गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

पृथ्वी स्वतःभोवती गिरकी का मारते


══════════════════════

   *@ संकलन @*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌎 *पृथ्वी स्वतःभोवती गिरकी का मारते?* 

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

आपली पृथ्वीच नाही तर सगळे ग्रह अशी गिरकी घेत असतात. प्रत्येकाचा अशी एक प्रदक्षिणा करण्याचा 'वेग' वेगवेगळा असतो. ज्या प्रक्रियेतून ग्रहांचा जन्म होतो, त्याचाच हा परिणाम आहे. आकाशात इतस्तत: अनेक पदार्थ, वायू वेडेवाकडे पसरलेले असतात. त्यापैकी प्रत्येकाला इतर सर्वांच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवत असते. कालांतराने त्या अोढीपायी त्यातले काही पदार्थ एकत्र येतात. त्यांचा जुडगा बनतो. साहजिकच त्याचं वस्तुमान जास्त असल्यामुळे त्यांची इतरांना वाटणारी ओढ जास्त होते. त्यामुळे पदार्थांचे आणखी काही कण त्याला येऊन चिकटतात. अशा साखळी पद्धतीने हळूहळू ग्रहाचा जन्म होतो. तो होत असताना त्या गुरुत्वाकर्षणाच्या सर्व बाजूंना सारख्याच वाटणाऱ्या ओढीपायी ते पदार्थ ओढले जात असताना त्यांना चक्राकार गती मिळते. तीच मग ते पदार्थ ज्याला चिकटतात त्या ग्रहांकुरालाही मिळते.


ग्रहांकुराच्या केंद्रस्थानात त्यातल्या पदार्थाची घनता साहजिकच जास्त असते. एखादा लाडू वळताना तो दाबला जात असतो. त्यामुळे त्याचा मध्यभाग जास्त घट्ट झालेला असतो तशातलाच हा प्रकार. त्यामुळं त्या ग्रहाच्या परिघावरच्या पृष्ठभागाला केंद्राच्या गुरुत्वाकर्षणाची जास्त ओढ वाटते. पण विखुरलेल्या पदार्थांपासून घन ग्रहाचा जन्म होताना त्याचा व्यास कमी होत जातो. त्यामुळे त्या वर्तुळाकार गतीचा वेगही वाढत जातो. कथक नृत्य करणारी नर्तकी जेव्हा गिरकी घ्यायला लागते तेव्हा त्या गिरकीची गती वाढवायची असेल तर ती आपले हात अंगासरशी ओढून घेते, म्हणजेच अंगाच्या गोलाचा व्यास कमी करते. तेच हा हात पसरलेले असले की त्या गिरकीचा वेगही कमी होतो. तशीच ग्रहाचीही अवस्था असते. त्याचा पसारा कमी होत जातो, तो अधिक घन बनतो तसा त्याचा वर्तुळाकार भ्रमणाचा वेगही वाढत जातो. त्यामुळे गिरकी घेणं हा प्रत्येक ग्रहाचा स्थायीभावच आहे. पृथ्वी ही त्याला अपवाद नाही.


मग चंद्र का गिरकी घेत नाही ? त्याचा एक भाग सतत आपल्या डोळ्यांसमोर राहतो ते का ? असे प्रश्न कोणीही विचारेल; पण चंद्र गिरकी घेत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. चंद्राचा स्वतःभोवती गिरकी घेण्याचा वेग हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या वेगाइतकाच असल्यामुळे त्याचा एक चेहरा आपल्याला सतत दिसत असतो एवढंच. एरवी आकाशातला इतर कोणत्याही गोल गोलासारखा तोही स्वतःभोवती गिरकी घेतच असतो.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


राँबर्ट बायल रसायनशास्त्रज्ञ स्मृतिदिन

 *⚗️⚗️⚗️⚗️रॉबर्ट बॉयल⚗️⚗️⚗️⚗️*

*🧪⚗️🧪रसायनशास्त्रज्ञ🧪⚗️🧪*

⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️⚗️

*स्मृतिदिन - ३१ डिसेंबर १६९१*


रॉबर्ट बॉइलचा जन्म २५ जानेवारी १६२७ रोजी आयर्लंडमध्ये झाला. त्याचे वडील रिचर्ड बॉइल मोठे जमीनदार होते. रॉबर्ट बॉइलने लहानपणीच लॅटिन, ग्रीक आणि फ्रेंच भाषा आत्मसात केल्या.


त्याची आई तो नऊ वर्षांचा असतानाच मृत्यू पावली. त्यानंतर पुढील शिक्षण त्याने इंग्लंड व इटली येथे घेतले. सन १६४३ मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी रॉबर्टसाठी मोठी इस्टेट मागे ठेवली होती.


रॉबर्टने स्वत:ला शास्त्रीय संशोधनात वाहून घ्यायचे ठरविले. त्याने हवेच्या गुणधर्मांचा अभ्यास करून अनेक प्रयोग केले. ‘स्थिर तापमानात वायूचे आकारमान व दाब हे व्यस्त अनुपाती असतात.


याचे त्याने प्रतिपादन केले. हाच, पुढे बॉइलचा सिद्धांत म्हणून प्रसिद्ध झाला. ध्वनीच्या संक्रमणातील हवेचा सहभाग, गोठणाऱ्या पाण्याचे प्रसरणात्मक बल, विशिष्ट गुरुत्व, अपवर्तन इत्यादी भौतिकशास्त्रातील अनेक गोष्टींबद्दल जरी रॉबर्टने संशोधन केले असले तरी रसायनशास्त्रात त्याला विशेष रस होता.


संयुगे आणि मिश्रणामधील फरक, त्यांचे पृथक्करण, ज्वलनक्रिया आणि श्वसनक्रिया यांचा त्याने अभ्यास केला होता. जीवशास्त्रात प्राण्यांचे विच्छेदन वगैरे करावे लागे, म्हणून त्याचा जीव जीवशास्त्रात मात्र कधीच रमला नाही.

🙏🌞🙏 शुभ प्रभात🙏🌞🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीष मास,कृष्ण पक्ष, *द्वादशी*,अनुराधा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ३१ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *जिस प्रकार कमरे में प्रकाश करते ही अँधेरा स्वयं लुप्त हो जाता है। वैसे ही यथार्थ बोध प्राप्त करो- अज्ञान, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार स्वयं ही पलायन कर जायेंगे और आपको सत्य ईश्वर के दर्शन स्वतः होने लगेंगे। अंधकार का आवरण हटाओ, ईश्वर के प्रकाश से आप प्रकाशित हो जायेंगे।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीष मास,कृष्ण पक्ष, *दशमी*,स्वाति नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २९ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


गते शोको न कर्तव्यो 

                  भविष्यं नैव चिन्तयेत्

वर्तमानेन  कालेन 

                  वर्तयन्ति विचक्षणाः।


*भावार्थ -  बीते हुए समय का शोक नहीं करना चाहिए और भविष्य के लिए चिंतित नहीं होना चाहिए। बुद्धिमान मनुष्य तो वर्तमान मे ही कार्य करते हैं, क्योंकि भविष्य सदा वर्तमान के गर्भ से ही निकलता है।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मधमाशी चावल्यावर काय होते

 📙 *मधमाशी चावल्यावर काय होतं ?* 📙


डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. 


विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या अोढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.


उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.धन्यवाद🙏

विक्रम साराभाई स्मृतीदिन 30 डिसेंबर

 *विक्रम साराभाई*


*भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ*


*स्मृतिदिन - ३० डिसेंबर, १९७१*


विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा *विक्रम साराभाई*


*भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ*


*स्मृतिदिन - ३० डिसेंबर, १९७१*


विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा  वाटा आहे.🙏

उंचीवर हवा थंड का असते


══════════════════════

   @ संकलन @गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌥 *उंचावरची हवा थंड का असते ?* 🌥


आपण सहसा पाहतो, की थंड हवेच्या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून जास्त असते. जसजशी ही उंची वाढते तसतसं तिथलं हवामानही त्याच्याजवळच, पण कमी उंचीवर असलेल्या ठिकाणाहून अधिक थंड होतं. आपल्या ओळखीच्या महाबळेश्वरचंच उदाहरण घ्या ना. सहय़ाद्रीच्या माथ्यावर ते वसलेलं आहे. त्याच डोंगरकड्याच्या पायथ्याशी असलेल्या वाईपासून त्याचं अंतर केवळ काही किलोमीटरचंच असेल; पण वाईचं तापमान उष्ण, तर महाबळेश्वरचं थंड असतं. सगळीकडेच आपल्याला असा अनुभव येतो. साहजिकच उंचावरची हवा थंड का असते, असा सवाल मनात उभा राहतो.


त्याचं उत्तर दोन्ही ठिकाणच्या हवेच्या गुणधर्मात दडलेलं आहे. कोणत्याही वायूवर असणारा दाब आणि त्याचं तापमान त्याचं सरळ नातं असतं. वायूवरचा दाब जास्त असेल तर त्याचं तापमानही वाढीव असतं. उलटपक्षी जर तो दाब कमी असेल तर तापमानही घटलेलं असतं. सायकलच्या चाकात जेव्हा हवा भरण्यासाठी आपण पंपातला दाब वाढवतो तेव्हा त्या हवेचं तापमान वाढत जातं. ती तापलेली असते. परिणामी, तो पंपही तापतो; पण त्याच टायरमधून आपण हवा सोडून तिला दाब कमी केला की त्याचं तापमान उतरतं.


रेफ्रिजरेटरमध्ये वायूच्या याच गुणधर्माचा वापर केलेला असतो. त्या यंत्रांमध्ये फ्रिऑन नावाचा वायू भरलेला असतो. जेव्हा तो रेफ्रिजरेटरच्या बाहेर असतो तेव्हा त्याच्यावर दाब देऊन त्याच्यातील उष्णता का काढून टाकली जाते. तो जेव्हा रेफ्रिजरेटरच्या आत असतो तेव्हा त्याच्यावरचा दाब कमी करत तो थंड केला जातो. त्यामुळे आतली उष्णता त्याच्याकरवी शोषली जाते व ती बाहेर का टाकली जाते. 


हवा ही अशीच निरनिराळ्या वायूंची बनलेली असते, त्यामुळे तिच्या ठायीही वायूंचा हाच गुणधर्म प्रस्थापित होतो. उंचावरची हवा विरळ असते, त्यामुळे तिथला हवेचा दाबही कमी असतो. लडाखसारख्या अतिशय उंचीवरच्या ठिकाणी गेल्यावर लवकर थकवा येतो, याचं कारणही हेच आहे. तिथली हवा इतकी विरळ आणि त्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण इतकं कमी असतं की आपल्या नेहमीच्या श्वासोच्छवासातून हवा तितका ऑक्सिजन आपल्याला मिळत नाही. इतक्या विरळ हवेचा दाबही साहजिकच कमी असतो. त्यापायी त्या हवेचं तापमानही घसरतं. अशा ठिकाणच्या जवळच, पण समुद्रसपाटीपासून फारश्या उंचीवर नसलेल्या ठिकाणची हवा विरळ नसते. ती तुलनेने दाट असते. त्यामुळे तिचा दाबही जास्त असतो. साहजिकच त्या हवेचं तापमानही जास्त असतं. उंचावरच्या ठिकाणाइतकं थंड नसतं. 


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

स्त्रीयांना दाढी का नसते


══════════════════════

    @ संकलन @

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *स्त्रियांना दाढी का नसते ?* 📙 


प्राचीन इजिप्तमध्ये हातशेपसुत नावाची एक राणी होती. ती हनुवटीवर एक खोटी दाढी लावून वावरत असे. आपलं स्त्रीत्व लपवण्यासाठी तिनं हा खटाटोप केला होता. कारण राजगादीवर पुरुष वारसांनीच बसावं, असा प्रघात होता. त्यामुळे तिच्या गादिवरच्या हक्काला सहजासहजी मान्यता मिळणार नव्हती. तेव्हा आपणही पुरुष आहोत असं दाखवण्यासाठी तीनं या खोट्या दाढिचा आधार घेतला होता. तसा तिनं करावं याचं राजकीय कारण जरी स्पष्ट झालं असलं तरी तिला किंवा एकंदरीतच स्त्रियांना दाढी का नसते, हा प्रश्न उरतोच. 


पुरुषांनाही दाढी वयात आल्यानंतरच येते. त्यामुळे या नैसर्गिक आविष्कारात वयात येताना सर्वांच्याच शरीरात जो संप्रेरकांच्या पाझराचा खेळ सुरू होतो त्याचा सहभाग असावा, हे निश्चित. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या अंगावर लव असते. काहींच्या अंगावर तशी ती जास्तच असते. अशा केसाळ मुलाच्या अंगावरची लव घालवण्यासाठी आई आणि दाई त्याला अंघोळ घालताना हळदीचा लेप चोळत असतात. वास्तविक त्याची काहीच गरज नसते. कारण मूल मोठं होत जातं तशी ही लव हळूहळू नाहीशी होत जाते.


तिच्यात मोठा फरक होतो तो ते मूल वयात येताना. त्या वेळी त्या मुलाच्या लिंगानुसार वेगवेगळ्या लैंगिक संप्रेरकांचा पाझर मोठ्या प्रमाणावर सुरू होतो. मुलींच्या शरीरात स्त्रैण संप्रेरकांचा स्त्राव सुरू होतो. त्यांच्या प्रभावाखाली शारीरिक तसंच शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये मोठे बदल घडून येतात. स्त्रियांच्या शरीराला गोलाई येते. स्तनांची वाढ होऊ लागते. जननेंद्रियांचीही वाढ होते. मासिक पाळी सुरू होते. या सर्वांबरोबरच अंगावरची लव कमी कमी होऊ लागते आणि डोक्यावरच्या केसांची वाढ सुरू होते. चेहऱ्यावरच्या केसांच्या वाढीलाही विरोध होतो. त्यांची वाढ दाबली जाते. अर्थात काहीजणींच्या बाबतीत ही प्रक्रिया संपूर्णपणे सुरळीत पार पडत नाही. त्यामुळे काही मुलींच्या हनुवटीवर थोडेफार केस दिसू लागतात; पण त्यांचा बंदोबस्त करणं सहज शक्य असतं. 

मुलांच्या शरीरात याच वेळी पुरुषी संप्रेरकांच्या स्त्रावाला सुरुवात होते. त्यांच्या प्रभावापोटी त्यांच्याही शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये बदल होतात.


 जननेंद्रियांची वाढ होते. छाती रुंदावते, भरदार होऊ लागते. उंचीतही वाढ होते. आवाज फुटतो. त्याचबरोबर मिसरूडं आणि दाढीही फुटते. कारण त्या संप्रेरकांच्या स्त्रावापोटी अंगावरची लव केसांमध्ये बदलते. चेहऱ्यावरच्या केसांचीही वाढ होऊ लागते. डोक्यावरच्या केसांची वाढ मात्र मंदावते. ती अति मंदावली तर मग टक्कलही पडतं. त्या मंदावण्याच्या वेगावर टक्कल केव्हा पडेल हे ठरतं. काही जणांना लहान वयातच ते पडतं, तर काही जण सत्तरीतही केसांचा फुगा पाडू शकतात.


स्त्री आणि पुरुष यांच्या शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये निसर्गानं जे काही फरक केले आहेत त्यांच्या परिपाकापोटी स्त्रियांना दाढी येत नाही, तर पुरुषांनाच टक्कल पडतं.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


फुले रंगबिरंगी का असतात


══════════════════════

  @ संकलन गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌺 *फुलं रंगीबेरंगी का असतात ?* 

➖➖➖➖➖➖➖➖➖

अनेक झाडांची फुलं तर्‍हेतर्‍हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार.


ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा. प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता. त्यामुळे प्रत्येक सजीव पुनरुत्पादनाला अतिशय महत्त्व देतो. वनस्पतींच्या पुनरुत्पादनात फुलं कळीची भूमिका बजावतात.


