शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा देत आहे व कामगार दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देत आहे गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿ 

 🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची*🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                                   

       *१ मे - महाराष्ट्र दिन*                                                                                                                                   

    *"कणखर देशा,पवित्र देशा,प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा"*…… 

   दिल्लीचे तख्त राखणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा वाढदिवस म्हणजे ६० वर्षापूर्वी  १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मित्ती झाली.मागील ६० वर्षात महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे कि आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. कला, साहित्य, क्रीडा, व्यापार उद्योग, शिक्षण,आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट राज्य आघाडीवर असल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत.महाराष्ट राज्य आणि त्यासंबाधित अनेक पैलूचा आपण आढावा घेणार आहोतच पण त्याआधी आपणा  सर्वाना १ मे  म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांच्या मनःपूर्वक शुभेच्छा...


१ मे म्हणजे हक्काची सुट्टी…। या दिवशी काय असते? असा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर द्यायला अनेक जान सरसावतील आणि या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो असा सांगतील. पण, १ मे रोजी महारष्ट्र कामगार दिन का साजरा केला जातो? हे जाणून घेणे आवश्यक  आहे .


खर पहिला गेला तर १ मे  हा दिवस आंतरराष्ट्रीय  कामगार दिन! इतिहासाची उजळणी केल्यावर आपल्या असं लक्ष्यात येत कि औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्य जगतात रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध  होऊ लागले . कामगारांकडे काम होतं, मात्र त्यांची पिळवणूक सुरु होती. कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांना १२ तास १४ तास काम कराव लागत असे . याविरोधात कामगार एकजूट झाले आणी त्यांनी उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद  उमटू लागले. अखेर कामगाराची कामाची वेळ ८ तास निश्चित करण्यात आली. यानंतर कामगारांच्या हक्कासंदर्भात दोन अंतराष्ट्रीय परिषदा झाल्या. नंतर १ मे १८११ पासून कामगार दिन साजरा केला जाऊ लागला. महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार दिनाला संयुक्त महाराष्टाच्या चळवळीचा संदर्भ आहे, संयुक्त महारष्ट्रचा लढा वेगवेगळ्या स्तरावर लढला  गेला. या लढ्यात  कामगारांनी घेतलेली  अत्यंत महात्वाची होती. त्याच्या सहभागामुळेच हा लढा खर्या अर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला, याच कारणामुळे १ मे १९६० रोजी मराठी भाषिकासाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट दिन बरोबरच कामगार दिन हि मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला.


आता यानंतर आपण संयुक्त महाराष्ट्रचा लढा आणि  त्यानंतरचा महाराष्ट्र यावर नजर टाकूया…मराठी  भाषिकासाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी हि संकल्पना दस्तुरखुद्द लोकमान्य टिळक यांनी १९०६ साली मांडली होती. १९१९ साली कॉग्रेसंच्या जाहीरनाम्यात लोकमान्य टिळक याच्या अध्यातेखाली या संदर्भातील ठराव नमूद करण्यात आला होता. पण असं असलं तरी कालांतराने महाराष्ट्र् राज्याची वेगळी निर्मिती व्हावी याला कॉग्रेसंमधूनच विरोध होत गेला. कधी बॉम्बें  हे व्दिभाषिक राज्य व्हावं, तर कधी विदर्भ वेगळा राज्य व्हाव अशा नानाविध सूचना पुढे येऊ लागल्या. दरम्यान चलेजाव आंदोलनान जोर धरला होता तर दुसरीकडे दुसर  महायुद्ध जोरात सुरु होत, हि परिस्थीती लक्षात घेऊन संयुक्त  महाराष्ट्र चळवळीत सहभागी असलेल्या कार्यकत्यांनी  जरा सबुरीन घेत थोडीशी माघार घेतली होती. १३ एप्रिल १९४७ रोजी झालेल्या अकोला करार अंतर्गत असा ठराव करण्यात आला की महाराष्ट्र एकीकरण परिषद महा विदर्भा, मराठवाडा, बॉम्बे आणि उर्वरित महाराष्ट्र याच्या एकत्रीकरणासह संयुक्त  महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कार्यरत राहील.काही महिन्यातच भारत स्वतंत्र झाला. अखंड भारत देश हि संकल्पाना अस्तित्वात आली. संस्थाने खालसा करण्यात आली १९५३ साली तेलगु भाषिकांसाठी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. १९५५ च्या दरम्यान डाव्या पक्षांनी बॉम्बे बंद चा इशारा दिला, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २० मार्च १९५५ रोजी गिरगाव  इथं काढण्यात आलेला मोर्चा रोखण्याचे आदेश  मोरारजी देसाई यांनी दिले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी डाव्या पक्षांनी काढलेल्या मोर्चावर हुतात्मा चौक इथं  मोरारजी देसाई सरकारने अमानुष लाठीचार्ज केला. एवढ्यावर न थांबता मोर्चा वर गोळीबार कारण्यात  आला. यात शेकडो जन जखमी झाले तर १०५ जनाचे प्राण गेले.


