मंगळवार, २८ जुलै, २०२०

डॉ ए पी जे अब्दूल कलाम यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दिनांक 27/7/2020

1)रोषनी दाते
पं. स. कोरची 

2)निलेश  गिरडकर 
पं स मूलचेरा 

3)सुशांत जगताप 
पं स, भडगाव 

4)दामोधर डहाळे
प,स तुमसर

5)संदिप कोल्हे 
पं स कळंब

6)हूमेंदं चांदेवार 
पं स सडक अर्जुनी 

7)निलेश रामटेके 
पं स कोरची

8)हेमराज अहिरे 
पं स शिरपुर

9)सिंधू मोटधरे 
पं  स मोरेगांव

10)अविनाश खैरनार 
पं स धुळे 

11)नारायण भिलाने
पं स साक्री 

12)अविनाश पाटिल
पं स धुळे

शनिवार, २५ जुलै, २०२०

डाँ, कलाम सरांच्या पुण्यतिथि निमित्ताने महाराष्ट्र राज्य मध्ये उपक्रम घेण्यात येणार आहे

🔥अग्निपंख फाऊंडेशन च्या सर्व उपक्रमशील शिक्षकांसाठी एक सुवर्ण संधी 🔥🔥🔥
   दि. 27 जुलै ला डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी निमित्त आपल्यासर्वांसाठी एक महत्वपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्याला 27 जुलै ला डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त सध्या लाकडाऊन असल्याने सर्व नियमांचे पालन करित आपापल्या परीने कार्यक्रम घेऊन त्याचा व्हिडीओ, सोबत आपलं पुर्ण नाव, शाळेचे नाव, मोबाइल क्रमांक व इमेल सह खाली दिलेल्या क्रमांकावर  सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत दिलेल्या नंबरवर पाठवायचं आहे.
 प्रत्येक तालुक्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
  सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे रराज्यसमन्वयक अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य
क्र 9423414686
--------—-------------------
गजानन गोपेवाड राज्यसमन्वयक अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य 
 क्र. 7378670283

गुरुवार, २३ जुलै, २०२०

पहाटेची अमर्याद ताकद

*पहाटेची अमर्याद ताकद*...💪💪💪

*तुम्ही सकाळी किती वाजता उठता?*
 
झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं!

मोठी माणसं सांगायची,
*“लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे !”*
आणि ते खरं आहे, 

*हेल एरॉल्ड* नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती.

पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.

पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?

*“हेल, तु सकाळी लवकर उठ!”* “बाकी सगळं आपोआप होईल”
या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, 
काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन *त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली,*

आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!

*पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का?*

इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय.

*"S-A-V-E-R-S"*

*ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत.*

१) *Silence – (ध्यान)*

- शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!

- स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!

- मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!

- मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!

- माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!

- अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान! 

२) *Affirmations – (सकरात्मक स्वयंसूचना)*

- अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!

- स्वतः स्वतःला सुचना देणं,

- प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!
- येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!

*- स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.*

- अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.

- आपले पूर्वज म्हणायचे, शुभ बोल नाऱ्या!..किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलु तसेच घडते, जिभेवरचे देवता तथास्तु म्हणते, वगैरे वगैरे 

- या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, ह्यामागे मनोविज्ञान आहे.

*- एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?* 

- वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!... 

३) *Visualize – (चांगल्या कल्पना मनात घोळवणे.)*

तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!

*- कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.*

- कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.

- दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.

- पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.

- ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे. 

- मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.

- प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, *“यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!”* 

४) *Exercise – (व्यायाम)*

*- शरीरातून आळसाला पळवून  लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम!*

*- शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!*

*- व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त मैथुनाकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.*

- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  

- तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.

- ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा. 

- शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

५) *Reading – (वाचन)*

*- पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.* 

- पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.

*- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.*

६) *Scribing – (लिहिणे.)*

- माझे ठाम मत आहे, की माझ्या आयुष्यातल्या खडतर काळात मी जर लिहीत राहीलो नसतो तर मी आज जिवंत राहीलो नसतो.

*- लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.*

- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.

- लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.

- म्हणून संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.

*- लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.*

*- लिहिल्याने विचार पक्के होतात.*

*- सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,*

- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत,

- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.

- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,

- आणि रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.

*- लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!*

- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.

- अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

*ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे.*

*वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत.*? 
 
मला ह्या सगळ्या सवयींचा खूप खूप फायदा झाला .
तुम्हालाही ह्या सवयी उपयुक्त ठरतील.

सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने म्हणा, पण आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे...तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे...
कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो...आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत..
तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू....
अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.....
वेळ आहे स्वतःवर काम करण्याची....स्वतःसाठी जगण्याची.....आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याचा.. 

*काळजी घ्यायची आहे,काळजी करायची नाही.*
आपला
गजानन गोपेवाड 
राज्य समन्वयक महाराष्ट्र 

बुधवार, २२ जुलै, २०२०

"अस्तित्व "तु भिकारी नाही व्यापारी आहेस

*💫अस्तित्व💫*


✨ *_तू भिकारी नाही व्यापारी आहेस....!_*✨

👆एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसले, ते होते, *महामानव विश्ववरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर.* त्यांना पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा माणूस बराच श्रीमंत दिसतो, यांना भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी त्यांच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्यांना भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून *डॉ. बाबा साहेब आंबेडकर* म्हणाले :-  *_“तू तर नेहेमी इतरांना काहीना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला कांही देतोस तरी का?”_*

*डॉ. बाबा साहेब आंबेडकर* म्हणाले :- 
 तेव्हा तो भिकारी म्हणाला :-  *_“साहेब, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागत फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?”_*
 
*बाबा साहेब आंबेडकर* म्हणाले :- 
 *_"अरे, तू जर कुणाला कांहीच देऊच शकत नाही, तर तुला भीक मागण्याचाही कांही अधिकार नाही. मी स्वतः वकील आहे, आणि माझा व्यवसाय लोकांना सल्ला देण्याचा व बदल्यात मोबादला घेण्याचा आहे. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन.”_* साहेब उत्तरले.