फुलांच्या अंतर्गत रचनेकडे लक्ष दिल्यास त्यातील दोन अवयव आपलं लक्ष वेधून घेतात. स्टॅमेन किंवा पुबीजांडातून पुंकेसर बाहेर पडतात. ते पिस्टिल किंवा स्त्रीबीजांडातील स्त्रीकेसरांवर पडले की त्यांच्या समागमातून पुढील पिढीची नांदी म्हटली जाते. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचं मिलन होणं त्या वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतं. कित्येक फुलांमध्ये हे मीलन स्वयंपूर्णरित्या होत असलं, तरी बहुतांश वनस्पतींच्या फुलांमध्ये या प्रक्रियेसाठी दुसर्‍या कोणीतरी मध्यस्थाच्या मदतीची आवश्यकता भासते. वारा ही कामगिरी पार पाडत असला तरी तो पूर्णांशाने हे काम करू शकत नाही. त्यासाठी मग पक्षी किंवा मधमाश्यांसारख्या कीटकांची गरज भासते. ते काम करावं म्हणून मग पक्षी आणि मधमाशा यांना उद्युक्त करणं जरुरीचं असतं. त्यांना काहीतरी मधाचं बोट लावल्याशिवाय ते तरी या कामगिरीसाठी का तयार व्हावेत ? मधमाशांना तर अक्षरश: मधाचं बोट लावलं जातं. फुलांमध्ये असलेला मधुरस शोषून घेऊन मधमाशा त्याचं मधात रूपांतर करतात. तरीही आपल्याकडे अशा मधुरसाचे कोण आहेत, हे मधमाश्यांना कळावं कसं ? त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मग ही फुलं रंगीबेरंगी परिवेष धारण करतात. 

त्यातही मध्यस्थ कोण आहे यावर फुलांचा रंग निर्धारित केला जातो. मधमाशांना निळा रंग आवडतो, तर हमिंगबर्डसारख्या पक्ष्यांना लाल, गुलाबी किंवा जांभळ्या रंगांचं आकर्षण असतं. फुलपाखरं पिवळ्या, नारिंगी रंगांकडे ओढली जातात. 


काही फुलं दिवसाउजेडी फुलत असली तरी काही सूर्यास्तानंतरच फुलतात. त्या वेळी मग त्यांचा रंग पक्षांना वा कीटकांना दिसावा कसा ? त्यासाठी मग रंगांशिवाय या फुलांना सुगंधही दिला जातो. त्याच्या दरवळापायी मग हे फलनाला मदत करणारे मध्यस्थ त्याच्याकडे खेचून आणले जातात. त्यांना मधुरस मिळता मिळता त्यांच्याकडून पुंकेसराचा शिडकावा स्त्रीकेसरांवर होतो. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला चालना मिळते.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

पाण्यातील पेन्सील मोडल्यासारखी का दिसतात


══════════════════════

    @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *पाण्यात ठेवलेली पेन्सिल मोडल्यासारखी का दिसते ?* 

***********************************

कोणतीही वस्तू आपल्याला दिसते कशी ? म्हणजे तशी ती आपण डोळ्यांनीच पाहतो ; पण डोळ्यांमध्ये तरी तिची प्रतिमा उमटते कशी ? आपल्याला अंधारात कोणतीही वस्तू दिसत नाही. अगदी आपल्या हाताचं बोटही दिसत नाही. म्हणजेच कोणतीही वस्तू पाहण्यासाठी आपल्याला प्रकाशाची गरज भासते. दिव्यासारख्या वस्तूला स्वतःचा प्रकाश असतो. आकाशातल्या ताऱ्यांनाही; पण इतर कोणतीही वस्तू आपल्याला दिसण्यासाठी अशा दुसऱ्याकडून आलेला प्रकाश त्या वस्तूवरुन परावर्तित होऊन तो आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असते.


 प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो. त्यामुळे त्या वस्तूवरून परावर्तित झालेल्या प्रकाशाचे किरण असेच शहाण्यासारखे सरळ रेषेत प्रवास करत आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात आणि त्यांची नीटस स्वच्छ प्रतिमा डोळ्यांच्या पडद्यांवर उमटते. जोवर प्रकाश एकाच माध्यमातून प्रवास करत असतो तोवर हा सरळ रेषेतला प्रवास कोणताही अडथळा न येता पार पडतो. जर माध्यम बदललं तर मात्र परिस्थिती वेगळी होते. याचं कारण प्रकाशाचा वेग निरनिराळ्या माध्यमांमध्ये निरनिराळा असतो. निर्वात पोकळीत तो सर्वात जास्त म्हणजे सेकंदाला तीन लाख किलोमीटर एवढा असतो. हवेत त्यापेक्षा थोडा कमी असतो. पाणी किंवा काच यांसारख्या घन माध्यमांमध्ये तो आणखी कमी होतो. रिकाम्या रस्त्यावरून आपण सुसाट धावू शकतो; पण त्याच रस्त्यावर माणसांची गर्दी असली तर सहाजिकच आपला वेग कमी होतो. प्रकाशाची गती ही वेगळी नसते.

 

त्यामुळेच एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना या वेगातील फरकामुळे प्रकाशकिरण वाकतात. ज्या माध्यमात वेग कमी असतो त्या माध्यमाच्या दिशेनं ते वाकतात. समजा तुम्ही विशिष्ट वेगानं डांबरी रस्त्यावरून सायकल चालवत आहात. मध्येच बाजूच्या गवताळ भागात जर सायकलचं चाक गेलं तर सायकल त्या बाजूला वळते. कारण डांबरी रस्त्यापेक्षा गवताळ भागातून जाताना चाकाच्या गतीला विरोध होतो आणि वेग कमी होतो. प्रकाशकिरणही वाकतात ते यामुळेच.


 आता एखाद्या पेल्यात ठेवलेल्या पाण्यात आपण एखादी पेन्सिल ठेवतो तेव्हा ती जर संपूर्णपणे त्या पाण्यात बुडालेली असेल तर ती एकसंधच दिसते. कारण तिच्यावरून परावर्तित झालेले किरण संपूर्णपणे एकाच माध्यमातून प्रवास करत असतात. जेव्हा असे किरण पाण्याबाहेर येऊन हवेतून प्रवास करू लागतात तेव्हा सर्वच किरण एकसाथ वाकतात. त्यामुळे परत पेन्सिल एकसंधच दिसते.

 

जेव्हा पेन्सिलीचा काही भाग पाण्यात असतो आणि काही पाण्याबाहेर असतो तेव्हा तिच्या वरचा म्हणजे हवेत असलेल्या भागावरून परावर्तीत होणारे प्रकाशाचे किरण केवळ हवेतूनच प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचतात. ते एका रेषेत प्रवास करतात; पण पाण्यात असलेल्या भागावरून निघालेले किरण काही अंतर पाण्यातून प्रवास करतात आणि मग पाण्याच्या पृष्ठभागाच्या बाहेर पडून ते हवेतून प्रवास करू लागतात. त्या वेळी त्या दोन भागांमधल्या वेगातल्या फरकामुळे त्यांची दिशा बदलते. आपल्या डोळ्यांना ते हवेतून येणाऱ्या किरणांपेक्षा वेगळ्या दिशेने येत असल्यासारखे दिसतात. या दोन दिशांमधल्या फरकामुळे पेन्सिलीच्या दोन भागांमध्ये काही कोन असल्याचा भास आपल्याला होतो. म्हणूनच पाण्याच्या पृष्ठभागाजवळ ती वाकल्यासारखी किंवा मोडल्यासारखी दिसते. प्रकाशाच्या या आविष्काराला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. या म अपवर्तनापोटीच बिचार्‍या पेन्सिलीवर मोडण्याची पाळी येते.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

उत्तर धृव व दक्षिण धृव


══════════════════════

   @ संकलन 

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *उत्तर ध्रुवापेक्षा दक्षिण ध्रुव जास्त थंड का आहे ?* 

***********************************

प्रथम खरोखरच दक्षिण ध्रुव उत्तर  ध्रुवापेक्षा जास्त थंडं आहे का, याचा विचार करूया. १९५७ पासून दक्षिण ध्रुवावरच्या दैनंदिन तापमानाच्या नोंदी ठेवावयास सुरुवात झाली. त्यावरून स्पष्ट झालं आहे की ऑगस्ट महिना हा तिथला सर्वात थंड महिना असतो. त्या महिन्यातलं गेल्या ५० वर्षांमधील सरासरी तापमान उणे ६० अंश राहिलं आहे. उलट जानेवारी महिना सर्वात 'गरम' असतो. त्यावेळचं सरासरी तापमान उणे १८ अंश असतं.

 

उत्तर ध्रुवावरच्या तापमानाच्या नोंदी ठेवायला अलीकडेच म्हणजे २००३ सालापासून सुरुवात झाली. तेव्हा गेल्या पाच सहा वर्षांमधल्या तापमानाच्याच नोंदी उपलब्ध आहेत. तरीही त्यावरून असं दिसतं की तिथलं सर्वात कमी सरासरी तापमान उणे ४० अंशांइतकंच असतं. तर सर्वात जास्त सरासरी तापमान शून्य अंशापर्यंत चढतं. तेव्हा दक्षिण ध्रुव हा उत्तर ध्रुवापेक्षा जास्त थंड आहे हे आता पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे.

 

 कोणत्याही ठिकाणचं तापमान हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. त्यातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या ठिकाणी पडणाऱ्या सूर्यप्रकाशातून मिळणारी उष्णता. विषुववृत्तावर पडणारे सूर्याचे किरण सरळ उभे म्हणजे जवळजवळ ९० अंशांचा कोन करून पडतात. त्यामुळे त्या प्रदेशातील कोणत्याही ठिकाणाला मिळणारी सूर्याची उष्णता सर्वात जास्त असते. तेव्हा तिथलं तापमान सर्वात जास्त असायला हवं; पण विषुववृत्तावरची एखादी जागा समुद्रसपाटीपासून उंचावर असेल तर तिथलं तापमानही घसरतं. शिवाय अशी जागा समुद्रकिनाऱ्यापासून अात किती दूरवर आहे, तिथलं वातावरण किती कोरडं आहे वगैरे अनेक बाबींवर तिथलं तापमान अवलंबून असतं.

 

 उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर पडणारे सूर्याचे किरण सरळ पडत नाहीत. तिथल्या आकाशात सूर्य जास्तीत जास्त २३ अंशांपर्यंतच चढतो. अशा आडव्या पडणाऱ्या किरणांपासून त्या प्रदेशाला मिळणारी सूर्याची उष्णताही कमी असते. त्यामुळे तिथलं सरासरी तापमान नेहमी फारच कमी असतं. अगदी कडक उन्हाळ्यातही ते शून्य अंशाखालीच राहतं. शिवाय तिथं सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. त्यामुळेही तिथलं तापमान फारसं चढत नाही.

 

 उत्तर आणि दक्षिण ध्रुव यांच्यामध्ये इतर काही मूलभूत फरक आहेत. दक्षिण ध्रुव अंटार्क्टिक खंडावर वसलेला आहे. म्हणजेच त्याच्या पायाखाली जमीन आहे. शिवाय त्या जमिनीवर जवळजवळ ) ९००० फूट उंचीचे बर्फाचे थर जमलेले आहेत. म्हणजेच दक्षिण ध्रुवाची समुद्रसपाटी पासूनची उंची तेवढी आहे. सहाजिकच तिथलं तापमान समुद्रसपाटीवर असणार्‍या उत्तर ध्रुवापेक्षा कमी असतं. शिवाय उत्तर ध्रुवांभोवती पसरलेल्या अंटार्क्टिक महासागरामुळे सूर्याची उष्णता जास्त प्रमाणात शोषली जाऊन तापमान वाढायला मदत होते.

 

*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


गणित प्रश्न मंजुषा

 *🔔गणितोत्सव निमित्त प्रश्नमंजुषा🔔🔔*

📚📚📚📚📚📚📚

*(१)लहानात लहान दोन अंकी संख्या कोणती ?*

*(२) मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती ?*

*(३) लहानात लहान एक अंकी नैसर्गिक संख्या कोणती ?*

*(४) मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती ?*

*(५) लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती ?*

*(६) मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती ?*

*(७) मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती ?*

*(८) एक शतक म्हणजे किती एकक  ?*

*(९) १ ते १०० पर्यंत ० (शून्य ) हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?*

*(१०)  १ ते १०० पर्यंत ० (शून्य ) हा अंक किती वेळा येतो ?*

*(११) १  ते  १०० पर्यंत १ हा अंक किती वेळा येतो ?*

*(१२)  १ ते १०० पर्यंत  २ ते ९ अंक  हे प्रत्येकी किती वेळा येतात ?*

*(१३) १ ते १०० पर्यंत १ हा अंक शतकस्थानी किती वेळा येतो ?*

*(१४) १ ते १०० या संख्यांमध्ये एक अंकी संख्या एकूण किती आहेत ?*

*(१५) १ ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी संख्या एकूण किती आहेत ?*

*(१६) १ ते १०० या संख्यांमध्ये तीन अंकी संख्या एकूण किती आहेत ?*

*(१७) १ दशक म्हणजे किती एकक ?*

*(१८)  १ शतक म्हणजे किती दशक ?*

*(१९)   १ ते १० पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?*

*(२०)  १ ते १०० पर्यंत ९ हा अंक किती वेळा येतो ?*

*(२१) १ते १० संख्यांची बेरीज किती?*

*(२२) ३१ते ४० संख्यांची बेरीज किती ?*

*(२३)१ ते १०० संख्यांची बेरीज किती ?*

*(२४)५७ ते ६६ संख्यांची बेरीज किती ?*

*(२५) १ ते १०० मध्ये एकूण सम संख्या किती आहेत ?*

*(२६)१ ते १०० मध्ये विषम संख्या किती आहेत ?*

*(२७)१ ते २० मधील सम संख्यांची बेरीज किती ?*

*(२८) १ ते ४० मधील विषम संख्यांची बेरीज किती ?*

*(२९)१ ते १०० मध्ये वर्ग संख्या किती आहेत? व कोणत्या?*

*(३०) १ ते १०० मध्ये त्रिकोणी संख्या किती आहेत?व कोणत्या?*

*(३१) १ ते १०० मध्ये मूळ संख्या किती आहेत ? व कोणत्या ?*

*(३२)१ ते १०० मध्ये संयुक्त संख्या किती आहेत ?*

*(३३) कोणती संख्या मूळसंख्या व संयुक्त संख्या नाही ?*

*(३४) कोणती मूळसंख्या सम संख्या आहे?*

*(३५) एक अंकी एकूण संख्य किती आहेत?*

*(३६) दोन अंकी एकूण संख्या किती आहेत ?*

*(३७) तीन अंकी एकूण संख्या किती आहेत ?*

*(३८) चार अंकी एकूण संख्या किती आहेत?*

*(३९) पाच अंकी एकूण संख्या किती आहेत ?*

*(४०) एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*

*(४१) दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*

*(४२)तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*

*(४३) चार अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*

*(४४) पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*

*(४५) एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*

*(४६) दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*

*(४७) तीन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*

*(४८) चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*

*(४९) पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*

*(५०) १ ते १०० मध्ये जोडमुळ संख्या किती आहेत ?*

*(५१) सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे ?*

*(५२)सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आहे ?*

*(५३)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे ?*

*(५४) सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती आहे ?*

*(५५) सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती आहे ?*

*(५६) सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती आहे ?*

*(५७)१५४ ते १६३ मधील संख्यांची बेरीज किती ?*

*(५८)७ ची क्रमवार संख्या कोणती आहे ?*

*(५९) ७९ च्या मागील संख्या कोणती आहे ?*

*(६०)३९९ च्या पुढील संख्या कोणती आहे ?*

*(६१)मूळ रोमन संख्या किती ? व कोणत्या आहेत?*

*(६२)१ ही संख्या रोमनसंख्या चिन्हात काशी लिहिली जाते ?*

*(६३) ४० ही संख्या रोमनसंख्या चिन्हात कशी लिहितात ?*

*(६४) ९० ही संख्या रोमनसंख्या चिन्हात कशी लिहितात ?*

*(६५)७८९ ही संख्या रोमनसंख्या चिन्हात कशी लिहितात ?*

*(६६)CMLXXXIX ही रोमनसंख्या कोणती संख्या दर्शविते ?*

*(६७)७५ चा वर्ग किती ?*

*(६८) २९ चा वर्ग किती ?*

*(६९) ५६ चा वर्ग किती ?*

*(७०)१ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?*

*(७१)१ फूट म्हणजे किती इंच ?*

*(७२) १ यार्ड म्हणजे किती फूट ?*

*(७३)  १ गुंठा म्हणजे किती चौरसफुट?*

*(७४)१ एक्कर म्हणजे किती आर ?*

*(७५)१ मिनिटांचे सेकंद किती ?*

*(७६)१तासाचे सेकंद किती ?*

*(७७) १ दिवसाचे तास किती ?*

*(७८)१ आठवड्याचे दिवस किती ?*

*(७९)१ वर्षाचे दिवस किती ?*

*(८०)लीप वर्षाचे दिवस किती ?*

*(८१) २९ दिवस कोणत्या महिन्यात येतात ?*

*(८२)१ वर्षाचे आठवडे किती ?*

*(८३)१ तप म्हणजे किती वर्षे ?*

*(८४)१ किलो म्हणजे किती ग्रॅम ?*

*(८५)१ क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?*

*(८६)१टन म्हणजे किती क्विंटल ?*

*(८७)१ ग्रॅम म्हणजे किती डेसिग्रॅम ?*

*(८८)१ लीटर म्हणजे किती सेंटीलीटर ?*

*(८९) पाऊण किलोग्रॅम म्हणजे ग्रॅम ?*

*(९०) सव्वा किलो म्हणजे किती ग्रॅम ?*

*(९१)साडे सात किलोमीटर म्हणजे किती मीटर ?*

*(९२)१ डझन म्हणजे किती वस्तू(नग)?*

*(९३) १ रिम म्हणजे किती कागद ?*

*(९४)१ रिम म्हणजे किती दस्ते ?*

*(९५)२५४०७ या संख्येत ५ ची स्थानिक किंमत किती ?*

*(९६) २५४०७ या संख्येत ५ ची दर्शनी किंमत किती ?*

*(९७)५८६ X ९९९ = किती ?*

*(९८)७ च्या पाढयातील  संख्यांची बेरीज किती ?*

*(९९)पंचाकोनाच्या  सर्व कोनांची बेरीज किती ?*

*(१००)३,२,७,४ हे अंक* *एकदाच वापरून तयार होणाऱ्या ४अंकी संख्यांची बेरीज किती?*                       

➖➖➖➖➖➖➖➖संकलन, गजानन गोपेवाड 


 