या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राचं  आंदोलन अधिक तीव्र झाला. ६ फेब्रुवारी  १९५६ रोजी केशवराव  जेधे यांच्या  अध्यक्षतेखाली  पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये   आचार्य अत्रे, प्रबोधनकर ठाकरे, सेनापती बापट,शाहीर अमर शेख अशा एका पेक्षा एक मातब्बर मंडळींचा   समावेश होता. यानंतरच्या काळात  आचार्य अत्रे यांनी मराठा मधून नेहरू आणि कॉंग्रेस सरकारच्या धोरणावर शब्दाच्या रुपात घणाघाती हल्ला करायला सुरुवात केली . शाहीर अमर शेखांसह अनेक शाहिरांच्या पोवाड्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे आंदोलन पोहचवलं आणि डाव्या पक्षांच्या, कामगार संघटनांच्या साथीन एक मोठी चळवळ उभी राहिली. पण, सरकार मात्र मानायला तयार नव्हतं. नेहरू सरकारच्या दुटप्पीपणाच्या धोरणाला विरोध करत तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. जनतेचं उत्स्फूर्त आंदोलन आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन अखेर २१ एप्रिल १९६० रोजी लोकसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन, मुंबई (बॉम्बे) महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. अशा रीतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.                                            🌐 *1 मे - महाराष्ट्र दिन*

                                                   1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.


महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.


संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले.


देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेशएकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.


महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥॥ अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा अशा शब्दांत स्वाभिमान जागवला आहे. वसंत बापटांनीही भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा म्हणत महाराष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र होय. श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले. संत ज्ञानेश्वररांनी माझा मऱ्हाटाचि बोल कवतुके। परी अमृतातेंहि पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें । मेळवीन॥ अशा शब्दांत मराठीचे माधुर्य मांडले आहे. मा.त्र्यं.पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांनी मराठी असे आमुची मायबोली म्हणत भाषेची थोरवी वर्णिली आहे. गं.रा.मोगरे यांनी माता तशी स्वभाषा, सेवाया होय आपणा उचित। किंबहुना मातेहुनि अधिक हिची योग्यता असे खचित॥॥ म्हणून भाषेचा गौरव केला आहे. ना.के.बेहेरे यांनी भाषा आमुची छान। मराठी। भाषा आमुची छान॥ भाषा भिन्ना देशदेशच्या सर्वांची परि खाण॥ म्हणून मराठीचे श्रेष्ठत्व सांगितले. संत एकनाथ महाराजांनी संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली ? ॥ असा परखड प्रश्न विचारला आहे. ख्रिस्तदास स्टीफन यांनी जैसी हरळां (खडा) माजि रत्नकिळा। कि रत्ना माजि हिरानिळा। तैसी भासां माजि चोखाळ। भासा मराठी॥ या शब्दांत मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला आहे. ना.गो.नांदापूरकर यांनी माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे अशा रसदार शब्दांत मराठीचा गोडवा गायिला आहे.


महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धारआपण करावयास हवा.                                                    🏵️ २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.


त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.