इतक्यात स्टेशन आले आणि साहेब स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी साहेबांच्या बोलण्यावर विचार करू लागला. साहेबांनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की साहेब म्हणाले ते बरोबर असावे. मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना कांही ना कांही दिल्याशिवाय केवळ भिकच मागत राहायची?
बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भिक घालील त्याला कांही ना कांही मी जरूर देईन. पण काय द्यायचे? *_जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे, ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल?_*

 दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता, पण त्याला उत्तर सापडत नव्हतं.
विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेव्हढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली.
तो गाडीत शिरला आणि नेहेमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कुणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे. ती सुगंधी, ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली.
कांही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे. तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक त्याला भीक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असतांना त्याला तेच सुटाबुटात *महामानव डॉ.भीमराव आंबेडकर* पुन्हा दिसले. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला :- *_“साहेब, आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत. तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन._*  साहेबांनी त्याला कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून साहेब खुश झाले होते. ते म्हणाले :- *_“व्वा! क्या बात है? आज तू ही माझ्यासारखा एक व्यावसायिक झालास.”_* एव्हढं बोलून साहेब गाडीतून स्टेशनवर उतरून निघुन गेले. पण त्या साहेबांनी बोललेले एक वाक्य, *_“आज तू ही माझ्यासारखा एक व्यावसायिक झालास?",_*  भिका-याच्या मनात घर करून गेलं. तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.
विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, *_“नाही, मी भिकारी राहिलेलो नाही व्यावसायिक आहो, व्यावसायिक. मी सुद्धा त्या साहेबांन सारखा एक छान व्यावसायिक होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो.”_* आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.
साधारणपणे एक वर्षा नंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार 🙏केला आणि स्मितहास्य😊 करीत विचारले :- *_"ओळखलंत मला साहेब?_*
आता त्याच्याकडे पाहत *डॉ. भीमराव आंबेडकर* उत्तरले :- *_“नाही, मला कांही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत.”_*
पहिला :-  *_“नाही, नाही! साहेब. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत.”_*
*डॉ. भीमराव आंबेडकर* :-  *_“असं? मला तर कांही आठवत नाहीये. या आधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो?”_*
पहिला माणूस हसून उत्तरला :-  *_“ह्या आधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्याच स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितले. आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितले होते. आठवतंय?”_* 🌹 *_"आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यवसाईक झालोय आणि माझ्या_* *_व्यावसाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय._*
*_पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला कांही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं कांही तरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे._* *_मीच मला नेहेमी भिकारी समजत राहिलो. यापलीकडे मी कांही विचार केलाच नव्हता._* *_दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं. आणि मग मात्र मला असं पक्केपणे वाटू लागलं की मी भिकारी नाही,_* *_व्यावसायिक आहे. हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवलात. आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय.”..._*🌹🌹🌹

*👉तुम्ही स्वतः कडे कसं बघता यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे...👈👍*

*🤳उठा आणि कामाला लागा ..🤳*
*🤳नशिबाला उगचं दोष देत बसू नका...🙂🤳*
(हे लिखाण *अस्तित्व* ह्या विश्ववरत्न महामानव डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या लेखनीतून  घेतलेले आहे. जे 1980 साली न्यू- यार्क टाइम मधे *उद्योग व नेतृत्व*  ह्या लेखात प्रसिद्ध झाले होते.) 
*उद्योगसंस्कार*
आपला 
गजानन गोपेवाड
राज्य समन्वयक महाराष्ट्र 

शनिवार, १८ जुलै, २०२०

हुशार लग्नानंतर मुली जातात कुठ?

*लग्नानंतर कुठे* 
*जातात या टॉपर मुली..?*

सगळ्याच गोष्टीत मूल पुढे आहेत.
मग ९०ते ९९% मार्क घेऊन *मुली जातात तरी कुठे..?*

मुली दहावीत टॉप..
बारावीत टॉप..
Engineering, MBBS, LLB, MBA, CA, CS, उत्कृष्ट खेळाडू ...
सगळ्या गोष्टीत मुली टॉप.

मग बहुतांश तज्ज्ञ आणि हुशार लोकांनाच प्रश्न असतो 
*कुठे जातात या टॉपर मुली..?* 

आज उत्तर देतो ...

त्या इकडेच असतात तुमच्या आजूबाजूला पण दिसत नाही कारण...
त्या *नाती* सांभाळत असतात, 
कोणी हातात बाळ घेऊन जगण्याशी लढत असतात, 
कोणी नवऱ्याचे डबे बनवत असतात आणि कोणी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी सुद्धा होत असतात....

*मुलींचं शिक्षण आपल्या आई वडिलांकडे असतात तोवर सुरळीत होत असते,*
 घरात कसलीही जबाबदारी नाही मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या करिअर संबंधी खूप विचार करतात, पैसा ओततात पण..
 मग २५ वय होताच अचानक लग्न होतं आणि 
*तिकडून टॉपर मुली गायब होण्यास सुरवात होते...*

काल क्लासेस वरून निघत असताना कित्येक वर्षाने एक मैत्रीण भेटली १ वर्षाच्या मुला सोबत तिला पाहून मी आश्चर्यचकित झालो..
इकडच्या-तिकडच्या गोष्टी करून तिने विचारलं 
तुझ्या क्लास मध्ये एखादा विषय आहे का शिकवायला, मी घेत जाईल क्लास, कमी पगार असला तरी चालेल"

हे ऐकून विचारात पडलो
अत्यंत हुशार, शाळेत कायम पहिली, कधी कुणाशी वैर नाही की कोणत्या मुलाशी भानगड नाही...