वर्षात सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर

 *आज वर्षातील सर्वात लहान दिवस*


*आज केवळ १० तास ४७ मिनिटे सुर्याचे दर्शन घडणार आहे.* व उर्वरित तासांची रात्र असणार आहे. २२ डिसेंबर रोजी सुर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला *'विंटर सोल्सस्टाईल'* असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो. कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतो. *पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे निर्माण होतात.* आकाशात वैष्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छंदन बिंदू आहे. यापैकी एका काल्पनीक छेदन बिंदू आहे. यापैकी एका बिंदूत *२२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो, याला संपात बिंदू असे म्हणतात, या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो.*

*२१ जून हा ग्रेगेरियन वर्षातील १७२ वा दिवस आणि लीप वर्षात १७३ वा दिवस असून हा विषुवृत्ताच्या उत्तरीय भागात सर्वात मोठा दिवस असतो.* 

*२१ जून या दिवसाचे कालमान जवळपास १४ तासांचे तर रात्रीचे कालमान १० तासांच्या जवळपास असते.*

 खगोलीय घटनेप्रमाणे २१ जूनला पृथ्वी आपला गोलार्थ बदलवत असून या दिवसापासून सूर्याचे काल्पनिक दक्षिणायन होण्याला सुरूवात होते. हा क्रम २१ डिसेंबरपर्यंत चालते. तोच २२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस असून त्यानंतर सूर्याची उत्तरायण होण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती २१ जूनपर्यंत चालत असते. पृथ्वी २४ तासात एक वेळा स्वत: फिरत असून २४ तासात दिवस रात्र घडत असतात त्याचप्रमाणे स्वतःभोवती

फिरत असताना पृथ्वी ३६५ दिवसांत सूर्याभोवती एक फेरा लावत असते. म्हणून ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे ३६५ दिवसांचा एक वर्ष मानला जातो. २१ जून नंतर वर्षातील १९३ दिवस उरले असतात. २१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होण्याचे चक्र सुरू होत असून दिवस लहान आणि रात्र मोठी होण्याला सुरूवात होते. हा क्रम चालत असताना 

*२३ सप्टेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही समान म्हणजे १२-१२ तासांचे असतात.* 

तसेच २२ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण क्रम सुरू होते आणि 

*२३ मार्चला दिवस आणि रात्र समान १२-१२ तासांचे असतात.*

 त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम सुरू राहत असून मार्चनंतर उन्हाळा व तापमान वाढत असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना दर तीन महिन्यांत आपला गोलार्ध बदलण्याची प्रक्रिया करते.

संकलन गजानन गोपेवाड 

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

22 डिसेंबर हा वर्षातील लहान दिवस

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*२२ डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅

🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌

  आज २२ डिसेंबर. आज वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. आज केवळ १० तास ४७ मिनिटे सुर्याचे दर्शन घडणार आहे. व उर्वरित तासांची रात्र असणार आहे. २२ डिसेंबर रोजी सुर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला ‘विंटर सोल्सस्टाईल’ असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो. कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतो. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैष्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छेंदन बिंदू आहे.

        पूर्व दिशेला उगवणारा सूर्य आपल्या पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे दररोज उदयस्थान बदलत असतो; परंतु हा फरक काही दिवसांनंतर लक्षात येतो. कधी पृथ्वीचा उत्तर तर कधी दक्षिणी गोलार्ध सूर्यासमोर येतो. यामुळे दिनमानात फरक पडून पृथ्वीवरील विविध वृत्तावरील अक्षवृत्तावर हा फरक कमी जास्त असतो. आपल्या भागात २२ डिसेंबर हा दिवस सर्वात लहान असून, या दिवशी रात्र सव्वातेरा तासांची असणार आहे. या दिवशी सूर्य नेमका मकरवृत्तावर उगवणार आहे.

  पृथ्वीचा अक्ष भ्रमण कक्षेशी कललेला असल्याने सूर्याचे भासमान चलन सतत सुरु असते. २१ मार्च व २२ सप्टेंबर या विषूवदिनी सूर्य नेमका पूर्वेस असतो. म्हणूनच या दिवशी दिवस व रात्र समान असतात. २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस, तर २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो. या उलटस्थिती दक्षीण गोलर्धात पहावयास मिळते. सध्या आपल्याकडे हिवाळा सुरु असून, आकाश बव्हंशी निरभ्रच असते. गुरुवार, २२ डिसेंबरची रात्र मोठी असल्याने रात्रीचे वेळी ग्रह, तारे बघण्याचा आनंद घेता येईल. सूर्यमालेतील पृथ्वीवरून मंगळ, बूध, गुरु, शुक्र व शनी हे पाच ग्रह नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात.

      २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस आहे. याला विंटर सोलस्टाइस नावानेही ओळखले जाते. सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ ‘सूर्य स्थिर आहे’ असा होतोय.


💁🏻‍♀️  *या मागील करणे:*


❂ २१ डिसेंबर सूर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते.


❂  या दिवशी रोजी सूर्य किरण हे मकर रेषेत लंबवत होत कर्क रेषेला तिरप्याहोत स्पर्ष करतात. यामुळे लवकर सूर्यास्त होतो आणि रात्र लवकर होते.


❂ पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते.


❂ या दिवशी सूर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडते.

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीष मास,कृष्ण पक्ष,*तृतीय*,पुष्य नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शिशिर ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २२ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अकॄत्वा परसन्तापं

                 अगत्वा खलसंसदं ।

अनुत्सॄज्य सतांवर्त 

                  मा यदल्पमपि तद्बहु ।।

*भावार्थः- दूसरों को दु:ख दिये बिना, जिससे आपका कार्य संभव हो सकता है परन्तु उसके मन एवं तन को पीड़ा नहीं हो। बुराइयों के साथ अपना संबंध बनाए बिना, जिसमें प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हमारी भागीदारी हो। अच्छे व्यक्तियो के साथ अपने सम्बंध तोडे बिना, जो हमें समझे उनको हम समझे और एक दूसरे के सहायक हो। इस प्रकार थोडा कुछ हम अपने सामाजिक व्यावहारिक धर्म के मार्ग पर चलेंगे, उतना ही पर्याप्त है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

ट्राँफीक लाईट लाल पीवळे हिरवेच का असतात


══════════════════════

   @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

*🚦ट्राफिकलाईट लाल,हिरवे,पिवळे का असतात?*  

***********************************

जगाच्या पाठीवर कुठेही जा, वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या दिव्यांचे रंग बदलत नाहीत. त्या ठिकाणी बोलली जाणारी भाषा कितीही वेगळी असो, त्यातलं ओ की ठो आपल्याला कळत नाही अशी परिस्थिती उद्भवो, वाहतूक दिव्यांची भाषा काही बदलत नाही. चालतं वाहन थांबवण्यासाठीचा सिग्नल लाल रंगाचा, तर थांबलेल्या वाहनाला वाट मोकळी करून देणारा दिवा हिरव्या रंगाचा हे समीकरण सगळीकडे सारखंच असतं.


 आपण दुसऱ्याशी संवाद साधतो तो नेहमीच शब्दांद्वारे किंवा भाषेच्या माध्यमातून साधतो असं नाही. हातवारेही बरंच काही सांगून जातात. डोळ्यांच्या भाषेबद्दल तर काय बोलावं ! ती भाषा नसती तर असंख्य लैला- मजनूंची शिरी-फरहादची पंचायतच झाली असती. रंग हेही संवादाचं असंच एक माध्यम आहे. या रंगकरवी आपल्याला नेहमीच काही संदेश मिळत असतात. कोणता रंग कोणता संदेश देतो हे थोडंफार आपापल्या सांस्कृतिक शिकवणीवर अवलंबून आहे हे खरं असलं तरी विशिष्ट रंग विशिष्ट भावना मनात उत्पन्न करतात हेही मानसशास्त्रज्ञ आणि मज्जाशास्त्रज्ञांनी पडताळून पाहिलं आहे.

 वाहतुकीच्या दिव्यांच्या रंगांची निवड आपल्या नजरेला कोणते रंग अधिक स्पष्ट दिसतात यावरून ठरवले गेले असावेत, असा सर्वसाधारण समज आहे. तो अगदीच चुकीचा नाही हे खरं असलं तरी ते या रंगांच्या निवडीपाठचं सगळ्यात महत्त्वाचं कारण नाही. रंगांमुळे उत्पन्न होणाऱ्या मानसिक ऊर्मीचं महत्त्व त्यापेक्षा जास्त आहे.

 

आज जरी रस्त्यावरच्या वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या दिव्यांसाठी हे रंग वापरले जात असले तरी त्यांची पहिली निवड लोहमार्गावरील वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी झाली होती. एकाच रुळावरून असंख्य गाड्या एकाच वेळी जात असतात. त्यामुळे पुढचा मार्ग मोकळा आहे हा संदेश इंजिनचालकाला देण्यासाठी जेव्हा सिग्नल वापरायला सुरुवात झाली तेव्हा या रंगांची निवड करण्यात आली. तीच पुढं रस्त्यावरच्या वाहतुकीसाठीही वापरण्यात येऊ लागली.


पुढं जाणं धोक्याचं आहे, गाडी थांबवा, असा संदेश देण्यासाठी लाल रंगांची निवड करण्यात आली ती तो रंग रक्ताचा असल्यामुळं. अनादिकाळापासून या रंगाची आणि धोक्याची सांगड घालण्यात आली आहे. हा रंग पाहिला की रक्ताची आणि त्यामुळं रक्तपाताची, धोक्याची भावना मनात जागृत होते. माणूस उत्तेजित होतो. त्याची नाडी वेगात धावू लागते. रक्तदाब वाढतो. भयापोटी वाहू लागणाऱ्या संप्रेरकांचा पाझर सुरू होतो. हे अजमावलं गेलं आहे. त्यामुळे 'थांबा' या संदेशासाठी या रंगाची निवड आपोआप झाली. 'धोका टळला आहे', 'आता जायला हरकत नाही' या आदेशांसाठी सुरुवातीला पांढऱ्या रंगाची निवड केली गेली होती; पण तो रंग आणि सूर्याप्रकाशाचा किंवा रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशाचा रंग यांच्यात गोंधळ उडू लागल्यामुळे मग त्यापेक्षा वेगळा तसंच, लाल रंगांपेक्षाही वेगळा असलेल्या हिरव्या रंगाची निवड केली गेली. या रंगाचा संबंध शांततेशी असल्यामुळे, तो रंग बघितला की मनातही शांत भाव निर्माण होतात. या दोन्ही रंगांपेक्षा वेगळा आणि त्यांच्यामध्ये असणारा रंग पिवळा म्हणून मग त्याची निवड दक्षतेसाठी करण्यात आली.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

गणित प्रीयमधमाशी


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : गणितप्रिय मधमाशी*


निसर्गातील विविध सजीव किंवा निर्जीव प्रकारांत काही ना काही गणित लपलेले आहे. मधमाशी हा छोटासा कामसू कीटक गणिती तत्त्वांचा अत्यंत सुंदर वापर करतो. लांबून पाहिले असता मधमाशीच्या पोळ्याचा आकार लंबवर्तुळाकार (ओव्हल) दिसतो, परंतु ते आतून षटकोनी आकाराच्या मेणाच्या छोट्या कप्प्यांनी बनलेले असते. कमीत कमी संसाधने व ऊर्जा वापरून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचे निसर्गाचे तत्त्व या षटकोनी आकारामागे दडले आहे.


परिमिती व बाजूंची संख्या समान ठेवून वेगवेगळ्या बहुभुजाकृती काढल्यास सुसम बहुभुजाकृतीचे क्षेत्रफळ (रेग्युलर पॉलिगॉन) हे सर्वाधिक भरते. उदाहरणार्थ समान परिमितीचे वेगवेगळे त्रिकोण काढल्यास समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ सर्वाधिक असेल, समपरिमितीच्या वेगवेगळ्या षटकोनात समभुज षटकोनाचे क्षेत्रफळ सर्वाधिक असेल. या भूमितीच्या नियमामुळे मधाच्या पोळ्यातील षटकोन समभुज का असतो याचे उत्तर मिळते. इष्टतम मेणात जास्त मध साठवायचा असेल तर षटकोन समभुज असणे गरजेचे आहे. मेण कमी वापरायचे तर कप्प्यांच्या भिंती सामाईक असणे, दोन कप्प्यांमध्ये रिकामी फट नसणे गरजेचे आहे. प्रतलाचे छोट्या समान आकाराच्या नियमित बहुभुजाकृतींनी मध्ये फट राहणार नाही व बहुभुजाकृती एकावर एक येणार नाहीत अशा प्रकारे आच्छादन (टेसेलेशन) करावे लागेल. बहुभुजाकृतीच्या कडा आणि शिरोबिंदू यांची जुळणी फट राहणार नाही अशी करावयाची झाल्यास बहुभुजाकृतीच्या आंतरकोनाने ३६० अंशाला पूर्ण भाग गेला पाहिजे. ही अट फक्त समभुज त्रिकोण, चौरस वा सुसम षटकोनच पूर्ण करू शकतात.


चौरस किंवा त्रिकोण जोडले असतासुद्धा मध्ये जागा राहणार नाही, मग षटकोनच का, याचेही उत्तर गणितात दडले आहे. समान परिमिती असणाऱ्या म्हणजे सारखेच मेण वापरावे लागेल अशा समभुज त्रिकोण, चौरस आणि सुसम षटकोन अशा तीन आकृत्यांची तुलना केली तर षटकोनाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त असते. त्यामुळे षटकोनी कप्प्यांच्या घराच्या भिंतींना जे मेण लागते, ते कमी प्रमाणात लागते आणि किमान मेण वापरून जास्तीत जास्त मध साठवण्यासाठी षटकोनी कप्पे असणारे पोळे गणितीदृष्ट्या आदर्श ठरते.


आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे विशिष्ट प्रकारे नृत्य करून मधमाश्या त्यांची दिशा आणि अंतर एकमेकींना कळवितात. अन्न पोळ्याच्या जवळ असेल तर गोल नृत्य आणि लांबवर असल्यास इंग्रजी आठ आकारात नृत्य अशी त्यांची संदेशवहनाची पद्धत आहे. म्हणजेच मधमाश्यांच्या नृत्यामागेही गणित दडलेले आहे. गणिताचा असा उपयोग करणाऱ्या मधमाश्यांना सलाम!


