांच्या प्रसारासाठी डासांच्या विविध जाती कारणीभूत ठरतात. यांतील प्रत्येक आजाराने जगाच्या पाठीवर, भारतातील काही भागांत अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. मलेरियावर औषधे व प्रतिबंधक उपाय आज पुरेसे सापडले आहेत; पण मलेरियामुळे वाया जाणारे मानवी श्रममूल्य, श्रमतास यांमध्ये मात्र फार फरक पडलेला नाही. मेंदूपर्यंत पोहोचलेला मलेरियाचा आजार (सेरेब्रल मलेरिया) झाल्यास रोगी दगावण्याची शक्यता आजही अगदी अद्ययावत रुग्णालयांतील अतिदक्षता उपचारकेंद्रात असते.


आपण चारही आजारांची थोडक्यात ओळख करून घेणे आवश्यक ठरते; कारण भारतात कुठेही गेलात, तरी डास तुमच्या भोवती गुणगुणतच असतात, चावत असतात.

सर रोनाल्ड रॉस या जन्माने भारतीय डॉक्टरचा मलेरियाच्या संशोधनात महत्त्वाचा वाटा आहे. उत्तर प्रदेशातील अल्मोरा गावी १३ मे १८५८ रोजी त्यांचा जन्म झाला. ब्रिटनमध्ये १८७९ मध्ये वैद्यकीय पदवी घेऊन भारतीय लष्करात डॉक्टर म्हणून ते दाखल झाले. मलेरियाला कारणीभूत झालेले परजीवी सूक्ष्मजीव फ्रेंच शास्त्रज्ञ लाव्हरेन यांनी १८८० मध्ये शोधले होते. पण त्यांची वाढ, प्रसार व मलेरियासंदर्भातील डासांचे जीवनचक्र यांबद्दल रॉस यांनी सतत संशोधन चालू ठेवले. अॅनाफिलीस जातीच्या डासाच्या मादीच्या जठराच्या वळ्यांमध्ये हे परजीवी दबा धरून वाढतात व तिच्या चाव्यातून मानवी शरीरात त्यांचा प्रवेश होतो, हे निरीक्षण हैदराबादजवळच्या बेगमपेठ येथील प्रयोगशाळेत त्यांनी १८९७ साली नोंदवले. १९०२ साली त्यांना याबद्दलचे नोबेल पारितोषिक दिले गेले.


मलेरियामध्ये रात्रीच्या वेळी थंडी वाजून येते व दिवसा ताप उतरतो, पण अशक्तपणा येतो. यामुळे हीव म्हणजे थंडी आणणारा ताप म्हणून हिवताप या नावाने तो प्रसिद्ध आहे. परजीवींची वाढ लाल रक्तपेशीत होते व त्यांचे विघटन झाल्याने रक्तक्षय होतो, हा मलेरियाचा एक उपद्रव, क्लोरोक्विन व तत्सम औषधांचा शोध व वापर सुरू झाला. प्रतिबंधक उपाय म्हणूनही क्लोरोक्विनच्या गोळ्या दर आठवड्याला दिल्या जाऊ लागल्या आणि मलेरियाचा घातकपणा कमी झाला. मात्र आजही पाणवठ्याजवळच्या जागा, दलदलीचा प्रदेश, जंगले येथे मलेरियाचा प्रभाव आढळतो.


स्वच्छ पाण्यात वाढणारे डास चिकुनगुनिया व डेंग्यू हे आजार पसरवतात. घरात, घराच्या आसपास साचलेल्या व ठेवलेल्या पाण्यातसुद्धा या डासांची वाढ होऊ शकते. फुलदाणीतील न बदललेले पाणी, बाल्कनीतील प्लास्टिकच्या भांडय़ांत, जुन्या टायरमध्ये साचलेले पावसाचे पाणी, गच्चीतील उघडी पाण्याची टाकी यांमध्ये हमखास या रोगांच्या वाहक डासांची निर्मिती होते. एडिस इजिप्ती जातीचा डास सहसा दिवसा चावतो. त्याच्या चाव्यातून या आजारांचे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात.

यांपैकी चिकनगुनिया या आजाराची सुरुवात आफ्रिकेमध्ये टांझानियात १९५२ साली झाली. कोलकात्यामध्ये १९६३ साली पहिली लागण झाल्याची नोंद आहे. केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसात नंतर याने अधूनमधून तोंड वर काढले. सुमारे ४३००० लोकांना त्यावेळी चिकनगुनियाने पछाडले होते. महाराष्ट्रात प्रथम मराठवाडा, विदर्भ येथे व नंतर अनेक ठिकाणी गेल्या ३ वर्षांत चिकनगुनियाचे रुग्ण सापडले आहेत. याचा अर्थ या डासांनी आता महाराष्ट्रातही ठाण मांडले आहे. चिकनगुनिया म्हणजे हातापायांची बोटे व सांधे वेडेवाकडे होणे. हा आफ्रिकन भाषेतील शब्द आहे. त्याचा चिकन म्हणजे कोंबडय़ांशी वा बर्डफ्लूशी काहीही संबंध नाही. तीव्र ताप, अंग दुखणे, डोकेदुखी, क्वचित त्वचेवर लालसर पुरळ, डोळ्यांमधून पाणी येणे व डोळेही लाल होणे या प्राथमिक लक्षणानंतर चिकनगुनिया खरा प्रभाव दाखवतो. शरीरातील लिम्फॅटिक म्हणजेच रसवाहिका व कोशग्रंथी यांद्वारे विविध सांध्यांमध्ये पसरलेल्या दाहामुळे अनेक सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज दिसते. काही वेळा पायांवर सूज येऊ लागते. रुग्णाला हालचाल करणे देखील कठीण होते. अन्नपाणी नकोसे वाटते. त्यातून अशक्तपणा वाढतो. ताप उतरला, तरी काही आठवडे वा वयस्कर माणसांत काही महिनेसुद्धा या तक्रारी चालू राहतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या आजारावर वेदनाशामकांपलीकडे कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. घराघरांतून धडधाकट माणसे सांधे आखडल्यामुळे काम करू शकत नाहीत, हे दृश्य या आजाराने धुमाकूळ घातलेल्या अनेक गावांमध्ये दिसून येते. क्वचित प्रसंगी हा आजार शरीरातील प्रमुख इंद्रियांच्या कामात अडथळा निर्माण करतो, तेव्हा रुग्णावर तातडीचे उपचार रुग्णालयात भरती होऊनच करावे लागतात.