आई वडिलांनी भरपूर पैसे खर्च करून शिकवलं, मोठे क्लासेस, चांगले कॉलेज मधून शिक्षण ही भविष्यात काहीतरी करणार अशी सगळ्यांची आशा... असलेल्या मुलीची अशी अवस्था पाहून धक्काच बसला.
खूप विचारपूस केल्यावर समजलं तिच्या आई वडिलांनी खूप पैसा असलेल्या मुलाशी लग्न लावून दिलं,
 *लग्न नंतर शिकू देऊ, नोकरी करू देऊ सांगून लग्न लावून दिलं..*

पण घरात बायकोला थोडेफार पैसे देऊन सगळा हिशोब मागायचा... 

शिक्षण-नोकरी तर लांब राहिली स्वयंपाक आणि घरातली कामं यावरून तिची पारख होण्यास सुरुवात झाली..
*कारण लग्नानंतर सासरच्या लोकांसाठी टॉपर, हुशार, शिक्षण या सर्व गोष्टीं शून्य असतात* 

पण स्वयंपाक येत नसेल तर काय उपयोग एवढं शिकून..? साधा स्वयंपाक येत नाही... असा प्रश्न करतात

मग तिने कसतरी घरचं काम शिकून नोकरी करण्यास सुरुवात केली..

पण नंतर 
*खुशाल नोकरीवर जातेस सगळी कामं माझ्या आईला करावी लागतात* भांड्यांना साबण तसाच असतो,भाजीत केस निघाला.

 मी एवढी वर्षे संसार केला पण कधी भाजीत खडा निघाला नाही.
डोळे खाली करून बोलायचं, मोठ्या आवाज नको..??

मुल होण्यासाठी घाई केली आणि त्यात पूर्ण अडकवून दिलं, घरात रोजचे पाहुणे, त्यांचं आगत स्वागत, बाळाचा सांभाळ या सगळ्या चक्रव्यूहात अडकून गेली होती ती बाजूला राहील ते तीच शिक्षण आणि हुशारी...
कागदाचे तुकडे बनून राहिल्या होत्या तिच्या सर्व डिग्र्या...

नंतर मनात विचार आला कोणी पोटातून तर शिकून येत नाही आणि कालपर्यंत शिक्षण आणि करिअर मध्ये गुंतलेल्या मुलींना सगळं शिकायला आणि नीट जमायला थोडा वेळ तर लागेल हे का कोणी समजून घेतं नाही..??

याउलट जर फक्त घर आणि परिवार सांभाळण्यासाठी मुलगी हवी असेल तर.. *एखादी दहावी नापास पण स्वयंपाक उत्तम येत असेल अश्या मुलीशी लग्न का नाही करत..??* 
चार लोकांमध्ये अपमान होऊ नये म्हणून शिकलेल्या  मुलीशी लग्न करायचं आणि मग भाजीत तेल जास्त, मीठ कमी, मसाला कमी, पोळ्या कडक किंवा भाजी पातळ यावरून तिच्या शिक्षणाचं आकलन का करायचं..??

कधी कधी विचार येतो 
*लता मंगेशकर* खरंच यांनी लग्न केलं नाही कदाचित म्हणून त्यांचा कर्तुत्वाला थांबवू शकलं नाही कोणी..? 
की *मेरी कोम*  च्या नवऱ्याने घरातली अगदी स्वयंपाकपासून ते बाळ सांभाळण्याची जबाबदारी उचलली म्हणून ती जिंकत गेली..?? 

पण आता सगळं लक्षात आल की कुठे जातात या टॉपर मुली...
असतात या आपल्याच आजूबाजूला, डोक्यावर पदर घेऊन सासुसोबत पूजेला जात असतात तर कोणी नवऱ्याचा मित्रांना चहा नाश्ता बनवत असतात... कधी त्या आपल्यातच असतात..!!!

*ह्या टॉपर मुलीं अजून टॉप वर जाऊ शकतात फक्त हवेत उडण्या आधी त्यांचे पंख छाटू नका..!!*
आपला 
गजानन गोपेवाड 

अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य 


🙏🙏🙏

साहित्य रत्न अन्नाभाऊसाठे स्मृतिदिन साजरा करणारा लेख

*साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे* 
*-गजानन गोपेवाड*

प्रासंगिक लेख सविस्तर वाचा
 https://www.nivedaknews.in/2020/07/18_19.html

© Nivedak Kaninde, Kinwat

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

🚩 *थोर साहित्यिक आण्णाभाऊ

: 🚩 *थोर साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन*💐🙏 🚩
            तुकाराम भाऊराव साठे हे आण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते. एक समाज सुधारक, लोक कवी, शाहीर आणि लेखक म्हणून ते नावा रुपाला आले; आण्णाभाऊ हे मार्क्‍सवादी आंबेडकरवादी विचाराचे  होते, आण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला, आण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा, कादंबरी हे साहित्य प्रकार त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत; त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या वैजंता ( 1961 )टिळा लाविते मी रक्ताचा, डोंगरची मैना माकडीचा माळ, मुरळी मल्हारी रायाची (1959) चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, (1970 )अशी ही सातार्‍याची तर्‍हा (1974 )अलगुज आणि फकिरा ( 1958  ) चौथी पर्यंत शिक्षण असुनही, आण्णाभाऊनी मराठी साहित्याजगतातील लोकवांग्मय, कथा,लोकनाट्य ,कादंबरी, चित्रपट, पोवाडे, लावण्या, तमाशा-वग, गवळण, प्रवास वर्णन असे अनेक लेखन प्रकार हाताळले आहेत; तमाशा या लोकनाट्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय आण्णाभाऊ साठे यांनाच जाते. सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी या साहित्य प्रकाराचा उपयोग करुन घेतला. स्वातंत्र्या नंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जनजागृती केली होती; त्यात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो,  गोवा मुक्ती संग्राम असो या चळवळींमध्ये त्यांनी आपल्या शाहिरीतून मोठे योगदान दिले आहे
 " माझी मैना गावाकडे राहिली,
 माझ्या जीवाची होतीया काहिली" 
ही त्यांची अत्यंत गाजलेली लावणी होती. 
            आण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियन भाषेतून भाषांतर करून, पोवाड्यातून रशिया पर्यंत पोहोचवले आहे, रशियन राष्ट्राध्यक्षा कडून त्यांचा सन्मान देखील झाला होता; आण्णा भाऊंनी आपल्या लेखणीमधून 21 कथा संग्रह 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्यात त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपट ही निघाले आहेत,"फकीरा"कादंबरीला 1961 मधे राज्यशासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे; ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांनी या कादंबरीचे कौतुक केले होते, कोळसेवाला, घरगडी ,खानकामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार ,मजूर, तमाशातला सोंगाड्या, अशा विविध भूमिका अण्णांनी प्रत्यक्ष जिवनात वठविल्या होत्या; आण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर (मुंबई) झोपडपट्टीत काढले, याच झोपडपट्टीत आण्णा भाऊंच्या एकापेक्षा एक कला कृतींची निर्मिती झाली होती मुंबईत गिरणी कामगारांचे कष्टमय दुःखाचे जीवन तसेच मुंबईच्या झोपडपट्टीत उघडे-वाघडे बकाल जगणे, त्यांच्या जगण्यातील भयान वास्तव त्यांनी पाहिले होते; त्यांचा भुकेकंगालपणा आणि भुकेची आग शांत करण्यासाठी  होणारी ससेहोलपट, अवैध मार्गाचा अवलंब या साऱ्या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या आणि ते विदारक आणि अद्भुत वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. शिक्षणा पेक्षा अनुभव हाच मोठा गुरु असतो या गोष्टीची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणा ही त्यांनी अनुभवला होता.1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावा खाली येऊन ते कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते झाले होते
    आण्णाभाऊंनी अन्याया विरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचे स्मरण करून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलना साठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली होती, शाहीर अमर शेख यांच्या समवेत त्यांनी काम केले होते; आण्णा भाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सुक्ष्म होती, नाट्यमयता त्यांच्या लेखन शैलीचा आगळा-वेगळा भाग होता ज्या उपेक्षितांच्या जीवनातून आण्णा भाऊनी अनुभूती घेतली त्यातील अनुभव त्यांच्या लेखनातून जाणवतात; आण्णा भाऊंचा शेवटचा काळ मात्र अत्यंत हलाखीत गेलेला आहे, दारिद्र आणि एकाएकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले होते; मराठी साहित्य प्रतिष्ठाना कडून त्यांची नेहमी उपेक्षाच झालीय; सुरवाती पासूनच लेखणी प्रस्थापित लोकांच्याच हातात राहीलेली आहे; त्यामुळे साहित्यात देखील एक वर्गाचीच मक्तेदारी आजही दिसून येतेय मराठी व नाट्य संमेलनाच्या आजपर्यंतच्या अध्यक्षांच्या नावाची यादी पाहिली तर ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते; असे बरेच साहित्यीक आहेत की,फक्त पाश्चात्य इंग्रजी साहित्याचे मराठीत भाषांतर केलेले आहे व तीच पुस्तके स्वत: च्या नावे प्रकाशीत करुन मराठी साहित्याचे नावाजलेले साहित्यीक म्हणून प्रसिद्धी करुन घेतलेली आहे;
परंतु आण्णा भाऊंमध्ये लेखणाची व स्वनिर्मितीची कला होती अशा या महान पण नेहमी दुर्लक्षित केलेल्या प्रतिभावंत लेखकाचे शेवटचे दिवस अत्यंत वाईट अवस्थेत गोरेगावच्या सिद्धार्थ नगर मध्ये व्यथित केले होते..!
    अनेक विद्यापीठातून आण्णा भाऊंच्या साहित्यावर अनेक प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत; त्यांच्या कथा, कादंबर्‍यांची तर केवळ भारतीयच नव्हे तर 22 परकीय भाषांत भाषांतरे झालेली आहेत, हजारो वाचकांनी त्यांच्या कथा कादंबर्‍याची अक्षरशः पारायणे केलीआहेत; त्यांच्या साहित्यातून प्रकट झालेले सर्व सामान्य माणसा विषयीची आंतरिक तळमळ व त्यांच्या सुखदुःखाचे चित्रण करण्याची ओढ वाचकांच्या मनाला भुरळ आजही घालतेच आहे,
           मुंबई नगरी ग बडी बाका l जशी रावणाची दुसरी लंका ll
  वाजतो ग डंका l
      डंका चहूमूलकी ll 
   या शब्दात पठ्ठे बापूराव मुंबई माया नगरीचे वर्णन करतात. तर याच मुंबई नगरीचे वर्णन करताना आण्णाभाऊ लिहितात-
"मुंबईत उंचावरी l
   मलबार हिल इंद्रपुरी ll
  कुबेराची वस्ती तिथ ,सुख भोगती ll परळात राहणारे l रात दिवस राबणारे
  मिळेल ते खाऊन घाम गाळती ll 
   पठ्ठे बापूरावांना मुंबई गर्भ श्रीमंत दिसते, तर आण्णा भाऊंना तीच मुंबई विषम व्यवस्थेची प्रतीक वाटते; आण्णा भाऊंच्या वेगळ्या जीवन दृष्टीचा येथे प्रत्येय येत रहातो; *ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तोलली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे*' अशी आण्णा भाऊंची विज्ञाननिष्ठ भूमिका होती;
      'जग बदल घालुनी घाव lअस सांगून गेले मला भीमराव ll
     असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची निष्ठा होती; आण्णाभाऊ साठे यांचे सारेच लेखन उपेक्षितांच्या बाजूचे आणि त्यांच्या अटी-तटीच्या जगण्यातील संघर्षाचे व अनुभव विश्वाचे प्रखर वास्तव अधोरेखित करणारे आहे....... 
          18 जुलै 1969 रोजी मुंबईच्या चिराग नगरीच्या झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या अवस्थेत आण्णाभाऊ साठे त्यांचा मृत्यू झाला.
       *अशा या थोर साहित्यीकाला, बिनीच्या शिलेदाराला त्यांच्या स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन* 💐💐🙏🙏
  