– प्रा. सुमित्रा आरस

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

पोटात कावळे का ओरडतात


══════════════════════

    @ संकलन @गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *पोटात कावळे का ओरडतात ?* 

*********************************

'पोटात कावळे ओरडतात' ही अलंकारिक भाषा झाली. खरोखरच पोटात कोणतेही पक्षी वा प्राणी जाऊन बसत नाहीत. पोटात होणाऱ्या आवाजाला उद्देशून ही भाषा वापरली गेली आहे. भूक लागली म्हणजेच पोटात कावळे ओरडतात किंवा हे आवाज होतात हेही खरं नाही. वास्तविक हे आवाज नेहमीच होत असतात.


 आपली पचनसंस्था म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत पसरलेली एक लांबलचक पोकळ नळीच असते. तोंडातल्या घासावर दात आणि लाळ यांचा प्रभाव पडला की त्याचा एक लगदा तयार होतो. हा लगदा मग त्या नळीतून पुढे पुढे सरकू लागतो; पण तसं तो स्वतःच्या जीवावर करू शकत नाही. त्यासाठी त्याला तोंडातून अन्ननलिकेच्या मार्गानं जठरात उतरावं लागतं. तिथं त्याचं पचन होऊन तो आणखी पातळ होतो. तिथून तो मग आतड्यांच्या आणखी अरुंद नळीत उतरतो. या अरुंद नळ्यांमधला त्याचा प्रवास सुकर होतो. कारण त्या नळ्याही त्या प्रवासाला मदत करत असतात. आपल्या पायजम्याच्या नाड्यात एखादी पिन जेव्हा पुढे सरकवायची असते तेव्हा आपण ती पिन जिथे आहे तिथे दाब देऊन तो भाग आकसून घेतो. त्याच्या पुढचा भाग थोडासा पसरत असल्याने ती पुढे सरकते. तशी ती पुढे गेली की आता ती जिथे पोहोचली असेल त्या भागावर दाब देऊन तो आकसून घेतो.

 

पचनसंस्थेच्या नळ्यांमध्येही अशीच हालचाल होत असते. त्यासाठी त्या नळ्यांशी जोडलेले स्नायू आलटून पालटून आकसतात आणि प्रसरण पावतात. स्नायू आकसले की त्या नळीला चिमटा बसतो. तिथे असलेल्या लगद्यावर दाब पडतो. नळीच्या पुढच्या भागाचं त्याचवेळी प्रसरण झालेलं असल्यामुळे सहाजिकच तो लगदा पुढे त्या भागात ढकलला जातो तोवर तो भाग अाकसतो. अशा रीतीने त्या नळीतून एखादी लहर दौडत गेल्यासारखी होते. तो लगदा पुढे पुढे सरकत राहतो.


 पचनसंस्थेच्या या नळ्यांची ही हालचाल सतत होत असते. हृदयाची जशी सतत होते तशीच. हृदयाच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटी हृदयाची धडधड होते. त्याचा ठोका पडतो. त्या ठोक्याचा आवाज आपण स्टेथोस्कोपमधून ऐकू शकतो. आतड्याच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटीही असाच आवाज होतो. जेव्हा त्या नळ्यांमध्ये अन्नाचा गोळा असतो तेव्हा तो आवाज त्या लगद्यामध्ये जिरतो. तो घुमत नाही; पण जेव्हा त्या नळ्या मोकळ्या असतात तेव्हा तो शोषुन घेणे शक्य होत नाही. उलट तो घुमतो. मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. कदाचित आपल्याला पोषणाची गरज आहे, हे सांगण्यासाठी मेंदू त्या नळ्यांशी जोडलेल्या स्नायूंना अधिकच जोरानं आकुंचन प्रसरण करण्याचा आदेश देत असावा. त्यामुळेही तो आवाज मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. पोटातल्या कावळ्यांची कावकाव सुरू होते.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

ज्ञान विज्ञान तेल का तरंगते


══════════════════════

    @ संकलन @गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *तेल का तरंगतं ?* 

**************************

प्रत्येक पदार्थाच्या रेणूंवर काही विद्युतभार असतात. एकापेक्षा अधिक अणू एकत्र येऊन जेव्हा रेणु तयार होतात तेव्हा त्या अणूंमधील ऋणविद्युतभारधारी इलेक्ट्रॉनच्या सहभागातून त्या अणुंमधले रासायनिक बंध तयार होतात. आयनिक बंधांमध्ये अशा इलेक्ट्राॅनची देवाणघेवाण होते. त्यामुळे मग जो अणू इलेक्ट्रॉनचं दान करतो त्याच्यावर धनविद्युतभार तयार होतो, तर जो अणू इलेक्ट्रॉन स्वीकारतो त्याच्यावर ऋणविद्युतभार तयार होतो. सहसंयोगी किंवा कोव्हॅलंट बंधामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न होता दोन अणुंमध्ये त्यांची भागीदारी होते. कोणत्या प्रकारचे बंध तयार झाले आहेत त्यावरून मग त्या रेणूवरील एकंदरीत विद्युतभाराचं स्वरुप ठरतं. सहसा आयनिक बंध असलेल्या रेणूंमध्ये दोन टोकाला विरुद्ध प्रकारचे विद्युतभार असतात. त्यामुळे ते रेणू जणू दोन धृव असल्यासारखे वागतात. एका ध्रुवावर धनविद्युतभार असतो तर दुसऱ्या धृवावर त्याच्या विरुद्ध ॠणविद्युतभार. अशा रेणूंना ध्रुवीय रेणू म्हणतात. पाण्याचा रेणू या प्रकारात मोडतो.

 

 सहसंयोगी बंध असलेल्या रेणूंमध्ये विद्युतभाराचं असं ध्रुवीकरण होत नाही. तो रेणुच्या सर्वच भागांवर सारखाच विभागलेला असतो. बहुतेक सेंद्रिय पदार्थांचे रेणू या प्रकारचे असतात. तेल हा एक सेंद्रिय पदार्थ असल्याने त्याचे रेणुही याच प्रकारात मोडतात.

 

 जेव्हा दोन पदार्थ एकमेकांमध्ये मिसळले जातात तेव्हा ध्रुवीय रेणू असलेले पदार्थ एकमेकांकडे आकर्षिले जातात. कारण त्यांच्या एका ध्रुवावरचा धनविद्युतभार दुसऱ्या रेणूच्या दुसऱ्या ध्रुवावरच्या ऋणविद्युतभाराला आपल्याकडे खेचतो. असे रेणू वेगवेगळ्या पदार्थांचे असले तरी एकमेकांकडे खेचले जातात. एकमेकांमध्ये सहजगत्या मिसळून जातात पण जर एक पदार्थ धृवीय रेणूंचा असला आणि दुसरा तसा नसला तर मग ध्रुवीय पदार्थांचे रेणू खेचले जातात आणि दुसऱ्या पदार्थाला आपल्यापासून दूर लोटतात. पाणी आणि तेल जेव्हा एकत्र केलं जातं तेव्हा पाण्याचे ध्रुवीय रेणु एकमेकांना खेचून घेतात व आसपासातच त्यांचं संधान जुळतं. तेलाच्या रेणूंवरचा विद्युतभार सर्वत्र सारखाच विखुरलेला असल्याने ते पाण्याच्या रेणुकडे आकर्षित होत नाहीत. एकमेकांबरोबरच संधान बांधणे ते पसंत करतात. त्यामुळेच पाणी आणि तेल एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. वेगवेगळेच राहतात.

 

त्यातही मग तेलाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने ते पाण्यापेक्षा हलके असते. साहजिकच ते पाण्यावर तरंगते. त्या दोन पदार्थांची एकमेकांत सरमिसळ होत नसल्याने मग तरंगणाऱ्या तेलाचा तवंग वेगळा उठून दिसतो.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

  

कुतुहल,, रिमानचे आव्हान


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : रीमानचे आव्हान*


गणितात काही प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत. त्यातील एक कळीचा प्रश्न म्हणजे रीमानची परिकल्पना (हायपोथिसिस) सत्य आहे का हा आहे. ‘‘यदाकदाचित मी थडग्यातून बाहेर आलो तर, रीमानच्या परिकल्पनेची सिद्धता मिळाली का हा माझा पहिला प्रश्न असेल’’ हे उद्गार आहेत थोर जर्मन गणितज्ञ डेव्हिड हिल्बर्ट (१८६२-१९४३) यांचे. यावरून या गणिती निष्कर्षाचे महत्त्व अधोरेखित होते. जेमतेम ४० वर्षांचे आयुष्य लाभलेल्या रीमान यांचे हे काम अंकशास्त्रात मूळ किंवा अविभाज्य संख्यांशी संबंधित आहे जशा की २, ३, ५, ७ वगैरे. 


मूळ संख्या अनंत आहेत तरी त्यांचे वितरण कसे आहे हे समजण्यासाठी रीमान यांनी चौकटीत दिलेल्या एका महत्त्वपूर्ण गणिती फलाची (फंक्शन) रचना केली. या सूत्रात ‘स’ ही १ ही संख्या सोडून त्यापेक्षा मोठी वास्तव संख्या किंवा संमिश्र संख्या आहे जशी की अ + ब र, इथे अ आणि ब या वास्तव संख्या तर  ही कल्पित संख्या म्हणजे -१ चे वर्गमूळ आहे. स ही केवळ वास्तव संख्या असल्यास झ(स) हे फल विशिष्ट प्रकारे मूळ संख्यांचा गुणाकार अशा स्वरूपात मांडता येते. 


रीमान यांनी त्यांच्या १८५९मध्ये प्रकाशित झालेल्या शोधलेखात असे विधान केले की झ(स) = ० या समीकरणाची उकल काढल्यास स ची अनंत क्षुल्लकेतर उत्तरे (नॉन ट्रिवियल सोल्युशन्स) मिळतील आणि ती -२, -४, -६, . अशा ऋण सम संख्या किंवा संमिश्र संख्या असतील, ज्यांचा वास्तव संख्या हा भाग नेहमी १/२ असेल. उदाहरणार्थ, झ(१/२ + १४.१२४७२५१४२  ) = ० किंवा झ(१/२ + २१.०२०३९६३९) = ०. संगणकाची मदत घेऊन आत्तापर्यंत केलेल्या तपासणीत त्या विधानाला छेद देणारे उत्तर मिळालेले नाही.


या विधानाची गणिती सिद्धता अजूनही देता आली नसल्यामुळे त्याला रीमानची परिकल्पना असे संबोधले जाते. ती सत्य किंवा असत्य आहे याचा सतत शोध सुरू आहे. त्याबाबत गणितज्ञांमध्ये मतभेद आहेत, पण यावर झालेला निर्णय मूळ संख्या तसेच संमिश्र संख्या यांच्या अभ्यासावर वेगळा प्रकाश पाडेल.


‘क्ले इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स’ या अमेरिकेतल्या संस्थेने २००० साली गणितातील सात अनुत्तरित प्रश्नांची यादी जाहीर केली आणि त्या प्रत्येकाची उकल करणाऱ्यास दशलक्ष डॉलर्स असे पारितोषिक जाहीर केले. त्या यादीत मागील दीडशे वर्षांहून अधिक काळ चकवा देणारी रीमानची परिकल्पना सामील आहे.


– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org


ज्ञान विज्ञान समुद्रकिनारा वर लाटा का फुटतात


══════════════════════

   संकलन ,

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌊 *समुद्रकिनाऱ्यावर लाटा का फुटतात ?* 

***********************************

मोसमी पावसाची चाहूल लागते ती समुद्राच्या खवळण्यामुळे. समुद्राचं पाणी गढुळ झाल्यासारखं करडा रंग धारण करतं. त्याच्यात मोठमोठ्या लाटा उठतात. त्या वेगाने किनाऱ्याकडे धावत सुटतात. तिथं पोहोचताच त्या अकस्मात राक्षसी आकार धारण करतात आणि टक्कर दिल्यासारख्या किनाऱ्याच्या बांधावर आपटतात. फेसाळतात. त्यांचे तुषार दूरवर फेकले जातात. त्या तुषारांमध्ये न्हाऊन निघण्यासाठी मग रसिक मंडळी चौपाटीच्या बांधावर गर्दी करतात. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबईत हे दृश्य हमखास बघायला मिळते. उन्हाळ्याच्या तलाखीनं त्रासलेल्या मंडळींना त्या फुटणाऱ्या लाटांनी चिंब भिजण्याचं सुख तर मिळतंच पण त्यांना तसं भिजताना पाहणाऱ्यांच्या मनावरही सुखाची साय धरते. या सार्‍या सुखसोहळ्यात एका प्रश्नाचा भुंगा मनाला पोखरत राहतो. किनाऱ्यावर आलेल्या लाटा अकस्मात मोठय़ा कशा होतात ? आणि त्या फुटतात तरी कशाला ?


 किनाऱ्यापर्यंत पोहोचणाऱ्या लाटांची उंची केवळ समुद्र खवळलेला असतानाच वाढते असं नाही. तसंच त्यांचं फुटणं समुद्र शांत असतानाही दिसून येतं. त्यामुळे लाटांमधल्या किनाऱ्याजवळच्या या बदलाला समुद्राचं खवळणं कारणीभूत नाही. त्याचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला मुळात या लाटा तयार कशा होतात किनाऱ्याकडे का धावतात याचा विचार करायला हवा.


 लाटा नेहमी किनाऱ्याकडेच धावतात येही संपूर्णपणे खरं नाही. ओहोटीच्या वेळी लाटा किनाऱ्यापासून दुरही जाताना दिसतात. तसेच परतणाऱ्या लाटाही किनाऱ्याचा निरोप घेताना दिसतात. त्या आपला आकारही बदलत नाहीत की फुटतही नाहीत. मध्य समुद्रात उठणाऱ्या लाटांचं वर्तनच तसं होत असतं.


 भर समुद्रातल्या पाण्याला जोराने वाहणारा वारा घुसळून काढतो. त्यामुळे ते पाणी तिथल्या तिथे वरखाली नाचत राहते. ते तसं पुढं सरकत नाही. पण एका जागी नाचणाऱ्या पाण्याच्या थराचा प्रभाव त्याच्या पुढच्या थरावर पडतो. मग ते नाचायला लागते. त्यामुळे ती लाट पुढे पुढे सरकल्यासारखी होते. जेव्हा ही लाट तयार होते तेव्हा त्या नाचणाऱ्या पाण्याच्या थराला खालच्या बाजूला अडवणारी जमीन नसते. कारण तिथे पाण्याला चांगलीच खोली असते. वारा कितीही वेगाने वाहत असला तरी पाणी जितके उंच उडू शकते तितकंच खोलवरही नाचू शकते. पण हीच लाट जेव्हा किनाऱ्याच्या जवळ येते तेव्हा तिथल्या पाण्याला तितकी खोली नसते. ते उथळ असते. खालच्या जमिनीचा तिला विरोध होतो. ती जमीन मग त्या नाचणाऱ्या पाण्याला वरच्या दिशेने ढकलत राहते. त्यामुळे मग लाटांची उंची वाढते. किनाऱ्याजवळची पाण्याखालची जमीन कशी आहे ती खडकाळ आहे तिला जोमदार चढाव आहे की नाही यावरही लाटेची उंची ठरते. या चढावापोटीच मग लाट उलटी फिरवली जाते. तिच्या लयीत फरक पडतो आणि ती फुटते. एका लयीत नाचणारे पाणी वेड्यावाकड्या दिशांनी फेकले जाते. त्यामुळेच मग ते फेसाळते.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

मधमाशा गुंजराव का करतात


══════════════════════

   संकलन ,,गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🐝 *मधमाशा गुंजारव का करतात ?* 🐝 

***********************************

मधमाशा अवतीभवती घोंघावयाला लागल्या की त्यांचा गूं गूं असा आवाज येत राहतो. इंग्रजीत यालाच 'बझिंग साऊंड' असं म्हणतात. जणू त्या तोंडानेच तसा आवाज करत राहतात, असं आपल्याला वाटतं. पक्षीही तोंडांनं आवाज करतात. प्रत्येक पक्ष्याचा आवाज वेगवेगळा असतो. त्या आवाजावरून पक्ष्याची ओळखही पटते; आणि तसा आवाज पक्षी का काढतात, याचीही माहिती आता मिळालेली आहे. एकमेकांशी दळणवळण साधण्यासाठी, संवादासाठी पक्षी आवाज काढतात. मधमाशाही तसाच एकमेकींशी संवाद साधण्यासाठी हा गुंजारव करत असतील, अशीच समजूत झाल्यास मग नवल नाही.