डेंग्यू व इन्फ्लुएंझा यांची लक्षणे खूपशी सारखी असल्याने अनेकदा गल्लत होऊ शकते. पण फ्ल्यूचा ताप सहसा तीन ते पाच दिवसांत उतरतो व तो सहसा साथीचा असतो. डेंग्यू डास चावल्यामुळे होतो. स्वच्छ पाण्यात वाढणार्‍या एडीस अल्बोपिक्टस, इजिप्ती या जातींच्या डासांचा या आजाराच्या प्रसारात सहभाग असतो. ताप, डोकेदुखी, सांधे दुखणे, भूक मंदावणे या लक्षणांबरोबर डेंग्यूच्या मोजक्याच रुग्णांत अचानक रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स यांची संख्या कमी होऊ लागते. मानवी प्रतिकारक्षमता पांढऱ्या पेशींवर अवलंबून असल्याने रुग्णाची तब्येत गंभीर होऊ लागते. प्लेटलेट्समुळे रक्तस्राव बंद करणे हे कार्य पार पाडले जाते. त्यात अडथळा येऊन विविध इंद्रियांत अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. यातून डेंग्यूचा गंभीर रुग्ण दगावू शकतो. रक्तघटक पुरवून अशा रुग्णांवर उपचार केले जातात. डेंग्यूवरसुद्धा उपचार वा प्रतिबंधक लस उपलब्ध नाहीत.


हत्ती रोगांमध्ये डासांद्वारे घेतलेल्या चाव्यातून मानवी शरीरात 'व्युचेरेरिया बँक्राफ्टाय' व व्युचेरेरिया मलायी' हे कृमी उपसर्गी अळीरूपाने प्रवेश करतात. मात्र क्युलेबस जातीच्या डासांमार्फत हा प्रसार होतो. या कृमींची वाढ शरीरातील रसवाहिन्यांमध्ये होते. एक ते दोन सेंटीमीटर एवढी त्यांची वाढ होऊ शकते. यांची संतती म्हणजे मायक्रोफायलेरिया. अतिसूक्ष्मापासून पूर्ण वाढीपर्यंत दोन आठवड्यांत यांची प्रगती होते. हत्तीरोगामध्ये रसवाहिन्यांमध्ये ही कृमी जागा अडवतात व रसवहनाची यंत्रणा (लिम्फ सिस्टीम) बंद पाडतात. यामुळे शरीराच्या खालच्या भागात म्हणजेच पाय, वृषणे, मांडीचा भाग येथे सूज दिसू लागते. रससंचय झाल्याने ही सूज असते. जड वाटणे यापलीकडे वेदना नसतात; पण हत्तीसारखा जाड पाय झाल्यास हालचाल, काम करणे अवघड होते. पायाला व्रण झाल्यास तो बरा होत नाही. अशा रुग्णाला डास चावल्यास त्याच्या रक्तातील मायक्रोफायलेरिया डासाच्या पोटात जाऊन त्यांची तेथेही वाढ होते. दुसर्‍या निरोगी माणसाला हा वाहक डास चावतो, तेव्हा त्याच्या सोंडेतून त्वचेवर उतरलेली उपसर्ग अळी निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते. हत्तीरोगावरील डायइथिल कार्बामाझाइन हे एकमेव औषध वापरले जाते. पण पूर्ण वाढलेल्या कृमींवर या हत्तीरोगाने पीडित व्यक्तीच्या लक्षणांवर त्याचा फारसा उपयोग होत नाही. संपूर्ण बाधित भागातील व्यक्तींना प्रतिबंधक म्हणून हे औषध वापरतात.


डासांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल माहिती घेतल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की डास चावण्यापासून प्रतिबंधक हाच एक उपाय सध्यातरी आपल्या हातात आहे. डास मारण्यासाठी वापरली जाणारी औषधे पचवुन त्यांच्या नव्या प्रजाती सतत तयार होत गेल्या आहेत. डीडीटी तर त्यांनी कधीच पचवले आहे. साचलेल्या पाण्यावर तेलाचा तवंग सोडून डासांच्या अळ्यांना प्राणवायू मिळू न देता त्यांचा नायनाट हा प्रकार छोटय़ा जलाशयात केला जातो. परमॅथ्रिनसारखी द्रव्ये, अन्य रसायने यांचा वापर केला जातोच. त्यामुळे डास आपल्यापासून दूर राहतात. मॉस्किटो रिपेलंट म्हणजे डासांना सहन न होणारी तीव्र वासाची द्रव्ये हवेत फवारणे वा त्वचेवर लावणे हाही एक उपाय आहे. मच्छरदाणी, लांब हातापायांचे कपडे हाही उपाय केला जातो.