या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६



गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

29 एप्रिल मराठी शास्त्रज्ञ शंकर भिसे जयंती

 *🇮🇳🇮🇳शंकर आबाजी भिसे🇮🇳🇮🇳*

👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬

*एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक*

🚋🚋🚋🚋🚋🚋🚋🚋🚋🚋

*जन्मदिन - २९ एप्रिल १८६७*


     डॉ. शंकर आबाजी भिसे (इंग्लिश: Shankar Aabaji Bhise) (जन्म मुंबई, २९ एप्रिल १८६७; मृत्यू : ७ एप्रिल १९३५) हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. 


संशोधन आणि आविष्कार

त्याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७मध्ये ' इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड' नामक मासिकाने 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करुन देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती.


पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आणि त्यांतील ४०हून अधिक आविष्कारांची पेटंटे घतली.


१९०० साली मद्रास येथे भरलेल्या 'इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस'चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसोटाइप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि नंतर ते जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले आणि त्याचे पहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये, २ डिसेंबर १९०१ रोजी घेतले. नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही 'भिसोटाइप’ची पेटंटे घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली, पण १९१५साली ही कंपनी बंद पडली. . १९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाइप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाइप कास्टर’ या यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी 'अमेरिकन भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन'ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय अशी अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे, डॉ. भिसे यांनी बनविले. त्यांच्या टाइप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एस्‌सी. ही पदवी दिली.


भिसे यांनी काचेचा कारखाना काढला. १८९० मध्ये उत्तर हिंदुस्थानात जाऊन आग्रा लेदर फॅक्टरी काढली. भिसे यांनी सामाजिक कार्य देखील केले. धी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. दादाभाई नौरोजींच्या सहाय्याने भिसे यांनी १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.


सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.


१९१० मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले एक भारतीय औषध त्यांना फार गुणकारी वाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण करून घेतले. त्यात आयोडीन असल्याचे कळताच भिसे यांनी १९१४ साली एक नवीनच औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले. अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध, भिसे यांनी बनवले. आणि त्याच्या उत्पादनासाठी न्यूयॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ’ॲटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.


*भिसे यांनी आविष्कार केलेली यंत्रे*

मुंबई उपनगरीय रेल्वेत गर्दीमुळे अपघात होतात. डब्यात लोंबकळणारे प्रवासी खाली पडतात व मरतात. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी २०१६साली केली, पण आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध डॉ. भिसे यांनी १८९८ मध्ये लावला होता. त्या काळात आजच्यासारखी गर्दी नव्हती, पण पुण्याहून मुंबईस येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाजात चिरडली. त्यामुळे रेल्वेवर टीका झाली. अशा प्रकारचा अपघात टळावा म्हणून डॉ. भिसे यांनी असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातले वा कोणी निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. या शोधाचे पेटंट भिसे यांनी घेतले नाही. मुंबईतील प्रदर्शनात त्यांनी या स्वयंचलित दरवाजाचे नमुने ठेवले व त्यास बक्षीस मिळाले. आज आपल्याला जे हवे आहे ते डॉ. भिसे यांनी १८९८ मध्येच निर्माण केले.

स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र. स्पर्धेसाठी बनविलेले यंत्र. यासाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले.

स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र - त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला.

आज आपण प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत.

भिसे मुद्रण यंत्र - हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी. हे यंत्र १९१६मध्ये विक्रीला आले.

मिनिटाला २४०० टाइप(खिळे) पाडणारे आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवले होते.

त्यांनी पगड्या तयार करण्याचे यंत्र बनवले. पिठाच्या चक्क्या बनवल्या. सायकल जागच्या जागी उभे करणारे स्वयंचलित यंत्र, १९०६ साली तारेने दूरवर फोटो पाठविण्याची युक्ती त्यांनी शोधून काढली.

डॉ. भिसे यांनी ‘टिंगी’नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला. टिंगीमुळे अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत.

सौर ऊर्जेवर चालणार्‍या मोटारीचा शोध १९१८ सालीच लावून ते मोकळे झाले.

समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा.

वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र.

धुण्यासाठी ' रोला ' नावाचा रासायनिक पदार्थ.

जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) - या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली.