 प्रत्यक्षात मात्र मधमाशांचा हा आवाज त्यांच्या तोंडातून येत नाही. तो त्यांच्या पंखांचा फडफडाट असतो. त्या एकाच जागी स्थिर असताना, मोहोळात राहुन आपापलं काम करत असताना हा गुंजारव आपल्याला ऐकू येत नाही. त्या जेव्हा मोहोळातून बाहेर पडून उडायला लागतात तेव्हाच त्यांचा गुंजारव ऐकू येतो. त्यावरून हा त्यांच्या पंखांचा फडफडाट असावा, हे ध्यानात यायला हवं. 

 

उडणाऱ्या सर्वच कीटकांना आपले पंख फडफडावे लागतात. त्यामुळे तिथल्या हवेत कंपनं सुरू होतात. हवेच्या कंपन्यांमुळेच ध्वनी निर्माण होत असल्याने पंखांच्या या फडफडाटाचं रुपांतर आवाजात होत असतं. मात्र, तो आवाज आपल्याला ऐकू येणं हे त्या कंपनांच्या वेगावर आणि त्यात असलेल्या ऊर्जेवर अवलंबून असतं. निरनिराळ्या कीटकांच्या पंखांच्या फडफडण्याचा वेग मात्र वेगवेगळा असतो. फुलपाखरंही उडताना आपले पंख फडफडवत असतात. मात्र त्यांचा वेग मंद असतो. एका सेकंदाला फार फार तर सहा ते दहा वेळा त्यांचे पंख फडफडतात. त्यामुळे होणाऱ्या हवेच्या कंपनापोटी आपल्याला ऐकू येईल एवढा आवाज निर्माण होत नाही. डासांच्या पंखांचं फडफडणं मात्र वेगात होतं; पण ते अतिशय लहान असल्यामुळे त्यापोटी निर्माण होणाऱ्या हवेच्या कंपनांचा आवाज जर ते डास आपल्या कानाच्या अगदी जवळ असतील तरच ऐकू येतो. मधमाश्यांचे पंख त्या मानाने मोठे असतात आणि त्यांच्या फडफडण्याचा वेगही जास्त असतो. एका सेकंदात ३०० ते ४०० वेळा हे पंख फडफडतात. साहजिकच त्यापोटी हवेत उठणारी कंपनंही जोमदार असतात. त्यांचाच आवाज गुंजारवाच्या स्वरूपात आपल्या कानी पडतो.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

  

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

मृगजळ का दिसतात


══════════════════════

   *संकलन 

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *मृगजळ का दिसत ?*  

*****************************

मृगजळ म्हणजे एक चमत्कार, अशी सर्वसाधारण समजूत असली तरी तो आहे केवळ एक प्रकाशीय अविष्कार. प्रकाशाच्या एका गुणधर्मापोटी तो साकार होतो. प्रकाशकिरणांचा वेग निरनिराळ्या माध्यमांमध्ये निरनिराळा असतो. घन माध्यमांमध्ये तो कमी असतो. विरळ माध्यमात तो जास्त असतो. निर्वात पोकळीत तो सर्वात जास्त असतो. माळरानावर आपण सुसाट धावू शकतो; पण घनदाट जंगलातून आपल्याला त्याच वेगाने पळता येत नाही. आपला वेग आपोआपच कमी होतो. त्यातलाच हा प्रकार.


 त्यामुळेच एका माध्यमातुन दुसऱ्या माध्यमात शिरताना प्रकाशकिरणांची दिशा बदलते. ते वागतात. कमी वेग असलेल्या माध्यमाच्या दिशेने ते वळतात. यालाच प्रकाशाचे वक्रीभवन किंवा अपवर्तन असे म्हणतात. माध्यमांच्या घनतेनुसार या वक्रीभवनाची मात्राही वेगवेगळी असते.

मृगजळ आपल्याला दिसते ते सहसा अतिशय तापलेल्या रस्त्यावरून जाताना. त्या रस्त्यावर दूरवर एखादे पाण्याने भरलेले तळे असल्यासारखे आपल्याला दिसते. पण त्याच्या जवळ जावे, ते तळे आहे असे वाटते. तिथे पोहोचले तर ते तळे गायब होते. तिथे तसाच तापलेला डांबरी रस्ता असल्याचे आपल्याला दिसते.


 जेव्हा तो रस्ता अतिशय तापलेला असतो तेव्हा त्या रस्त्याच्या निकट असलेल्या हवेच्या थराचं तापमानही चढतं. हवा तापली की विरळ होते. त्याच्यावर असलेल्या तुलनेने थंड असलेल्या हवेच्या थराची घनता जास्त असते. ती दाट असते. त्यामुळे आकाशातून आलेल्या सूर्याप्रकाशाचा किरण प्रथम त्या हवेच्या दाट थरातून जातो. तिथून जेव्हा तो खालच्या तापलेल्या विरळ थरात जातो तेव्हा त्याचा वेग अर्थातच वाढतो आणि त्याची व त्याची दिशा बदलते. ती वरच्या दाट थराच्या म्हणजे कमी वेग असलेल्या माध्यमांच्या दिशेने वळते. तो किरण आपल्या डोळ्यांना भिडतो तेव्हा त्या रस्त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यात न उमटता वर असलेल्या आकाशाची प्रतिमा तिथे साकार होते. आकाश तर वरच्या बाजूला आहे. मग ते आपल्याला कसे दिसेल, असे वाटल्याने ते त्याचे प्रतिबिंब आहे असा आपला समज होतो. तसे ते प्रतिबिंब जर तिथे पाणी असेल तरच आपल्याला दिसेल, अशा समजुतीने प्रकाशकिरणांचे वक्रीभवन जिथुन झाले त्या ठिकाणी पाण्याचा साठा असल्याचा भास आपल्याला होतो. अशा प्रकारच्या हवेच्या निरनिराळ्या थरात जेव्हा घनता वेगवेगळी असते तेव्हा तेव्हा हा वक्रीभवनाचा खेळ साकार होतो. त्यापायीच समुद्राजवळच्या एखाद्या डोंगराच्या कड्यावर आपण उभे असतो तेव्हाही आपल्याला आकाशात होडी चालल्यासारखी दिसते. वास्तविक ती होडी समुद्राच्या पाण्यात विहरत असते; पण वक्रीभवनापायी तिची ती आभासी प्रतिमा उमटते आकाशाच्या पडद्यावर. तेही मृगजळच.

 

*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

विश्वनाथन चा स्थिरांक


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________संकलन, गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : विश्वनाथचा स्थिरांक*


गणितात भर घालणारी कल्पना अगदी प्राथमिकही असू शकते. पण त्यामुळे मिळणारी अंतिम रचना एकदम वेगळे लक्षणीय रूप घेऊ शकते. उदाहरणार्थ विविध युक्लिडेतर भूमितींची रचना, ज्या भूमिती, युक्लिडच्या भूमितीमधील पाचव्या गृहीतकात थोडे बदल करून एकोणिसाव्या शतकात मिळाल्या. या संदर्भात एक अलीकडचे उदाहरण बघू.


१, १, २, ३, ५, ८, १३,… ही फिबोनासी क्रमिका सुपरिचित आहे. या क्रमिकेत तिसऱ्या संख्येपासून पुढची प्रत्येक संख्या आधीच्या दोन संख्यांच्या बेरजेइतकी आहे जशी की ५ = ३ + २; १३ = ८ + ५.  गणिती भाषेत ही क्रमिका सन = सन-१ + सन-२ (न २ पेक्षा मोठा आहे) या नियमाने तयार होते. सनच्या केवल मूल्याचे (अ‍ॅबसोल्युट व्हॅल्यू) ‘न’वे मूळ काढत गेल्यास ते १.६१८०३. या संख्येजवळ जाते ज्याला ‘सुवर्ण गुणोत्तर’ म्हणतात. दिवाकर विश्वनाथ या गणितज्ञाने १९९८मध्ये सदर क्रमिका रचण्याच्या नियमात एक छोटा बदल केला. तो म्हणजे क्रमिका तिसऱ्या संख्येपासून वन = थ् वन-१ थ् वन-२ (न २ पेक्षा मोठा आहे) या नियमाने तयार करायची जिथे + किंवा – हे चिन्ह यादृच्छिक पद्धतीने ठरवायचे जसे की नाणेफेक करून. म्हणजे छाप आला तर + आणि काटा आला तर -. त्यामुळे कदाचित १, १, -२, -३, -१, ४, -३,. अशी क्रमिका मिळू शकेल किंवा वेगवेगळ्या क्रमिका मिळू शकतील. 


संगणकाच्या मदतीने विश्वनाथ यांनी अशा एक लक्षहून अधिक संख्या असलेल्या अनेक क्रमिका रचल्या आणि वनच्या केवल मूल्याचे (अ‍ॅबसोल्युट व्हॅल्यू) ‘न’वे मूळ ते काढत गेले. त्यांना असे आढळले की जसजसे न वाढत जाते, जसे की दशलक्षापर्यंत, या मुळाचे मूल्य नेहमी १.१३१९८८२४. या संख्येजवळ जाण्याची संभाव्यता एक असते. (चौकट पाहा). हे घडण्याची सिद्धता त्यांनी यादृच्छिक सारणीच्या गुणाकाराचा सिद्धान्त, वास्तव संख्येबाबत उपलब्ध स्टर्न-ब्रोकोट निष्कर्ष, आणि संगणकगणन यातील स्थूलांकन दोष विश्लेषण अशा प्रगत गणिताच्या आधाराने दिली.


विश्वनाथ यांचे हे संशोधन सन २०००मध्ये आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आणि तेव्हापासून १.१३१९८८२४. या संख्येला ‘विश्वनाथचा स्थिरांक’ आणि वरील वन क्रमिका ही ‘विबोनासी क्रमिका’ म्हणून ओळखली जाते. विश्वनाथ यांनी आयआयटी मुंबईमधून संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयात बी.टेक. (१९९२) आणि अमेरिकेतील कोर्नेल विद्यापीठातून पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्या (१९९८). सध्या ते अमेरिकेत मिशिगन विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक आहेत.


 – डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~

प्रत्येक माणसाच्या शरीरात

 *प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचे वैद्यकीय क्रमांक*

 1. रक्तदाब: 120/80

 2. नाडी: 70 - 100

 3. तापमान: 36.8 - 37

 4. श्वसन: 12-16

 5. हिमोग्लोबिन: पुरुष (13.50-18)

  महिला ( 11.50 - 16 )

 6. कोलेस्टेरॉल: 130 - 200

 7. पोटॅशियम: 3.50 - 5

 8. सोडियम: 135 - 145

 9. ट्रायग्लिसराइड्स: 220

 10. शरीरातील रक्ताचे प्रमाण: 5-6 लिटर

 11. साखर: मुलांसाठी (70-130)

  प्रौढ: 70 - 115

 12. लोह: 8-15 मिग्रॅ

 13. पांढऱ्या रक्त पेशी: 4000 - 11000

 14. प्लेटलेट्स: 150,000 - 400,000

 15. लाल रक्तपेशी: 4.50 - 6 दशलक्ष..

 16. कॅल्शियम: 8.6 - 10.3 mg/dL

 17. व्हिटॅमिन डी3: 20 - 50 एनजी/मिली (नॅनोग्राम प्रति मिलीलीटर)

 18. व्हिटॅमिन बी12: 200 - 900 pg/ml


 *जे खालील नमूद वय ओलांडले आहेत त्यांच्यासाठी टिप्स:*

    *40*

    *50*

    *60*

  आणि वर,

  *देव तुम्हाला आज्ञापालन, आरोग्य आणि निरोगीपणा देवो..*


             *पहिली सूचना:*

  तुम्हाला आजारी वाटत नसताना किंवा कोणताही आजार नसला तरीही तुम्हाला दरवर्षी कपिंग करावे लागते.

  ?

 (कपिंग म्हणजे काय?

 कपिंग ही एक प्राचीन उपचार पद्धती आहे जी काही लोक वेदना कमी करण्यासाठी वापरतात.  प्रदाता तुमच्या पाठीवर, पोटावर, हातावर, पायांवर किंवा तुमच्या शरीराच्या इतर भागांवर कप ठेवतो.  कपच्या आत, व्हॅक्यूम किंवा सक्शन फोर्स त्वचेला वर खेचते.

         कपिंग हे पारंपारिक चीनी आणि मध्य पूर्व औषधांचा एक प्रकार आहे.  लोकांनी हजारो वर्षांपासून कपिंग थेरपीचा सराव केला आहे.)


          *दुसरी सूचना:*

  तुम्हाला तहान लागली नाही किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या... आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या आणि त्यापैकी बहुतेक शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आहेत.


           *तिसरी टीप:*

  तुम्ही तुमच्या व्यस्ततेच्या शीर्षस्थानी असतानाही खेळ खेळा... शरीराला हालचाल करणे आवश्यक आहे, जरी फक्त चालणे... किंवा पोहणे... किंवा कोणत्याही प्रकारचे खेळ.


  *चौथी टीप*

 जेवण कमी करा...


  जास्त अन्नाची लालसा सोडा...कारण ते कधीही चांगले आणत नाही.  *स्वतःला वंचित ठेवू नका, पण प्रमाण कमी करा.*


          *पाचवी टीप*

  शक्य तितके, अगदी आवश्यक असल्याशिवाय कार वापरू नका... तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुमच्या पायावर पोहोचण्याचा प्रयत्न करा *(किराणा, एखाद्याला भेटणे...) किंवा कोणतेही ध्येय*.


           *सहावी टीप*

  राग सोडा...

  राग सोडा...

  राग सोडा...

  काळजी सोडून द्या... गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा...

 गडबडीच्या परिस्थितीत स्वतःला गुंतवू नका... ते सर्व आरोग्य कमी करतात आणि आत्म्याचे वैभव काढून घेतात.  तुम्हाला आरामदायक वाटणारी दाई निवडा.


          *सातवी टीप*

  म्हटल्याप्रमाणे..तुमचे पैसे उन्हात सोडा..आणि सावलीत बसा..स्वत:ला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मर्यादित करू नका..पैसा त्याच्यासाठी जगण्यासाठी बनवला आहे, जगण्यासाठी नाही.


  *आठवी टीप*

  स्वतःला कोणाबद्दल वाईट वाटून घेऊ नका,

  किंवा ज्या गोष्टीवर तुम्ही साध्य करू शकत नाही,

   किंवा तुमच्या मालकीची नसलेली कोणतीही गोष्ट.

  त्याकडे दुर्लक्ष करा, विसरा;


          *नववी टीप*

 नम्रता..मग नम्रता..पैसा,प्रतिष्ठा,सत्ता आणि प्रभावासाठी..त्या सर्व गोष्टी अहंकाराने आणि अहंकाराने भ्रष्ट झालेल्या आहेत.

  नम्रता ही लोकांना प्रेमाने तुमच्या जवळ आणते.


           *दहावी टीप*

  जर तुमचे केस राखाडी झाले तर याचा अर्थ आयुष्याचा अंत होत नाही.  चांगले जीवन सुरू झाल्याचा तो पुरावा आहे.  आशावादी, आठवणीने जगा, प्रवास करा, स्वतःचा आनंद घ्या.