मात्र आजही गरीब असो वा श्रीमंत, झोपडीत राहणारा असो वा उंच इमारतीत वरच्या मजल्यावर राहणाऱा या सर्वांनाच डासांनी नकोसे करून सोडलेले आहे. त्यांच्यामुळे फैलावणारे आजार आज सर्वांनाच सारखे त्रास देत आहेत. नजीकच्या भविष्यात उष्ण कटिबंधातील सर्व माणसांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे, हे निश्चित.


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

  

ज्ञान विज्ञान डायनामो म्हणजे काय?


══════════════════════

   * संकलन *गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *डायनॅमो म्हणजे काय ?* 📙 

*******************************

डायनॅमो म्हणजे वीजउत्पादनाचे यंत्र. या यंत्राची ताकद व आकारावरून त्याला निरनिराळी नावे दिली जातात. डायनॅमो म्हटला की, सायकल वा मोटारसायकलसाठी वापरला जाणारा वीजउत्पादक समोर येतो. जनरेटर म्हटला की, घरासाठी, छोट्या कारखान्यांसाठी वीज निर्माण करणारे यंत्र समोर येते. वीजकेंद्रांसाठी याचीच मोठी भावंडे म्हणजे भलीमोठी विद्युतजनित्रे वापरली जातात.

डायनॅमोचे तत्त्व *मायकल फॅरडे* यांनी १८३१ साली शोधले. त्याआधीच्या काळात वीज छोट्या बॅटरीत रासायनिक प्रक्रियेतूनच मिळवली जात असे. सलग वीज वापरणे हे त्यामुळे अर्थातच महागडे व अवघडही होते. डायनॅमोचे तत्त्व वापरून विजेचा वापर सुरू झाला आणि सारे चित्रच बदलून गेले.


कोणत्याही डायनॅमोमध्ये मुख्यत: लोहचुंबक तांब्याच्या तारेच्या वेटोळ्याभोवती फिरतो व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विजेचा वापर तारेच्या वेटोळ्याच्या दोन टोकांमधून घेऊन केला जातो. याउलट परिस्थिती पण असू शकते. म्हणजेच एखाद्या स्थिर चुंबकाभोवती तारेचे वेटोळे फिरत राहते. चुंबकीय क्षेत्र ज्यावेळी तारेच्या वेटोळ्याने छेडले जाते, त्यावेळी वीजनिर्मिती होते. डायनॅमो फिरवण्यासाठी वापरली जाणारी यांत्रिक ताकद हीच या पद्धतीत विद्युतनिर्मितीमध्ये बदलली जाते. एका ऊर्जेचे दुसऱ्या स्वरूपात रूपांतर केले जाऊन हीच ऊर्जा आपण दिव्याच्या उष्णतेच्या स्वरूपात उजेड पाडण्यासाठी वापरतो.


डायनॅमोचा वापर सुरू झाला आणि वीजनिर्मितीच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती सुरू झाली. १८६७ साली मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करणारी केंद्रेही कार्यरत झाली होती. पण मुख्यतः डायनॅमोचा फायदा दुचाकी वाहनांसाठी आजही होतो. आडनिडय़ा अंधार्‍या रस्त्याला जाताना विजेरी वापरण्याऐवजी डायनॅमो चाकाला लावून फिरेल, अशी व्यवस्था केली की, सायकलचा पुढचा रस्ता स्वच्छ दिसू लागतो. एवढी त्यातून निर्माण होणाऱ्या विजेची दिव्याला पुरवली जाणारी शक्ती असते.


सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये दिवे, हाॅर्न्स, वाहनांमधील छोटी मोठी यंत्रे, (रेडिओ, पाणी साफ करणारा वायपर, निरनिराळे इंडिकेटर्स) चालवण्यासाठी जास्त ताकदीचा डायनॅमोचा वापर केला जातो. एवढेच नव्हे, तर यातून तयार होणारी जास्तीची वीज रासायनिक विद्युतघटात साठवून ठेवण्याची पण अंगभूत व्यवस्था सर्व चारचाकी वाहनात केलेली असते. वाहन सुरू करत असताना किंवा वाहन बंद असताना हीच विद्युतघटातील ऊर्जा वापरून यंत्राकरवी काम करून घेता येते.


सहसा दुचाकी वाहनांसाठी वापर केला असता डायनॅमोमधून दीड ते बारा व्होल्ट या दाबाची वीज निर्माण केली जाते.


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

ज्ञान विज्ञान जीभ


══════════════════════

   * @ संकलन @*

  गजानन गोपेवाड

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

               *👅 जीभ 👅*


जीभ हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला लालसर गुलाबी रंगाचा एक अवयव आहे. हा अवयव पूर्णपणे स्नायूंचा बनलेला असतो. बहुतेक सर्व पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये जीभ अन्न गिळण्यासाठी, चवीच्या जाणीवेसाठी मदत करते. जीभ, दात, ओठ, कंठ, टाळू व घसा यांच्या साहाय्याने मनुष्य निरनिराळे आवाज (ध्वनी) काढू शकतो. मानवी जिभेची सरासरी लांबी सुमारे १० सें.मी. असते. रोगनिदान करण्यासाठी जिभेचा रंग , स्वरूप आणि ओलसरपणा याबाबी लक्षात घेण्यात येतात.