 माझी मैना गावावर राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना गावावर राहिली|
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना गावावर राहिली|
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना गावावर राहिली|
माझ्या जिवाची होतिया काहिली ||

ओतीव बांधा | रंग गव्हाला 
कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |
हसून बोलायची | मंद चालायची |
सुगंध केतकी | सतेज कांती |
घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची |
काडी दवन्याची | रेखीव भुवया |
कमान जणू इन्द्रधनुची |
हिरकणी हिरयाची काठी आंधल्याची |
तशी ती माझी गरीबाची |
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
नसे सुखाला वाण |
तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना......

गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची |
झाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची |
वेळ होती ती भल्या पहाटेची |
बांधाबांध झाली भाकर तुकड्याची |
घालवित निघाली मला माझी मैना चांदनी शुक्राची |
गावदरिला येताच कली कोमेजली तिच्या मनाची |
शिकस्त केलि मी तिला हसवण्याची |
खैरात केली पत्रांची | वचनांची |
दागिन्यांन मडवुन काडयाची |
बोली केली शिंदेशाही तोड्याची |
साज कोल्हापुरी | वज्रटिक |
गल्यात माळ पुतल्याची |
कानात गोखरे | पायात मासोल्या |
दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची |
परी उमलली नाही कली तिच्या आन्तरिची |
आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुम्बैची |
मैना खचली मनात | ती हो रुसली डोळ्यात |
नाही हसली गालात | हात उन्चावुनी उभी राहिली ||
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना.....

या मुम्बई गर्दी बेकरांची |
त्यात भर झाली माझी एकाची |
मढ़ेवर पडावी मुठभर माती |
तशी गत झाली आमची |
ही मुम्बई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंदिची, दाढ़ीची,
हडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या
तलम साडीची | बुटांच्या जोडीची |
पुस्तकांच्या थडीची | माडीवर माडी | हिरव्या माडीची |
पैदास इथे भलतीच चोरांची |
एतखाऊची | शिर्जोरांची |
हरामखोरांची | भांडवलदाराची |
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची |
पर्वा केलि नाही उन्हाची, थंडीची, पावसाची |
पाण्यान भरल खीस माझ |
वान माला एका छात्रिची |
त्याच दरम्यान उठली चलवल संयुक्त महाराष्ट्राची|
बेलगांव, कारवार, निपानी, गोव्यासह एकभाषिक राज्याची |
चकाकली संगीन अन्यायाची | फ़ौज उठली बिनिवारची |कामगारांची | शेतकरीयांची ।मध्यम वर्गियांची |
उठला मराठी देश | आला मैदानी त्वेष |
वैरी करण्या नामशेष |
गोळी डमडमची छातीवर सहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना.......
म्हणे अन्नाभाऊ साठे | घर बुडाली
गर्वाची | मी-तू पणाची | जुल्माची | जबरिची |
तस्कराची | निकुम्बलीला कत्तल झाली इन्द्रजिताची |
चौदा चौकड्याच राज्य गेले रावनाचे | लंका जलाली त्याची |
तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची |
अखेर झाली ही मुम्बई महाराष्ट्राची |
परलच्या प्रल्याची | लालबागच्या लढायची | फौंटनच्या चढ़ाइची |
झाल फौंटनला जंग | तिथे बांधुनी चंग |
आला मर्दानी रंग | धार रक्ताची मर्दानी वाहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना....

महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची |
दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची |
पारी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची
| गावाकडे मैना माझी | भेट नाही तिची |
तीच गत झाली आहे या खंडित
महाराष्ट्राची | बेलगांव, कारवार, डांग, उम्बरगावावर
मालकी दुजांची | धोंड खंडनीची | कमाल दंडलीची | चिड बेकिची | गरज एकीची |
म्हणून विनवणी आहे या शिवशाक्तिला शाहिराची |
आता वलु नका | रणी पलु नका | कुणी चलू नका |
बिनी मारायची अजुन राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली✍🏻💐🙏
आपला 
गजानन गोपेवाड अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य 

"आँनलाईन मोबाईल व आँनलाईन शिक्षण "

