सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

ज्ञान विज्ञान थकवा का येतो


══════════════════════

    @ संकलन 

  श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

😰 *थकवा का येतो ?* 😰

"""""""""""""""""""""""""""""""""""""

काही काही शब्द आपण सहजपणे वापरतो. 'थकलो रे आज' असं म्हणणं त्याच जातकुळीतलं आहे. कारण काहीही न करता काही मंडळींना थकायला होत असतं. पण इथं आपल्याला ज्या थकव्याचा विचार करायचा आहे तो अंगमेहनतीचं काम केल्यानंतर येणारा. सकाळी जॉगिंग करणाऱ्याला काही विशिष्ट अंतरानंतर थकवा जाणवायला लागतो किंवा तालमीत जोर बैठका काढणार्याला किंवा वजन उचलण्याचा व्यायाम करणाऱ्यालाही थकवा जाणवायला लागतो. भर उन्हात शेतकी खेळ करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीलाही शतक पूर्ण करता करताच थकवा जाणवायला लागतो. तो का ? 


अंगमेहनतीचं काम करताना आपण आपल्या शरीरातल्या स्नायूंना कामाला लावत असतो. हे काम करण्यासाठी अर्थात स्नायूंना ऊर्जेची गरज भारत भासते. ती एटीपी या रसायनातून त्यांना मिळते. अंगातल्या ग्लुकोज या इंधनाचं ज्वलन झालं की त्या जीवारासायनिक प्रक्रियेतून एटीपीची निर्मिती होते; पण त्या ज्वलनासाठी सहाजिकच ऑक्सिजनची गरज असते. रक्तातून त्याचा पुरवठा होतो; पण आपण स्नायूंना अधिक वेगानं काम करायला लावलं की त्याची ऑक्सिजनची गरजही वाढते. ती हृदय, अधिक वेगानं काम करून पुरवतं. आपल्या श्वासोच्छवासाचा वेगही वाढवावा लागतो; पण याला मर्यादा असते. स्नायूंचा काम करायचा वेग त्या मर्यादेपलीकडे वाढला की मग या प्रक्रियेकडून होणारी एटीपीची निर्मिती पुरेशी पडत नाही.

तसं झालं की शरीर एटीपीचे उत्पादन करणाऱ्या पर्यायी ऑक्सीजनविरहित प्रक्रियेला चालना देतं. त्या प्रक्रियेत ग्लूकोज ऐवजी शरीरात साठवलेल्या ग्लायकोजेनचा इंधन म्हणून वापर केला जातो. त्या प्रक्रियेत ग्लायकोजेनचे ग्लुकोज आणि पायरुव्हिक आम्ल या दोन घटकांमध्ये विभाजन होतं. त्यातल्या पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर मग लॅक्टिक आम्लात होतं. आपल्या भाषेत याला दुधाचं आम्ल म्हणायला हरकत नाही.


हे लॅक्टिक आम्ल स्नायूंना विषासारखं असतं. त्यांच्या आकुंचन प्रसारणाच्या क्रियेत बाधा अाणतं. लॅक्टिक आम्ल जसजसं साठत जातं तसतसे जास्तीत जास्त स्नायू त्याच्या प्रभावाखाली येतात. त्यांची काम करण्याची क्षमता घटत जाते. त्या आम्लाचा निचरा करणारी यंत्रणा कामाला लागते. त्यामुळे ते आम्ल रक्तात उतरतं. त्यातून मग ते जे स्नायू प्रत्यक्ष काम करत नसतात त्यांच्यापर्यंतही पोहोचतं. तसं झालं की ते स्नायूही आखडल्यासारखे होतात.  आपल्याला थकवा जाणवायला लागतो.


उत्तम खेळाडू अर्थात नियमित व्यायाम करून आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढवत असतात. त्यामुळे स्नायूंना ऑक्सिजन पुरविण्याचे काम ते अधिक काळ करू शकतात. साहजिकच त्यांच्या शरीरात लॅक्टिक आम्ल जमायला वेळ लागतो. त्यांना लवकर थकवा जाणवत नाही. त्यांचा दम अधिक टिकतो.



*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

रतन टाटा

 *जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा*

🛫🛬🛩️✈️🛫🛬🛩️✈️🛫🛬

            *भारतीय उद्योजक*

      *पहिले भारतीय वैमानिक*

🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭

*स्मृतिदिन - नोव्हेंबर २९ इ.स. १९९३*

 🏨🏨🏨🏨🏨🏨🏨🏨🏨🏨

जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा (जुलै २९, इ.स. १९०४ - नोव्हेंबर २९ इ.स. १९९३) हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.

जीवन

टाटांचा जन्म जुलै २९, इ.स. १९०४ मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले. काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.

उद्योजक पदभार

इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. इ.स. १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स. १९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे इ.स. १९४६ साली तिचे नाव बदलून एर इंडिया ठेवले गेले.

वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे इ.स. १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने इ.स. १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.

टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स. १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स. १९४१ साली मुंबईत सुरू केले.

पुरस्कार

टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स. १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर इ.स. १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले.


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *दशमी*,उ.फा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, २९ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


निश्चित्वा यः प्रक्रमते 

                  नान्तर्वसति कर्मणः,

 अवन्ध्यकालो वश्यात्मा 

                  स वै पण्डित उच्यते।।


भावार्थः- जिनके प्रयास एक दृढ़ प्रतिबद्धता से शुरु होते हैं, जो कार्य पूर्ण होने तक ज्यादा विश्राम नहीं करते हैं, जो समय नष्ट नहीं करते हैं और जो अपने विचारों पर नियंत्रण रखते हैं, वह बुद्धिमान है।

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

ज्योतीराव फुले

 *जोतीराव गोविंदराव फुले*

📚📚📚📚📚📚📚📚📚📚

*स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक*

📚📚📚📚📚📚📚📚📚📚

*स्मृतिदिन - २८ नोव्हेंबर १८९०*


महात्मा जोतीबा फुले 

     एप्रिल ११, इ.स. १८२७ 

     नोव्हेंबर २८, इ.स. १८९०

      हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.


सामाजिक कार्य

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -

     *“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।*

       *नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।*

       *वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”*

जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतक-र्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *नवमी*,पू.फा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, २८ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *यह सत्य है कि संकल्प के अभाव में शक्ति का कोई महत्त्च नहीं है। उसी प्रकार यह भी सत्य है कि शक्ति के अभाव में संकल्प भी पूरे नहीं होते। केवल संकल्प करते रहने वाला निरुद्यमी व्यक्ति उस आलसी व्यक्ति की तरह कहा जाएगा, जो अपने पास गिरे हुए आम को उठाकर मुँह में भी रखने का प्रयास नहीं करता और इच्छा मात्र से आम का स्वाद ले लेने की आकाँक्षा करता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

अँडर्स सेल्सिअस गणितज्ञ

 *अँडर्स सेल्सियस*


*एक स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ*


*जन्मदिन - २७ नोव्हेंबर १७०१*

 

अँडर्स सेल्सियस (स्वीडिश: Anders Celsius; २७ नोव्हेंबर १७०१, उप्साला - २५ एप्रिल १७४४, उप्साला) हा एक स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता. सेल्सियस हे तापमान मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.

स्वीडनच्या उप्साला शहरामध्ये जन्मलेला सेल्सियस १७३० ते १७४४ दरम्यान उप्साला विद्यापीठामध्ये खगोलशास्त्राचा प्राध्यापक होता.

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *अष्टमी*,मघा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, २७ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


नाभिषेको न संस्कार:,

              सिंहस्य क्रियते मृगैः,

विक्रमार्जितराज्यस्य,

              *स्वयमेव मृगेंद्रता ...*


*भावार्थ - जंगल का साम्राज्य, सिंह को कभी अपना राजा, राज्याभिषेक का उत्सव मनाकर घोषित नहीं करता। सिंह अपना राज्य स्वयं अपने पराक्रम से अर्जित करता है !*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

26 नोव्हेंबर संविधान दिन

 *२६ नोव्हेंबर - संविधान दिन*

📖📖📖📖📖📖📖📖📖📖

             *भारताचे संविधान*

      *भारतातील सर्वोच्च कायदा*


    *भारतीय संविधान उद्देशिका*


घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटना संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द करतांना, २६ नोव्हेंबर १९४९   (कृपया फोटो बघा)


भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब अांबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.


📜 *इतिहास*


भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीच्या इतर सदस्यांसमवेत. (बसलेल्या पैंकी डावीकडून) एन. माधवराव, सय्यद सदुल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, सर बेनेगल नरसिंह राव. (उभे असलेल्या पैंकी डावीकडून) एस.एन. मुखर्जी, जुगल किशोर खन्ना व केवल कृष्णन् (२९ जाने, इ.स. १९४७)

 (कृपया फोटो बघावा)


१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of १९३५) वर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर  १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृह मध्ये पार पडली कि, जे आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते . १५ ऑगस्ट  १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.


२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर  १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.


📖 *स्वरूप*


भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ३९५ (डिसेंम्बर २०१८) कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते. भारताची घटना हि अतिशय लवचिक असून जगातील इत्तर घटनेपेक्षा जास्त प्रकारचे कायदे करता येतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला एकाच नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.


📒 *तोंडओळख व महत्त्वाची अंगे*


भारतीय संविधानात अनेक पाश्चात्त्य देशांच्या उदारमतवादी राज्यघटनांचा व ब्रिटिश वसाहतवादी संविधानाच्या पायाभूत तत्त्वांशी मेळ घालण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन् भारताच्या व्हॉईसरायकडे असलेले प्रमुख पद नव्या व्यवस्थेत राष्ट्रपतीकडे सोपवण्यात आले व व्हाईसरॉयचे प्रशासकीय अधिकार पंतप्रधानांकडे देण्यात आले आहेत. राज्यघटनेच्या ७४ व्या कलमानुसार राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादित असून ते केवळ मंत्रिमंडळास सल्ला देऊ शकतात. राष्ट्रपती हे तीनही सैन्यदलांचे प्रमुख असतात. ब्रिटिश व्यवस्थे प्रमाणे भारतीय संसदही द्विगृही (Bicameral) आहे.


📖 *उद्देशिका*


मुख्य पान: भारतीय संविधान उद्देशिका

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक (Republic) आहे. उद्देशिका फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून नागरिकांस -


सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय

आचार,विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य

आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन देते.

मूळ उद्देशिकेत समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या ४२व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.


🗳 *मूलभूत अधिकार*


भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी (liberal character) रूपाची प्रचिती विभाग ३ मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये सामान्य मानवी अधिकारांचा समावेश आहे जसे - कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म, वंश, जात, लिंग वा प्रांत आदी मुद्द्यांधारे न केला जाणारा भेदभाव (कलमे १२ -१८) दलितांवरच्या अत्याचारा विरुद्धचे कलम १७ विशेष महत्त्वाचे आहे. अस्पृश्यता पाळणे हा या कलमाने दंडनीय गुन्हा आहे. घटनेत पाच मूलभूत प्रकारचे अधिकार ओळखण्यात आले आहेत.


स्वातंत्र्य (कलम १९-२२): भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य सभा वा संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य (कलम १९)

कायदा (कलम २०), जीविताचा अधिकार (कलम २१), काही बाबींमध्ये अटक वा कैदेचे स्वातंत्र्य (कलम २२)

शोषणाविरूद्ध संरक्षण (कलम २३ व २४): बालमजूरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून सं‍रक्षण

धर्मस्वातंत्र्य (कलम २५-२८) : पूजा व आचरणाचे स्वातंत्र्य

अल्पसंख्याकांचे अधिकार (कलम २९ व ३०): अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य

घटनात्मक तक्रारींचा अधिकार (कलम ३२-३५): मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीस कलम ३२ अन्वये सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा हक्क आहे.

मालमत्ता बाळगण्याचा अधिकार देणारे कलम ३१ हे १९७८ साली वगळण्यात आले होते. ही वगळण वादग्रस्त ठरली होती.


📘 *सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे*


राज्यघटनेच्या चौथ्या विभागात राज्य व संघ स्तरावरील सरकारे तसेच संसदे/विधानसभा यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. यात सामाजिक अधिकार - जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना कामे करणे सुलभ होईल अशी कार्यालये (human working conditions and appropriate environment) आदी. कलम ४३ अन्वये समाविष्ट आहेत. कलम ४५ अन्वये १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण हे शासनाचे दायित्व आहे. कलम ४६ अन्वये समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे. वरील सामाजिक दायित्वांशिवाय चौथ्या विभागात न्यायालयीन (Judiciary) व प्रशासकीय (Executive) अधिकारांचा कलम ५० मध्ये व पंचायत स्थापण्याचा कलम ४०) मध्ये उल्लेख आहे.


निसर्गरक्षण (कलम ४८-अ), स्मारकांचे जतन (कलम ४९), आंतरराष्ट्रीय शांतता व परस्पर मैत्री संबंधांविषयीचे कलम (कलम ५१) आदी कलमे सरकारसाठीची इतर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. इतरत्र अतिशय सुस्पष्ट व तपशीलवार असणारे भारतीय संविधानाचे रूप या कलमांमध्ये अतिशय ढोबळ (Vague) असे आहे. वरील पैकी कोणतीही कलमे सरकारसाठी सक्तीची नाहीत. किंबहुना तात्विक मूल्ये (Moral values) असेच त्याचे स्वरूप आहे.


📙 *सत्ता*


सत्तेचे भारतात तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे -


कार्यकारी (Executive)

कायदेकारी(Legislative)

न्यायालयीन (Judicial)

प्रशासकीय सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते; परंतु त्यास संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन अधिकारांच्या मर्यादा सुस्पष्टपणे आखून देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च केंद्र सर्वोच्च न्यायालय असते.


भारतातील संसद ही द्विगृही (Bicameral) आहे. कलम १६८ अन्वये राज्यांची विधिमंडळे एकगृही(Unicameral) वा द्विगृही(Bicameral) असू शकतात. द्विगृही व्यवस्थेत विधानसभा हे खालील सभागृह (Lower House) तर विधानपरिषद हे वरील सभागृह(Upper House) असते.


📔 *संघराज्य प्रणाली*


भारत हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला अधिकारांमध्ये झुकते माप दिले आहे. विभाग ६ अन्वये राज्यांच्या सत्ता, हक्क, कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे स्वरूपही केंद्राप्रमाणेच असते. राज्यात पंतप्रधानाप्रमाणे मुख्यमंत्री हा सरकारचा कार्यकारी प्रमुख तर राज्यपाल हा राष्ट्रपतीप्रमाणे घटनात्मक प्रमुख असतो. गरज पडल्यास राज्याचे शासन केंद्राद्वारे बरखास्त केले जाऊ शकते. भारताची फाळणी, हिंदू-मुस्लिम दंगे अशा कारणांमुळे केंद्रीय सरकार तुलनेने सशक्त ठेवण्याची गरज घटनाकारांस भासली. राज्ये संघराज्यापासून फुटू नयेत यासाठी केंद्रीय सरकारकडे जादा अधिकार देण्यात आले आहेत. गाव व तालुकास्तरांवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णतः स्वायत्तता देण्यास याच कारणास्तव उशीर झाला.