जिभेद्वारे अन्न तोंडात फिरवून दाताखाली आणले जाते आणि अन्नाचे गोळ्यात रूपांतर केले जाते. दातामध्ये , गालफडामध्ये साचलेले अन्न जिभेने काढून तोंड स्वच्छ ठेवले जाते. जिभेमुळे अन्न घशात ढकलले जाते. अन्न गिळताना जीभ टाळूवर दाबली जाते आणि आतील बाजूना पसरते. परिणामी तोंडातील अन्न बाहेर न पडता घशाकडे सरकवले जाते. अन्य सस्तन प्राण्यापैकी कुत्रा, मांजर, जिभेने अंग साफ करतात. त्यामूळे अंगावरील तेल आणि परजीवी दूर होतात. कुत्र्याची जीभ त्याच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी उपयोगी पडते. सरडगुहि (शॅमेलिऑन), बेडूक, खवल्या मांजर इत्यादी प्राणी जिभेने अन्न तोंडात घेतात. साप जीभ बाहेर काढून भक्ष्याचे गंधकण गोळा करतो. गंधकणांच्या ज्ञानावरून त्याला भक्ष्य पकडणे सोपे जाते. सुतार पक्ष्याची जीभ अतिशय संवेदी असते. जिभेच्या सहाय्याने तो झाडाच्या सालीखालील कीटक गोळा करतो. व्हेल, आणि मुशी यासारख्या काहीं प्राण्यांची जीभ अचल असते. जिभेवर ठरावीक ठिकाणी विशिष्ट चवीची जाणीव होते असे एकेकाळी समजले जात होते. प्रत्यक्षात जीभेवर असलेल्या रुचिकलिकामध्ये सर्व चवी ओळखल्या जातात. पदार्थ पाण्यामध्येविद्राव्य असल्यास चव लगेच समजते.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

सत्येंद्रनाथ बोस🔬⚗🔬* 🇮🇳🇮🇳🇮🇳 *भारतीय शास्त्रज्ञ*🇮🇳🇮🇳🇮🇳

 *🔬⚗🔬सत्येंद्रनाथ बोस🔬⚗🔬*


🇮🇳🇮🇳🇮🇳 *भारतीय शास्त्रज्ञ*🇮🇳🇮🇳🇮🇳

🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪

*स्मृतिदिन - ४ फेब्रुवारी १९७४*

👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬

सत्येंद्रनाथ बोस (बंगाली: সত্যেন্দ্রনাথ বসু} (१८९४-१९७४) भारतीय शास्त्रज्ञ

बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ यांचा जन्म १ जानेवारी  १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते.

सत्येंद्रनाथ यांचे शालेय ते पदवी पर्यंतचे शिक्षण कोलकाता येथेच झाले. लहानपणापासूनच वर्गात पहिला क्रमांक मिळ्वून उत्तीर्ण होण्याचा जणू त्यांना छंदच होता. पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही. शाळेत असतांना एकदा त्यांना गणिताच्या परिक्षेत १०० पैकी ११० गुण देण्यात आले कारण सगळी गणिते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणि अचूक सोडविली होती. त्यांचे मित्रच नव्हे तर इतरही विद्यार्थी म्हणत की सत्येंद्रनाथ शिकत असतांना पहिला क्रमांक सोडून देऊन इतर क्रमांकासाठीच प्रयत्न करता येतील. सत्येंद्रनाथ यांनी प्रेसीडेन्सी कॉलेज मधून १९१५ साली आपली पदवी प्राप्त करतांनाही पहिला क्रमांक सोडला नाहीच, यावेळी ते संपूर्ण विद्यापिठातून प्रथम आले होते. त्यांना जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रॉय यांचे सतत मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले. त्यांना अनेक भाषा येत होत्या आणि व्हायोलीन सारखे एसराज नावाचे वाद्य ते अतिशय उत्तमपणे वाजवु शकत.

१९१५ सालीच सत्येंद्रनाथांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित केला. १९१६ ते १९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम कले. १९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

१९२३ साली सत्येंद्रनाथांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरित करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले. आपल्या कामाच्या व्यापातून सत्येंद्रनाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम मेरी क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येंद्रनाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.

१९४५ साली सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली.

भौतिकशास्त्र विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.

१९५८ साली सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.

दि. फेब्रुवारी ४ १९७४ रोजी सत्येंद्रनाथांचे हृदय रोगामुळे निधन झाले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

तानाजी मालुसरे🚩⚔️🚩* ⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

 *🚩⚔️🚩तानाजी मालुसरे🚩⚔️🚩*

⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत शिवाजीबरोबर होते.


*⚔️तानाजी मालुसरे यांचे स्मारक*

         मृत्यू - ०४ फेब्रुवारी १६७०,

           सिंहगड, पुणे, महाराष्ट्र,


*⚔️बालपण*


सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले..


*⚔️कामगिरी*


अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.


महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले.


स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.


*⚔️कोंढाण्याची लढाई*


स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर;कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारी होते. त्यांनी ती तयारी अर्धेवट सोडली आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."


गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी)[ दुजोरा हवा] रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे दिवसा होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने यशवंत  घोरपडेंना वर पाठवले.  मावळे  दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.


तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्‍या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले *"गड आला पण सिह गेला"*. अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठे' (पोलादपूरजवळ) या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले आहे


*⚔️तानाजीची स्मारके*


तानाजी मालुसरेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते *_नरवीर तानाजी वाडी_* असे करण्यात आले.


पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.


रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.

⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

*नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन*

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

माघ मास,शुक्ल पक्ष,*चतुर्थी*,पू.भा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ०४ फेब्रुवारी २०२२.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"सम्बन्ध वो नही होते जो जन्म से जुड़े होते हैं, सम्बन्ध वो होते हैं जो दिल से और भावनाओं से जुड़े होते हैं। किन्तु यह भी स्मरण रहे कि जिन सम्बंधों में सन्देह, किन्तु, परन्तु और समर्पण की कमी होती है, वह रिश्ते कभी प्रगाढ़ और दीर्घायु नही होते।"*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नलिका विरहित ग्रंथी


══════════════════════
   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*
  *श्री.गजानन गोपेवाड 
══════════════════════
            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════   
📙 *नलिकाविरहित ग्रंथी* 📙 
***************************
आपल्या शरीरात दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. बहि:स्रावी ग्रंथीमध्ये तयार झालेला स्राव नलिकेद्वारे बाहेर पाठवला जातो. उदारणार्थ लाळग्रंथीत तयार झालेली लाळ तोंडात येते. याउलट अंत:स्रावी ग्रंथीत तयार झालेला स्राव ग्रंथीमधीलच रक्तवाहिन्यांत शोषला जातो. रक्तामध्ये शरीरात विविध भागांकडे पाठवला जातो. अशा अंतस्रावांस संप्रेरक, 'हार्मोन' असे म्हणतात. अशा नलिकाविरहित ग्रंथींना 'एंडोक्राइन' ग्रंथी असे म्हटले जाते.
शरीरात घडणाऱ्या असंख्य चयापचयाच्या क्रिया व महत्त्वाचे जीवनव्यापार यांवरचे नियंत्रण या ग्रंथींद्वारे राखले जाते. प्रत्येक ग्रंथीमधील स्रावाचे कार्य एखाद्या विशिष्ट लक्ष्यावर काम करते. सर्वात जास्त परिणाम त्या लक्ष्यावर घडून येतो. नलिकाविरहित ग्रंथींच्या प्राकृत व विकृत अभ्यासाची अतिविशिष्ट अभ्यासशाखा मानली जाते (एंडोक्रायनाॅलॉजी ही सुपर स्पेशालिटी). डॉक्टर मंडळी त्यात प्रावीण्य मिळवून काम करतात.

अशा नलिकाविरहित ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथी. (पिट्युटरी), कंठस्थ (थायरॉइड), उपकंठस्थ (पॅराथायरॉइड), मूत्रपिंडावरील (अॅड्रिनल), स्वादुपिंडातील (लँगरहॅन्स आयलेट) या ग्रंथी स्त्री व पुरुषांत सारख्याच असतात. पुरुषात वृषण (टेस्टीज) व स्त्रीमध्ये राज:पिंडे (ओव्हरीज) या वेगळ्या असतात. यांतील प्रत्येक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाला बहुदा त्या ग्रंथीच्या नावाने ओळखले जाते. उदाहरणार्थ पिट्युटरी हार्मोन.

या ग्रंथीमधील सर्वात महत्त्वाची म्हणजे पिट्युटरी शीर्षस्थ ग्रंथी. अन्य सर्व ग्रंथींवर तर तिचे नियंत्रण असतेच, पण शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या बाबी ती नियंत्रित करते. मूत्रपिंडाचे कार्य, हवेच्या तापमानाशी जोडून मुत्रनिर्मिती कमी वा जास्त राखणे व त्यानुसार शरीराला तहानेची जाणीव करून देणे हे काम तिच्याकडे आहे. स्नायूंवरचे नियंत्रण, विशेषत: गर्भाशयाचे स्नायू बाळाच्या जन्मासाठी कधी आकुंचित करायचे व आईचे दूध कधीपासून निर्माण करायला सुरुवात करायची, यांवरचे नियंत्रण ऑक्सिटोसीन व मॅमॅट्रोपिक हार्मोनने केले जाते. या सर्वांची निर्मिती शीर्षस्थ ग्रंथींच्या मागच्या भागातून होते. याशिवाय पुढील भागात अन्य ग्रंथींना उत्तेजक (ट्रोपिक) हार्मोनची निर्मिती केली जाते. थायरॉइडमधील स्रावांचे सतत नियंत्रण या हार्मोनने होत असते. नलिकाविरहित ग्रंथींचे नेतृत्वच शीर्षस्थ ग्रंथी करत असते. जेमतेम मोठ्या शेंगदाण्याएवढ्या असलेली ही ग्रंथी खरोखरीच जीवनाधार समजली जाते.

 थायरॉइड हार्मोन मुख्यतः आयोडिनयुक्त असते. खाण्यात, आहारात आयोडाइड्स कमी पडली तर हा स्राव कमी निर्माण होतो. शरीरातील चयापचयाची महत्त्वाची कार्ये व शरीराचे तापमान नियंत्रण आणि शक्तीसंपन्नता यांत ह्या हार्मोनचा महत्त्वाचा कार्यभाग असतो. गलगंड, मेंदूची अपूरी वाढ, मतिमंदत्व असे विकार होऊ नयेत, त्यांना प्रतिबंध करता यावा यासाठी मिठावाटे आयोडीनचा आवश्यक पुरवठा करावा, असे तज्ज्ञांना वाटते. रोज दोन चिमटी एवढेच मीठ आपण खात असल्याने नियंत्रित पुरवठा याद्वारे करणे शक्य होते. मिठाशिवाय जेवण, अळणी अन्नपदार्थ हा विचार आपल्या मनात तरी येतो का ? 
 
उपकंठस्थ वा पॅराथायरॉइड या कंठस्थ ग्रंथीमागे दोन छोट्या ग्रंथी असतात. कॅल्शिअम व फॉस्फरस या दोन्हींच्या चयापचयावर पॅराथाॅर्मोनचे नियंत्रण असते. हाडे, दात, शरीरातील सर्व स्रावांत या दोन्हींची गरज असते. त्यासाठी या ग्रंथीचे कार्य महत्त्वाचे ठरते.