*अँड्रॉइड मोबाईल व आँनलाईन शिक्षण*
आपण अँड्रॉइड मोबाइल वापरत आहोत म्हणजे आपले वडील गरीब होते. आपण स्वतः खूप कष्ट करून कमाई करत आहोत आणि आपल्या गरीबीमुळे आपण आपल्या इच्छेनुसार शिकू शकलो नाही. त्यामुळे आपणास जे बनायचे होते. ते आपल्या मुलाने बनावे. अशी आपली तीव्र इच्छा आहे. आपली कितीही पैसे खर्च करायची तयारी आहे. पण आपण मुलाला वेळ देऊ शकत नाहीत. आपण आपले स्वप्न साकार करायला निघालात तर हे करा.
 मुलांचे मित्र बना.करिअर करण्याच्या नादात घरातील संवाद कमी झाला. घरात टीव्ही आणि मोबाईल आल्यामुळे सिरीयल आणि मित्र-मैत्रिणींसोबत बोलण्यात खूप वेळ घालवतो. अनलिमिटेड टॉकटाईम आणि इंटरनेटच्या सुविधेमुळे व्हॉट्सॲप आणि फेसबुक वर चॅटिंग करण्यात स्वतःला "वेल सेटल", समजणार्‍या अनेक कुटुंबातील माता आणि पालक व्यस्त आहेत. त्यामुळे मुलाला अँड्रॉइड मोबाइल म्हणजे पर्वणीच होऊन बसली आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमाचे वेळापत्रक पाहण्यासाठी पालकांकडे वेळ नाही. त्यामुळे मुलं अनेकदा विचित्र गेम्समध्ये अडकतात व आत्महत्येकडे वळतात. इंटरनेटवर अश्‍लिल वेबसाईटचे जाळे पसरलेले आहे.
त्यामुळे पालकांनी वेळीच जागरूक होणे आवश्यक आहे व मुलांसोबत संवाद वाढवणे आवश्यक आहे. मुलगा मोबाईलवर अभ्यासाचंच पाहतो की आणखी दुसरं काही हे ही मधून मधून तपासणण्याची सवय ठेवा. आपण मोबाईलमुळे एखादी वाईट घटना घडली की मुलांचा मोबाईल तपासायला सुरुवात करतो. त्यामुळे मुलं मग आपल्याकडे संशयाने पहायला लागतात. अचानकच मोबाईल पहायला सुरुवात केल्यावर त्यांना आपला राग यायला लागतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच मोबाईल तपासण्याची सवय मुलाला होणे आवश्यक आहे. आपले वडील कधीही मोबाईल चेक करू शकतात. असे का आपल्या मुलांना माहित झाले तर मुलं इतर वाईट सवयींमध्ये गुरफटून जात नाहीत.
जबाबदारी झटकू नका.       बर्‍याचशा पालकांचं असं होतं की मुलांना मोबाईल घेऊन देतात आणि त्यांच्याकडे संपुर्णतः दुर्लक्ष करतात. परंतु जेव्हा मुलं टोकाची भूमिका घेतात तेव्हा त्यांचे कान उघडतात आणि तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हातातून गेलेली गोष्ट पुन्हा येणे शक्य नसते.आपला पाल्य मोबाईलवर काय करत आहे हे नेहमी तपासणे पालकांसाठी चांगली बाब आहे.
 मुलांची चाचणी कशी घ्यावी?
             अगदी सोप्प आहे. आपण जेव्हा बाहेरून आपल्या घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्या पाल्याकडे नजर टाकावी. जर का त्याची नजर कावरीबावरी झाली नाही तर आपण समजून जावे की  त्याचा अभ्यास सुरू आहे. आणि मोबाईलचे कव्हर बंद झाले किंवा  मोबाईल वरची बोटं चालू लागली तर समजून जावे की, काहीतरी गडबड सुरू आहे. कारण अभ्यास करणारा मुलगा पालक आल्यावर घाबरून जात नाही किंवा मोबाईल बंद करत नाही.
अँड्रॉइड मोबाईलचा वापर आपल्या नजरेखालीच करू द्या. मुलाच्या अभ्यासात व्यत्यय नको. म्हणून पालकांची इच्छा असते की मुलाला वेगळी स्टडी रूम असावी आणि ही स्टडी रूम नंतर मात्र आपल्यासाठी प्रश्नचिन्ह  होऊन बसते.
 मुलाला एकांतवास मिळाला की अभ्यासाचा वेळ संपल्यावर तो मोबाईलचा वेगळा उपयोग करायला लागतो.
 मोबाईल वापरण्याची वेळ ठरवा.महागडा मोबाईल घेऊन दिला की आपले काम संपले. असे बऱ्याच पालकांना वाटते आता तर मुले दिवसभर घरीच आहेत. त्यामुळे माता- पिता -पुत्र- पुत्री यांनी एकत्र येऊन ऑनलाइन अभ्यासाच्या वेळापत्रका विषयी चर्चा व्हावी व तेवढाच वेळ मोबाईलचा वापर व्हावा. यादृष्टीने नियोजन करावे. नाहीतर पुढील पाच दहा वर्षांत मुलांच्या एकलकोंडेपणामुळे व मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदू विकाराचे व मानसिक रुग्णांचे प्रमाण निश्चितच वाढेल. त्यामुळे मेंदू विकार तज्ञ व मानसोपचार तज्ञांकडे रांगाच्या रांगा लागण्यास वेळ लागणार नाही.
 मुलांचा कल ओळखा.
             आपल्या पाल्याचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हे पाहण्यासाठी लाॅकडाऊन च्या काळात वेळच वेळ आहे. त्यामुळे मुलांचा कल ओळखून त्यांना त्यांच्या इच्छेनुसार अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात यावे.