📗 *अधिकृत भाषा*


संघराज्याची अधिकृत भाषा कोणती असावी हा घटनासमितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, असे डॉ.आंबेंडकरांनी आपल्या आठवणीत नमूद केले आहे. राज्यघटनेच्या कलम ३४३ अन्वये देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी भाषा ही संघराज्याची अधिकृत भाषा आहे. यासोबत इंग्रजी भाषेचा उपयोग सर्व अधिकृत कामांसाठी करण्यात येईल. हिंदी भाषेस घटनेने राष्ट्रभाषा नव्हे तर संघराज्याची अधिकृत भाषा असा दर्जा दिलेला आहे. या सोबत इतर २२ भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषा आहेत. इंग्रजी भाषेच्या वापराविषयी दर १५ वर्षात पुनरावलोकन करावे अशी तरतूद घटनेत आहे.


कलम ३४५ अन्वये राज्यांना हिंदी वा एकाधिक प्रादेशिक भाषा वापरण्याचा पर्याय आहे. कलम ३४६ अन्वये केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे परस्परांशी व राज्यांचे परस्परांशी दळणवळण हिंदी वा इंग्रजीत असावे अशी तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. राष्ट्रपतीच्या अनुमतीने उच्च न्यायालयात हिंदी वा इतर प्रादेशिक भाषांच्या वापरास मुभा आहे. जर हिंदी व इंग्रजी भाषेतील कोणत्याही कायदेशीर दस्तात मतभेद/फरक दिसल्यास इंग्रजी भाषिक मजकूर ग्राह्य मानला जाईल असे कलम ३४८ सांगते


📙 *आणीबाणीविषयक तरतुदी*


भारताच्या राज्यघटनेत आणीबाणी विषयकच्या अनेक तरतुदींचा उल्लेख आहे. आणीबाणीचे तीन प्रकार सांगितले आहेत. यात -


राष्ट्रीय आणीबाणी - जेव्हा राष्ट्र वा त्याचा मोठा हिस्सा आपदकालीन स्थितीत असतो तेव्हा

प्रादेशिक आणीबाणी - जेव्हा एखाद्या राज्यातील स्थिती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा

आर्थिक आणीबाणी - जेव्हा भारताचे आर्थिक स्थैर्य वा पत धोक्यात असते तेव्हा

अशा तीन आणीबाणींचा समावेश आहे


राज्यघटनेच्या ३५२व्या कलमानुसार भारताची अंतर्गत वा बाह्य सुरक्षितता धोक्यात आली असता राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकता. ३५३ व्या कलमानुसार आणीबाणीच्या परिस्थितीत सारे अधिकार संसदेकडे एकटवितात. राज्यघटनेच्या ३५९व्या कलमानुसार राष्ट्रपती विभाग ३द्वारे नागरिकांस दिलेल्या सर्व मूलभूत अधिकारांचा प्रत्याहार (काढून घेणे) करू शकतो. ३५८व्या कलमानुसार कलम १९मधील नागरिकांचे अधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात. म्हणजेच व्यवस्थेचे इतर काळी उदारमतवादी असलेले रूप या काळात अनुदार बनते. राज्यघटनेच्या ३५६ व्या कलमानुसार राज्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास राज्याचा कारभार राष्ट्रपतींकडे देण्यात येतो. राज्याच्या विधिमंडळाचे काम या काळात संसद करते. या स्थितीस राष्ट्रपती राजवट असे म्हणतात.


📗 *कलमांचा गोषवारा*


 संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा -


भाग १ -

कलम १ संघाचे नाव आणि भूप्रदेश

कलम २ - प्रदेश किंवा नविन राज्यांची निर्मीती

कलम २(अ)-सिक्कीम हे संघाचे सहयोगी राज्य (रद्द केले)


कलम ३- नवीन राज्याची स्थापना, सिमा किंवा नावे बदलणे

कलम ४ -कलम २ आणि कलम ३ अंतर्गत केलेले बदल, कलम ३६८ अनुसार घटनादुरुस्ती समजली जाणार नाही

भाग २ - कलमे ५ - ११नागरिकत्व

भाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्क

कलमे १४-१८ समानतेचा हक्क,

कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,

कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,

कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,

कलमे २९-३0 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,

कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.

भाग ४ - राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलमे ३६ - ५१

कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन

कलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार

भाग ४(अ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये.

*भाग ५ -*

प्रकरण १ - कलमे ५२-७८

कलमे ५२-६३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत,

कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक

कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी,

कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत

प्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत.

कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,

कलमे ८९-९८ संसदेच्या अधिकारांबाबत,

कलमे ९९-१००

कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत

कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे अधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,

कलमे १०७-१११ (law making process)

कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,

कलमे ११८-१२२

प्रकरण ३ - कलम १२३

कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत

प्रकरण ४ - कलमे १२४-१४७

कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत

प्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.

कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे अधिकार व कर्तव्ये यांबाबत

भाग ६ - राज्यांच्याच्या बाबतची कलमे.

प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या

कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मू आणि काश्मीर वगळून

प्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत

कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,

कलमे १६३-१६४ मंत्रिमंडळावर,

कलम १६५ राज्याच्या ॲडव्होकेट-जनरल यांच्याबाबत.

कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.

प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.

कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती

कलमे १७८ - १८७ राज्यांच्या शासनाचे अधिकार

कलमे १८८ - १८९ कार्यकालाविषयी

कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत

कलमे १९४ - १९५ विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे

कलमे १९६ - २०१ कार्यकाविषयी

कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयांसंबधी

कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयांसंबधी

प्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालांच्या अधिकारांबाबत

कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.

प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.

कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.

प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांबाबत.

कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत


📓 *भाग ७ - राज्यांच्या बाबतीतील कलमे.*


कलम २३८ -

भाग ८ - केंद्रशासित प्रदेशांशी निगडित कलमे

कलमे २३९ - २४२ मंत्रिमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांबाबत

भाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमे

कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत

भाग ९ अ - नगरपालिकांबाबतची कलमे.

कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत

भाग १० -

कलमे २४४ - २४४ अ

भाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी

प्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी

कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी

प्रकरण २ - कलमे २५६ - २६३

कलमे २५६ - २६१ - सामान्य

कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत.

कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध.

भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत

प्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीबाबत

कलमे २६४ - २६७ सामान्य

कलमे २६८ - २८१

कलमे २८२ - २९१ इतर

प्रकरण २ - कलमे २९२ - २९३

कलमे २९२ - २९३

प्रकरण ३ - कलमे २९४ - ३००

कलमे २९४ - ३००

प्रकरण ४ - कलम ३०० अ मालमत्तेच्या अधिकारांविषयक

कलम ३०० अ -

भाग १३ - भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे

कलमे ३०१ - ३०५

कलम ३०६ -

कलम ३०७ -

भाग १४ -

प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४

कलमे ३०८ - ३१३

कलम ३१४ -

प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम

कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम

भाग १४ अ - आयोगांच्या बाबत कलमे

कलमे ३२३ अ - ३२३ बी

भाग १५ - निवडणूक विषयक कलमे

कलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमे

कलम ३२९ अ -

भाग १६ -

कलमे ३३० -३४२

भाग १७ - अधिकृत भाषॆबाबतची कलमे

प्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबत

कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत

प्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषांबाबत

कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषांबाबत

प्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी

कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी

प्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश

कलम ३५० -

कलम ३५० अ -

कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम

कलम ३५१ - हिंदी भाषॆविषयक कलम

भाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे

कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे

कलम ३५९ अ -

कलम ३६० - आर्थिक आणीबाणी

भाग १९ - इतर विषय

कलमे ३६१ - ३६१अ - इतर विषय

कलम ३६२ -

कलमे ३६३ - ३६७ - इतर

भाग २० -घटनादुरुस्ती पद्धत

कलम ३६८ -घटनादुरुस्ती

भाग २१ -

कलमे ३६९ -३७८ अ

कलमे ३७९ - ३९१ -

कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क

भाग २२ -

कलमे ३९३ -३९५


📝 *घटनादुरुस्त्या*


मुख्य पान: भारतीय संविधानातील दुरुस्त्या

राज्यघटनेच्या ३६८व्या कलमानुसार भारतीय संसदेस घटनेतील तरतुदी वाढवण्याचा, कमी करण्याचा वा बदलण्याचा अधिकार आहे. घटनादुरुस्तीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाणे व २/३ बहुमताने मंजूर होणे बंधनकारक आहे. घटनेच्या काही कलमांमधील दुरुस्त्यांना संसदेशिवाय किमान निम्म्या राज्यांच्या संमतीची गरज असते. संसदेच्या मान्यतेनंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यावर ही दुरुस्ती अंमलात येते. 

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६   


                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          

          🌞🙏शुभ प्रभात🙏🌞

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *सप्तमी*,अश्लेषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


पिपीलिका अर्जितं धान्यं 

                 मक्षिका सञ्चितं मधु,

लुब्धेन सञ्चितं द्रव्यं 

                 समूलं हि विनश्यति।।


*भावार्थः- चींटी द्वारा इकट्ठा किया गया अनाज, मधुमक्खी द्वारा जमा किया गया शहद, और लोभियों द्वारा संचित किया गया धन... समूल ही नष्ट हो जाता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

कुतुहल ग्रह तारे


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : ग्रह-ताऱ्यांची स्थाने – निरपेक्ष पद्धत*


ग्रह वा ताऱ्याचे निरपेक्ष स्थान दर्शवण्यासाठी वैषुविक पद्धतीचा किंवा आयनिक पद्धतीचा वापर केला जातो. आकाशाच्या गोलावरचे आकाशस्थ वस्तूचे स्थान दर्शवणाऱ्या या पद्धती, वैषुविकवृत्त आणि आयनिकवृत्त यांवर आधारलेल्या आहेत. पृथ्वीच्या विषुववृत्ताचे प्रतल पृथ्वीबाहेर वाढवत नेले तर, आकाशात ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर तयार होणारे काल्पनिक वर्तुळ म्हणजे वैषुविकवृत्त. तसेच, ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवरील सूर्याच्या भासमान मार्गाचे वर्तुळ म्हणजे आयनिकवृत्त. ही दोन्ही वर्तुळे एकमेकांशी साडेतेवीस अंशांचा कोन करतात. या दोन वर्तुळांच्या छेदनबिंदूंपैकी एका बिंदूला वसंतसंपात बिंदू म्हटले जाते. हा बिंदू मीन तारकासमूहात वसलेला आहे.


वैषुविक पद्धतीत आकाशस्थ वस्तू विषुवांश आणि क्रांती या संदर्भाकांनी दर्शवली जाते. या पद्धतीत, वैषुविकवृत्त हे संदर्भवर्तुळ आणि वसंतसंपात बिंदू हा संदर्भबिंदू मानला जातो. विषुवांशांवरून एखादा तारा वसंतसंपात बिंदूपासून किती पूर्वेला आहे ते कळते, तर क्रांतीवरून तो तारा वैषुविकवृत्ताच्या किती उत्तरेला वा दक्षिणेला आहे ते कळते. वसंतसंपात बिंदूचे दोन्ही संदर्भाक शून्य मानले जातात. या पद्धतीत विषुवांश हे तास-मिनिट-सेकंद या वेळेच्या एककात दिले जातात. कारण विषुवांशांचा संबंध नाक्षत्रवेळेशी जोडण्यात आला आहे. नाक्षत्रवेळेचे घडय़ाळ सौरवेळेच्या म्हणजे आपल्या नेहमीच्या घडय़ाळापेक्षा चार मिनिटे जलद धावते. सौरवेळेनुसार प्रत्येक तारा रोज चार मिनिटे लवकर उगवत असला तरी, नाक्षत्रवेळेनुसार तो रोज ठरावीक वेळेलाच उगवतो. कोणत्याही ठिकाणी वसंतसंपात बिंदू जेव्हा उत्तरबिंदू-शिरोबिंदू-दक्षिणबिंदू यांना जोडणाऱ्या रेषेवर म्हणजे मध्यमंडलावर येतो, तेव्हा त्या ठिकाणी नक्षत्रवेळेनुसार ‘शून्य वाजता’ नाक्षत्रदिवसाला सुरुवात होते. समजा, एखाद्या ताऱ्याचे विषुवांश दोन तास आहेत आणि क्रांती तीस अंश आहे. जगात कुठूनही या ताऱ्याचे निरीक्षण केले, तर त्या ठिकाणच्या नाक्षत्रवेळेनुसार जेव्हा दोन वाजतील, तेव्हा हा तारा तिथल्या मध्यमंडलावर आलेला असेल. क्रांती तीस अंश असल्याने, हा तारा वैषुविकवृत्ताच्या नेहमीच तीस अंश उत्तरेला असेल. वैषुविकवृत्ताच्या दक्षिणेला असणाऱ्या ताऱ्याची क्रांती ऋण चिन्हाने दर्शवली जाते.


दुसरी निरपेक्ष पद्धत म्हणजे आयनिक पद्धत. या पद्धतीत वैषुविकवृत्ताऐवजी, आयनिकवृत्त हे संदर्भवर्तुळ असते व वसंतसंपात बिंदू हा संदर्भबिंदू मानला जातो. या पद्धतीत मात्र दोन्ही संदर्भाक अंशांच्या स्वरूपात दिले जातात. वैषुविकवृत्त किंवा आयनिकवृत्त, तसेच वसंतसंपात बिंदू, यांची आकाशाच्या पार्श्वभूमीवरील स्थाने स्थिर असल्यामुळे, या दोन्ही पद्धतींतील संदर्भाक निरपेक्ष ठरतात. मात्र ग्रह वा ताऱ्याचे, निरीक्षणाच्या जागेवरून दिसणारे, एखाद्या ठरावीक वेळचे प्रत्यक्ष स्थान शोधण्यासाठी, या संदर्भाकांचे गोलीय त्रिकोणमितीच्या साहाय्याने स्थानिक संदर्भ पद्धतीतील संदर्भाकांत रूपांतर करावे लागते. सरावाने हे गणित करणे सोपे आहे.


–डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~

ज्ञान विज्ञान


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *मुक्या माराचे वळ काळेनिळे का होतात?* 

***********************************

शरीरावर जेव्हा कोणत्याही हत्याराचा हल्ला होतो तेव्हा आपल्याला इजा होते. बहुधा या इजेमध्ये त्वचाच फाटते असं नाही, तर आतल्या मांसालाही जखम होते. अशा वेळी त्या स्ना च्या बनलेल्या मांसाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्याही कापल्या जातात. साहजिकच त्यांच्यामधून सतत वाहणारं रक्त बाहेर सांडू लागतं. रक्तस्रावाला सुरुवात होते. कालांतरानं तो थांबतो किंवा जातो. रक्तवाहिन्यांची सुटी टोकं बांधली जातात. त्यांच्यामधून आणखी स्राव होणार नाही अशी व्यवस्था केली जाते किंवा नैसर्गिकरित्याच जर रक्तस्राव थांबला असेल तर झालेल्या रक्ताच्या गुठळीनं त्या वाहिन्यांची तोंड बंद केली जातात. मग त्या स्नायूंची दुरुस्ती आणि वरच्या त्वचेची भरपाई होत जखम भरून येते.