बॉडी मसाजरचा शोध त्यांनी त्या काळात लावला. डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे हे यंत्र होते. त्यांनी ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’ बनवले.


एडिसन

भिसे हे खर्‍या अर्थाने आपले ‘एडिसन’ होते, पण स्वातंत्र्यानंतर हा एडिसन उपेक्षित राहिला. भिसे यांचा सन्मान म्हणून त्यांच्यावर एक टपाल तिकीट काढावे यासाठी दिलीप प्रभाकर गडकरी व पार्ल्याचे रघुनाथ पी. मेढेकर २०१० सालापासून प्रयत्न करीत आहेत. भिसे यांच्या संशोधन कार्याबाबत सर्व माहिती व पुरावे सादर करूनही त्यांचे पोस्टाचे तिकीट निघू शकले नाही व ही मागणी फेटाळण्यात आली.


कारकीर्द

शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्यामुळे उत्तेजनार्थ त्यांनी शंकररावांना महिना ३० रुपये पगारावर अकाउन्टन्ट जनरलच्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटवले.


गौरव

जागतिक दर्जाच्या 'हू’ ज 'हू' या संदर्भग्रंथात भारताचे एडिसन असे म्हणून शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आले आहे. खऱ्या थॉमस अल्व्हा एडिसननेही भिसे नामक भारतीय एडिसनची २३ डिसेंबर १९३० रोजी न्यू जर्सी येथे भेट घेतली होती. २९ एप्रिल१९२७ रोजी, म्हणजे भिसे यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ’अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र त्यापूर्वीच म्हणजे १९०८ सालापासूनच अमेरिकन वृत्तपत्रे भिसे यांचा भारताचे एडिसन म्हणून उल्लेख करीत होती.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन-)

गजानन गोपेवाड 

7378670283

उमरखेड जिल्हा-यवतमाळ ४४५२०६

आँक्सीजन चे शोध कर्ता जोसेफ


 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*💨💨जोज़ेफ़ प्रीस्टलि💨💨*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

 (Priestley, Joseph; सन् १७३३ - १८०४) 

     १८वीं शती के जगत्प्रसिद्ध, अंग्रेज रसायनज्ञ थे,जिन्होंने ऑक्सीजन की खोज की थी।



जोस्फ प्रिस्टले

*परिचय*


जोजेफ प्रिस्टले का जन्म लीड्ज़ के समीप फील्डहेड में हुआ था। बाल्यकाल में स्वास्थ्य अनुकूल न होने के कारण बहुत दिनों तक इनका अध्ययन बदं रहा और ये इधर उधर व्यापार संबंधी काम करते रहे। बाद को डॉ॰ डॉडरिज (Doddridge) द्वारा डेवेट्री में स्थापित एक अकादमी में इन्होंने धर्मशिक्षा प्राप्त की। प्रीस्टलि ने रूढ़िगत परंपराओं के प्रति आस्था प्रकट न की और अपने निजी ढंग पर प्रत्यक्ष और परोक्ष के प्रश्नों पर विचार करना प्रारंभ किया। १७५५ ई. में ये सफक (Suffolk) के एक छोटे से समुदाय के नीडैम मार्केट में पादरी हो गए। यहाँ इन्होंने एक पुस्तक 'दी स्क्रिपचर डॉक्ट्रिन ऑव रेमिशन' लिखी, जिसमें ईसा की मृत्यु और पाप संबंधी प्रचलित विचारों का विरोध किया गया था। १७५८ ई. में इन्हांने नीडैम अकादमी छोड़ दी और नैटविच चले गए। १७६१ ई. में ये बैरिगटन की एक अकादमी में भाषाओं के अध्यापक हो गए। यहीं प्रिस्टलि का साहित्यिक जीवन आरंभ हुआ। इनका लंदन आना जाना लगा रहता था, जिससे प्रिस्टलि का परिचय फ्रैंकलिन से हो गया। फ्रैंकलिन ने जो सामग्री इन्हें प्रदान की, उसके आधार पर प्रीस्टलि ने १७६७ ई. में विद्युत् संबंधी पुस्तक 'हिस्ट्री ऐंड प्रेजेंट स्टेट ऑव इलेक्ट्रिसिटी' लिखी। इसके बाद ही इनकी प्रकाश संबंधी पुस्तक 'विज़्हन, लाइट ऐंड कलर्स' (दृष्टि, प्रकाश और रंग) प्रकाशित हुई। १७६२ ई. में इन्होंने भाषा और सर्वमान्य व्याकरण के सिद्धांत पर एक पुस्तक लिखी।


१७६४ ई. में इन्हें एल-एल.डी. की उपाधि एडिनबरा से मिली और १७६६ ई. में ये रॉयल सोसायटी के फेलो निर्वाचित हुए। इगले वर्ष ये लीड्ज़ में एक गिरजा के पादरी हो गए। यहाँ इनके घर के निकट शराब बनाने का एक छोटा कारखाना प्रारंभ हुआ। प्रीस्टलि ने इस कारखाने में रुचि लेना प्रारंभ किया, जिसके कारण इनका ध्यान रसायन विज्ञान की ओर आकर्षित हुआ। पर प्रमुख वृत्ति अभी साहित्यिक ही थी। १७७३ ई. में ये लार्ड शेलबर्न के साहित्यिक सहायक नियुक्त हुए और यूरोप की यात्रा की। 'मैटर और स्पिरिट' (प्रकृति और पुरुष) पर एक ग्रंथ लिखा, जिसमें प्रकृति में चेतनता और आत्मा में जड़ता, इस प्रकार विरोधी भावों का समन्वय करना चाहा। ये विज्ञान की सत्यता की अपेक्षा बाइबिल की सत्यता में अधिक आस्था रखते थे। बाद को लार्ड शेलबर्न का साथ इन्होंने छोड़ दिया और बर्मिघम के गिरजे के पादरी बने। यहाँ इन्होंने ईसा मसीह से संबधित विवादास्पद विचारों पर एक पुस्तक लिखी, जिसका नाम 'हिस्ट्री ऑव अर्ली ओपिनियन्स कन्सर्निग जीसस क्राइस्ट' है। बर्क की एक पुस्तक 'रिफ्लेक्शन्स ऑन फ्रेंच रेवोल्यूशन' का प्रीस्टलि ने उत्तर लिखा, जिसके परिणामस्वरूप इन्हें फ्रेंच रिपब्लिक का नागरिक बना लिया गया। इस नागरिकता के कारण इनके नगर के लोग बिगड़ उठे, उन्होंने इनका घर लूट लिया और इनकी पुस्तकें तथा पांडुलिपियाँ जला दीं। इसी समय इनके एक बहनोई की मृत्यु हुई और इन्हें उसकी १०,००० पाउंउ की संपत्ति मिल गई। इनके स्वतंत्र विचारों ने इन्हें कहीं चैन से टिकने न दिया। विरुद्ध लोकमत से तंग आकर ये १७९४ ई. में अमरीका चले गए, जहाँ इनका अच्छा स्वगत हुआ। पेनसिलवेनिया के फिलाडेल्फिया नगर में ६ फ़रवरी १८०४ ई. को इनकी मृत्यु हो गई।


प्रीस्टलि ने गैसों पर बहुत काम किया। ये सब प्रयोग इन्होंने अवकाश के समय में किए थे। १७७४ ई. में इन्होंने छह खंडों में 'ऑबज़र्वेशन्स ऑन डिफ़रेंट काइंड्स ऑव एयर', अर्थात् विभिन्न प्रकार की हवाओं संबंधी परीक्षण विषयक पुस्तक प्रकाशित की। इन्होंने अपने प्रयोगों के उपकरणों की स्वयं खोज की। प्रीस्टलि ने नई गैसों की भी खोज की और इनमें से जो गैसें पानी में बहुत विलेय थीं, (जैसे अमोनिया और सल्फर डाइऑक्साइड), उन्हें पारे के ऊपर इकट्ठा करने की विधि बताई। ऑक्सिजन की खोज इन्होंने १७७४ ई. में की। लगभग इन्हीं दिनों शीले (Scheele) ने भी स्वतंत्र रूप से यह गैस स्वीडन में तैयार की थी। प्रीस्टलि ने पारे के ऑक्साइड पर सूर्य की किरणें १२ इंच व्यास के लेंस द्वारा केंद्रित की। ऐसा करने पर उन्होंने देशा कि एक गैस आसानी से निकल रही है। यह गैस पानी में नहीं घुलती थी और इसमें मोमबत्ती जोरों से जलती थी। इन्होंने इस गैस के भीतर साँस की खींची और साँस लेने में उन्हें सुविधा प्रतीत हुई। इस प्रकार प्रीस्टलि ने ऑक्सिजन की खोज कर डाली। प्रीस्टलि ने नाइट्रिक ऑक्साइड, नाइट्रस ऑक्साइड, सलफ्यूरस अम्ल, कार्बोनिक ऑक्साइड, हाइड्रोक्लोरिक अम्ल और अमोनिया आदि गैसों पर महत्वपूर्ण कार्य किया।