मूत्रपिंडावरील अॅड्रिनल ग्रंथी मूत्रपिंडावर छोट्या टोपीप्रमाणे असतात. त्यांचा गाभा (मेड्युला) व बाह्यभाग (कॉर्टेक्स) हे दोन वेगवेगळ्या हार्मोन्सची निर्मिती करतात. जीवनावश्यक व हृदयासारख्या महत्त्वाच्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणारी अॅड्रीनॅलिन व नाॅर-अॅड्रीनॅलिन ही दोन हार्मोन्स गाभ्यात तयार होतात. 'मारा किंवा मरा', अशा समयी या स्रावांचे कार्य अवघ्या शरीराला जाणवते. स्नायूंचा रक्तपुरवठा वाढवणे, हृदयाची गती वाढवणे, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे, यकृतातील साखरेची म्हणजे ग्लायकोजेनची ग्लुकोज शर्करा बनवणे व अनिच्छावर्ती स्नायू शिथिल करणे ही मुख्य कामे या दोन स्रावांमुळे होतात. अॅड्रिनल ग्रंथीच्या बाह्य भागातून काॅर्टिकोस्टिराॅईड नावाची हार्मोन्स निर्माण होतात. यांतील अल्डोस्टिराॅन हे द्रव्य शरीरातील सोडियम व पोटॅशियम या घटकांच्या चयापचयावर नियंत्रण ठेवते. मज्जातंतूंचे कार्य, हृदयाचे कार्य, स्नायूंचे कार्य यांसाठी या दोन्हींची गरज असते. स्टिरॉइडमधील अन्य द्रव्ये पिष्टमय पदार्थांच्या चयापचयावर नियंत्रण राखतात. त्यांचे कार्य रक्तातील शर्करा जरुरीप्रमाणे वाढविण्याचे असते. प्रथिने व स्निग्ध यांच्या साठ्यांवरही त्यांचे नियंत्रण राहते. याशिवाय शरीरात कोठेही दाह झाल्यास यांचा दाहशामक म्हणूनही उपयोग होतो. विशेषतः सांध्यांचा दाह असल्यास स्टिरॉइडचा तोंडावाटे वा त्याजागी इंजेक्शन देऊन उपयोग होतो. अॅड्रिनल ग्रंथीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते.

स्वादुपिंडातील स्वादुरस पक्वाशयात नलिकेवाटे पोहोचवला जातो. मात्र लँगरहॅन्स आयलेट्स या पेशीसमूहातून इन्सुलिनची निर्मिती होऊन ती थेट रक्तात मिसळते. शक्ती व उष्णता उत्पन्न होण्यासाठी शरीरातील सर्व पेशीजालामध्ये प्राणवायूच्या साहाय्याने ग्लुकोज साखरेचे ज्वलन होते. यासाठी इन्सुलिनची मदत लागते. ती न मिळाल्यास रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होते. तसेच इन्शुलिनचे दुसरे कार्य म्हणजे रक्तातील जास्तीच्या साखरेचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करून ती यकृतात साठवणे. या दोन्ही संदर्भात या ग्रंथीचे महत्त्व आहे.

लैंगिक ग्रंथी पुरुष व स्त्रीमध्ये प्रत्येकी दोन असून त्यांना वृषण व राज:पिंड असे म्हणतात. वयात आल्यावर पुंबीजे व स्त्रीबीजे यांची यथायोग्य वेळी निर्मिती हे त्यांचे एक कार्य. दुसऱ्या कार्यात स्रावनिर्मितीचा म्हणजे हार्मोनचा सहभाग असतो. पुरुषातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे जननेंद्रियांची वाढ, दुय्यम लैंगिक लक्षणे म्हणजे दाढी मिशा उगवणे, आवाज फुटणे, स्नायूंचा भरदारपणा यात पूर्णता येते. स्त्रियांच्या राज:पिंडातून इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे दोन स्राव स्रवतात. त्यामुळे मासिक पाळी सुरू होते. स्तनांची व नितंबाची गोलाई वाढते, जननेंद्रियांचा आकार पुरेसा वाढतो. गर्भधारणा, गर्भाची वाढ, दूध पुरेसे येणे व गर्भधारणेच्या काळातील अन्य शारीरिक बदल यांवरही याच हार्मोन्सचे नियंत्रण राहते.

वयोमानानुसार लैंगिक ग्रंथींचे कार्य मंदावते. स्त्रियांमध्ये पन्नाशीनंतर, तर पुरुषात सत्तरीनंतर या ग्रंथी थकून जातात. त्याप्रमाणे स्त्रियांत रजोनिवृत्ती व पुरुषांत लैंगिक शैथल्य जाणवू लागते. मात्र जीवनाच्या अंतापर्यंत अन्य नलिकाविरहित ग्रंथी कार्यरत असतात. नलिकाविरहित ग्रंथींच्या कार्यकारणभावावर व त्यातील रोगांच्या उपचारांबद्दल आता खूपच प्रगती झाली असली, तरी प्रतिबंधक उपाय फारसे ज्ञात नाहीत.

'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
═══════════════════════
 

दूरचित्रवाणी


══════════════════════

   @ संकलन @गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *दूरचित्रवाणी (Television)* 📙

**********************************

दूरचित्रवाणीचे भारतात आगमन खूपच उशिरा झाले. केवळ दिल्लीपुरते 'दूरदर्शन' अनेक वर्षे वापरात होते. पण तेही 'दूरचित्रवाणी'च्या जागतिक वापरानंतर २० वर्षांनी १९५६ साली सुरू झाले. अन्य सर्व शहरात तर दूरदर्शनची सेवा १९७२ पासून मिळू लागली. आज बऱ्याच भागांत हे जाळे पसरले आहे व त्याने आता उपग्रहाद्वारे स्वतःचे हातपाय पक्के रोवायला सुरुवात केली आहे.