काही वेळा शरीरावर पडलेल्या घावानं त्वचा फाटत नाही पण त्या त्वचेखालच्या रक्तवाहिन्यांना मात्र तो आघात सहन न झाल्यानं त्या फाटतात. तुटतात. यालाच आपण मुका मार म्हणतो. म्हणजे इजा झालेली असते पण ती वर दिसत नाही. शरीराच्या आतच ती प्रकट झालेली असते. त्या आतल्या फाटलेल्या रक्तवाहिन्यांमधूनही रक्तस्राव होतो. ते रक्त साकळून आतच साचून राहतं. आपली त्वचा तशी पातळ असते आणि प्रकाशाला संपूर्ण अपारदर्शक नसते, म्हणून तर तळहातावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकला तर आतल्या रक्तवाहिन्या लाल रंगाच्या दिसतात. तसंच हे न फाटलेल्या त्वचेच्या आत साचलेलं रक्त लाल रंगाच्या डागात दृग्गोचर होतं. कारण त्या रक्तात लाल पेशी असतात. त्यांचा रंग दिसतो. काही काळ गेल्यानंतर मात्र त्या रक्तपेशी सुकतात. त्यांच्यामधला ऑक्सिजन निघून जातो. त्यामुळं त्यांचा रंग बदलतो. तो निळसर दिसतो. काळ्या रंगाकडे झुकू लागतो. त्या काळ्या रंगाचा गडदपणाही हळूहळू कमी होत जातो. काही काळानंतर आतल्या त्या रक्ताचं विघटन होऊन संपूर्ण निचरा झाला की तो डागही दिसेनासा होतो.


दाराच्या फटीत सापडून बोट चिमटलं असलं तरी त्या चिमट्याचा आघात बोटाच्या त्वचेखालच्या

रक्तवाहिन्यांवर होतोच. त्या फुटतात आणि त्यांच्यातलं रक्त वाहून ते साकळून राहतं. त्या घावाचा डागही असाच काळानिळा दिसतो. त्या वेळी होणारी प्रक्रियाही अशीच असते.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातून*

═══════════════════════


कुतुहल


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : ग्रहताऱ्यांची स्थाने-सापेक्ष पद्धत*


ग्रह-तारे, चंद्र-सूर्य यांची आकाशातली स्थाने ढोबळमानाने दर्शवण्यासाठी विविध तारकासमूहांचा, नक्षत्रांचा आधार घेतला जातो. या वस्तू आकाशात अचूकपणे दर्शवण्यासाठी मात्र संदर्भ पद्धतींचा वापर करावा लागतो. सर्वसाधारण आलेखाप्रमाणेच आकाशातल्या वस्तू दर्शवण्यासाठीही दोन संदर्भांची आवश्यकता असते. आकाशस्थ वस्तूची, या दोन संदर्भांपासूनची आकाशाच्या गोलावरची अंतरे ही त्या वस्तूचे संदर्भांक असतात. आकाशस्थ वस्तूंची स्थाने दर्शवण्यासाठी गरजेनुसार वेगवेगळ्या संदर्भ पद्धती वापरल्या जातात. त्यापैकी स्थानिक संदर्भ पद्धतीत, निरीक्षणाच्या ठिकाणचे क्षितिज हे संदर्भवर्तुळ म्हणून आणि या क्षितिजावरचा उत्तरबिंदू हा संदर्भबिंदू म्हणून वापरला जातो. या पद्धतीनुसार, आकाशस्थ वस्तू उन्नतांश आणि क्षित्यंश या दोन संदर्भांकांनी दर्शवली जाते. उन्नतांश म्हणजे आकाशस्थ वस्तूचे आकाशाच्या गोलावरचे, क्षितिजापासूनचे अंतर आणि क्षित्यंश म्हणजे त्या वस्तूचे क्षितिजालगत मोजलेले उत्तरबिंदूपासूनचे अंतर. ही दोन्ही अंतरे अंशांच्या स्वरूपात दिली जातात.


एखाद्या ताऱ्याचे उन्नतांश मोजायचे असल्यास, त्या ताऱ्यापासून क्षितिजापर्यंत आकाशाच्या गोलावर लंब टाकायचा. आपला एक हात त्या ताऱ्याकडे रोखायचा आणि दुसरा हात लंब क्षितिजाशी जिथे मिळतो त्या बिंदूकडे रोखायचा. आपल्या दोन हातांमध्ये होणारा कोन म्हणजे त्या ताऱ्याचे उन्नतांश. या पद्धतीनुसार, क्षितिजावरील सर्व ताऱ्यांचे उन्नतांश हे शून्य अंश असतात, तर बरोबर डोक्यावरील ताऱ्याचे उन्नतांश नव्वद अंश असतात. आकाशात दिसत असलेल्या इतर सर्व ताऱ्यांचे उन्नतांश शून्य ते नव्वद अंश या दरम्यान भरतात. क्षितिजाखाली असणाऱ्या ताऱ्याचे उन्नतांश ऋण चिन्हाने दर्शवले जातात.


क्षित्यंश मोजण्यासाठी, आपला डावा हात क्षितिजावरील उत्तरबिंदूकडे रोखायचा. उजवा हात हा, ताऱ्याकडून टाकलेला लंब क्षितिजावरील ज्या बिंदूवर मिळतो, त्या बिंदूकडे रोखायचा. आता या दोन हातांतला कोन म्हणजे त्या ताऱ्याचे क्षित्यंश. क्षित्यंश हे घडय़ाळाचे काटे ज्या दिशेने फिरतात, त्या दिशेने म्हणजे उत्तरेकडून पूर्वेकडे मोजायचे. या पद्धतीनुसार उत्तरबिंदूचे क्षित्यंश शून्य भरतात, तर पूर्वबिंदू, दक्षिणबिंदू आणि पश्चिमबिंदू यांचे क्षित्यंश अनुक्रमे ९०, १८० आणि २७० अंश भरतात. सर्व आकाशस्थ वस्तूंचे क्षित्यंश, त्यांच्यापासून टाकलेला लंब क्षितिजावर ज्या बिंदूशी पडेल, त्यानुसार ० अंश ते ३६० अंशांदरम्यान असतात.


या पद्धतीने एखादी आकाशस्थ वस्तू, निरीक्षणाच्या ठिकाणी आणि ठरावीक वेळेला प्रत्यक्ष कुठे दिसेल, ते सहज समजू शकते. मात्र क्षितिजाचे वर्तुळ हा स्थानिक संदर्भ आहे. तसेच वस्तूचे स्थानही क्षितिजाच्या संदर्भात सतत बदलत असते. म्हणून या पद्धतीनुसार आकाशस्थ वस्तूचे संदर्भांक सांगताना, निरीक्षणाचे स्थान आणि निरीक्षणाची वेळही सांगावी लागते. त्यामुळे स्थानिक संदर्भ पद्धत ही सापेक्ष स्वरूपाची संदर्भ पद्धत ठरते.


–डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~

ज्ञान विज्ञान


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *सर्दी झाल्यावर अन्न बेचव का लागते ?*

***********************************

अन्नाची चव आपण जिभेनं चाखतो असं म्हणतो; पण ते संपुर्ण खरे नाही. जिभेवर केवळ चार प्रकारच्या स्वादांना प्रतिसाद देणारे स्वादांकुर असतात. गोड, खारट, आंबट आणि तुरट. बाकी सगळ्या चवी या चार आणि वासाबी या नावानं ओळखल्या जाणार्‍या पाचव्या प्रकारच्या स्वादांकुरांच्या वेगवेगळ्या प्रकारे साथ देण्याच्या प्रक्रियांमधुन आपल्याला समजतात. या स्वादांकुराशी पदार्थांमधील स्वादरेणुंचा संबंध आला की त्यातुन उठणारे विद्युत रासायनिक तरंग मज्जातंतुकडुन मेंदुतील स्वादकेंद्राकडे पाठवले जातात. त्या तरंगांबरोबरच आपल्या घ्राणेंद्रियांकडुन येणारे अन्नाच्या गंधांचे आणि डोळ्यांकडुन येणार्‍या अन्नाच्या रंगांचे, आकारांचे तरंग मेंदुला येऊन भिडतात. या सर्वांचं तिथं. विश्लेषण होऊन त्यातुन मग त्या पदार्थाच्या खर्‍याखुर्‍या चवीची ओळख आपल्याला पटते. अर्थात या सार्‍या प्रक्रिया इतक्या वेगानं होतात की हे सारं सव्यापसव्य होत असल्याची जाणीवही आपल्याला होत नाही.


तरीही यावरुन हे मात्र ध्यानात येईल की केवळ जीभ जे चाखते त्यावरुनच आपल्याला अन्नाची चव कळत नाही. त्यात डोळ्यांना दिसणार्‍या त्या अन्नाच्या स्वरुपाचा आणि नाकानं जोखलेल्या त्याच्या गंधाचाही तितकाच महत्वाचा सहभाग असतो.

आंब्याचा रंग काळाकुट्ट आणि त्याचा आकार दगडासारखा ओबडधोबड असता, त्याचा गंध अापल्याला नाक मुठीत धरायला प्रवृत्त करणार्‍यांच्या जातकुळीतला असता तर आंबा आपल्याला तितकाच चविष्ट लागला असता की काय या प्रश्नाचं उत्तर स्वत:लाच देण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्या चवीतल्या जिभेखेरीज इतर इंद्रियांच्या सहभागाचं आकलन होईल.


तेव्हा कोणत्याही अन्नाची चव घेण्यासाठी जिभेबरोबरच आपली नजर आणि घ्राणेंद्रिये तितकीच जागृत असायला हवीत. जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा आपलं नाक चोंदतं. म्हणजेच नाकाद्वारे हवा आत शिरायला त्रास होतो. त्याचमुळे आपण अशावेळी तोंड उघडुन श्वासोच्छवास करत असतो. नाकावाटे हवा आत शिरत नसल्यामुळे त्या अन्नाचा सुटलेला दरवळ हवेतुन आपण आत घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या गंधांच्या रेणुशी ज्यांचं संघटन जुळायचं त्या नाकातल्या ग्रहणकेंद्रांशी आवश्यक ती प्रक्रिया होतच नाही. त्यामुळे चव जोखण्यात असलेली आपली भुमिका नाक बजावु शकत नाही. साहजिकच चवीची ओळख पटवुन देण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. त्यामुळे मग ते अन्न बेचव असल्याची भावना होते.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातून*

═══════════════════════

  

रेडिओ चा शोध

संकलन गजानन गोपेवाड 

═══════════════════ 

*

*Radio; रेडिओ शोधाचे श्रेय मार्कोनीला नाही तर या भारतीय शास्त्रज्ञाला जाते*



संपूर्ण जगाचा भारतीयांच्या बुद्धीवर विश्वास आहे. भारत जेव्हा गुलाम होता आणि वैज्ञानिक प्रयोगांसाठी शैक्षणिक संस्था आणि संसाधनांची कमी होती तेव्हा सूही भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक झेंडे दाखवले लावले आहेत. असेच एक भारतीय शास्त्रज्ञ म्हणजे जगदीशचंद्र बोस. आज प्रा. जगदीश बोस यांची पुण्यतिथी. 23 नोव्हेंबर 1937 रोजी त्यांचे निधन झाले.

संपूर्ण जगाचा भारतीयांच्या बुद्धीवर विश्वास आहे. भारत जेव्हा गुलाम होता आणि वैज्ञानिक प्रयोगांसाठी शैक्षणिक संस्था आणि संसाधनांची कमी होती तेव्हाही भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक झेंडे दाखवले लावले आहेत. असेच एक भारतीय शास्त्रज्ञ म्हणजे जगदीशचंद्र बोस. आज प्रा. जगदीश बोस यांची पुण्यतिथी. 23 नोव्हेंबर 1937 रोजी त्यांचे निधन झाले.




रेडिओ आणि मायक्रोवेव्ह ऑप्टिक्सच्या शोधाचे श्रेय जगदीशचंद्र बोस यांना जाते. अनेकदा भारतीय लोक त्यांना झाडांमध्ये जीवन शोधणारे वैज्ञानिक म्हणून स्मरण करतात. जगदीशचंद्र बोस यांच्या जीवनातील काही खास गोष्टी.

रेडिओ आणि मायक्रोवेव्ह ऑप्टिक्सच्या शोधाचे श्रेय जगदीशचंद्र बोस यांना जाते. अनेकदा भारतीय लोक त्यांना झाडांमध्ये जीवन शोधणारे वैज्ञानिक म्हणून स्मरण करतात. जगदीशचंद्र बोस यांच्या जीवनातील काही खास गोष्टी.



त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी मेमनसिंगच्या ररौली गावात झाला. आता ते बांगलादेशात आहे. बोस यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातीलच शाळेत झाले. ही शाळा त्यांच्या वडिलांनी स्थापन केली होती.

त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी मेमनसिंगच्या ररौली गावात झाला. आता ते बांगलादेशात आहे. बोस यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातीलच शाळेत झाले. ही शाळा त्यांच्या वडिलांनी स्थापन केली होती.



त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांचे आर्थिकदृष्ट्या संपन्न वडील त्यांना सहजपणे इंग्रजी शाळेत पाठवू शकत होते. परंतु, इंग्रजी शिक्षण घेण्यापूर्वी मुलाने आपली मातृभाषा शिकावी आणि आपली संस्कृती चांगली जाणून घ्यावी अशी त्यांची इच्छा होती.

त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांचे आर्थिकदृष्ट्या संपन्न वडील त्यांना सहजपणे इंग्रजी शाळेत पाठवू शकत होते. परंतु, इंग्रजी शिक्षण घेण्यापूर्वी मुलाने आपली मातृभाषा शिकावी आणि आपली संस्कृती चांगली जाणून घ्यावी अशी त्यांची इच्छा होती.



1884 मध्ये, बोस यांनी नैसर्गिक शास्त्रात पदवी घेतली आणि लंडन विद्यापीठातून विज्ञानात बॅचलर पदवी देखील मिळवली.

1884 मध्ये, बोस यांनी नैसर्गिक शास्त्रात पदवी घेतली आणि लंडन विद्यापीठातून विज्ञानात बॅचलर पदवी देखील मिळवली.




बोस यांनी कॅस्कोग्राफ नावाच्या उपकरणाचा शोध लावला. ते परिसरातील विविध लहरी मोजू शकत होते. नंतर, त्यांनी प्रयोगांद्वारे दावा केला की झाडे आणि वनस्पतींमध्ये जीवन आहे. हा प्रयोग रॉयल सोसायटीमध्ये झाला आणि संपूर्ण जगाने त्यांच्या शोधाचे कौतुक केलं.

बोस यांनी कॅस्कोग्राफ नावाच्या उपकरणाचा शोध लावला. ते परिसरातील विविध लहरी मोजू शकत होते. नंतर, त्यांनी प्रयोगांद्वारे दावा केला की झाडे आणि वनस्पतींमध्ये जीवन आहे. हा प्रयोग रॉयल सोसायटीमध्ये झाला आणि संपूर्ण जगाने त्यांच्या शोधाचे कौतुक केलं.



एका चिन्हाच्या स्वरुपात वनस्पतीतील उत्तेजना मशिनच्या माध्यमातून त्यांनी दाखवली होती. त्यानंतर त्या झाडाच्या मुळामध्ये ब्रोमाइड टाकले. त्यामुळे झाडाची कामे अनियमित होऊ लागली. यानंतर वनस्पतीच्या उत्तेजक यंत्राने कोणतीही क्रिया दाखवणे बंद केले. याचा अर्थ रोप मेलं होतं.

एका चिन्हाच्या स्वरुपात वनस्पतीतील उत्तेजना मशिनच्या माध्यमातून त्यांनी दाखवली होती. त्यानंतर त्या झाडाच्या मुळामध्ये ब्रोमाइड टाकले. त्यामुळे झाडाची कामे अनियमित होऊ लागली. यानंतर वनस्पतीच्या उत्तेजक यंत्राने कोणतीही क्रिया दाखवणे बंद केले. याचा अर्थ रोप मेलं होतं.



काही लोक त्यांना बंगाली विज्ञानकथेचे जनक देखील म्हणतात.

काही लोक त्यांना बंगाली विज्ञानकथेचे जनक देखील म्हणतात.



त्यांनी शोधलेल्या वायरलेस रेडिओसारख्या उपकरणामुळे रेडिओचा विकास झाला असे म्हणतात. पण स्वतःच्या नावावर पेटंट झाल्यामुळे रेडिओच्या शोधाचे श्रेय मार्कोनी यांना दिले जाते.

त्यांनी शोधलेल्या वायरलेस रेडिओसारख्या उपकरणामुळे रेडिओचा विकास झाला असे म्हणतात. पण स्वतःच्या नावावर पेटंट झाल्यामुळे रेडिओच्या शोधाचे श्रेय मार्कोनी यांना दिले 

कुतुहल वर्षे काळाचे चक्र

 *📱तंत्रस्नेही शिक्षक स

══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : वर्षकाळाचे चक्र*


आपल्या नेहमीच्या वापरातले वर्ष हे ऋतुचक्राशी निगडित आहे. ऋतूंचा आवर्तनकाळ हा ३६५ दिवस, ५ तास आणि ४९ मिनिटांचा आहे. परंतु पृथ्वी ही सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ३६५ दिवस, ६ तास आणि ९ मिनिटांत पूर्ण करते. दोहोंतील २० मिनिटांच्या फरकामुळे पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण होण्याच्या अगोदरच, नव्या ऋतुचक्राला सुरुवात झालेली असते. शेतीसारखे अनेक व्यवहार ऋतूंशी संबंधित असल्याने, वर्षकालाची सांगड ही पृथ्वीच्या सूर्यप्रदक्षिणेपेक्षा ऋतुचक्राबरोबर असणे, हे व्यावहारिक ठरते.


इ.स. पूर्व पहिल्या शतकातील रोमन सम्राट ज्युलिअस सिझरच्या काळापूर्वी, रोमन साम्राज्यात वर्षांचा कालावधी हा ३५५ दिवसांचा होता. वर्षकाळ आणि ऋतुचक्र यांचा मेळ घालण्यासाठी, त्याकाळी अधूनमधून अधिक मासाचा वापर केला जायचा आणि वर्षांचा कालावधी ३६५ दिवसांच्या आसपास आणून ठेवला जायचा. मात्र त्यातील अनियमिततेमुळे उडणारा गोंधळ टाळण्यासाठी, सॉसिजेनेस या खगोलज्ञाच्या सूचनेवरून ज्युलिअस सिझर याने इ.स. पूर्व ४५ या साली, वर्षांचा कालावधी सरासरी ३६५ दिवस आणि ६ तासांचा निश्चित केला. ही सरासरी राखण्यासाठी, चारने भाग न जाणारी वर्षे ३६५ दिवसांची, तर चारने भाग जाणारी वर्षे ३६६ दिवसांची – लीप वर्षे – मानली गेली. परंतु या ‘ज्युलिअन वर्षां’चा कालावधी हा ऋतूंच्या आवर्तनकाळापेक्षा ११ मिनिटांनी मोठा होता. त्यामुळे प्रत्येक वर्ष हे ऋतुचक्रापेक्षा उशिरा पूर्ण होऊ लागले. दरवर्षीचा ११ मिनिटांचा फरक जमा होऊ लागल्याने, वर्ष सुरू होण्यास दर १२८ वर्षांनी ऋतुचक्राच्या तुलनेत एक दिवसाचा उशीर होऊ लागला.


सोळाव्या शतकापर्यंत हा फरक वाढून १२ दिवसांचा झाला. यावर उपाय म्हणून रोमच्या पोप ग्रेगरीने इ.स. १५८२ मध्ये लीप वर्षांची संख्या कमी करून, हा फरक कमी करायचे ठरवले. त्यानुसार त्याने चारने भाग जाणारी वर्षे ही लीप वर्षे म्हणूनच मानली. परंतु यातली चारशेने भाग न जाणारी शतकाच्या अखेरची वर्षे या लीप वर्षांंतून वगळली. परिणामी, १७००, १८००, १९०० ही लीप वर्षे न ठरता, फक्त १६००, २००० ही लीप वर्षे ठरली. यामुळे वर्ष हे सरासरी सुमारे ३६५ दिवस, ५ तास आणि ४९ मिनिटांचे झाले. ऋतूंच्या आवर्तनकाळातील व वर्षकाळातील फरक हा यामुळे अर्ध्या मिनिटाहून कमी झाला. हा फरक एक दिवसाइतका होण्यास आता एकूण सुमारे ३,२०० वर्षां चा दीर्घ कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी या ‘ग्रेगोरिअन वर्षां’च्या कालावधीत बदल करण्याची आवश्यकता भासत नाही. पोप ग्रेगरीचे हे गणित साधे, पण दूरगामी परिणाम करणारे ठरले आहे.


– डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~


मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

यशवंत लक्षण नेने

 *🌱🌾🌱यशवंत लक्ष्मण नेने🌱🌾🌱*

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*🌾🌾🌾कृषीशास्त्रज्ञ🌾🌾🌾*

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*जन्मदिन - २४ नोव्हेंबर १९३६*


यशवंत लक्ष्मण नेने यांचा जन्म मध्यप्रदेशात ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे शालेय आणि बी.एस्सी. (अ‍ॅग्रिकल्चर) पर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. १९५७ साली त्यांनी आग्र विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी मिळवली. त्यानंतर अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातून त्यांनी १९६० साली पीएच.डी. मिळवली. त्यांचा संशोधनाचा विषय ‘वानसविकृतिविज्ञान आणि विषविज्ञान’ हा होता. वानसविकृतिविज्ञान म्हणजे पिकांवरील रोगनियंत्रणाचे विज्ञान. पीएच.डी. झाल्यावर त्यांनी चौदा वर्षे उत्तर प्रदेशातील पंतनगर विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. त्यांपैकी शेवटची पाच वर्षे ते विद्यापीठाच्या वानसविकृतिविज्ञान विभागाचे प्रमुख होते. १९७४ साली आंध्रप्रदेशातील पाटनचेरू येथील आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेत (इक्रिसॅट) ‘वानसविकृतिविज्ञान’ विभागाच्या प्राचार्य पदावर त्यांची निवड झाली. १९८० साली डाळीमध्ये सुधारणा घडविण्याच्या प्रकल्प विभागाची सूत्रेही त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याच संस्थेत त्यांनी १९८६ ते १९८९ या काळात द्विदल धान्यविभागाचे संचालक, तर १९८९ ते १९९६ या काळात उपमहासंचालक म्हणून काम केले.


डाळींमध्ये सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पाचे ते प्रमुख होते. त्या काळात डॉ. नेने यांनी त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांच्या मदतीने ‘म्लान’ या रोगाला तोंड देणाऱ्या हरभऱ्याच्या जाती विकसित केल्या. याकरिता डाळीचे सुधारित बियाणेही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. याचा परिणाम म्हणून हेक्टरी ३७५ कि.ग्रॅ. उत्पादनाऐवजी १००० कि.ग्रॅ. उत्पादन मिळवता आले.  त्यावर पडणाऱ्या  ‘म्लान’ आणि ‘वोझोटी’ रोगांवर मात करण्यात यश मिळविले. याकरिता कमी उंचीच्या नवीन जाती विकसित करून दिल्यामुळे कीटकनाशकांचा सहज वापर करता येऊ लागला. पीक तीन-चार महिन्यांत तयार होत असल्यामुळे तुरीच्या शेंगा खुडून ते पीक तसेच ठेवून, एकाच झाडापासून वर्षात दोन ते तीन वेळा शेंगा तोडायची सोय झाली आणि परिणामी, हेक्टरी २००० कि.ग्रॅ.पर्यंत पीक घेता आले, जे पूर्वी हेक्टरी ६०० कि.ग्रॅ. होते. त्यापुढेही प्रगती साधताना संकरित तुरीच्या जाती विकसित केल्या; तद्वतच खूप पाऊस पडल्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ न देता, त्यावर तोडगा काढला. पीक उंच ओळीवर लावायचे आणि बाजूला खाच ठेवायची अशा पद्धतीने जास्तीचे पाणी जमिनीत मुरायची सोय करून दिली. त्यामुळे पिकांना होणारा जास्त पाण्याचा त्रास टाळला गेला. 


त्यांना तांदळावरील खैरा रोगावर केलेल्या संशोधनाबद्दल १९६७ साली फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा पुरस्कार मिळाला. तसेच, ‘गव्हावरील रोगाचे निदान’ या कामाबद्दल १९७१ साली त्यांना ‘डॉ. नॉर्मन बोरलॉग’ आणि ‘डॉ. आर.जी. अँडरसन पारितोषिक’ मिळाले.  वनस्पतींच्या रोगनिदानातील त्यांच्या संशोधनासाठी ‘जीरसानिधी पारितोषिक’ मिळाले. या क्षेत्रात हा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान समजला जातो. नंतर त्यांना ओमप्रकाश भसीन पुरस्कार मिळाला.


डॉ. नेने यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार, वक्ते, परिसंवादाचे अध्यक्ष आणि ‘द्विदल शेंगांवरील रोग’ या विषयावरील लेखक, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यशस्विरीत्या पार पाडल्या. वानसविकृतिविज्ञान आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सभासद असून अनेक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. भारतीय वैज्ञानिक संघटनेमध्येही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. भारतीय वानसविकृतिविज्ञान संस्थेचे कार्यकारिणी सभासद व संचालक मंडळाचे सदस्य, भारतीय केंद्रीय कीटक संशोधन समितीचे सभासद, ‘बुरशी नियंत्रण’ या विषयावरील शिबिराचे संचालक, अशा प्रकारे त्यांनी निरनिराळ्या जबाबदाऱ्या  सांभाळल्या. त्यामुळेच १९८० साली त्यांना भारतीय वानसविकृतिविज्ञान संस्थेचे सन्माननीय सभासदत्व मिळाले, तर १९८५ व १९८६ साली त्यांनी त्या संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले.


असे विविध संस्थांचे काम सांभाळत असताना, डॉ. नेने यांचे संशोधनकार्यही सुरूच होते. त्यावर त्यांनी विपुल लेखनही केलेले आहे. त्यांचे एक स्वतंत्र पुस्तक असून त्यांनी दोन पुस्तके संपादित केली आहेत. त्यांचे ८४ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध वैज्ञानिक नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.


१९९१ साली जुन्नर येथे भरलेल्या चोविसाव्या मराठी विज्ञान संमेलनाचे डॉ. नेने हे अध्यक्ष होते. डॉ. नेने १९९६ साली इक्रिसॅटमधून निवृत्त झाले. त्यांनी एशियन अ‍ॅग्रे हिस्टरी फाउण्डेशन ही संस्था सुरू केली असून ते त्याचे अध्यक्ष आहेत. आशियातील शेतीवरच्या इतिहास संकलनाचे काम ही संस्था करते. ‘वृक्षायुर्वेद’ ह्या मूळ संस्कृत गंथाचे भाषांतर या संस्थेने १९९६ साली प्रसिद्ध केले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

मारोतराव कन्नमवार

 *🇮🇳🇮🇳मारोतराव सांबशिव कन्नमवार🇮🇳🇮🇳*           

         (महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री)

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

        जन्म : १० एप्रिल १८९९      

              (चांदा, चंद्रपूर)


    *मृत्यू : २४ नोव्हेंबर १९६३*


भूषविलेली अन्य पदे : 

दळणवळण, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य खाती (महाराष्ट्र राज्य). आरोग्य (१९५२ ते १९६० मध्य प्रांत)


मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:

२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३

पक्ष : काँग्रेस

पहिल्यांदा आमदार १९५२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूळसावली मतदारसंघ.


एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचला होता.

एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचला होता.

वृत्तपत्रांनी घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही. त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान वृत्तपत्र मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी उभी करू शकते. चळवळींच्या काळात निघणारी अन् चळवळींसाठी चालणारी वृत्तपत्रे या बाबतीत फार मोठा अन्याय करीत असतात. महाराष्ट्रात असा अन्याय आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ या दैनिकाने अनेकांवर केला आहे.



ह.रा. महाजनी यांच्यापासून लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापर्यंत आणि यशवंतरावांपासून पुढे देशाच्या पंतप्रधानपदावर पोहोचलेल्या मोरारजीभाईंपर्यंत अनेकांच्या प्रतिमा अतिशय विकृत स्वरूपात मराठी मानसावर आचार्यांनी त्यांच्या समर्थ लेखणी आणि वाणीच्या द्वारे ठसविल्या आहेत. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती इ. बरोबरच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीतील त्यांचा मोठा वाटा कायमचा स्मरणात राहणार असला तरी त्यांची ही कर्तबगारीही विसरता येण्याजोगी नाही.


अत्र्यांच्या या कर्तृत्वाचा सर्वात मोठा व निरपराध बळी मारोतराव सांबशीव उपाख्य दादासाहेब कन्नमवार हा आहे.

अत्र्यांनी त्यांची यथेच्छ टवाळी केली. त्यासाठी अग्रलेखांपासून नाटकांपर्यंतचे सारे लेखनप्रकार हाताळले. संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी लढयाचे एक कर्णधार असलेल्या आचार्यांवर मराठी मानस मोहीत होते आणि त्या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री व नंतर मुख्यमंत्री झालेले कन्नमवार अत्र्यांसह त्यांच्या तमाम चाहत्यांच्या रोषाचे आणि टिंगलटवाळीचे विषय होते.


कन्नमवारांचे दुर्दैव हे की त्या अपप्रचाराला आपल्या कर्तृत्वाने उत्तर द्यायला आयुष्याने त्यांना पुरेसा वेळ दिला नाही. मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या कारकीर्दीला जेमतेम एक वर्ष पूर्ण होत नाही तोच त्यांचे निधन झाले आणि मराठी मनावरची त्यांची अत्रेकृत प्रतिमाच कायम राहिली.


दि. २४ नोव्हेंबर १९६४ रोजी कन्नमवारांचा मृत्यू झाला.

आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत त्यांनी हिऱ्यांच्या स्मगलिंगपासून अनेक गोष्टींना उत्तेजन दिले असा मोठा प्रवाद मुंबईतील टीकाखोर वृत्तपत्रांनी त्यांच्या अखेरच्या दिवसात उभा केला होता. कन्नमवारांचे दारिद्रयोत्पन्न व दारिद्रयसंपन्न आयुष्य ठाऊक असणाऱ्या त्यांच्या वैदर्भीय व अन्य चाहत्यांना त्या प्रचारी प्रवादाने तेव्हा कमालीचे व्यथित केले होते. त्यांच्यावर कोणते तरी बालंट येणार किंवा तशाच एखाद्या आरोपावरून त्यांना बदनाम केले जाणार असे वाटू लागले असतानाच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यांचे सहस्त्रावधी चाहते पार कासावीस होऊन गेले.


बरोबर एक महिन्याच्या अंतराने दादासाहेबांच्या जीवनावर साहित्यभूषण तु.ना. काटकर यांनी लिहिलेल्या एका छोटेखानी पुस्तकाचे प्रकाशन नागपूरच्या चिटणीस पार्कवर तेव्हाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या सोहळयासाठी चंद्रपूरहून आलेल्या मित्रांच्या समूहात मीही होतो. त्या भव्य समारंभाला हजर राहून दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला जाणारी बस पकडायला पुढे केंद्रीय अर्थखात्याचे राज्यमंत्री झालेले शांताराम पोटदुखे आणि मी नागपूरच्या जुन्या एस.टी. स्टँडवर आलो तेव्हा दादासाहेबांच्या पत्नी गोपिकाबाई त्या स्टँडवरच आम्हाला दिसल्या.


हाती एक छोटीशी बॅग घेतलेल्या गोपिकाबाई एस.टी.च्या तिकिटासाठी सामान्य माणसांप्रमाणे रांगेत उभ्या होत्या. एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्रीणबाई असलेल्या गोपिकाबाईंना तसे बेदखल उभे असलेले पाहून आम्ही गलबलून गेलो. मग आमच्यातल्या एकाने त्यांना जबरीनेच बसायला लावून त्यांची तिकिटे काढून आणली.


मुंबईच्या टीकाखोर वर्तमानपत्रांनी रंगविलेली कन्नमवारांची विकृत प्रतिमा धुवून अन् पुसून काढायला तो प्रसंग पुरेसा होता.


*दादासाहेब कोण होते?*


साऱ्या विदर्भात आपल्या हजारो चाहत्यांचा वर्ग त्यांनी कसा उभा केला?


अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, अर्धवट शिक्षण, प्रस्थापित अन् धनवंत अशा साऱ्यांचा कडवा विरोध, या साऱ्यावर कोणत्याही दखलपात्र जातीचे पाठबळ नसताना मात करून त्यांनी विदर्भावर आपला एकछत्री अंमल कसा कायम केला?


त्यांच्या शब्दाखातर विदर्भातील ५४ आमदार स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा द्यायला आपापले राजीनामे घेऊन का उभे राहिले?


भंडाऱ्यात मनोहरभाई पटेल, वर्ध्यात पाटणी अन् बजाज, चंद्रपुरात छोटूभाई पटेल व इतर आणि नागपुरात अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे व दादा धर्माधिकाऱ्यांपासून आर.के. पाटील यांच्यासह खरे-अभ्यंकरांच्या प्रतिष्ठित अनुयायांपर्यंतचे सगळे बुध्दीसंपन्न लोक राजकारणावर प्रभाव गाजवीत असताना त्या साऱ्यांच्या डोळयादेखत विदर्भाचे राजकारण कन्नमवारांनी ज्या अलगदपणे आपल्या ताब्यात आणले तो इतिहास खरे तर स्वतंत्रपणेच लिहिला गेला पाहिजे.


त्या काळात खुद्द म. गांधी विदर्भाचे (सेवाग्रामचे) रहिवासी होते आणि महात्माजींचे मानसपुत्र स्व. जमनालाल बजाज विदर्भाच्या राजकारणावर नजर ठेवून होते ही गोष्टही हा इतिहास लिहिताना स्पष्टपणे ध्यानात घ्यावी लागणार आहे.

चंद्रपूरच्या भानापेठ नावाच्या साध्या वस्तीतील एका दरिद्री कुटुंबात दादासाहेबांचा जन्म झाला. जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि कोणत्या धनवंत वा संख्यासंपन्न जातीचे पाठबळ नसलेल्या या साध्या माणसाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत केलेली वाटचाल कोणालाही थक्क करणारी आहे.


कधीकाळी वृत्तपत्रे विकणाऱ्या व काँग्रेस कमेटीच्या बाहेर ठेवलेल्या बाकडयावर दिवस काढणाऱ्या मारोती कन्नमवारांच्या पत्नीने एकेकाळी वरोऱ्याच्या रस्त्यालगत खाणावळ चालवून आपली व आपल्या कुटुंबाची गुजराण करण्याचे प्राक्तन अनुभवले. कन्नमवारांच्या इंग्रजीला आणि व्यवहारात अभावानेच दिसणाऱ्या त्यांच्या नेटकेपणाला हसणाऱ्या तथाकथित मोठया माणसांना त्यांचा हा बिकट वाटेवरचा प्रवास कधी विचारात घ्यावासा वाटला नाही.


कन्नमवारांना राज्याचे मुख्यमंत्रीपद अपघाताने वा नशिबाने मिळाले नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद देणे ही महाराष्ट्राच्या मराठी राजकारणाची तेव्हाची गरज होती ही बाबही त्याचमुळे कोणाला महत्त्वाची वाटली नाही.

१९५६ च्या अखेरीस देशात भाषावार प्रांत रचना झाली. त्यावेळी स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्यात १९५७ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सपाटून मार खाल्ला. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उमेदवारांनी मुंबईसह प. महाराष्ट्र आणि मराठवाडयात काँग्रेस उमेदवारांना अस्मान दाखविले तर इंदुलाल याज्ञिकांच्या नेतृत्वातील महागुजराथ जनता परिषदेने साऱ्या गुजराथेत त्या पक्षाला धूळ चारली. त्या स्थितीत मुंबईत काँग्रेसचे यशवंतराव सरकार टिकवायचे तर त्या पक्षाचे ५४ आमदार निवडून देणाऱ्या विदर्भाला महाराष्ट्रात कायम ठेवणे ही त्या पक्षाची गरज होती. दादासाहेब कन्नमवार हे त्या आमदारांचे सर्वश्रेष्ठ नेते होते. ते वेगळया विदर्भाचे पुरस्कर्ते होते.


फाजल अली कमिशनच्या शिफारशीनुसार विदर्भाचे वेगळे राज्य झाले असते तर कन्नमवार हे त्याचे पहिले मुख्यमंत्रीच झाले असते.


पुढे १९५९ मध्ये नागपुरात काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय अधिवेशन यशस्वीरित्या भरवून त्यांनी आपले ते स्थानमहात्म्य सिध्दही केले होते. विदर्भ राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडून कन्नमवारांनी एका निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यासारखे महाराष्ट्रात राहणे तेव्हा मान्य केले आणि त्या बळावर यशवंतरावांचे मुख्यमंत्रीपद शाबूत राहिले व टिकले. मात्र त्यासाठी कन्नमवारांचे मन वळवायला प्रत्यक्ष पं. जवाहरलाल नेहरूंना आपला शब्द खर्ची घालून त्यांची मनधरणी तेव्हा करावी लागली होती.


कन्नमवारांच्या वाटयाला आलेले उपमुख्यमंत्रीपद या घटनाक्रमातून त्यांच्याकडे आले ही गोष्ट पश्चिम महाराष्ट्रा सकट विदर्भातल्या विचारवंतांनीही पुरेशा गांभीर्याने कधी नोंदवली नाही. उलट उपमुख्यमंत्रीपदासाठी कन्नमवारांनी विदर्भ राज्याची आपली मागणी सोडली असा गहजबच त्या काळात त्यांच्याविरुध्द केला गेला. पुढे यशवंतराव चव्हाण केंद्र सरकारात संरक्षण मंत्री पदावर गेल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्रीपद कन्नमवारांकडे येणे अतिशय स्वाभाविक व प्रस्थापित नियमाला अनुसरूनच होते.


*एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा आडगावचा दरिद्री माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर असा पोहोचला होता.*


कन्नमवार मुख्यमंत्री होऊन चंद्रपुरात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी १० हजारावर लोकांचा समुदाय तिथल्या विश्रामभवनासमोर उभा होता. पोलिसांची मानवंदना स्वीकारण्याआधी दादासाहेब त्यांच्या नित्याच्या सवयीप्रमाणे त्या समुदायात शिरले. त्यातल्या अनेकांशी त्यांची नावं घेऊन ते बराच काळपर्यंत एकेरीत बोलत राहिले. सावलीजवळच्या खेडयातून आलेला एक शिक्षक तेवढया गर्दीत मुख्यमंत्र्यांजवळ आपल्या जावयाची तक्रार करताना तेव्हा दिसला.


आपला जावई मुलीला सासरी नेत नसल्याचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून त्या नाठाळ जावयाला दटावण्याची विनंती तो घरच्या माणसाशी बोलावे तशा आवाजात त्यांना करीत होता. पुढे दादासाहेबांच्या दौऱ्यात गेलेल्या पत्रकारांत मीही होतो. कन्नमवारांचे सावधपण हे की त्या जावयाच्या गावी जाताच त्यांनी अधिकाऱ्यांना धाडून त्याला बोलवून घेतले आणि ‘बायकोला नेले नाहीस तर माझ्याशी गाठ आहे’ अशी समज त्यांनी त्या जावयाला दिली.


कन्नमवारांच्या येण्याचा मुहूर्त हा चंद्रपूर परिसरातल्या लोकांसाठी जत्रेचा मुहूर्त असे. ‘दादासाहेबांना पाहायला चाललो’ असे एकमेकांना सांगत शेकडोंच्या संख्येने लोक त्यांना नुसतेच पाहायला येत. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांचे असे लोंढे आवरताना पोलिसांची पुरेवाट होत असे.


एकच एक मळकट सदरा अन् एकच एक काळपट धोतर नेसून काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयात पडेल ते काम करणारे अन् प्रसंगी कार्यालयाबाहेर टाकलेल्या बाकडयावर थकून झोपी जाणारे दादासाहेब कन्नमवार आजही त्या परिसरातील वयोवृध्द माणसांच्या स्मरणात आहेत. त्याच काळात तेव्हाची वृत्तपत्रे घरोघर टाकणाऱ्या पोराचे काम करून त्यांनी गुजराण केली.


काँग्रेस पक्ष आणि त्याचे सगळेच कार्यकर्ते त्या काळात कमी अधिक हलाखीचे जिणे जगणारे होते. कधीमधी त्यातल्याच एखाद्याला त्यांच्या घरातल्या दारिद्रयाची आठवण यायची अन् तो त्यांच्या घरात कधी पायली दोन पायली तांदूळ तर कधी ज्वारी नेऊन टाकायचा.


चंद्रपूरसह सगळया विदर्भातील काँग्रेस पक्षावर तेव्हाच्या प्रतिष्ठित धनसंपन्न आणि उच्चवर्णीय पुढाऱ्यांचा वरचष्मा होता. त्यांच्यात अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे व दादा धर्माधिकारी यांच्यासारख्या तपस्वी अन् विद्वान माणसांपासून बजाज व बियाणींपर्यंतच्या धनवंतांचा समावेश होता. त्या काळात कन्नमवारांनी समाजाच्या तळागाळातली साधी अन् सामान्य माणसे हाताशी धरली. त्यांच्या माध्यमातून बहुजन समाजातील वेगवेगळे वर्ग आपल्यासोबत घेतले.


उच्चवर्णीय पुढाऱ्यांचे लक्ष दिल्ली अन् नागपूरकडे लागले असताना ग्रामीण भागातील उपेक्षित वर्गांना जवळ करणारा कन्नमवार नावाचा गरीब माणूस त्या वर्गांना स्वाभाविकपणेच अधिक विश्वासाचा वाटला.


*स्वातंत्र्याच्या आंदोलनात वाटयाला आलेल्या हालअपेष्टा*


 कन्नमवारांच्याही वाटयाला आल्या. जवळजवळ प्रत्येकच आंदोलनात त्यांना तुरुंगाची वारी घडली. त्या काळातली त्यांची एक आठवण अजूनही जुनी माणसे मिस्किलपणे सांगतात. कन्नमवार चांगली भाषणे देत. त्यांच्या भाषणात ग्रामीण म्हणी अन् गावठी किस्से भरपूर असत. ते सगळे चपखलपणे व्याख्यानात आणून ते भाषण रंगवीत. पण आरंभीच्या काळात त्यांना आपल्या व्याख्यानातला उत्साह आवरता येत नसे. बोलताना अवसान चढले की ते श्रोत्यांच्या दिशेने पुढे सरकू लागत. लाऊडस्पिकरची चैन तेव्हाच्या काँग्रेसला परवडणारी नसल्यामुळे पुढे सरकणाऱ्या त्या जोशिल्या नेत्याला अडवायला तो अडसरही त्या काळात नसे. या प्रवासात खूपदा ते व्यासपीठाच्या पुढल्या टोकापर्यंत पोहोचत. मग त्यांना कोणीतरी धरून मागे आणत असे. कै. पं. बालगोविंदजी हे त्या काळात चंद्रपूरच्या काँग्रेसचे ज्येष्ठ व आदरणीय नेते होते.


भाषण देताना पुढे सरकणाऱ्या कन्नमवारांना एका जागी खिळवून ठेवण्यासाठी त्यांच्या शर्टाच्या मागल्या बाजूला दोरी बांधण्याचा अफलातून आदेशच तेव्हा पंडितजींनी काढला.

ऐन भाषणात त्यांचे पाऊल पुढे पडले की कोणीतरी त्यांच्या शर्टाला बांधलेली दोरी मागून घट्ट धरून ठेवायचा. मात्र कोणताही दोर कन्नमवारांना थांबवू किंवा अडवू शकला नाही. उच्चभ्रू समाजाने कितीही नावे ठेवली तरी सामान्य माणूस नेहमी त्यांच्यासोबत राहिला अन् ते सामान्यांसोबत राहिले. याच प्रक्रियेतून त्यांच्या लोकनेतृत्वाचा उदय झाला.

विदर्भाच्या राजकारणात कन्नमवारांचे वर्चस्व जसजसे वाढत अन् विस्तारत गेले तसतसा काँग्रेसमधील एक एक प्रस्थापित पुढारी पक्षीय राजकारणाच्या बाहेर पडून ‘विधायक कार्य’ करू लागला.


आचार्य विनोबा भाव्यांचा पवनार आश्रम विदर्भातच असल्यामुळे त्यातल्या अनेकांना तो जवळ करावासा वाटला. कन्नमवारांकडून पराभूत झालेली किती माणसे त्या काळात अशा विधायक चळवळीकडे वळली त्याचा हिशोब कधीतरी मांडला जावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात कधीकाळी जोरात असलेली ब्राह्मणेतर चळवळ पूर्व विदर्भात फारशी जोरकस कधी नव्हतीच. असलीच तर तिचे थोडेफार अस्तित्व राजकारणापुरते मर्यादित होते अन् दादासाहेब कन्नमवार हे त्या क्षीण प्रवाहाचे प्रभावी नेते होते.


१९४१-४२ या काळात पुनमचंदजी राका यांच्यानंतर नागपूर प्रदेश काँग्रेस कमेटीचे ते अध्यक्ष झाले. नंतरच्या काळात काँग्रेसच्या तिकिटावर ते देशाच्या घटना समितीवर निवडले गेले. १९५२ साली झालेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकीत मध्यप्रांत व वऱ्हाडच्या विधीमंडळात निवडून जाऊन ते त्या राज्याचे आरोग्यमंत्री झाले.


कोणतीही शैक्षणिक पदवी गाठीशी नसणारा माणूस आरोग्य खात्याचा मंत्री झाला तेव्हा त्याची राज्याच्या उच्चभ्रूंकडून भरपूर टिंगलटवाळी होणे अपेक्षितच होते. कन्नमवारांचीही अशी पुरेशी टवाळी झाली. मेडिकल कॉलेजमधील एका रुग्णावरील उपचाराचे कागद हाती घेऊन कन्नमवारांनी त्याला ‘पोस्टमार्टम’ अहवाल म्हटले असा एक सरदारजी छाप विनोद त्यांच्या नावावर त्या काळात खपविला गेला.


स्वत:ला प्रतिष्ठित म्हणविणाऱ्या अनेक तथाकथित बुध्दिवंतांनी नंतरच्या काळात कन्नमवारांच्या नावावर अशा सवंग विनोदाच्या अनेक कहाण्या पिकविल्या. कन्नमवारांचा वेष आणि वागणे या दोहोतही एक अस्सल ग्रामीणपण असल्यामुळे अनेक पदवीधारक विद्वानांना त्या कहाण्या खऱ्याही वाटल्या. कन्नमवारांना सफाईदार अन् अस्खलित नसले तरी चांगले इंग्रजी येत होते. प्रशासकांच्या व अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रसंगी ते इंग्रजीतून बोलत.


मुंबईत भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन करताना त्यांनी तब्बल २० मिनिटे इंग्रजीत भाषण केले. त्या भाषणात जराशीही चूक झाल्याचे कोणाला आढळले नाही या वास्तवाकडे त्यांच्या टवाळखोरांना लक्ष द्यावेसे कधी वाटले नाही.


१९५९ साली मी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालो. माझे वडील स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व जिल्ह्याच्या काँग्रेस संघटनेतील एक आघाडीचे कार्यकर्ते होते. कन्नमवारजींशी त्यांचा संबंध परस्परांशी एकेरीत बोलण्याइतका निकटचा होता. दादासाहेब माझ्या वडिलांना ‘जन्या’ (जनार्दन) म्हणत अन् माझे वडील त्यांना त्यांच्या ‘मारोती’ या नावाने हाक मारत. त्या काळातील आमच्या हलाखीच्या स्थितीची पूर्ण जाणीव असलेल्या दादासाहेबांनी मला माझ्या परीक्षेतील यशाचे अभिनंदन करणारे १२ ओळींचे पत्र लिहिले. हे पत्र त्यांच्या हस्ताक्षरात अन् अस्सल इंग्रजीत आहे. ते मी अद्याप जपून ठेवले आहे. कन्नमवारांनी अनेक मंत्रीपदे भुषविली. वाटयाला आलेले खाते कोणतेही असो त्यातील प्रशासनाधिकाऱ्यांवर त्यांचा कमालीचा वचक होता ही गोष्ट प्रशासनातला कोणताही जुना अधिकारी आज सांगू शकेल.


१९५३ साली पोट्टी श्रीरामलू यांच्या नेतृत्वात झालेली आंध्रप्रदेशाच्या निर्मितीची चळवळीचे पडसाद पश्चिम महाराष्ट्रात उमटले. पश्चिम महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन उभे राहिले. याच काळात विदर्भात व विशेषत: पूर्व विदर्भात वेगळया विदर्भाची चळवळ संघटित होऊ लागली. दादासाहेब कन्नमवार हे मनाने पुरते विदर्भवादी होते. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगासमोर बोलताना कन्नमवारांनी वेगळया विदर्भाच्या मागणीचा जाहीर उच्चार केला.


वेगळया विदर्भासाठी स्वत:सकट आपल्यासोबत असलेल्या काँग्रेसच्या आमदारांचा विधीमंडळाचा राजीनामा द्यायला आपण तयार असल्याचे कन्नमवारांनी त्यावेळी सांगितले. राज्य पुनर्रचना आयोगाने भाषावर प्रांत रचनेबाबत केंद्र सरकारला केलेल्या शिफारशीत विदर्भाच्या वेगळया राज्याची शिफारस पुढे नोंदवली, हे कन्नमवारजींच्या भूमिकेचेच यश होते.


मात्र कन्नमवारांच्या विदर्भवादाला वऱ्हाडातील काँग्रेसचे पुढारी त्याही काळात अनुकूल नव्हते. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तर त्या राज्यावर मराठा जातीचे वर्चस्व असेल ही गोष्ट वऱ्हाड काँग्रेसमधील मराठा पुढाऱ्यांना तेव्हाही दिसत होती. विदर्भाचे वेगळे राज्य झाले तर त्याचे नेते मराठा नसलेले कन्नमवार असतील हेही त्या पुढाऱ्यांना कळणारे होते. स्वाभाविकच वऱ्हाडच्या प्रदेश काँग्रेस कमेटीमध्ये नागपूर काँग्रेस कमेटीएवढा विदर्भाबाबतचा उत्साह नव्हता. तशाही स्थितीत काँग्रेसच्या आमदारांना विदर्भाच्या प्रश्नावर एका रांगेत त्यांच्या राजीनाम्यानिशी उभे करणे कन्नमवारांना जमले, ही गोष्ट त्यांचा राजकारणावरील दबदबा स्पष्ट करायला पुरेशी ठरावी.


कन्नमवारजींचे विदर्भाच्या राजकारणावरील वर्चस्व निर्विवादपणे १९५९ साली नागपुरात भरलेल्या अ. भा. काँग्रेस महासमितीच्या अतिप्रचंड अधिवेशनानेही सिध्द केले. कन्नमवारजींच्या पत्नी गोपिकाबाई तेव्हा नागपूर प्रदेश काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष होत्या. त्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. या अधिवेशनाचे यजमानपद त्यामुळे स्वाभाविकपणेच कन्नमवारजींकडे होते. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत ढेबरभाईंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाची भव्यता पाहून देशाच्या वेगवेगळया भागातून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी कन्नमवारांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती.


या अधिवेशनाच्या काळात झालेली नागपूर लोकसभेची पोटनिवडणूकही फार गाजली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या ऐन धडाक्याच्या त्या काळात समितीने आपले उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांना उभे केले. ते कन्नमवारांच्याच गावचे म्हणजे चंद्रपूरचे होते. कॉ. डांगे, अत्रे, एसेम ही सगळी संयुक्त महाराष्ट्राची फर्डी माणसे त्यांच्या प्रचारासाठी नागपुरात तळ मांडून बसली होती. काँग्रेसने आपली उमेदवारी बापूजी अण्यांसारख्या तपस्वी विदर्भवाद्याला दिली होती. साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेली ही निवडणूक बापूजींनी ५० हजारांच्या मताधिक्याने जिंकली. कन्नमवारांच्या विदर्भावरील वर्चस्वाची चुणूकही संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांना त्यामुळे येऊन चुकली.


या नेत्यांचा कन्नमवारांवरील रोष नंतर अखेरपर्यंत कायम राहिला हेच पुढच्या घटनांनी स्पष्ट केले.

कन्नमवारांकडे पदवी नसली तरी प्रशासन कौशल्य होते. खेडयातून आलेल्या माणसाजवळ आढळणारे सहज साधे सावधपण आणि समयसूचकता त्यांच्यात होती. माणूस जोखण्याचे राजकीय कसब होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलण्यात अन् त्याला आपलेसे करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. सांगली-साताऱ्याकडील अनेक कार्यकर्त्यांनाही त्यांचे हे सहजसाधे माणूसपण भावले होते. ‘मुख्यमंत्री असून ते आमच्याशी घरच्या माणसाशी बोलावे तसे बोलले’ अशी त्यांची आठवण काढणारे पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाडयातले अनेकजण दादासाहेबांच्या मृत्यूनंतर मला भेटले अन् त्यांच्यातील अनेकांनी तशा आठवणी लिहिल्या.


*कन्नमवार मुख्यमंत्रीपदावर असतानाची गोष्ट*


सरकारी कामासाठी त्यांच्या वारंवारच्या बोलावण्याला कंटाळलेले एक वरिष्ठ अधिकारी एक दिवस सगळा धीर गोळा करून मुख्यमंत्र्यांना म्हणाले


‘दादासाहेब, आम्हा लोकांना एक कौटुंबिक जीवन आहे. सायंकाळची वेळ आम्हाला त्यात घालवायची असते. तुम्ही एकतर सकाळी नाहीतर सायंकाळी आम्हाला बोलवीत चला’


दादासाहेब म्हणाले ‘ठीक आहे’.


दुसरे दिवशी सकाळी ते स्वत:च त्या सचिवांच्या घरी पोहोचले. त्यांना तसे आलेले पाहून ते सचिव पुरेसे सर्द झाले. आरंभीचा स्वागताचा उपचार आटोपल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, ‘एक दोन फायलींवरचे निर्णय राहिले होते. ते आज दुपारपूर्वी घेणे जरूरीचे होते, तुम्हाला बोलवायचे जीवावर आले म्हणून मीच तुमच्याकडे आलो.’


सचिव जे समजायचे ते समजले अन् माफी मागून मोकळे झाले.

सिंहगडावर जाणारा रस्ता ताबडतोब दुरुस्त करण्याचे आदेश बांधकाम मंत्री असताना दादासाहेबांनी तिथल्या अधिकाऱ्यांना जागच्या जागी दिले. तसे करणे यंदाच्या आर्थिक तरतुदीत कसे बसणार नाही ही गोष्ट ते अधिकारी त्यांना समजावू लागले तेव्हा कन्नमवार म्हणाले,


‘तरतुदी काम करण्यासाठी असतात. ते न करण्यासाठी नसतात. तुमच्याने ते होत नसेल तर तेवढेच फक्त सांगा.’


मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांचा एक मोठा संप कन्नमवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत झाला. त्या संपाच्या वाटाघाटीसाठी कामगार नेत्यांचे एक शिष्टमंडळ जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्त्वात त्यांच्या भेटीला मुख्यमंत्र्यांच्या दालनात दाखल झाले. मुंबईच्या वृत्तपत्रांसह अनेक नामवंतांनी कन्नमवारांची जी प्रतिमा रंगविली तीच बहुदा या नेत्यांच्याही मनात असावी. वाटाघाटीला सुरुवात करतानाच त्या नेत्यांपैकी एकजण म्हणाला,


‘आमच्या मागण्यांपैकी बहुतेक सगळया आधीच्या मुख्यमंत्र्यांनी, यशवंतरावजींनी तत्त्वत: मान्य केल्याच आहेत.’


त्या पुढाऱ्याला तेथेच थांबवत दादासाहेब म्हणाले,


‘आता यशवंतरावजी मुख्यमंत्री नाहीत. मी मुख्यमंत्री आहे.’


पुढारी चपापले अन् साऱ्या गोष्टी नव्याने चर्चेला आल्या. त्याच चर्चेच्या दरम्यान त्या पुढाऱ्याने एकवार पुन्हा धीर एकवटून दादासाहेबांना म्हटले,


‘आमच्या विनंतीचा मान राखायला आपण एकवार यशवंतरावजींशी बोलून का घेत नाहीत?’


त्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तेव्हाच्या संरक्षण मंत्र्यांना तात्काळ फोन जोडून दिला गेला. अडचण एवढीच झाली की कधीही न बिघडणाऱ्या त्या फोनवर मुख्यमंत्र्यांचे बोलणे संरक्षण मंत्र्यांना स्पष्ट ऐकू गेले. संरक्षणमंत्र्यांचे बोलणे मात्र कन्नमवारांना अजिबात ऐकू आले नाही. हताश चेहरा करून दादासाहेबांनी यशवंतरावांना अखेर म्हटले,


‘काही एक ऐकू येत नाही. तुमचे म्हणणे मला लिहूनच कळवा.’


अन् त्यांनी फोन ठेवला.


कन्नमवारांचा बेरकीपणा यशवंतरावांसकट फर्नांडिसांनाही समजला तेव्हा त्या वाटाघाटी रीतसर सुरू झाल्या.

१९६७ साली भरलेल्या आनंदवनाच्या मित्रमेळाव्याला आलेल्या फर्नांडिसांनी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्याविषयीचे असे अनेक किस्से तेथे जमलेल्यांना ऐकविले. त्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत स.का. पाटील यांना पराभूत करून निवडून आलेल्या फर्नांडिसांभोवती एक तेजोवलय तेव्हा होते. त्यामुळे त्यांच्या गोष्टी ऐकायला त्यांच्याभोवती अनेकांनी गर्दी केली होती.


मुंबईतील सफाई कामगारांच्या संपाच्या काळात मुख्यमंत्री स्वत:च रस्ता झाडणार असल्याची साऱ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी घोषणा कन्नमवारांनी केली होती. लागलीच मुंबईच्या वृत्तपत्रांनी झाडुवाला मुख्यमंत्री म्हणून त्यांची टर उडवायला सुरुवात केली. कन्नमवारांचे हे प्रसिध्दीचे चाळे आहेत असेही त्यांच्या टीकाकारांनी सांगून टाकले. हातात झाडू घेतलेले कन्नमवार दाखविणारी टवाळखोर व्यंगचित्रेही तेव्हा प्रकाशित झाली.


प्रत्यक्षात ठरलेल्या दिवशी अन् नियोजित वेळी मुख्यमंत्री दादर चौकात आले आणि त्यांनी शांतपणे रस्ता झाडायला सुरुवात केली. स्वातंत्र्याच्या लढयात शिपाई म्हणून काम केलेल्या आणि सारे आयुष्य दारिद्रयात काढलेल्या कन्नमवारांना त्या कामाची खंत वाटण्याचे काही कारणही नव्हते. मुख्यमंत्री रस्ता झाडत असल्याचे पाहून दादर परिसरातले काँग्रेसचे कार्यकर्तेही हातात झाडू घेऊन रस्त्यावर आले. मुंबईच्या नागरिकांना हा अनुभव नवा होता. राज्याचे मुख्यमंत्री रस्ते सफाईचे काम प्रतिक म्हणून एकच दिवस करतील ही सर्व संबंधितांची अटकळ कन्नमवारांनी खोटी ठरविली.


दरदिवशी मुंबईच्या एका नव्या वस्तीत राज्याचा मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांसह रस्ते झाडत असल्याचे दृश्य मुंबईकरांना तेव्हा पाहायला मिळाले.

परिणाम असा झाला की या घटनेने संकोचलेले सफाई कामगारच फर्नांडिसांकडे जाऊन संप मागे घेण्याची विनंती त्यांना करू लागले. रस्ते सफाईची आरंभी टर उडविणाऱ्या वृत्तपत्रांनी त्या साध्या आणि प्रतिकात्मक कामगिरीच्या या परिणामाची दखल घेण्याचे मात्र नेमके टाळले.