*शेवटचा आणि सर्वात महत्वाचा सल्ला स्वतःची काळजी घ्या.*

...गजानन गोपेवाड 

ज्ञान विज्ञान पदार्थांची अँलर्जी का होते


══════════════════════

    संकलन गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *पदार्थांचीच अॅलर्जी का होते आणि निरनिराळ्या व्यक्तींना निरनिराळ्या अॅलर्जी का होतात?* 

************************************

आपल्या अवतीभवती आपल्या आरोग्याला बाधा आणू शकतील असे एवढे सूक्ष्मजीव वावरत असतात, की आपण जीवाणू, विषाणू, कवक अशा सूक्ष्मजीवांच्या महासागरातच पोहत असतो, असं एका वैज्ञानिकांनी म्हणून ठेवलं आहे. याएवढ्या आणि डोळ्यांनाच काय, पण शक्तिशाली सूक्ष्मदर्शकांची मदत घेतल्यानंतरही दिसून शकणाऱ्या रोगजंतूंशी सामना करायचा म्हणजे तुकोबांनी म्हटलं आहे तसा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'; पण अशा कठीण प्रसंगातही आपलीच जीत व्हावी अशी चोख व्यवस्थाही निसर्गानं केलेली आहे. त्यानं आपल्याला एक अशी सुनियोजित, सुबद्ध आणि कार्यक्षम संरक्षणयंत्रणा बहाल केली आहे, की जणू ती आपली कवचकुंडलंच! या संरक्षणयंत्रणेच्या, इम्युन सिस्टिमच्या पाईक असतात आपल्या रक्तातल्या लिम्फपेशी. निरनिराळ्या लिम्फग्रंथींच्या रूपात यांच्या तुकड्या शरीरात सगळीकडे पसरलेल्या असतात. जिथून जिथून म्हणून रोगजंतूंचा शिरकाव शरीरात होऊ शकतो, अशा सर्व ठिकाणी त्यांचं बस्तान असतं. शिवाय रक्तातल्या पेशींच्या रूपात शरीरभर त्यांची गस्त चालूच असते.


या लिम्फपेशींच्या अंगी आपला कोण आणि परका कोण, याची ओळख पटवण्याची क्षमता असते. प्रत्येक रेणूच्या पृष्ठभागावर त्याची निर्विवाद ओळख पटवणारं विशिष्ट अणूंच्या रचनेच्या रूपातलं ओळखपत्र वाचून लिम्फपेशी आगंतुक पाहुणा मित्र आहे की शत्रू आहे, याचा निवाडा करतात. त्याला पिटाळून लावण्यासाठी काही विवक्षित प्रथिनांची प्रतिपिंडांची निर्मिती व्हायला लागते. ही प्रतिपिंडं त्या त्या ओळखपत्राला प्रतिसाद देणारीच असतात. ती त्या अणूंच्या रचनेला मरणमिठीच मारतात. त्यायोगे तो रेणू तर निकामी होतोच; पण ज्या सजीवाच्या अंगावर तो असतो, त्याचंही मरण ओढवतं.


या साऱ्या प्रकारात काही वेळा काही रेणूंच्या बाबतीत काही लिम्फपेशी अतिउत्साही होतात. त्या रेणूच्या विरोधात त्या जोमदार प्रतिक्रिया करतात. ती गोष्ट आठवते ना! एका राजानं, आपण झोपलेले असताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून एक माकडाला नेमलं. त्याच्या हाती तलवार दिली. एक माशी नाकावर घोंघावत राजाला त्रास देऊ लागली. कितीही वेळा हाकललं तरी ती जाईना. एकदा ती अशीच नेमकी नाकाच्या शेंड्यावर बसलेली असताना माकडानं तिचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तलवारीचा घाव घातला आणि... तशीच अवस्था या अतिउत्साही लिम्फपेशींची असते. काही विशिष्ट पदार्थांपासून आपलं संरक्षण करण्यासाठीच त्या कार्यरत होतात; पण उत्साहाच्या भरात त्या अशा काही रसायनांची निर्मिती करतात, की आपल्या श्वासनलिका, रक्तवाहिन्या चोंदून जातात. आपल्याला श्वासोच्छ्वास करणं कठीण होऊन बसतं. रक्तप्रवाहातही अडथळा येतो. हृदयाच्या कामावरही अनिष्ट परिणाम होतो.


ज्याचं संरक्षण करायचं त्या शरीराच्या मुळावरच उठल्यासारखी परिस्थिती होते. यालाच हायपरसेन्सिटिव्हिटी रिअॅक्शन किंवा अॅलर्जी असं म्हणतात. अॅलर्जी का होते, हे जरी आज आपल्याला समजलं असलं, तरी काही पदार्थांची अॅलर्जी का असते, हे गूढ मात्र अजूनही उकललेलं नाही.


*-डाॅ.बाळ फोंडके 

कुतुहल ब्रुनचा स्थिरांक


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : ब्रुनचा स्थिरांक*


मूळ किंवा अविभाज्य (प्राइम) संख्या (२, ३, ५, …) यांचे विविध पैलू या सदरात वेळोवेळी सादर केलेले आहेत. एका मूळ संख्येनंतर एक संख्या सोडून लगेच येणारी संख्याही मूळ संख्या असेल तर त्या दोन संख्यांना जुळ्या (ट्विन) मूळ संख्या म्हटले जाते. जसे की, ३ व ५, ५ व ७, ११ व १३. मूळ संख्या अनंत आहेत हे सिद्ध झालेले आहे, तर जुळ्या मूळ संख्यादेखील अनंत असतील असा कयास आहे पण त्याची सिद्धता झालेली नाही. ती अद्याप अटकळच आहे. जुळ्या मूळ संख्यांची पहिली जोडी म्हणजे ३ व ५ वगळता, आत्तापर्यंत सापडलेल्या सर्व जुळ्या मूळ संख्या (६न – १, ६न +१) अशा स्वरूपाच्या आहेत, जिथे न ही नैसर्गिक संख्या आहे.


सर्व मूळ संख्यांचा व्यस्त घेतला आणि त्यांची बेरीज, म्हणजे १/२ + १/३ + १/५ + १/७ + . केली तर ती अनंताकडे अपसृत (डायव्हर्ज) होते. तसेच जुळ्या मूळ संख्यांच्या बाबतीतही घडेल असे स्वाभाविकपणे वाटते. म्हणजे १/३ + १/५ + १/७ + १/११ + १/१३ + . ही बेरीजदेखील अनंताकडे अपसृत होईल. नवल म्हणजे तसे घडत नाही. नॉर्वे देशवासीय गणितज्ञ व्हिगो ब्रुन यांनी १९१९ साली एका शोधलेखाद्वारे सिद्ध केले की ती बेरीज एका सान्त मूल्याच्या जवळपास म्हणजे १.९०२१६०. अशी येते. या संख्येला ब्रुनचा स्थिरांक असे संबोधले जाते आणि ‘बी२’ या चिन्हाने दर्शवले जाते. या स्थिरांकाचे अधिकाधिक अचूक मूल्य काढण्याचे प्रयत्न चालू असून ते सध्या १.९०२१६०५८३१०४. असे आहे. १९२० साली गोल्डबाखच्या अटकळीसंबंधी प्रसिद्ध झालेले ब्रुनचे प्रमेयही उल्लेखनीय आहे.


दोन जुळ्या मूळ संख्यांची जोडी, ज्यांच्या पहिल्या जोडीतील शेवटच्या आणि दुसऱ्या जोडीतील पहिल्या संख्येतील अंतर चार आहे, त्यांना चतुष्क (क्वाड्रुप्लेट) मूळ संख्या म्हणतात, उदा. (५, ७, ११, १३), (११, १३, १७, १९), (१०१, १०३, १०७, १०९). त्यांचा व्यस्त घेऊन बेरीज केल्यास आणखी एक स्थिरांक मिळतो. त्याला ब्रुनचा स्थिरांक ‘बी४’ असे म्हणतात. त्याचे मूल्य जवळपास ०.८७०८५८३८००. इतके आहे. अशा प्रकारे विविध मूळ संख्यांच्या जोड्या घेऊन त्यांच्या व्यस्तांची बेरीज करून नव्या स्थिरांकांचा तपास गणितज्ञ करत आहेत. तुम्हीही याचप्रमाणे वेगवेगळ्या संख्यांचे व्यस्त घेऊन असा अभ्यास सहज हाती घेऊ शकता.


– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~

पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

              *१३ डिसेंबर २००१*

♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟


      *भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.*

 

"पृथ्वी" हे भारतीय सैन्याचे "पृष्ठभाग ते पृष्ठभाग" (Surface to Surface) निम्न पल्ला प्रक्षेपास्त्र (Short Range Ballistic Missile) आहे. हे प्रक्षेपास्त्र भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने "एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमा" अंतर्गत विकसित केले आहे.

विकास आणि इतिहास

भारत सरकारने वेगवेगळी युद्ध क्षेपणास्त्रे व पृष्ठभाग ते आकाश या मालिकेतील क्षेपणास्त्रांवरील स्वावलंबनासाठी १९८३ साली "एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम" सुरू केला. या अंतर्गत विकसित केलेले पृथ्वी हे पहिले प्रक्षेपास्त्र आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने याआधी "प्रोजेक्ट डेव्हिल" अंतर्गत सोविएत रशियाच्या एसए-२ पृष्ठभाग ते आकाश या क्षेपणास्त्राची उलट अभियांत्रिकी केली होती. "पृथ्वी"ची प्रणोदन प्राद्योगिकी (Propulsion Technology) ही एसए-२ पासुन उत्पादित केली असल्याचे मानले जाते. या प्रक्षेपास्त्राच्या प्रारूपांमध्ये स्थायू अथवा द्रव, अथवा या दोन्ही प्रकारची इंधने वापरली जातात. युद्धभूमीवरील वापरासाठी विकसित केलेले हे प्रक्षेपास्त्र सामरिक उपयोगासाठी स्फोटक शीर्षावर अण्वस्त्रेसुद्धा वाहून नेऊ शकते.


प्रारूपे

पृथ्वी प्रक्षेपास्त्र प्रकल्पामध्ये भारतीय सेना, नौसेना व वायु सेना या तिन्ही दलांसाठी असलेली "पृथ्वी"ची प्रारूपे अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. सुरुवातीच्या एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या प्रकल्पामध्ये पृथ्वी प्रक्षेपास्त्राच्या संरचना रूपरेषेत खालील प्रारूपे अंतर्भूत आहेत.


पृथ्वी - १ (एसएस- १५०) - भारतीय सेनेसाठी (१,००० किलो च्या स्फोटक शिर्षासह १५० किलोमीटर लांबीचा पल्ला)


पृथ्वी - २ (एसएस- २५०) - भारतीय वायुसेनेसाठी (५०० किलो च्या स्फोटक शिर्षासह २५० किलोमीटर लांबीचा पल्ला)


पृथ्वी - ३ (एसएस- ३५०) - भारतीय नौसेनेसाठी (५०० किलो च्या स्फोटक शिर्षासह ३५० किलोमीटर लांबीचा पल्ला)

धनुष - बातमीनुसार धनुष हे भारतीय नौसेनेसाठीचे युद्धनौकेवरून डागण्यात येऊ शकणारे प्रारूप आहे. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार धनुष ही संतुलित मंच असलेली अशी रचना आहे की ज्यावरून पृथ्वी - २ व पृथ्वी - ३ अशी दोन्ही प्रक्षेपास्त्रे युद्धनौकेवरून डागण्यात येऊ शकतील. तर काही सूत्रांच्या मते धनुष हे पृथ्वी - २ या प्रक्षेपास्त्राचे प्रारूप आहे.

वर्षानुवर्षे ही वैशिष्ठ्ये अनेक बदलांमधून गेली. भारताने लष्करी वापराकरिता तयार केलेल्या या वर्गातील कुठल्याही क्षेपणास्त्राला पृथ्वी या कूटनामाने ओळखले जाते. मात्र नंतरच्या विकसनशील प्रारूपांना पृथ्वी-२ आणि पृथ्वी-३ या नावाने ओळखले जाते.


वर्णन


पृथ्वी १

पृथ्वी १ हे १००० किलो स्फोटक शिर्षाची क्षमता व १५० किलोमीटर चा पल्ला असलेले भूपृष्ठ ते भूपृष्ठ क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची अचूकता १०-५० मीटर असून हे ऊर्ध्व परीवाहक पट्ट्यावरून डागण्यात येऊ शकते. या वर्गातील पृथ्वी क्षेपणास्त्र भारतीय सेनेत १९९४ साली नियुक्त करण्यात आले.


पृथ्वी २

पृथ्वी २ हे प्रक्षेपास्त्र २५० किलोमीटर च्या वाढीव पल्ल्यासह १००० किलोचे स्फोटक शीर्ष असलेले क्षेपणास्त्र आहे. पृथ्वी २ हे एकस्तरीय द्रव इंधन वापरणारे क्षेपणास्त्र आहे व त्याची लांबी- ९ मीटर व्यास- १.१० मीटर, वजन-४००० ते ४६०० किलो आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय वायु दलाच्या प्रार्थमिक वापराकरिता तयार केले गेले. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी २७ जानेवारी १९९६ रोजी केली गेली व याच्या विकसित आवृत्त्या २००४ मध्ये पूर्ण करण्यात आल्या. सध्या पृथ्वी २ या क्षेपणास्त्राची भारतीय वायु दलातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सध्याच घेण्यात आलेल्या एका चाचणीत हे क्षेपणास्त्र ३५० किलोमीटरच्या वाढीव पल्ल्यासह व सुधारित 'जडत्व परिभ्रमण सहाय्यता प्राप्त' सह डागण्यात आले. या प्रक्षेपास्त्रामध्ये प्रक्षेपास्त्र-विरोधी क्षेपणास्त्रांना चकवण्याची वैशिष्ठ्ये आहेत. बातम्यांच्या अनुसार या प्रक्षेपास्त्रच पल्ला आता ३५० km पर्यंत वाढवण्यात आला आहे.


पृथ्वी ३

पृथ्वी ३ वर्ग (कूट नाम "धनुष") हे द्विस्तरीय नौका ते पृष्ठभाग प्रक्षेपास्त्र आहे. पहिला स्तर १६ मेट्रीक टन बल (१५७ kN) जोर मोटरचा असून त्यात स्थायुरूपी इंधन वापरले जाते. दुसऱ्या स्तरामध्ये द्रवरूपी इंधन वापरले जाते. प्रक्षेपास्त्र १००० किलोचे स्फोटक शीर्ष ३५० किमी पर्यंत, ५०० किलोचे स्फोटक शीर्ष ६०० किमी पर्यंत आणि २५० किलोचे स्फोटक शीर्ष ७५० km पर्यंत वाहून नेऊ शकते. धनुष प्रणालीमध्ये संतुलित मंच (धनुष्य) आणि प्रक्षेपास्त्र (बाण) हे घटक अंतर्भूत आहेत. अंदाजानुसार धनुष हे पृथ्वी प्रक्षेपास्त्राचेच एक सागरी वापरासाठीच्या योग्यतेचे एक विशिष्ट रूप आहे. "धनुष" डागण्यासाठी जलस्थिर मंचाची आवश्यकता आहे. याचा छोटा पल्ला याच्या गुणांविरुद्ध असल्याकारणाने हे प्रक्षेपास्त्र फक्त शत्रूच्या विमानवाहू नौकेविरोधात अथवा बंदराविरोधात वापरता येते. या प्रक्षेपास्त्राची पृष्ठीय नौकांवरून अनेक वेळा चाचणी घेण्यात आली आहे.

पृथ्वी ३ हे प्रक्षेपास्त्राची चाचणी सर्वप्रथम सुकन्या वर्गीय गस्ती नौकेच्या आय.एन.एस. सुभद्रा वरून २००० साली घेण्यात आली.या नौकेच्या सुधारित, अधिक मजबूत केलेल्या Helicopter deck वरून या प्रक्षेपास्त्राची चाचणी घेण्यात आली. २५० किमी पल्ला असलेल्या प्रारूपाची पहिली चाचणी अंशतः यशस्वी झाली. याची पूर्ण सामरिक चाचणी सन २००४ मध्ये पूर्ण झाली. नंतरच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आय.एन.एस. राजपूत वरून याच प्रक्षेपास्त्राच्या ३५० km पल्ला असलेल्या प्रारूपाची भूपृष्ठावरील लक्ष्य अचूकपणे साधून यशस्वी चाचणी घेण्यात आली. याच प्रक्षेपास्त्राची चाचणी पुन्हा एकदा १३ डिसेंबर २००९ रोजी आय.एन.एस. सुभद्रावरून चांदीपूरच्या एकल परीक्षण क्षेत्रापासून ३५ km लांब समुद्रात उभी करून यशस्वीरीत्या घेण्यात आली. ही या प्रक्षेपास्त्राची सहावी चाचणी होती .