आपले व्यक्तिमत्त्व प्रसन्न बनवा.आपल्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम आपल्या आपल्यावर व कुटुंबावर निश्चितच होत असतो. त्यामुळे आपल्या दिवसभर केलेल्या कार्याचा तान चेहऱ्यावर न ठेवता प्रसन्न मुद्रेने आपण जर घरी परतलो व कुटुंबातील सदस्यांसोबत आपला थकवा गेल्यानंतर तासाने चर्चा केली तर त्यामुळे कुटुंबातील संवाद आपोआपच वाढेल. आपण घरी आल्यावर आपल्या चेहर्‍यावरील भाव मुद्रा जर चांगली असेल तर घरातील सर्व मंडळी सुखी राहतील. एखादे दिवशी आपणाला जर थकवा आला असेल तर घरातील मंडळींना सांगून द्यावे की मी आज थकलेला आहे. आपण अर्ध्या तासानंतर चर्चा करूया. परंतु असे होताना दिसत नाही त्यामुळे मुलांना आपली भावमुद्रा ओळखायला कधी वेळच मिळत नाही. आपण घरी केव्हा येतो आणि केव्हा बाहेर जातो याच्या निश्चित वेळा मुलांना माहीत नसल्यामुळे मुले बिनधास्त असतात. त्यामुळे आपली बाहेरून येण्याची वेळ निश्चित असेल आणि राहिलेली कामे नंतर केली तर मुले आपापल्या वेळेबद्दल जागरुक राहतात व त्यांना सुद्धा आपल्या हजरजबाबीपणाची सवय होऊन जाते.
         आपल्या मुलांच्या जुन्या स्वाध्यायपुस्तिका काढून त्या पूर्ण करून घ्या. कारण आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे बऱ्याच मुलांच्या मागील वर्षाच्या स्वाध्यायपुस्तिका अपूर्ण असतात आणि वर्ष संपून जाते. त्यामुळे त्याच्या काही न समजलेल्या बाबी स्वाध्याय पुस्तिका पूर्ण केल्यामुळे समजून जातात. आता घरबसल्या माता-भगिनी त्या स्वाध्याय पुस्तिका पूर्ण करून घेऊ शकतात.
 कच्चे दुवे शोधा
           मुलं आपले कच्चे दुवे सांगत नाहीत त्यामुळे त्यांचा एखादा विषय तसाच कच्चा राहतो म्हणून पायाभूत संकल्पना स्पष्ट करून घ्या. त्यासाठी अनुलेखन,  श्रुतलेखन, शुद्धलेखन, हस्ताक्षर, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, शाब्दिक उदाहरणे अशा गणितीय क्रियांचा सराव घ्यावा.
संकटांना सामना करायला शिकवा
        जीवनाचा प्रवास हा दीर्घ पल्ल्याचा असतो. प्रत्येक दिवस हा नवीन आव्हाने, बदल संकटे घेऊन येत असतो कोणत्याही परिस्थितीत निराश न होता नवीन धोरणं ठरवावी लागतात. आज-काल मुलांना एखादी गोष्ट नाही असं म्हटलं तर ती टोकाची भूमिका घेताना दिसतात. "हम दो हमारे दो" च्या काळात "केजी टू पीजी" पर्यंत मुलांना प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळत असल्याने त्यांना कधी समस्याच जाणवत नाही. पालकही आमच्या वेळी आम्हाला काहीही भेटले नाही पण आपल्याकडे आहे तर मुलांना दिलेच पाहिजे. या मानसिकतेत आहेत. त्यामुळे मुलांना त्या गोष्टींचे महत्त्व वाटत नाही. पण हे सर्व बालवयात ठीक आहे. पण मुलांच्या वयानुसार गरजसुद्धा वाढत जातात. त्या पुरवताना पालकांच्या नाकीनऊ येते. मग त्यांनी अँड्रॉइड मोबाईल साठी मागणी केली आणि दिला नाही तर मुलं पळून जाणे किंवा सुसाईड करण्यासारखे निर्णय घेताना दिसतात. म्हणून त्यांना समस्यांना सामोरे जाणे शिकवा. सुट्ट्यांचा यासाठी आवश्य फायदा होईल. मुलांना उनिवा भासुद्या, तेव्हा त्यांच्यात जाणीवा आपोआपच निर्माण होतील.
 मुलांना शिकवू नका त्यांना शिकू द्या.
          पालक आपल्या पाल्यासमोरच त्याला आपण किती नामवंत व खर्चिक शाळेत टाकले हे शेजाऱ्यांशी, मित्रांशी सांगत असतात. मी त्याला काहीही कमी पडू देणार नाही असं सांगतात. त्यामुळे मुलांना या गोष्टी आपल्या पालकांकडून इतक्या सहज मिळत असल्यामुळे गांभीर्य वाटत नाही व पालकांच्या इच्छेखातर प्रवेश घेतल्यामुळे ते आपल्या ऑफर वाढवत जातात. म्हणून पालकांना विनंती आहे की, त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकू द्या. तुम्ही त्यांना शिकवू नका. ज्याप्रमाणं अंडं जेव्हा आतून फुटतं, तेव्हा त्यातून नवीन जीव निर्माण होतो. आणि आपण अंडं बाहेरून फोडलं तर त्यातील जीव गुदमरून मरतो. तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याच्या बालमनावर दडपन टाकू नका. त्याला ज्या विषयात गोडी आहे त्या विषयाचा अभ्यास करू द्या.
 वेळेचा सदुपयोग  करा.
               कोरोना महामारीमुळे जो वेळ मिळत आहे. एवढा वेळ पुन्हा कधीच मिळणार नाही. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. याचा नकारार्थी विचार न करता तुम्हाला तुमच्या पाल्यासोबत जास्तीचा वेळ देण्याची एक उत्तम संधी आलेली आहे. लोकमान्य टिळक बीएला असताना त्यांची तब्येत ठीक राहत नव्हती. म्हणून त्यांनी मध्येच शिक्षण सोडून एक वर्ष व्यायाम केला होता. म्हणजेच यावरून असं लक्षात येतं की, आपल्या पाल्याचे सुद्धा एक वर्ष वाया गेल्यामुळे भले मोठे नुकसान होईल असे नाही.
                       
गजानन गोपेवाड 
राज्य समन्वयक महाराष्ट्र 
अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य

सोमवार, १३ जुलै, २०२०

🌳एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, झाडे लावा झाडे जगवा 🌳

🌳“वनराई वृक्ष लावा चळवळ” ही एक सामाजिक बांधिलकी https://www.purogamisandesh.in/news/5782
👆👆👆👆👆👆👆👆👆
            🔹विशेष लेख🔹
        ✍️गजानन गोपेवाड ✍️               (राज्य समन्वयक अग्निपंख फाउंडेशन ,महाराष्ट्र राज्य)
----------------------------------------------
🔹पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क🔹
            
----------------------------------------------
           🔸सुरेश डांगे🔸
              मुख्य संपादक
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

रसायन शास्त्रज्ञ दिनकर कर्वे यांची स्तुती दिवस 13 जूलै

*आजचे शास्त्रज्ञ*

*दिनकर धोंडो कर्वे*

*रसायन शास्त्रज्ञ*

*जन्मदिन - १३ जुलै १८९९*
************************

दिनकर धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे तृतीय पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव आनंदी होते. दिनकर कर्वे यांचे शिक्षण पुणे येथे झाले. ते बी. एस्सी. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांची रसायनशास्त्रविषयक जाण उत्तम असल्यामुळे, ते जर्मनीच्या लॅपझिग युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. तेथे त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना त्या विद्यापीठाने डी. फिल. पदवी प्रदान केली. डॉ.दिनकर कर्वे पुण्याला परत आल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे आजीव सदस्य झाले. ते रसायनशास्राचे नामवंत प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, विज्ञान प्रसारक होते. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे ते वीस वर्षे प्राचार्य होते.

शिक्षणक्षेत्रातच उत्तम कामगिरी करण्याचा ध्यास डॉ. कर्वे यांनी घेतला. फर्गसन महाविद्यालयामध्ये ते भौतिकी रसायनशास्त्र हा विषय शिकवीत होते. त्यांचा अनुभव, विज्ञानाधारित अभ्यासू वृत्ती आणि शिस्तप्रियता लक्षात घेऊन फर्गसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांमुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विषयामध्ये आवड निर्माण झाली. फर्गसन महाविद्यालयामधील त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. त्यांच्या कडक शिस्तप्रियतेचा अनुकूल परिणाम महाविद्यालयाच्या प्रांगणात दिसून आला. दर्जाबाबत डॉ.दिनकर कर्वे यांनी कधीही तडजोड केली नाही. ते त्यांचे एक वैशिष्ट्य ठरले. त्यांच्यामुळे दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये फर्गसन महाविद्यालयाचे नाव अग्रगण्य झाले.

त्या काळामधील विज्ञानाच्या समविचारी प्राध्यापकांचे सहकार्य मिळवून त्यांनी ‘सृष्टिज्ञान’ या नियतकालिकाचा दर्जा अधिकाधिक चांगला करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ‘सृष्टिज्ञान’मध्ये त्यांनी विज्ञान विषयावर बरेच लेख लिहिले. त्यायोगे विज्ञान प्रसारही केला. वीस वर्षे प्राचार्यपदाची जबाबदारी पार पाडून ते निवृत्त झाले. तथापि त्यांनी त्यानंतर सुमारे दहा वर्षे ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ या संस्थेचे भारतातील संचालक म्हणून कार्य केले.

डेक्कन महाविद्यालयामधील प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ प्रा.इरावती कर्वे या डॉ.दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी होत्या. ‘हिंदू सोसायटी - अ‍ॅन इंटरप्रिटेशन’ हा ग्रंथ प्रा. इरावती कर्वे यांनी लिहिला होता. त्याचे मराठीकरण डॉ.दिनकर कर्वे यांनी केले. ‘हिंदू समाज - एक अन्वयार्थ’ त्या ग्रंथाचे शीर्षक होते. त्याचे प्रकाशन असे ११ ऑगस्ट, १९७५ रोजी झाले होते. १९५९ साली त्यांचे ज्येष्ठ बंधू रघुनाथ कर्वे यांनी ‘संतती नियंत्रण: विचार व आचार’ हे पुस्तक लिहिलेले होते त्याची अभ्यासपूर्ण आणि विज्ञानाधिष्ठित प्रस्तावना  डॉ.दिनकर कर्वे यांनी लिहिलेली होती.

१९६४ साली प्रकाशित झालेल्या ‘ए हिस्टरी ऑफ एज्युकेशन इन इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान’ या पुस्तकाचे डॉ.दिनकर कर्वे सहलेखक होते. त्यांनी ‘दि न्यू ब्राह्मण्स: फाइव्ह महाराष्ट्रीयन फॅमिलीज’ महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेला होता. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या वडलांसह तत्कालीन सामाजिक कार्याला झोकून देणाऱ्या पाच कुटुंबीयांच्या कार्याचा आढावा  घेतला होता.

१९७४ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल विजेते शास्रज्ञ कोनराड झचारियस लॉरेंझ यांनी ‘सिव्हिलाइझ्ड मॅन्स एट डेडली सिन्स’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. डॉ.कर्वे यांनी त्याचे भाषांतर केले होते. मानववंश शास्त्रज्ञ ब्रोनिस्लाव्ह मॅलिनोवस्की यांनी लिहिलेल्या ‘सेक्स अ‍ॅन्ड रिप्रेशन इन सॅव्हेज सोसायटी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘असंस्कृत समाजातील लैंगिकता’ या शीर्षकाखाली डॉ.कर्वे यांनी केला. १९७८ साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे ते पुस्तक प्रकाशित झाले.

बुद्धिप्रामाण्य आणि विचारांची तर्कशुद्धता यांवर डॉ. दिनकर कर्वे यांचा संपूर्ण विश्वास  होता. त्याचा परिपाक म्हणून धार्मिक कर्मकांड; समाज ज्याला धर्म मानतो, त्याची सबंध चौकट, देवाच्या अस्तित्वावर विश्वास या सर्व गोष्टी त्यांनी नाकारल्या होत्या. ते कट्टर निरीश्वरवादी होते. आपल्या मतीला जे पटेल तेच करण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे ते प्रवाहपतित झाले नाहीत.


*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_संकलन : गजानन गोपेवाड*
राज्य समन्वयक 
अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य 
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_'सृष्टी विज्ञानगाथा' विज्ञान आणी दिनविशेष, वरून_*