ग्रामीण भागातून आलेल्या माणसांत एक उपजत शहाणपण असते. तशा नेत्यांमध्ये मी ते अनेकदा पाहिले आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्रीपदावर असताना एकदा भामरागडला आले. त्या गावच्या आदिवासींनी भामरागड ते लाहेरी हा रस्ता रुंद व चांगला करून देण्याची विनंती त्यांना केली. मात्र तेथील झाडे तोडता येणार नाहीत असा तेव्हाच्या वनसंवर्धन कायद्याचा निर्बंध होता. गावकऱ्यांची विनंती मान्य करायची तर शेकडो झाडे तोडावी लागतील आणि तसे करणे नियमात कसे बसत नाही हे तेव्हा वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.


जरा वेळ दोन्ही बाजूंचे ऐकून घेऊन वसंतदादा अधिकाऱ्यांकडे वळून म्हणाले,


‘झाडे तोडावी लागतील म्हणता ना. पण मला तर झाडे कुठे दिसतच नाहीत.’


अधिकारी समजायचे ते समजले आणि भामरागड-लाहेरी हा रस्ता काही महिन्यांतच बांधून तयार झाला. कन्नमवार असेच होते. त्यांना वसंतदादांसारखा विकासाचा सरळ मार्गच दिसत होता.


कन्नमवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतला असा एक प्रसंग मी स्वत: अनुभवला आहे. गडचिरोलीहून १३-१४ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खेडयातील शाळेच्या इमारतीचे उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऐन पावसाळयात व्हायचे होते. त्यासाठी दादासाहेब आदल्या रात्रीच गडचिरोलीत डेरेदाखल झाले होते. त्यांच्यासोबत आलेल्या पत्रकारांच्या चमूत मीही होतो. सारी रात्र पडलेल्या पावसाने त्या मागासलेल्या क्षेत्रातील अगोदरच्याच कच्च्या रस्त्यांचा सकाळपर्यंत पार चिखल करून टाकला होता. त्यामुळे शाळेच्या जागी जाणे कसे अवघड आहे हे तेथील अधिकारी सकाळी त्यांना समजावून सांगू लागले. त्यांचा तो सल्ला अव्हेरताना दादासाहेब शांतपणे म्हणाले,


‘अहो त्या गावात हजारो माणसे आपल्या भेटीसाठी आली असणार. तुमच्यापैकी ज्यांना चिखलातून येणे जमणार नसेल ते येथे थांबा. मला अशा प्रवासाची सवय आहे.’


पाहता पाहता हातात चपला घेऊन मुख्यमंत्री चिखलाची वाट तुडवू लागले. तब्बल १२ कि.मी. अंतर पायी चालत जाऊन ते तेथे जमलेल्या हजारो लोकांना भेटले.

त्यांच्यामागे पळत जाणाऱ्या अधिकाऱ्यांची तारांबळ तेथे जमलेल्या अनेकांची करमणूक करणारी ठरली. कन्नमवार आयुष्यभर सामान्य माणसात राहिले. आपल्यावरचा सामान्यपणाचा संस्कार त्यांनी जाणीवपूर्वक सांभाळला.


वागण्या बोलण्यातल्या साधेपणामुळे ते उच्चभ्रूंना त्यांच्या बरोबरीचे वाटले नसले तरी सामान्यांना मात्र ते कधी दूरचे वाटले नाही. त्यांचेही आग्रह असत आणि त्या आग्रहासाठी प्रसंगी ते कठोर भूमिका घेत. पण तुटेपर्यंत ताणण्याचा दुराग्रह त्यांनी कधी धरला नाही.


या साऱ्या काळात अत्रे आणि त्यांचा मराठा यांनी केलेले वार ते झेलतच राहिले. अत्र्यांच्या हल्ल्यापुढे भलेभले गारद झाले, भ्याले, त्यांना उत्तर देणे शक्य असूनही तसे करणे कोणाला फारसे जमले नाही. कन्नमवारांनी ते धाडस केले. मुळातच तो लढवय्या माणूस होता. अत्र्यांचे आव्हान स्वीकारून त्या जंगी माणसाला स्वप्नातही अनुभवावी लागली नसेल ती तुरूंगाची हवाच एक आठवडा कन्नमवारांनी त्याला खायला लावली. अत्र्यांची मुजोरगिरी त्यामुळे कमी झाली नसली तरी आपण ज्याच्याशी पंगा घेत आहोत त्याचे बळही त्या घटनेने त्यांच्या लक्षात आणून दिले…


नंतरच्या काळात विदर्भाच्या चळवळीचे एक नेते त्र्यं.गो. देशमुख यांचे आपल्या कार्यालयात स्वागत करताना आचार्यांनी कन्नमवारांच्या त्या साहसाची कबुलीच त्यांच्याजवळ देऊन टाकली.


१९६२ साली नगरला झालेल्या अ.भा. पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मराठवाडयाचे संपादक अनंत भालेराव तर उद्धाटक मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार होते. अनंतरावांच्या छापील भाषणात सरकारच्या वृत्तपत्रविषयक धोरणावर कठोर टीका करणारे काही परिच्छेद होते. ते परिच्छेद तसेच वाचले जाणार असतील तर मला तेथे येता येणार नाही असा निरोप मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी परिषदेच्या आयोजकांना पाठविला. अनंतरावांनीही आपल्या भाषण स्वातंत्र्याचा आग्रह धरून आपण तो परिच्छेद वाचणारच असे स्पष्ट केले. परिणामी उद्धाटनाची वेळ टळली तरी परिषदेचे व्यासपीठ रिकामेच राहिले.


जरा वेळाने स्वत: अनंतरावांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना ते स्वातंत्र्यसंग्राम सैनिक असल्याची आठवण करून दिली. खुद्द अनंतराव हैद्राबादच्या मुक्ती लढयातील आघाडीचे सैनिक होते. एका स्वातंत्र्य सैनिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या स्वातंत्र्याचा संकोच करणे चांगले नाही असे अनंतरावांनी म्हणताच कन्नमवार विरघळले आणि लगोलग समारंभाच्या ठिकाणी आले. पुढल्या कार्यक्रमात अनंतरावांनी ते परिच्छेद वाचले तेव्हा कन्नमवारांनी आपले डोळे मिटून घेतले एवढेच तेथे जमलेल्या पत्रकारांसोबत मी पाहिले.


१९६२ च्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील सगळे विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात प्रथमच संघटित झाले. त्या निवडणुकीत कन्नमवारांना जेमतेम सहाशे मतांनी विजय मिळवता आला. त्यांच्या विजयाची वार्ता समजली तेव्हा त्यांचे खंदे विरोधक असलेले अहेरीचे राजे विश्वेश्वरराव म्हणाले ‘माझ्या सर्वात चांगल्या शत्रूचे मी मनापासून अभिनंदन करतो.’ राजकारणात शत्रुत्व करणाऱ्या कन्नमवारांनी आपल्या विरोधकांशी असे जिव्हाळयाचे संबंध जपले होते हे सांगणारी ही घटना आहे.


त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक हजरजबाबी खटयाळपणाही होता. मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाल्यानंतर चंद्रपूरच्या जिल्हा पत्रकार संघाने त्यांचा एक छोटेखानी सत्कार केला. शांताराम पोटदुखे हे त्यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि मी सरचिटणीस होतो.


त्यांच्या स्वागतपर भाषणाची सुरुवात करताना ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री’ असे न म्हणता चुकून मी महाराष्ट्राचे मुख्याध्यापक असे म्हणालो. त्यावर दादासाहेब जोरात ओरडून म्हणाले,


*‘अजूनही शाळेतच आहेस का रे..?’*


विदर्भातल्या माझ्यासारख्या असंख्य माणसांनी त्यांची अशी असंख्य साधी रूपे डोळयात आणि मनात साठवली आहेत. वंचनेपासून प्रतिष्ठेपर्यंतचा आणि सडकेपासून सत्तापदापर्यंतचा त्यांचा प्रवास आमच्या परिचयाचा आहे. सत्ताकारणात अपरिहार्यपणे वाटयाला येणारे सन्मान आणि मनस्ताप हे दोन्ही त्यांनी भरपूर अनुभवले. पण एवढया साऱ्या काळात त्यांचे माणूसपण आणि साधेपण कधी हरवले नाही. अपयशांनी खचलेले कन्नमवार कधी कोणी पाहिले नाहीत अन् यशाने त्यांना हेकेखोर बनविल्याचेही कधी कोणाला दिसले नाही. एवढया साध्या, सामान्य आणि गरीब माणसाचे मुंबईच्या वृत्तपत्रांनी केलेले विकृतीकरण त्याचमुळे विदर्भाला कधी समजू शकले नाही.


बापाचा वारसा नाही, जातीचं पाठबळ नाही, पैशाचा आधार नाही आणि शिक्षण वा पदवीसारख्या लौकिकावर मदार नाही. कन्नमवार असे वाढले आणि तशा गोष्टींच्या कुबडया घेऊन राजकारणाची वाट धरणाऱ्या साऱ्यांना त्यांनी मागे टाकले.


आपल्या स्पर्धेत असलेल्या प्रत्येकाच्या गळयात त्यांनी पराजयाचा गंडाही असा बांधला की त्या पराभूतांनाही तो त्यांचा सन्मानच वाटावा. त्यांच्या राजकारणामुळे त्या क्षेत्रातून हद्दपार व्हावे लागलेल्या अनेक थोरामोठयांनी पुढे ‘कन्नमवार आपले स्नेही होते’ एवढीच एक गोष्ट नोंदवून त्यांच्या मोठेपणाएवढेच स्वतःच्या पराजयावर पांघरूण घातलेले दिसले.


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या प्रत्येकच पुढाऱ्याने आपले राजकीय वारसदार जन्माला घातले. पोटची मुले नसतील तर मानसपुत्र पुढे आणले. मुख्यमंत्री म्हणून पार अपयशी झालेल्या इसमांनीही तेवढा एक पराक्रम आपल्या नावावर नोंदविलेला दिसला. या साऱ्यांना अपवाद ठरलेला व त्यामुळे मराठी राजकारणातली घराणेशाही अधोरेखित करणारा एकमेव नेता आहे, मा.सां. कन्नमवार. त्याला अभावाचा वारसा होता आणि त्याने निर्माण केलेली परंपराही त्यागाचीच होती.


कन्नमवारांचा जन्म १० एप्रिल १८९९ या दिवशी झाला.१९९९ मध्ये त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीची बैठक तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात भरली होती.


तीत बोलताना विदर्भातील एका ज्येष्ठ पत्रकाराने सह्याद्री या अतिथीगृहाला कन्नमवारांचे नाव देण्याची सूचना केली. कन्नमवारांचा मृत्यू त्यात झाला म्हणून त्याला ती करावीशी वाटली. ती ऐकताच मुख्यमंत्र्यांची झालेली अडचण त्यांच्या चेहऱ्यावर उमटली. मग ‘ही सूचना मान्य करण्यापेक्षा पंत वेगळा विदर्भ देणे पसंत करतील’ असे म्हणून मीच मुख्यमंत्र्यांची त्या पेचातून सुटका केली होती.


२४ नोव्हेंबर १९६३ रोजी कार्यालयात असताना त्यांचा मृत्यू झाला. 


विक्रोळी (पूर्व), मुंबई मधील कन्नमवार नगर हे त्यांच्या नावावर आहे.   

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६


गुरू तेग बहादूर

 *गुरु तेग़ बहादुर*

         *👳🏻‍♂️नववे सिख गुरु👳🏻‍♂️*


      जन्म : १८ अप्रैल १६२१

   (जन्म भूमि अमृतसर,पंजाब)


    *मृत्यु : २३ नवम्बर १६७५*

(मृत्यु स्थान चांदनी चौक,नई दिल्ली)



पुरा नाम : गुरु तेग़ बहादुर सिंह


अभिभावक : गुरु हरगोविंद सिंह और माता नानकी

पति/पत्नी: माता गुजरी

संतान : गुरु गोविन्द सिंह

कर्म भूमि : भारत


पुरस्कार-उपाधि : सिक्खों के नौवें 

                          गुरु

नागरिकता : भारतीय


गुरू तेग़ बहादुर सिखों के नवें गुरु थे जिन्होने प्रथम गुरु नानक द्वारा बताए गये मार्ग का अनुसरण करते रहे। उनके द्वारा रचित ११५ पद्य गुरु ग्रन्थ साहिब में सम्मिलित हैं। उन्होने काश्मीरी पण्डितों तथा अन्य हिन्दुओं को बलपूर्वक मुसलमान बनाने का विरोध किया। इस्लाम स्वीकार न करने के कारण १६७५ में मुगल शासक औरंगजेब ने उन्हे इस्लाम कबूल करने को कहा कि पर गुरु साहब ने कहा सीस कटा सकते है केश नहीं। फिर उसने गुरुजी का सबके सामने उनका सिर कटवा दिया। गुरुद्वारा शीश गंज साहिब तथा गुरुद्वारा रकाब गंज साहिब उन स्थानों का स्मरण दिलाते हैं जहाँ गुरुजी की हत्या की गयी तथा जहाँ उनका अन्तिम संस्कार किया गया। विश्व इतिहास में धर्म एवं मानवीय मूल्यों, आदर्शों एवं सिद्धांत की रक्षा के लिए प्राणों की आहुति देने वालों में गुरु तेग़ बहादुर साहब का स्थान अद्वितीय है।


"धरम हेत साका जिनि कीआ

सीस दीआ पर सिरड न दीआ।"

—एक सिक्ख स्रोत


इस महावाक्य अनुसार गुरुजी का बलिदान न केवल धर्म पालन के लिए नहीं अपितु समस्त मानवीय सांस्कृतिक विरासत की खातिर बलिदान था। धर्म उनके लिए सांस्कृतिक मूल्यों और जीवन विधान का नाम था। इसलिए धर्म के सत्य शाश्वत मूल्यों के लिए उनका बलि चढ़ जाना वस्तुतः सांस्कृतिक विरासत और इच्छित जीवन विधान के पक्ष में एक परम साहसिक अभियान था।


आततायी शासक की धर्म विरोधी और वैचारिक स्वतंत्रता का दमन करने वाली नीतियों के विरुद्ध गुरु तेग़ बहादुरजी का बलिदान एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना थी। यह गुरुजी के निर्भय आचरण, धार्मिक अडिगता और नैतिक उदारता का उच्चतम उदाहरण था। गुरुजी मानवीय धर्म एवं वैचारिक स्वतंत्रता के लिए अपनी महान शहादत देने वाले एक क्रांतिकारी युग पुरुष थे।


२४ नवंबर,१६७५ ई को दिल्ली के चांदनी चौक में काज़ी ने फ़तवा पढ़ा और जल्लाद जलालदीन ने तलवार करके गुरू साहिब का शीश धड़ से अलग कर दिया। किन्तु गुरु तेग़ बहादुर ने अपने मुंह से सी' तक नहीं कहा। आपके अद्वितीय बलिदान के बारे में गुरु गोविन्द सिंह जी ने ‘बिचित्र नाटक में लिखा है-


तिलक जंञू राखा प्रभ ताका॥ कीनो बडो कलू महि साका॥

साधन हेति इती जिनि करी॥ 

सीसु दीया परु सी न उचरी॥

धरम हेत साका जिनि कीआ॥ सीसु दीआ परु सिररु न दीआ॥ (दशम ग्रंथ)


☮ *धर्म प्रचार*


गुरुजी ने धर्म के सत्य ज्ञान के प्रचार-प्रसार एवं लोक कल्याणकारी कार्य के लिए कई स्थानों का भ्रमण किया। आनंदपुर से कीरतपुर, रोपड, सैफाबाद के लोगों को संयम तथा सहज मार्ग का पाठ पढ़ाते हुए वे खिआला (खदल) पहुँचे। यहाँ से गुरुजी धर्म के सत्य मार्ग पर चलने का उपदेश देते हुए दमदमा साहब से होते हुए कुरुक्षेत्र पहुँचे। कुरुक्षेत्र से यमुना किनारे होते हुए कड़ामानकपुर पहुँचे और यहाँ साधु भाई मलूकदास का उद्धार किया।


यहाँ से गुरुजी प्रयाग, बनारस, पटना, असम आदि क्षेत्रों में गए, जहाँ उन्होंने लोगों के आध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक, उन्नयन के लिए कई रचनात्मक कार्य किए। आध्यात्मिक स्तर पर धर्म का सच्चा ज्ञान बाँटा। सामाजिक स्तर पर चली आ रही रूढ़ियों, अंधविश्वासों की कटु आलोचना कर नए सहज जनकल्याणकारी आदर्श स्थापित किए। उन्होंने प्राणी सेवा एवं परोपकार के लिए कुएँ खुदवाना, धर्मशालाएँ बनवाना आदि लोक परोपकारी कार्य भी किए। इन्हीं यात्राओं के बीच १६६६ में गुरुजी के यहाँ पटना साहब में पुत्र का जन्म हुआ, जो दसवें गुरु- गुरु गोबिन्दसिंहजी बने।

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

संकलन -)गजानन गोपेवाड 

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🚩🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🚩

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,पुनर्वसु नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २४ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


         *"हम रिश्तों को और अधिक मधुर एवं प्रगाढ़ बना सकते है... बस अपनी सोच में छोटा सा परिवर्तन करके-*


       *"हम विचार करें कि सामने वाला इतना त्रुटिपूर्ण नही है, वह मात्र हमारी अपेक्षाओं से थोड़ा भिन्न है"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

कुतुहल आकाश मोजणी प्रकाशवर्षे


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : अंतरमोजणी प्रकाशवर्षांने!*


‘प्रकाशवर्ष’ हा शब्द वाचून अनेकांना ‘वर्ष’ या कालमापनाच्या एककाप्रमाणेच हेही वेळ मोजण्याचेच एकक असावे, असे वाटू शकते. पण प्रत्यक्षात तसे नसून ‘प्रकाशवर्ष’ हे मोठी अंतरे मोजण्यासाठीचे एकक आहे. खगोलीय वस्तूंतील अंतर प्रचंड असल्याने ते किलोमीटर, मैल अशा एककांत मोजणे कठीण जाते. म्हणून प्रकाश सर्वांत वेगवान असल्याने अवकाशातील प्रचंड अंतरे मोजण्यासाठी प्रकाशाने पार केलेल्या अंतराचा वापर होऊ लागला. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने ‘प्रकाशाने निर्वात जागेतून प्रवास करताना एका ज्युलियन वर्षांत पार केलेले अंतर म्हणजे एक प्रकाशवर्ष’ अशी व्याख्या केली आहे. साधारणपणे हे एकक दोन ताऱ्यांमधील किंवा दीर्घिकांमधील अंतरे मोजण्यासाठी वापरतात.


प्रकाशवर्ष या संकल्पनेचा प्रथम उल्लेख फ्रेड्रिक बेसेल यांनी १८३८मध्ये केला. त्यांनी खगोलशास्त्रीय एकक (अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनिट) वापरून ‘६१ सिग्नी’ या जुळ्या ताऱ्यांचे अंतर मोजले, पण वाचकांना कल्पना करणे अधिक सोपे आणि रंजक व्हावे यासाठी वर्णन करताना प्रकाशाला हे अंतर पार करायला १०.३ वर्षे लागतील असे म्हटले. परंतु तेव्हा प्रकाशाचा वेग अचूकपणे मोजून त्याची स्थिरांक म्हणून नोंद झाली नव्हती. मात्र आता एक ज्युलियन वर्ष = ३६५.२५ दिवस = (३६५.२५ गुणिले २४ गुणिले ६० गुणिले ६०) सेकंद = ३,१५,५७,६०० सेकंद आणि प्रकाशाचा वेग २९,९७,९२,४५८ मीटर/सेकंद मानला जातो. त्यामुळे एक प्रकाशवर्ष हे (३,१५,५७,६०० सेकंद) गुणिले (२९,९७,९२,४५८ मीटर/सेकंद) म्हणजेच सुमारे (९.४६०७) गुणिले १०चा बारावा घात किलोमीटर एवढे असते. खगोलशास्त्रज्ञ अवकाशीय अंतरे मोजण्यासाठी पार्सेक हे आणखी एक मोठे एकक वापरतात. १ पार्सेक = ३.२६ प्रकाशवर्षे. लोकप्रिय विज्ञानसाहित्यात मात्र प्रकाशवर्ष याच एककाचा उल्लेख प्राधान्याने दिसतो.


प्रकाशवर्ष याच संकल्पनेच्या विस्ताराने प्रकाशसेकंद, प्रकाशमिनिटे यांसारख्या संकल्पना उदयास आल्या. उदाहरणार्थ, प्रकाशसेकंद म्हणजे प्रकाशाने निर्वात जागेत एका सेकंदात पार केलेले अंतर. सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित झाल्यावर पृथ्वीवर पोहोचायला सुमारे १.२ ते १.३ सेकंद लागतात. म्हणून चंद्र आणि पृथ्वीतील अंतर १.२ ते १.३ प्रकाशसेकंद आहे. तसेच सूर्यप्रकाश थेट पृथ्वीवर पोहोचायला सुमारे ८.३२ मिनिटे लागतात. म्हणून सूर्य आणि पृथ्वीतील अंतर (एक खगोलशास्त्रीय एकक) ८.३२ प्रकाशमिनिटे आहे. आपल्या सूर्याच्या सर्वांत जवळच्या ज्ञात ताऱ्याचे म्हणजेच एका नरतुरंगियाचे (प्रॉक्झिमा सेण्टॉरी) सूर्यापासूनचे अंतर साधारण ४.२५ प्रकाशवर्ष आहे. आपल्या आकाशगंगेचा विस्तार सुमारे १,५०,००० प्रकाशवर्ष आहे. तसेच देवयानी तारकासमूहातील ‘एम ३१’ दीर्घिकेचे आपल्यापासूनचे अंतर सुमारे २५ लाख प्रकाशवर्ष असल्याने आपण सध्या ही २५ लाख वर्षांंपूर्वीची दीर्घिका पाहतो!


–मुग्धा महेश पोखरणकर

मराठी विज्ञान परिषद, 

दत्तात्रय पोतनीस जन्म

 *दत्तात्रय (दादासाहेब) शंकर पोतनीस*


    *जन्म : २२ नोव्हेंबर १९०९*

                (वाई, सातारा)


     *मृत्यू : २७ आॕगष्ट १९९८*

 

केवळ नाशिकच नव्हे,तर महाराष्ट्रातही दादासाहेब पोतनीस एक अत्यंत आदरणीय आणि नामांकित व्यक्ती होते.त्यांच्या बायोडाटावरून स्पष्ट होते की त्यांनी मानवी जीवनातील राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात ठसा उमटविला होता.महात्मा गांधीजी आणि तत्त्वज्ञानावर कट्टर विश्वास असलेले त्यांनी आपले जीवन समाजाच्या उन्नतीसाठी वाहिले आहे. जर्नलिझममधील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि आर्थिक आणि सामाजिक जीवनाच्या सर्वांगीण विकासामध्येही असेच आहे. शाळा,बँक,सहकारी बँक,सहकारी साखर कारखाना आणि ग्राहक समाज यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते अग्रेसर आहेत. त्याला क्वचितच आढळले पुण्य म्हणजे अलिप्तता. एकदा जेव्हा त्यांना कळले की आस्थापने स्वतःची काळजी घेण्यास सक्षम आहेत,तेव्हा त्याने स्वत: ला त्यांच्यापासून दूर ठेवले आणि त्याने मोठे आव्हान स्वीकारले.२२ नोव्हेंबर १९०९ रोजी वाई (जि. सातारा) येथे जन्म, त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात आणि पुण्याच्या एसपी महाविद्यालयात मॅट्रिक नंतर झाले. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांचा सामाजिक कार्याकडे कल होता.ते दिवस ब्रिटीशांच्या राजवटी विरुद्ध राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे दिवस होते. बी.ए.वर्गात शिकत असताना त्यांनी महाविद्यालय सोडले व कॉंग्रेस पक्षासाठी काम करण्यास सुरवात केली.त्याला पाच वेगवेगळ्या वेळेस तुरूंगवास भोगावा लागला.


♻ *राजकीय काम*


त्यांची राजकीय कारकीर्द १९३० मध्ये सुरू झाली. ते रविवार कारंजा येथे नाशिक कारागृहात  ४५ दिवस तुरुंगात होते.१९३१ मध्ये त्यांनी नाशिक जिल्ह्यातील बागलाण येथे सत्याग्रह आश्रम स्थापन केले.१९३२ मध्ये ते नाशिक जिल्ह्यात भूमिगत कामगार म्हणून कार्यरत होते. ते अनेक वर्षे नाशिक जिल्हा कॉंग्रेस सेक्रेटरी होते.१९३४ मध्ये ते विनोबा भावे या सामाजिक कार्यकर्त्याशी संबंधित होते. त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे आयोजक आणि निवडणूक प्रचारक म्हणून काम केले. ते बर्‍याच वर्षांपासून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सदस्य होते.१९५० मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय कॉंग्रेस परिषदेसाठी त्यांनी प्रसिद्धी प्रमुख आणि स्वागत समितीच्या सदस्य म्हणून काम केले.


📰 *पत्रकारिता*


१९३८ मध्ये त्यांनी “गडकरी” दैनिक वृत्तपत्र सुरू केले. तेव्हापासून ते गडकरीचे मुख्य संपादक होते.


संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात गडकरींचे प्रसारण ९०००० पेक्षा जास्त आहे.“गावकरी” आता ६० वर्षांचे आहेत.१९५२ मध्ये त्यांनी “अमृत मराठी डायजेस्ट” हा मासिक उपक्रम सुरू केला. तरुण पिढीसाठी साप्ताहिक “रस रंग” प्रकाशित होण्यास सुरुवात झाली आणि आजही विविध खेळ व चित्रपटगृहातील माहितीसाठी ते प्रसिद्ध आहेत.१९७५ मध्ये कृषी साधनाचे साप्ताहिक प्रथम प्रकाशित झाले. गावकरीची बहीण असलेली दैनिक “अजिंठा” वृत्तपत्र १९६० मध्ये मराठवाडा प्रांतासाठी औरंगाबाद येथे सुरू झाले. ते मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष होते. गोव्याच्या पंजिम येथे आयोजित पत्रकार परिषदेचे ते अध्यक्ष होते. ते शोलापुरात आयोजित “महाराष्ट्र मुद्रा परशहाद” चे अध्यक्ष होते. ते भारतीय भाषा वृत्तपत्र संघटनेचे सचिव आणि उपाध्यक्ष देखील होते.


💎 *समाजकार्य*


१९३६ मध्ये ते सेवा दलाच्या कामात सामील झाले. १९४२ पर्यंत ते जिल्हा सेवादल प्रमुख होते. खरं तर ते नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यात सेवा दल चळवळीचे प्रवर्तक होते.महात्मा गांधींच्या आमंत्रणामुळे प्रभावित होऊन त्यांनी महाविद्यालय सोडले आणि स्वतःला राष्ट्रीय हितासाठी वाहिले. बागलाण तालुक्यात त्यांनी ग्रामसेवा समितीची स्थापना केली.१९३२ मध्ये ग्रामसेवा समितीवर ब्रिटीश सरकारने बंदी घातली आणि समितीच्या सर्व कामगारांना अटक करून तुरूंगात टाकले गेले. ते महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या गांधी सेवा संघाचे सदस्यही होते.


🏢 *शैक्षणिक कार्य*


त्यांनी मालेगाव व बागलाण तालुक्यात ३० प्राथमिक शाळा सुरू करण्यास पुढाकार घेतला आहे आणि १९४२ मध्ये तुरूंगात टाकण्यापर्यंत कार्यरत असलेल्या मालेगाव तालुका प्राथमिक शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यांच्या पत्नीही १९४० मध्ये सहा महीने धारापूरमधील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांच्यात सामील झाले.नाशिकमधील बिडी कामगार संघटना त्यांच्यामार्फत तयार केली गेली.


🔱 *सांस्कृतिक कार्य*


त्यांचा नाशिकच्या अनेक सांस्कृतिक संघटनांशी जवळचा संबंध आहे. ते ११ वर्षे लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष होते. नाशिक शहराच्या सुशोभिकरणासाठी त्यांनी “वनराई मित्र मंडळ” स्थापन केले ज्याचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.


🌀 *उद्योग,अर्थशास्त्र आणि वाणिज्य*


आर्थिक क्षेत्रातही त्यांचे काम भरीव आहे. त्यांनी ग्रामीण उद्योग संघटनांची स्थापना केली आणि बरेच वर्षे ते मुख्य प्रवर्तक आणि फेडरेशनचे अध्यक्ष होते. त्यांनी जिल्हा दूध सहकारी संस्था स्थापन केली. शासकीय दूध योजना नाशिक हा त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. नाशिक येथे वाणिज्य आणि उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांनी अनेक परिषदा आयोजित केल्या. १९५८ मध्ये त्यांनी नाशिक व्यापारी सहकारी बँकेची स्थापना केली आणि या बँकेचे मुख्य प्रवर्तक, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून काम केले.


१९६०-६२ मध्ये त्यांनी नाशिक औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या नेतृत्वात नाशिक शहरातील सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर सोसायटीची स्थापना १९६५ मध्ये झाली. तेथे त्यांनी २ वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले. ते नाशिक येथे नाशिक सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक होते, जिथे त्यांनी बरीच वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले.


⚜ *धार्मिक क्षेत्रात कार्य*


त्यांनी टाकळी येथील रामदास मंदिराच्या नूतनीकरणाला पाठिंबा दर्शविला आणि ते टाकळी देवस्थानचे अध्यक्ष होते. त्यांनी अंजनेरी येथे हनुमान जन्म स्थानाच्या विकासासाठी काम केले आणि हनुमान जन्म स्थान विकास समितीची स्थापना केली. ते नाशिक येथे “संत विचार भारती” संस्थेचे अध्यक्ष होते. धर्मनिरपेक्षतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्व संस्थानांची स्थापना केली. 

       

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

  🙏🙏🙏 शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६