१९२६ साली जॉन बर्ड याने टेलिव्हिजन हा प्रकार शोधला. १९३६ साली लंडनमध्ये बीबीसीने त्याचे कार्यक्रम सुरू केले, तर पहिले रंगीत प्रक्षेपण १९५१ मध्ये अमेरिकेत झाले. खरे म्हणजे रेडिओ सिग्नल्सद्वारेच प्रकाशचित्रे पण पाठवता येतील, याचा अंदाज शास्त्रज्ञांना १९०० सालीच आला होता. कल्पना वास्तवात यायला हा काळ जावा लागला.


नेहमीच्या कॅमेऱ्यासारखा कॅमेरा. पण त्यात फिल्म न घालता प्रतिमा प्रकाशाला संवेदनक्षम अशा एका पृष्ठभागावर पडते. हा पृष्ठभाग वरपासून खालपर्यंत एका इलेक्ट्रॉन्सच्या झोताने न्याहाळला जातो. ही क्रिया होतानाच त्यातून ज्या रेडिओलहरी निर्माण होतात, त्यात जे बदल होतात, त्यासकट त्यांचे प्रक्षेपण केले जाते. याची पद्धत अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी माॅड्युलेशन (UHF) या नावाने ओळखली जाते. या लहरी थेट सरळ प्रवास करतात. म्हणूनच टीव्हीचा अँटेना व प्रक्षेपण मनोरा हे समोरासमोर असून मध्ये अडथळा चालत नाही. अर्थातच मनोऱ्याची उंची खूपच उंच असावी लागते. मुंबईचा वरळीचा मनोरा तीनशे मीटर उंच आहे, तर पुण्याचा सिंहगडावरच आहे. जगातील सर्वात उंच मनोरा आहे ६२८ मीटर उंचीचा, फार्गो, नॉर्थ डकोटा येथे अमेरिकेत.


हे रेडिओ सिग्नल्स आपल्या घरातील अँटेना गोळा करतात. त्यांचे रूपांतर पिक्चर ट्युबमुळे पुन्हा इलेक्ट्रॉन झोतामध्ये होते. हा झोत फॉस्फरसचा थर दिलेल्या टीव्ही पडद्यावर आतून पडतो. ज्या ठिकाणी झोत पडेल तो भाग प्रकाशाने उजळून निघतो. ही क्रिया सतत झिगझॅग पद्धतीने चालू असते. त्यामुळे पडद्यावरील चित्र पूर्ण होऊन डोळ्यांना दिसते. पडद्यावरील चित्र हे आडव्या बारीकबारीक रेघांद्वारे आपल्यासमोर येते. प्रत्येक केंद्र स्वतःचे चित्र किती रेघांद्वारे प्रक्षेपित करायचे, ते ठरवते. अर्थात हा झाला त्याचा तांत्रिक भाग. तसेच दर सेकंदाला किती चित्रे प्रक्षेपित करायची, हेही प्रमाण एखाद्या चलतचित्राप्रमाणे ठरवले जाते. त्यामुळे समोरची स्थिर चित्रेच आपल्याला हालचाल करताना दिसू लागतात.


१९८२ सालच्या एशियाडपासून रंगीत दूरचित्रवाणी 'दूरदर्शन' मार्फत भारतात आली. मूळ रंगा तीन. लाल, निळा, हिरवा यांचा वापर करून सर्व रंग बनतात, हे तत्त्व रंगीत टीव्ही वापरतो. पिक्चर ट्यूबमधून तीन प्रकारचे इलेक्ट्रॉन झोत पडद्यावर टाकले जातात. यांच्या मिश्रणातून आपल्याला परीपूर्ण रंगीत चित्र दिसू लागते. यात सर्व रंगांचे सुखद मिश्रण असते. नको असलेले रंगझोत टाळण्यासाठी पडद्यामागे एका विशिष्ट प्रकारची जाळी (shadow grid) असते. त्यामुळे नेमक्या जागी नेमका रंग हे मिश्रण साधले जाते. रंगीत प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यातून केलेले चित्रण कृष्णधवल टीव्हीवरही कृष्णधवल रंगात पाहता येते.

दूरचित्रवाणीचा कॅमेरा हा चित्रण करताना त्यामागे बसवलेल्या छोट्या टीव्हीवर प्रत्यक्ष चित्रण कसे दिसेल, याचे स्वरुप जसेच्या तसे दाखवत असतो. त्यामुळे कॅमेरामन झटपट बदल करू शकतात. तसेच एका प्रसंगाचे चित्रण दोन वा अधिकही कॅमेरे करतात. त्यांतील नेमक्या कोणत्या चित्राचे प्रक्षेपण करायचे, ते संकलक ठरवतो. त्याच्यासमोर या सर्वांचे प्रक्षेपण एकाच ओळीत लावलेल्या पडद्यांवर दिसत असते. त्यामुळेच कधी जवळून, कधी वरून, कधी संपूर्ण दृश्याचे असे चित्रण आपण बघू शकतो.


 टीव्ही पडदा खूप मोठा करून एखाद्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये लावणे हे आता नवीन नाही. ऑलिम्पिक स्टेडियममधील प्रत्येक कार्यक्रम तेथील लोक प्रत्यक्ष व मोठ्या पडद्यावर ब्लोअप केलेला असाही बघू शकतात. पिक्चर ट्यूब व तिच्यामधून होणाऱ्या पडद्यावरच्या इलेक्ट्रॉन माऱ्यामुळे टीव्हीची जाडी वाढते. भिंतींवर तसबिरीप्रमाणे टांगता येणारा टीव्ही बनवायला त्यामुळे सतत अडचणी येत होत्या. पण आता जेमतेम तीन इंच जाडीचा तसबिरीसारखा टीव्हीपण वापरात आला आहे. स्टँडवरचा वा टिपाॅयवरचा टीव्ही आता भिंतीवरही जाऊ शकेल. फ्लॅट स्क्रीन, २१ इंच ते ७२ इंच या दरम्यानचे अनेक आकारांतील पडदे असलेले टीव्ही आता उपलब्ध आहेत. थेट एलसीडी प्रोजेक्टरचा वापर करून घरातील भिंतीवरही आपण चित्र पाहू शकतो. 

 

 टीव्ही सुरू करणे, बंद करणे, कार्यक्रम संपल्यावर आपोआप बंद होणे व जागेवरूनच या गोष्टी घडवणे हेही रिमोट कंट्रोलमुळे शक्य झाले आहे. इन्फ्रारेड किरणांद्वारे टीव्हीच्या नियंत्रकाला दिलेल्या सूचना पाळल्या जाऊन या गोष्टी घडतात.

 

 टीव्ही हे करमणुकीचे माध्यम आहेच; पण खरे म्हणजे उत्कृष्ट शैक्षणिक व लोकजागृतीचे माध्यम आहे. सध्या विविध प्रकारच्या वाहिन्यांवरील विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम देत आहेत. वार्तांकन, क्रीडा, करमणूक, सिनेमा, कार्टून, विनोदी, विज्ञान, प्राणीजगत अशा विविध कार्यक्रमांतून प्रेक्षक निवड करू शकतात. तेही त्यांच्या स्वतःच्या भाषेतून.

 

'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═══════════════════════

  

नायट्रोजन काय आहे आणि त्याचे महत्त्व


══════════════════════

   @ संकलन @गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

*📙नायट्रोजन काय आहे?त्याचे महत्व काय?* 

************************************

१७७२ साली रुदरफोर्डने या वायूचा शोध लावला. रंगहीन, वासहीन व उदासीन असा हा वायू आपल्या पृथ्वीच्या वातावरणातील हवेचा ७८ टक्के भाग व्यापतो. गमतीची गोष्ट म्हणजे उदासीन असलेला हा वायू त्याच्या संयुक्त स्वरूपात मात्र सारेच व्यापून टाकतो. सजीवांच्या पेशीची निर्मिती असो, वनस्पतींना आवश्यक घटक असोत, खते असोत वा स्फोटके असोत, त्यात नायट्रोजन हा अत्यावश्यक घटक बनतो. आपल्या शरीरातील पेशीच्या द्रवात म्हणजे प्रोटोप्लाझममध्ये विविध घटकांसमवेत १६ टक्के नायट्रोजनचा समावेश असतो. मात्र वातावरणातील नायट्रोजनचा वापर कसा करायचा हा प्रश्न अनेक वर्षे शास्त्रज्ञांना सतावत होता. याचे उत्तर जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिट्झ हाबर यांनी शोधून काढले. अतिउच्च दाबाखाली म्हणजे वातावरणापेक्षा पाचशे ते हजार पटींनी जास्त दाबाखाली नायट्रोजन व हायड्रोजनचे मिश्रण पाचशे डिग्री सेंटिग्रेडपर्यंत तापवायचे. या प्रक्रियेत लोखंडाचा उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) म्हणून वापर करून अमोनियाची निर्मिती त्यांनी शक्य करून दाखवली. दुसऱ्या पद्धतीत विद्युतअार्कचा वापर करून ३००० सेंटीग्रेड तापमानाला हवेतील नायट्रोजन व प्राणवायू यांचा संयोग होतो व त्यापासून नायट्रिक ऑक्साईड बनते. याचा वापर करून नायट्रिक अॅसिड व नायट्रेट्स बनवली जातात. नैसर्गिक सोडियम नायट्रेटचे साठे किती पुरतील, ही काळजी आता कोणाला सतावत नाही. या पद्धतीमुळे वातावरणातील नायट्रोजन वायूचा नेमका उपयोग काय व कसा हे कळेपर्यंत विसावे शतक उजाडावे लागेल. अन्यथा हवेमधील फार मोठा घटकवायू एवढीच त्याची ओळख होती.


नैसर्गिकरीत्या नायट्रोजनची संयुगे प्रचंड प्रमाणात बनत असतात. वनस्पती, प्राणी, सर्व सजीव यांच्या शरीरातील त्यांची संयुगे त्यांच्या पश्चात विविध जंतूंंमुळे विघटित होतात. अमोनियाचे क्षार या स्वरूपात ती मातीत मिसळली जातात. हवेतील व जमिनीतील प्राणवायूशी त्यांचा संयोग होऊन त्यापासून नैसर्गिकरीत्या सोडियम नायट्रेटचे साठे बनू लागतात. चिलीमध्ये असे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय वाटण्यासारख्या वनस्पतींच्या मुळाशी गाठींच्या स्वरुपात नायट्रोजनची नैसर्गिक संयुगे बनतात. हवेतील नायट्रोजनचा वापर त्या वनस्पती करतात. जमिनीचा कस नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी त्यांची लागवड करून त्या नांगरटीमध्ये गाडण्याची पूर्वापार पद्धत यामुळेच रूढ झाली आहे. कृत्रिम खते व त्यांचा वापर यातून नायट्रोजन, पोटॅशियम व फाॅस्फेटचा मारा केला जातो. त्याऐवजी ही पद्धत कमी खर्चाची असते. विजांचा कडकडाट होतो, तेव्हाही काही प्रमाणात वातावरणातील नायट्रोजन व प्राणवायू संयोग पावतात व ही संयुगे जमिनीत मूरतात. नायट्रोजनचे नैसर्गिक चक्र खूपच प्रभावी आहे. पण मानवी गरजांनुसार शेतीउत्पादन काही पटींनी वाढावायला ते कमी पडते, असे वाटल्याने अमोनियाची गरज प्रमाणाबाहेर वाढली आहे.


'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*