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

मिरगी का? येते.

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

     *📱अग्निपंख फाउंडेशन ऊमरखेड यवतमाळ 📱*

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═══════════════════════

📕 *मिरगी वा फेफरे का होते?* 

********************************

निरोगी माणसाला अचानक झटका येणे, क्वचित बेशुद्धी येणे, हा मिरगी वा फेफऱ्याचा परिणाम असतो. फेफरे अनेक प्रकारचे असते. एखाद्या अवयवापुरता झटका येण्यापासून सर्व शरीराला आकडी येणे, बेशुद्ध पड़णे असे अनेक प्रकार दिसून येतात. यालाच इंग्रजीत 'एपीलेप्सी' असे म्हणतात. अँड माल वा मोठे फेफरे या प्रकारात सर्व शरीराला झटका येतो, तोंडाला फेस येतो, शुद्ध हरपते व तेवढ्यापुरती स्मरणशक्ती जाते. काही प्रकारच्या फेफर्‍यात काही काळ शुद्ध हरपते, झटके येत नाहीत. पेटीट माल वा लहान फेफरे या प्रकारात स्मरणशक्ती शाबून राहते, शुद्धही हरपत नाही. फक्त एखाद्या भागापुरताच झटका येतो.


मेंदूतल्या विशिष्ट भागातील विद्युतप्रवाहामध्ये अचानक विघाड झाल्यास फेफरे होते, हे वैद्यकशास्त्राला ज्ञात आहे. पण ते का होते, ते मात्र खात्रीने सांगता येत नाही. मिरगीच्या कारणात अनुवंशिकता, जन्माच्या वेळी डोक्याला झालेली इजा, मेंदूतील वा डोक्यातील गाठ, रक्तप्रवाहात बिघाड इत्यादींचा समावेश होतो. खूप तापात, मधुमेहासारख्या रोगात व रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले, तरीही झटके येतात; पण मिरगीचे झटके बऱ्याच वेळा येतात. तसेच त्यासोबत वर सांगितलेले (मधुमेह बगैरे) आजार असतील असे नाही. मिरगीचे निदान व उपचार तज्ज्ञांकडूनच करून घ्यावे. गार्डीनल, डायलॅटीन, टेग्रेटॉल यांसारख्या परिणामकारक औषधांचा वापर करून मिरगी हा रोग नियंत्रणात ठेवता येतो. पाच वर्षांत जर व्यक्तीला एकदाही झटके आले नाही, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार थांबवता येतात.


अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी झटका आलेल्या व्यक्तीची नीट काळजी घ्यावी. जीभ चावली जाऊ नये यासाठी दातांमध्ये लाकडी पट्टी वा कपडा ठेवावा. अशा व्यक्तीने मशिनवर काम करू नये, वाहन चालवू नये. तसेच पोहणे, आगीजवळ काम करणे अशा गोष्टी कदापिही करू नयेत. रुग्णाच्या जवळ त्याचे नाव, पत्ता, घेत असलेले उपचार आदी माहिती असलेले कार्ड नेहमी ठेवावे; म्हणजे अपघाताच्या वेळी वा आकस्मिकपणे काही झाल्यास त्या माहितीचा उपयोग होईल.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

मनोविकास प्रकाशन


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

  *📱गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 📱*

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

═══════════════════════


═══════════════════════