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीर्ष मास,शुक्ल पक्ष,*दशमी*,रेवती नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १३ डिसेंबर  २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"यह सत्य है कि हमारे हृदय में यदि किसी के लिए प्रेम है एवं विचार सकारात्मक हैं तो अमुक व्यक्ति में कोई दोष दिखाई नही देगा। .. और यदि किसी के लिए ईर्ष्या अथवा घृणा है, तो उसके गुण भी हमे दोष दिखने लगते हैं। अतः मनोस्थिति बदलो और बिना लाभ हानि के प्रेम करना सीखो, ईश्वरीय आनंद की अनुभूति होगी।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

गाथा बलिदानाची हुतात्मा बाबु गेन

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

            

            *हुतात्मा बाबू गेनू सैद*

        (भारतीय स्वतंत्रता कार्यकर्ता)


               *जन्म : १९०८*

         (महालुंगे, आंबेगाव, पुणे)


     *मृत्यू : १२ डिसेंबर १९३०*

                      (उम्र २२)

                        (मुंबई)


बाबू गेनू सैद  भारत के स्वतंत्रता-संग्राम सेनानी एवं क्रांतिकारी थे। उन्हें भारत में स्वदेशी के लिये बलिदान होने वाला पहला व्यक्ति माना जाता है।


१९३० में महात्मा गांधी ने नमक सत्याग्रह आरम्भ किया | भारतीय स्वतंत्रता संग्राम में इसका विशेष महत्व है | सम्पूर्ण भारत के लोग अबाल-वृद्ध , शिक्षित-अशिक्षित , ग्रामीण नागरिक सबने उसमे भाग लिया | शराब की दुकानों के आगे धरना दिया और विदेशी कपड़ो की होली जलाई , जुलुस निकाले और घरो ने नमक बनाकर नमक कानून को तोड़ा | सरकार ने जनता पर असीम अत्याचार किये | कई लोगो को बंदी बनाया गया , लाठीचार्ज किया गया और बंदूके भी चलाई गयी | इस प्रकार से अत्याचार से विदेशी शासन के विरुद्ध आक्रोश फ़ैल गया |


पुणे जिले के महांनगुले गाँव में ज्ञानोबा आब्टे का पुत्र बाबू गेन,  २२ वर्ष का था वह भी सत्याग्रहियों में सम्मलित था | वह केवल चौथी कक्षा तक पढ़ा हुआ था | बाबू के माता-पिता उससे बहुत प्रेम करते थे | उसके अध्यापक गोपीनाथ पंत उसको रामायण , महाभारत और छत्रपति शिवाजी की कहानिया सुनाते थे | बाबू दस वर्ष का भी नही हुआ था कि उसके पिता की मृत्यु हो गयी और परिवार का भार उसकी माँ के कन्धो पर आ गया | वह भी उसकी सहायता करता था |


माँ उसका जल्दी से जल्दी विवाह करना चाहती थी परन्तु वह भारत माँ की सेवा करना चाहता था इसलिए उसने विवाह करने से मना कर दिया और वह मुम्बई चला गया | वह तानाजी “पाठक” के दल में सम्मिलित हो गया | वह वडाला के नमक पर छापा मारने वाले स्वयंसेवकों के साथ हो गया | वह पकड़ा गया और उसको कठोर कारावास का दंड दिया गया | वह जब यरवदा जेल से छुटा तो माँ से मिलने गया जो लोगो से उसके वीर पुत्र की प्रशंशा सुनकर बहुत प्रसन्न थी |


माँ की आज्ञा लेकर वह फिर मुम्बई अपने दल में जा मिला | उसको विदेशी कपड़ो के बाहर धरना देने का काम सौंपा गया जो उसने बखूबी निभाया | धरना देने वाले सत्याग्रहियों से न्यायाधीश ने पूछा कि क्या तुम विदेशी कपड़ो से भरे ट्रक के सामने लेट सकते हो ? बाबू ने इस चुनौती को मन ही मन स्वीकार कर लिया और यह भी निश्चय कर लिया कि आवश्यक होने पर वह अपना बलिदान भी दे सकता है | १२ दिसम्बर १९३० को ब्रिटिश एजेंटों के कहने से विदेशी कपड़ो के व्यापारियों ने एक ट्रक भरकर उसको सड़क पर निकाला | ट्रक के सामने एक के बाद एक ३० स्वयंसेवक लेट गये और ट्रक को रोकना चाहा | पुलिस ने उसको हटाकर ट्रक को निकलने दिया |


बाबू गेनू  ने ओर कोई ट्रक वहां से न निकलने का निश्चय कर लिया और वह सड़क पर लेट गया | ट्रक उस पर होकर निकल गया और वह अचेत हो गया | उसको अस्पताल ले गये जहा उसकी मृत्यु हो गयी | ट्रक ड्राईवर और पुलिस की क्रूरता से शहीद हो गया किन्तु वह लोकप्रिय हो गया | उसका नाम भारत के घर घर में पहुच गया और बाबू गेनू  अमर रहे के नारे गूंजने लगे | महानुगले गाँव में उसकी मूर्ति लगाई गयी जहा वह शहीद हुआ था | उस गली का नाम गेनू स्ट्रीट रखा गया | कस्तूरबा गांधी उसके घर गयी और उसकी माँ को पुरे देश की तरफ से सांत्वना दी | एक साधारण मजदूर के द्वारा दी गयी शहादत को यह देश कभी नही भूल सकता है |

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीर्ष मास,शुक्ल पक्ष,*नवमी*,उ.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, १२ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *तन की अस्वस्थता उतनी घातक नहीं होती, जितनी मन की अस्वस्थता घातक होती है। तन से अस्वस्थ व्यक्ति केवल स्वयं को अथवा अधिक से अधिक अपने परिजनों को ही दुख देता है, किन्तु मन से अस्वस्थ व्यक्ति स्वयं को, परिवार को, समाज को और अपने सम्पर्क में आने वाले सभी को कष्ट देता है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

केस कुरळे का होतात


══════════════════════

    @ संकलन 

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *केस कुरळे का होतात ?* 📒

******************************

आपले केस केरटीन या प्रथिनाचे बनलेले असतात. त्यातले काही सरळसोट का राहतात, तर इतर वेडीवाकडी वळणे घेत कुरळे का बनतात, याचं इंगीत प्रथिनांच्या रचनेतच सामवले आहे. प्रथिने ही अमिनो आम्लांची बहुवारिक साखळीच असते. प्रथिनांमध्ये एकूण २० वेगवेगळ्या प्रकारची अमिनो आम्ल असतात. त्यातल्या प्रत्येकाच्या रेणूची अंतर्गत तसंच त्रिमिती रचना वेगवेगळी असली तरी प्रत्येक अमिनो आम्लाच्या एका टोकाला आम्लधर्मीय कार्बोक्सील हा रेणूंचा गट असतो, तर दुसर्या टोकाला अल्कलीधर्मीय अमिनो गट असतो. साखळी गुंफण्यासाठी जेव्हा एका अमिनो आम्लाचा रेणू शेजारच्या दुसर्या अमिनो आम्लाशी जोडला जातो तेव्हा हे अमिनो आणि कार्बोक्सील रेणू एकमेकांशी पेप्टाइड बंध तयार करतात. अशा रीतीने प्रथिनांची प्राथमिक रचना असणारी हि सरळसोट साखळी तयार होते. 


या अमिनो आम्लांवर इतर अणुही असतात. ते टोकाला नसून मधल्या अंगाच्या दोन्ही बाजूंना पसरलेले असतात. ते जराशा दूरवर असलेल्या अमिनो आम्लावरच्या दुसर्या रेणूशी संधान बांधून इतर बंध तयार करतात. त्यामुळे मग या साखळ्या सरळसुत न राहता त्यांच्यामध्ये वेटोळी किंवा मोड तयार होतात. प्रथिनांची द्वितीय स्तरावरची रचना तयार होऊ लागते.


या प्रकारच्या बंधामध्ये सल्फरचे अणुही सहभागी होतात. कित्येक अमिनो अम्लांच्या मध्यभागावर सल्फरचे अणु असतात. त्यांचा संपर्क दुसर्या कोणत्यातरी साखळीत त्यांच्यापासून दूरवर असणाऱ्या अमिनो आम्लाच्या अंगावरच्या सल्फरच्याच अणुशी आला, कि त्यांच्यामध्ये एक पूल तयार होतो. त्याला डायसल्फाईड ब्रिज असे म्हणतात. या पुलांमुळे मग त्या प्रथिनांच्या सरळ असलेल्या साखळीला बाक येतो. त्याची वेटोळी बनतात. केसांमध्ये अशा सल्फरच्या पुलांची संख्या वाढली तर ते कुरळे होतात. जर त्यांची संख्या कमी झाली तर ते सरळ राहतात. केसांमध्ये किती पाणी आहे, यावरही त्यांच्या या रचनेत काही बदल होतात; पण ते कायमचे नसतात. केस कोरडे झाले कि परत आपले मूळ रूप धारण करतात.


काही जण केसांवर काही प्रक्रिया करून त्याचे स्वरूप बदलू पाहतात. सरळ केस असलेली व्यक्ती आपले केस कुरळे करून घेते. तसे करताना ती त्यांच्यातल्या सल्फर पुलांची संख्या वाढवत असते; पण हि स्थिती तात्पुरतीच असते. कारण नव्याने वाढलेले केस परत सरळच राहतात. कालांतराने मग सरळ वळण देण्याच्या प्रयत्नांची होते. काही दिवसांनी ते आपले मुळचे कुरळेपण परत मिरवू लागतात.



आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस

 *⛰️⛰️⛰️११ डिसेंबर⛰️⛰️⛰️*

***********************************

🏔️🏔️ *अंतराष्ट्रीय पर्वत दिवस*🏔️🏔️

)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))

  अंतराष्ट्रीय पर्वत दिवस २०१९: वर्तमान थीम, इतिहास और मुख्य तथ्य

पहाड़ों के महत्व के बारे में जागरूकता बढ़ाने,अवसरों पर ध्यान केंद्रित करने और पहाड़ों के विकास पर ज़ोर डालने के लिए हर साल ११ दिसंबर को अंतराष्ट्रीय पर्वतीय दिवस (International Mountain Day (IMD) मनाया जाता है.


यह दिन पर्यावरण में पहाड़ों की भूमिका और जीवन पर इसके प्रभाव को समझने के लिए लोगों को शिक्षित करता है. अंतराष्ट्रीय पर्वतीय दिवस हर साल एक विशेष थीम के साथ मनाया जाता है.


अंतराष्ट्रीय पर्वत दिवस २०१९ का थीम "Mountains matter for Youth" है. यह थीम युवाओं पर केंद्रित है ताकि वे परिवर्तन के सक्रिय एजेंटों के रूप में और कल के भविष्य के नेतृत्व के रूप में आगे आ सकें. बच्चों और लोगों को पहाड़ों के बारे में शिक्षित करना आवश्यक है क्योंकि पहाड़ ताजा पानी, स्वच्छ ऊर्जा, भोजन, इत्यादि प्रदान करते हैं.


आइये अंतराष्ट्रीय पर्वत दिवस (IMD) के इतिहास के बारे में जानते हैं.


अंतराष्ट्रीय पर्वत दिवस का गठन १९९२ में तब हुआ जब एजेंडा २१ के अध्याय १३ के "Managing Fragile Ecosystems: Sustainable Mountain Development" को पर्यावरण और विकास पर संयुक्त राष्ट्र सम्मेलन में अपनाया गया. इसमें कोई शक नहीं, इसने पहाड़ों के विकास के इतिहास को एक नया रूप दिया. पहाड़ के महत्व की ओर बढ़ते हुए ध्यान को देखते हुए, संयुक्त राष्ट्र महासभा ने २००२ को संयुक्त राष्ट्र अंतराष्ट्रीय पर्वत वर्ष घोषित किया और ११ दिसंबर को २००३ से अंतराष्ट्रीय पर्वत दिवस के रूप में नामित किया. इसलिए हम कह सकते हैं कि पहली बार अंतराष्ट्रीय पर्वत दिवस ११ दिसंबर २००३ को मनाया गया था. हर साल यह एक विशेष थीम के साथ मनाया जाता है.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीर्ष मास,शुक्ल पक्ष, *अष्टमी*,पू.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ११ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"हम कितने भी पवित्र शब्द, वाक्य, ग्रन्थ, उपनिषद पढ़ लें अथवा बोल लें..., वो तब तक हमारा भला नहीं करेंगे, जब तक हम उन्हें व्यवहारिक जीवन में प्रयोग में नहीं लाते"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कुतुहल भरती आहोटि गणित


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : भरती-ओहोटीचे गणित*


भरतीचा आणि चंद्राचा संबंध समुद्रकिनारी राहणाऱ्या सर्वांनाच माहीत असतो. ते तिथीवरून ढोबळमानाने आज भरती केव्हा येईल आणि ओहोटी केव्हा हे सांगू शकतात. पण ही माहिती पुरेशी नसते. मोठमोठी जहाजे जेव्हा एखाद्या उथळ पाण्याच्या भागातून जाणार असतील तेव्हा भरतीची वेळ आणि त्या वेळेला पाणी किती ‘चढेल’ याची बिनचूक माहिती असणे आवश्यक असते. या गणितात चूक झाली तर जहाज चिखलात रुतून बसू शकते किंवा त्याचा तळ खडकावर फाटू शकतो. आणि हे गणित अतिशय गुंतागुंतीचे असते.


न्यूटनने सतराव्या शतकात फक्त चंद्राचाच नाही तर सूर्याचाही भरती-ओहोटीवर परिणाम होतो हे सिद्ध केले आणि त्या दोहोंचा तुलनात्मक प्रभाव किती असेल याचेही गणित मांडले. हे गणित शास्त्रीय सिद्धांतांवर आधारित असले, तरी त्यात सुधारणेला खूप वाव होता. यात लाप्लासने अनेक सुधारणा केल्या. हळूहळू भरती-ओहोटीला कारणीभूत असलेले अनेक घटक शास्त्रज्ञांना मिळायला लागले. यात पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याने निर्माण होणारी केंद्रगामी प्रेरणा, सूर्याभोवतीच्या लंबवर्तुळाकार मार्गामुळे कमीजास्त अंतर आणि त्यामुळे बदलणारे गरुत्वाकर्षण, पृथ्वीचा झुकलेला अक्ष, चंद्राच्या कक्षेचा पृथ्वीच्या कक्षेशी असणारा कल, चंद्राची अनियमित वेगाने होणारी वाटचाल असे अनेक घटक हाती लागू लागले. याशिवाय इतर ग्रहांचे गुरुत्वाकर्षण, स्थानिक भूप्रदेशाची भौगोलिक ठेवण, पाण्याची खोली असे अतिरिक्त घटक आढळून येऊ लागल्यामुळे भरती-ओहोटीचे गणित अधिकाधिक क्लिष्ट होऊ लागले. यातले बहुतेक घटक हे नियमितपणे बदलणारे असल्यामुळे वेगवेगळेपणाने लहरींच्या स्वरूपात त्यांचे भाकीत करणे शक्य होते, पण अशा २० किंवा ३० घटकांचा एकत्रपणे विचार करणे आणि त्यांचा प्रभाव कोणत्या वेळी किती पडेल हे सांगणे सुमारे १५० वर्षांपूर्वी अशक्यप्राय वाटत होते.


अशा परिस्थितीत काही संशोधकांनी हा प्रश्न यांत्रिक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला. यात पृथ्वीचे मार्गक्रमण, चंद्राची कक्षा अशा प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व करणारी चाके किंवा कप्प्या वापरून त्या सर्वांच्या हालचालींची दोरीच्या किंवा तरफांच्या मदतीने एकमेकांशी बेरीज-वजावाकी करून एखाद्या वेळी भरतीची उंची किती असेल याचे भाकीत करण्याची यंत्रे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बनवण्यात आली. ते अगदी प्राथमिक अवस्थेतले संगणकच म्हणावे लागतील. आजमितीस चंद्राच्या भ्रमणाचा कालावधी पायाभूत मानून १९ वर्षांचे चक्र गृहीत धरून हे हिशेब संगणकाच्या मदतीने केले जातात. त्यात मिनिटे आणि सेंटिमीटर्सपर्यंत अचूक अंदाज करता येतात.


– कॅप्टन सुनील सुळे 

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~


तोंडाला पाणी का सुटत


══════════════════════

    @ संकलन गजानन गोपेवाड 


══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *तोंडाला पाणी का सुटतं ?* 📒

******************************

आपल्या तोंडात लाळग्रंथी असतात. यांचं काम तोंडात लाळेचा स्राव करण्याचं असतं. लाळेमध्ये असलेले काही पाचक पदार्थ व विकरं अन्नाच्या पचनात मोलाची भुमिका बजावत असतात. त्यामुळे जेव्हा आपण अन्नाचा घास तोंडात घेतो तेव्हा या ग्रंथींमधुन आपोआप लाळेचा पाझर व्हायला सुरुवात होते. त्या घासाचे दातांकडुन तुकडे पडत असताना त्यात लाळ मिसळुन त्यातल्या विकरांमुळे म्हणजेच रासायनिक कातर्‍यांमुळे त्यातील रसायनांच्या रेणुंचे तुकडे व्हायला सुरुवात होते. पचन व्हायला तिथुनच सुरुवात होते. या ग्रंथी काहीवेळा अधिकच उत्साह दाखवतात. त्यामुळे घास प्रत्यक्षात तोंडात पडण्यापुर्वी त्याच्या येण्याची वाट न पाहताच त्या कामाला लागतात. आपण अन्नाची चव जशी जिभेनं घेत असतो तशीच ती नाकानेही घेत असतो. खरं तर अन्नाचा स्वाद आणि सुगंध या दोन्हींचा एकसमयावच्छेदेकरुन वापर करुन आपण अन्नाची चव चाखत असतो. त्यामुळे आवडत्या किंवा मसालेदार पदार्थांचा सुगंध वातावरणात दरवळु लागला की त्या वासानंच आपली भुक चाळवली जाते. सहाजिकच तो पदार्थ आपल्या तोंडात कधी पडतो, याचीच वाट आपण पाहु लागतो. त्या भावनेपोटी मग आपल्या मेंदुतील विवक्षित मज्जापेशी उत्तेजित होतात. त्या आपलं काम करायला सुरुवात करतात आणि लाळग्रंथींना संदेश पाठवु लागतात. त्यांना प्रतिसाद देत मग त्या ग्रंथी कार्यान्वित होतात. त्यांच्यामधुन लाळेचा पाझर होऊ लागतो. यालच आपण पाणी सुटणं असं म्हणतो. काही वेळा अन्नाला तसा सुवास नसतो. पण तो पदार्थ पाहुनही मज्जापेशी चाळवल्या जातात आणि लाळग्रंथींना आदेश मिळतो. तोंडाला पाणी सुटतं ते यामुळेच. अशारितीनं ती एक प्रतिक्षिप्त म्हणजेच आपोआप होणारी घटना आहे.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

  

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

            *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


        *चक्रवर्ती राजगोपालाचारी*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*प्रथम भारतीय गवर्नर जनरल*


 *जन्म : १० दिसम्बर १८७८* 


(थोरापल्ली,कृष्णागिरी,तामिलनाडू)


   *मृत्यु : २८ दिसम्बर १९७२* 

                (उम्र ९४)

            (मद्रास, भारत)


राजनैतिक पार्टी : स्वतंत्र पार्टी 

                    (१९५९–१९७२)

अन्य राजनैतिक सहबद्धताएं : भारतीय राष्ट्रीय कांग्रेस 

                      (१९५७ से पहले)

इंडियन नेशनल डेमोक्रेटिक कांग्रेस      

                     (१९५७–१९५९)

जीवन संगी : अलामेलु मंगम्मा  

                    (१८९७–१९१६)

विद्या अर्जन : सेंट्रल कॉलेज

             प्रेसीडेंसी कालिज, मद्रास

पेशा : वकील, लेखक, राजनेता


चक्रवर्ती राजगोपालाचारी  राजाजी नाम से भी जाने जाते हैं। वे वकील, लेखक, राजनीतिज्ञ और दार्शनिक थे। वे स्वतन्त्र भारत के द्वितीय गवर्नर जनरल और प्रथम भारतीय गवर्नर जनरल थे। १० अप्रैल १९५२ से १३ अप्रैल १९५४ तक वे मद्रास प्रांत के मुख्यमंत्री रहे। वे दक्षिण भारत के कांग्रेस के प्रमुख नेता थे, किन्तु बाद में वे कांग्रेस के प्रखर विरोधी बन गए तथा स्वतंत्र पार्टी की स्थापना की। वे गांधीजी के समधी थे। (राजाजी की पुत्री लक्ष्मी का विवाह गांधीजी के सबसे छोटे पुत्र देवदास गांधी से हुआ था।) उन्होंने दक्षिण भारत में हिन्दी के प्रचार-प्रसार के लिए बहुत कार्य किया।


💁‍♂ *आरम्भिक जीवन*


उनका जन्म दक्षिण भारत के सलेम जिले में थोरापल्ली नामक गांव में हुआ था। राजाजी तत्कालीन सलेम जनपद के थोरापल्ली नामक एक छोटे से गांव में एक तमिल ब्राह्मण परिवार (श्री वैष्णव) में जन्मे थे। आजकल थोरापली कृष्णागिरि जनपद में है। उनकी आरम्भिक शिक्षा होसूर में हुई। कालेज की शिक्षा मद्रास (चेन्नई) एवं बंगलुरू में हुई।


✴ *मुख्यमंत्री*


सन १९३७ में हुए काँसिलो के चुनावों में चक्रवर्ती के नेतृत्व में कांग्रेस ने मद्रास प्रांत में विजय प्राप्त की। उन्हें मद्रास का मुख्यमंत्री बनाया गया। १९३९ में ब्रिटिश सरकार और कांग्रेस के बीच मतभेद के चलते कांग्रेस की सभी सरकारें भंग कर दी गयी थीं। चक्रवर्ती ने भी अपने पद से त्यागपत्र दे दिया। इसी समय दूसरे विश्व युद्ध का आरम्भ हुआ, कांग्रेस और चक्रवर्ती के बीच पुन: ठन गयी। इस बार वह गांधी जी के भी विरोध में खड़े थे। गांधी जी का विचार था कि ब्रिटिश सरकार को इस युद्ध में मात्र नैतिक समर्थन दिया जाए, वहीं राजा जी का कहना था कि भारत को पूर्ण स्वतंत्रता देने की शर्त पर ब्रिटिश सरकार को हर प्रकार का सहयोग दिया जाए। यह मतभेद इतने बढ़ गये कि राजा जी ने कांग्रेस की कार्यकारिणी की सदस्यता से त्यागपत्र दे दिया। इसके बाद १९४२ में 'भारत छोड़ो' आन्दोलन प्रारम्भ हुआ, तब भी वह अन्य कांग्रेसी नेताओं के साथ गिरफ्तार होकर जेल नहीं गये। इस का अर्थ यह नहीं कि वह देश के स्वतंत्रता संग्राम या कांग्रेस से विमुख हो गये थे। अपने सिद्धांतों और कार्यशैली के अनुसार वह इन दोनों से निरंतर जुड़े रहे। उनकी राजनीति पर गहरी पकड़ थी। १९४२ के इलाहाबाद कांग्रेस अधिवेशन में उन्होंने देश के विभाजन को स्पष्ट सहमति प्रदान की। यद्यपि अपने इस मत पर उन्हें आम जनता और कांग्रेस का बहुत विरोध सहना पड़ा, किंतु उन्होंने इसकी चिंता नहीं की। इतिहास गवाह है कि १९४२ में उन्होंने देश के विभाजन को सभी के विरोध के बाद भी स्वीकार किया, सन १९४७ में वही हुआ। यही कारण है कि कांग्रेस के सभी नेता उनकी दूरदर्शिता और बुद्धिमत्ता का लोहा मानते रहे। कांग्रेस से अलग होने पर भी यह अनुभव नहीं किया गया कि वह उससे अलग हैं।


✳ *राज्यपाल*


१९४६ में देश की अंतरिम सरकार बनी। उन्हें केन्द्र सरकार में उद्योग मंत्री बनाया गया। १९४७ में देश के पूर्ण स्वतंत्र होने पर उन्हें बंगाल का राज्यपाल नियुक्त किया गया। इसके अगले ही वर्ष वह स्वतंत्र भारत के प्रथम 'गवर्नर जनरल' जैसे अति महत्त्वपूर्ण पद पर नियुक्त किए गये। सन १९५० में वे पुन: केन्द्रीय मंत्रिमंडल में ले लिए गये। इसी वर्ष सरदार वल्लभ भाई पटेल की मृत्यु होने पर वे केन्द्रीय गृह मंत्री बनाये गये। सन १९५२ के आम चुनावों में वह लोकसभा सदस्य बने और मद्रास के मुख्यमंत्री निर्वाचित हुए। इसके कुछ वर्षों के बाद ही कांग्रेस की तत्कालीन नीतियों के विरोध में उन्होंने मुख्यमंत्री पद और कांग्रेस दोनों को ही छोड़ दिया और अपनी पृथक स्वतंत्र पार्टी की स्थापना की।


🎖 *सम्मान*


१९५४ में भारतीय राजनीति के चाणक्य कहे जाने वाले राजा जी को भारत रत्न से सम्मानित किया गया। भारत रत्न पाने वाले वे पहले व्यक्ति थे। वह विद्वान और अद्भुत लेखन प्रतिभा के धनी थे। जो गहराई और तीखापन उनके बुद्धिचातुर्य में था, वही उनकी लेखनी में भी था। वह तमिल और अंग्रेज़ी के बहुत अच्छे लेखक थे। 'गीता' और 'उपनिषदों' पर उनकी टीकाएं प्रसिद्ध हैं। इनके द्वारा रचित चक्रवर्ति तिरुमगन, जो गद्य में रामायण कथा है, के लिये उन्हें सन् १९५८ में साहित्य अकादमी पुरस्कार (तमिल) से सम्मानित किया गया। उनकी लिखी अनेक कहानियाँ उच्च स्तरीय थीं। 'स्वराज्य' नामक पत्र उनके लेख निरंतर प्रकाशित होते रहते थे। इसके अतिरिक्त नशाबंदी और स्वदेशी वस्तुओं विशेषकर खादी के प्रचार प्रसार में उनका योगदान महत्त्वपूर्ण माना जाता है।


⏳ *निधन*


अपनी वेशभूषा से भी भारतीयता के दर्शन कराने वाले इस महापुरुष का २८ दिसम्बर १९७२ को निधन हो गया।

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

आल्फेड नोबल

 *👨‍🔬👨‍🔬👨‍🔬आल्फ्रेड नोबेल👨‍🔬👨‍🔬👨‍🔬*

*********************************

              *स्वीडिश शास्त्रज्ञ*

)))))))))))))))))))))))))))))))))))))))))

*स्मृतिदिन - १० डिसेंबर १८९६*

 

आल्फ्रेड नोबेल (ऑक्टोबर २१, १८३३: स्टॉकहोम - डिसेंबर १०, १८९६) हा स्वीडिश शास्त्रज्ञ होता.

नोबेलचा जन्म २१ ऑक्टोबर १८३३ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वतः शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले. यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आल्फ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधुचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामायटाचा शोध लावला.

डायनामायटामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले व नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वतः इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्याकारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्वीडिश क्रोनरांचे विश्वस्त मंडळ स्थापले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देणे आरंभले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.

इ.स. १९५८ साली १०२ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या बनवण्यात आले; तेव्हा त्याला नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेलियम असे नाव देण्यात आले.

१० डिसेंबर १८९६ रोजी नोबेलचा मृत्यू झाला.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीर्ष मास,शुक्ल पक्ष,*सप्तमी*,शतभिषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु, युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, १० डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"सच्चे सम्बन्ध, शहद से अधिक मीठे एवं धन से अधिक मूल्यवान, रेशम से अधिक कोमल एवं दूध से अधिक उज्जवल(श्वेत), किसी भी मीनार से ऊँचे एवं किसी भी शक्ति स्रोत से अधिक शक्तिशाली होते हैं। अतः रिश्तों का मूल्य समझे एवं उन्हें सहेज एवं सम्भालकर कर रखें"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

ज्ञान विज्ञान विजेचा धक्का का बसतो ?*


══════════════════════

    संकलन गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *विजेचा धक्का का बसतो ?* 📒 

************************************

साधा दिवा लावायला जावं किंवा गरम पाण्यासाठी गिझर चालू करायला जावं आणि विजेचा धक्का बसावा, असा अनुभव कित्येक वेळा आलेला असतो. वास्तविक ही उपकरणे चालू करण्यासाठी असलेली बटनं इन्शुलेटेड केलेली असतात. म्हणजेच त्यांच्या बाह्यांगामधून विजेचा प्रवाह खेळणार नाही, अशी व्यवस्था केलेली असते. पण कधी कधी या व्यवस्थेला कुठेतरी तडा जातो आणि केवळ अंतरंगातूनच खेळणारी वीज या बाह्यांगातही प्रवेश करते. तिच्याशी आपला संपर्क आला की मग आपल्याला विजेचा धक्का बसतो. हे असं का होतं ? असा सवाल त्या धक्क्यानं गांगरुन गेल्यावरही आपल्या डोक्यात धुमाकूळ चालत राहतो.


 विद्युतबल हे विश्वाच्या जन्मापासून अस्तित्वात असलेलं मूलभूत बल आहे. विश्वाचा गाडा सुरळीत चालू राहण्यात ते महत्त्वाची भूमिका वठवत असतं. विद्युतबलामध्ये ऋण आणि धन असे दोन विद्युतभार असतात. सामान विद्युतभार एकमेकांना दूर लोटतात, तर विषम विद्युतभार एकमेकांकडे आकर्षित होतात; पण अशा एकमेकांकडे ओढ असणाऱ्या एक धन आणि दुसरा ऋण अशा विद्युतभारांना आपण एकमेकांपासून काही अंतरावर ठेऊ शकतो. त्यापोटी मग त्या दोन भारांमध्ये स्थितीजन्य ऊर्जा निर्माण होते. यालाच आपण विद्युत पोटेन्शियल म्हणतो. जर ते दोन टोकांवरचे भार एकत्र आले तर ही ऊर्जा व्होल्टेजच्या रूपात मोकळी होते. दूरवर राहूनही त्यांना एकत्र आणण्याचं काम ज्यांच्यामधून विद्युतभार सहजगत्या वाहू शकतो असे विद्युतवाहक करतात. तांब्याची तार किंवा साधं पाणी सुद्धा चांगले विद्युतवाहक आहेत. अशा तारेनं जर ते विद्युत भार जोडले गेले तर त्या वाहकातून म्हणजेच तारेतून विद्युतप्रवाह वाहू लागतो. याउलट लाकूड किंवा पोर्सेलीन यांच्यामधून विद्युतप्रवाह सहजगत्या वाहू शकत नाही. हे पदार्थ त्या प्रवाहाला विरोध करतात. त्यामुळे ते विद्युतरोधक बनतात. प्रवाहापासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी अशा विद्युतरोधकांचा वापर केला जातो.

 आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपले शरीरही चांगलं विद्युतवाहक असतं. त्यामुळे एका टोकाच्या विद्युतभाराशी आपल्या शरीराचा संपर्क आला तर शरीरातून विद्युतप्रवाह वाहू लागतो. त्यापोटी उद्भवणाऱ्या व्होल्टेजपोटी अनेक शरीरक्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात. होल्टेजचं प्रमाण जास्त असेल तर या अडथळ्यांची मात्राही जास्त असते. जोरदार धक्का बसल्यासारखी परिस्थिती निर्माण होते.

 

विद्युतप्रवाह नेहमी धन विद्युतभाराकडून ऋण विद्युतभाराकडे वाहत असतो. आपला संपर्क धन विद्युतभार असलेल्या टोकाशी झाला की विद्युतप्रवाह दुसऱ्या टोकाला असलेल्या ऋण विद्युतभाराकडे वाहू लागतो. अर्थात दुसऱ्या टोकाला असा ऋण विद्युतभार असण्याची आवश्यकता असते. जेव्हा आपण जमिनीवर उभे असतो तेव्हा तसा तो असतो; पण आपण लाकडावर जर उभे राहिलो तर दुसऱ्या टोकाला असा विद्युतरोधक असल्यामुळे विद्युतप्रवाह वाहू शकत नाही. त्यामुळे धक्का बसण्यापासून आपली सुटका होते.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन*