सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

बाळाची वाढ व विकास


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *बाळाची वाढ व विकास व्यवस्थित आहे वा नाही, हे कसे ओळखावे ?* 


बन्याचदा आईवडिलांना आपल्या मुलाच्या वाढीविषयी चिंता वाटत असते तो नीट खात नाही वा अमुकच करतो, अशा तक्रारी ते करत असतात. मुलाची वाढ व विकास व्यवस्थित आहे वा नाही, हे कसे ओळखायचे? हा पालकांपुढील महत्त्वाचा प्रश्न असतो. ५ वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलाच्या वाढीचा त्याचे वजन हा उत्तम निदर्शक असतो. "Road to health" नावाचे तक्ते उपलब्ध असतात. यात दर महिन्याला मुलाचे वजन नोंदवण्याची सोय असते. मुलांच्या अपेक्षित वजनाच्या हिशोबाने तक्त्यावर एक 'आरोग्य पथ' दाखवलेला असतो. आपल्या बाळाचे वजन त्या आरोग्य पथावर असेल तर मुलाची वाढ चांगली आहे, असे समजावे. हा तक्ता असा असतो.


मुलाचा विकास योग्य आहे वा नाही, हे खालील निकषांवरून तपासून पाहता येईल. 


तीन महिने - आईकडे बघून ओळखीचे हसते.


चार महिने - मान पूर्णपणे सावरू शकते.


सहा-सात महिने - बसायला लागते.


नऊ ते दहा महिने - रांगायला लागते.


पंधरा महिने - बाबा, दादा असे बोलू लागते.


अडीच वर्षे - स्वतंत्रपणे चालू लागते. संडासवर नियंत्रण येते.


दोन ते अडीच वर्षे - छोटी वाक्य बोलते.


तीन ते साडेतीन वर्षे - लघवीवर नियंत्रण येते.


या विकासाच्या टप्यांवरून मूल योग्य प्रकारे वाढते आहे वा नाही, हे तपासता येईल. अर्थात वाढ व विकास यात मुलामुलांमध्ये थोडाफार फरक पडू शकतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या मुलामध्ये विकासाचे सर्वच


टप्पे उशीरा गाठले जात असतील, तर मात्र संपूर्ण तपासण्या करून घेणे गरजेचे आहे.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

कान का? खाजतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *कान का खाजतात ?* 📕


सार्वजनिक ठिकाणी कानात बोट घालून कान गदागदा हलवणारे किंवा कानात काड्या घालून तल्लीन कान कोरणारे महाभाग तुम्ही पाहिले असतील. कान कोरडा पडला २ थोडीफार खाज येऊ शकते. ही खाज आपोआपच कमी होते; परंतु कानाच्या रोगांमध्ये मात्र खाज सारखीच येत राहते व उपचार केल्याशिवाय कमी होत नाही. पावसाळ्यात, दमट वातावरणात किंवा पोहणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्णपथात (Auditory canal) बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. अॅस्परजीलस, नायगर व कँडीडा अल्बीकन्स या बुरशींमुळे होणाऱ्या संसर्गात कान खाजतात व बहिरेपणाही येतो. कानाची तपासणी केल्यास कर्णपथात काळपट वा विटकरी काळपट रंगाची घाण जमा झालेली दिसते. ओल्या वर्तमानपत्राच्या बोळ्यासारखा रंग त्या घाणीला येतो.


कानातील घाण वारंवार काढून टाकणे, पुसून घेणे, सॅलीसिलिक अॅसिड कर्णपथात लावणे, निस्टॅटीनसारखे बुरशीनाशक वापरणे अशा विविध उपायांनी हा रोग पूर्णपणे आटोक्यात येतो. कानावर अॅलर्जीमुळे किंवा जंतूसंसर्गामुळे फोड आले, तरीही कान सुरुवातीच्या काळात अथवा फोड फुटून खपली येण्याच्या काळात खाजतात. यावर अॅलर्जी व जंतुसंसर्गावरील उपचार करावे लागतात.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

ताराबाई मोडक यांची पुण्यतिथी

 ***********************************

*३१ ऑगस्ट - बालशिक्षणाची माता ताराबाई मोडक यांची पुण्यतिथी*

***********************************

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

जन्म - १९ एप्रिल १८९२ (मुंबई)

*स्मृती - ३१ ऑगस्ट १९७३*


बालशिक्षणाची माता ताराबाई मोडक यांची आज पुण्यतिथी.


ताराबाई मोडक या माहेरच्या ताराबाई केळकर.

आपल्या भारतभूमीत बालशिक्षणाची माता म्हणवून घेण्याचा गौरव पद्मभूषण स्व.ताराबाई मोडक यांनी प्राप्त केला. १९२३ मध्ये गिजुभाई बधेका यांच्या साहाय्याने भावनगर येथे montysarichya तत्वावर आधारलेली शिक्षणपद्धती त्यांनी निश्चित केली. 


मुलांच्या बालवयातच शिक्षणाचा खरा पाया घातला जाण्याची शक्यता व आवश्यकता  असते. यादृष्टीने त्यांनी पूर्वप्राथमिक विभागात शिक्षणात नवीन पाऊल टाकले. १९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. या संस्थेने पुढे पूर्व प्राथमिक अध्यापन मंदिर सुरु केले. यातून मराठी आणि गुजराती दोन्ही भाषांच्या हजाराहून अधिक शिक्षक शिक्षकांचे प्रशिक्षण केले. मराठी शिक्षणपत्रिका त्यांनीच सुरु केली. 


ताराबाईनी १९३३ जूनचा शिक्षणपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित केला. तत्पूर्वी त्या गुजराती शिक्षण पत्रिकेत १० वर्षे लिहित होत्या. बालकांसाठी त्यांनी विपुल लेखन लिहिले. परंतु पालक शिक्षक यांच्या साठीही विपुल लिहिले.१९४५ मध्ये ताराबाईनी बोर्डी (जि.ठाणे) येथे ग्राम बाल शिक्षा केंद्र स्थापिले. आदिवासी मुलांच्या अडचणी लक्षात घेवून त्यांनी १९५३ मध्ये नवीन उपक्रम सुरु केला. 


१९५७ मध्ये बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र कोसबाड येथे  हलविण्यात आले. येथे आदिवासी मुलांसाठी कुरणशाळा, रात्रीची शाळा ,व्यवसाय शिक्षण हे पूरक प्रकार प्राथमिक स्वरुपात सुरु करण्यात आले. १९६२ मध्ये त्यांना भारत सरकारने त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल पद्मभूषण हा किताब देवून गौरविले. आजही महाराष्ट्रात त्यांचे कार्य ग्राम शिक्षा केंद्र विकासवाडी, कोसबाडहिल जि.ठाणे येथे चालू आहे. ताराबाईच्या पश्चात स्व. अनुताई वाघ यांनी कार्य प्रज्वलित ठेवले. 


मा.ताराबाई मोडक यांचे निधन ३१ ऑगस्ट १९७३ रोजी झाले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

***********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,कृष्ण पक्ष, *नवमी*,रोहिणी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ३१ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अष्टौ गुणा: पुरुषं दीपयन्ति

           प्रज्ञासुशीलत्वदमौ श्रुतं च,

 पराक्रमश्चा बहुभाषिता च

          दानं यथाशक्ति कृतज्ञता च॥


*भावार्थः - आठ गुण पुरुष को सुशोभित करते हैं - तीक्ष्ण बुद्धि, उत्कृष्ट चरित्र, आत्म-नियंत्रण, शास्त्र-अध्ययन, साहस, कई भाषाओं का ज्ञान, यथाशक्ति दान और कृतज्ञता।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

बाळाची वाढ


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 



══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *बाळाची वाढ व विकास व्यवस्थित आहे वा नाही, हे कसे ओळखावे ?* 


बन्याचदा आईवडिलांना आपल्या मुलाच्या वाढीविषयी चिंता वाटत असते तो नीट खात नाही वा अमुकच करतो, अशा तक्रारी ते करत असतात. मुलाची वाढ व विकास व्यवस्थित आहे वा नाही, हे कसे ओळखायचे? हा पालकांपुढील महत्त्वाचा प्रश्न असतो. ५ वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलाच्या वाढीचा त्याचे वजन हा उत्तम निदर्शक असतो. "Road to health" नावाचे तक्ते उपलब्ध असतात. यात दर महिन्याला मुलाचे वजन नोंदवण्याची सोय असते. मुलांच्या अपेक्षित वजनाच्या हिशोबाने तक्त्यावर एक 'आरोग्य पथ' दाखवलेला असतो. आपल्या बाळाचे वजन त्या आरोग्य पथावर असेल तर मुलाची वाढ चांगली आहे, असे समजावे. हा तक्ता असा असतो.


मुलाचा विकास योग्य आहे वा नाही, हे खालील निकषांवरून तपासून पाहता येईल. 


तीन महिने - आईकडे बघून ओळखीचे हसते.


चार महिने - मान पूर्णपणे सावरू शकते.


सहा-सात महिने - बसायला लागते.


नऊ ते दहा महिने - रांगायला लागते.


पंधरा महिने - बाबा, दादा असे बोलू लागते.


अडीच वर्षे - स्वतंत्रपणे चालू लागते. संडासवर नियंत्रण येते.


दोन ते अडीच वर्षे - छोटी वाक्य बोलते.


तीन ते साडेतीन वर्षे - लघवीवर नियंत्रण येते.


या विकासाच्या टप्यांवरून मूल योग्य प्रकारे वाढते आहे वा नाही, हे तपासता येईल. अर्थात वाढ व विकास यात मुलामुलांमध्ये थोडाफार फरक पडू शकतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या मुलामध्ये विकासाचे सर्वच


टप्पे उशीरा गाठले जात असतील, तर मात्र संपूर्ण तपासण्या करून घेणे गरजेचे आहे.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

 

सिझेरीयन म्हणजे काय?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *सिझेरियन म्हणजे काय* 📕


"सिझेरीयन झाले शेवटी", "सिझेरीयनशिवाय गत्यंतर नाही, असे डॉक्टर म्हणाले" अशी वाक्ये मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये वारंवार ऐकू येतात. बाळंतपणासाठी गेलेली स्त्री सात-आठ दिवस बिछान्यावर पडून असते. नंतर टाके काढल्यानंतर तिला घरी जाऊ देतात. एकूण सिझेरीयन व बाळंतपण यांचा संबंध आहे, हे आपल्या लक्षात आले असेल.


९५% प्रसूती नैसर्गिकरित्या होतात. म्हणजेच मातेच्या योनीमार्गातून बाळ बाहेर येते. काही वेळा मात्र योनीमार्गातून बाळ बाहेर येणे शक्य नसते. बाळाचे डोके मोठे असते वा मातेच्या कमरेच्या हाडांच्या ज्या पोकळीतून बाळ बाहेर येते ती पोकळी खूप लहान असते. कधी माता बाळंतपणाच्या कळा घेऊ शकत नाही. कधी तिचे पूर्वी सिझेरीयन झालेले असते. या सर्व कारणांमुळे योनीमार्गातून मुलाचा नैसर्गिकरित्या जन्म न होता ते पोटातून काढावे लागते. प्रथम ओटीपोटीवर छेद घेऊन नंतर गर्भाशयाचा छेद घेतल्यानंतर काही क्षणांतच बाळ बाहेर काढले जाते. एकदा मूल बाहेर आले की, मग त्याची काळजी नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या मुलाप्रमाणेच घेतली जाते.


आजकाल सिझेरीयनचे प्रमाण वाढत चाललेले दिसते. डॉक्टरी व्यवसायातील धंदेवाईकपणा, हे याचे एक कारण असले तरी, वेदना सहन न करण्याकडे असलेला आधुनिक स्त्रियांचा कल, पूर्वीसारखी घरगुती कामे (बसून कपडे धुणे, सारवणे आणि बरीच इतर शारीरिक कष्टाची कामे) करावी न लागल्याने कमी होऊ लागलेली गर्भाशयाच्या स्नायूंची शक्ती ही कारणे देखील दुर्लक्षण्याजोगी नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा स्त्रिया स्वतः होऊनच सिझेरीयन करायची विनंती डॉक्टरांना करतात. वेदनेशिवाय, कळांशिवाय मातृत्व ही कल्पनाच करणे योग्य नाही. सिझेरीयनचे दुष्परिणामही होऊ शकतात. ही शस्त्रक्रिया असल्याने भूल देण्यातील धोके, शस्त्रक्रियेत होणारे उपद्रव, जंतु संसर्गाची भीती असतेच. शिवाय साध्या बाळंतपणापेक्षा खर्चही ५-६ पट अधिक येतो.


बाळाला दूध पाजणेही ४-६ तास (स्त्री शुद्धीवर येईपर्यंत) उशीरा सुरू होते. तसेच एकदा सिझेरीयन झाले की, बरेचदा पुढच्या बाळाच्या वेळीही सिझेरीयनच करावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेता मातांनी सहनशीलता दाखवून, सिझेरीयन टाळता येईल तेवढे टाळण्याचा प्रयत्न करावा.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

लाँर्ड माउंटबँटन यांची आज स्मृतिदिन

 *************************************

*२७ ऑगस्ट - लॉर्ड माउंटबॅटन स्मृतिदिन*

**************************************


जन्म - २५ जून १९०० (UK)

*स्मृती - २७ ऑगस्ट १९७९* (आयर्लंड)


लॉर्ड माउंटबॅटनच्या कार्यकाळादरम्यान १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुढील एक वर्ष तो भारतीय अधिराज्याचा पहिला गव्हर्नर-जनरल होता.


लॉर्ड  माउंटबॅटन हा भारतातील शेवटचा ब्रिटिश व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. त्यांचे पूर्ण नाव लूई फ्रान्सिस ॲल्बर्ट व्हिक्टर निकोलस ऑफ बॅटनबर्ग.


लॉर्ड माउंटबॅटन हा प्रिन्स लूई ऑफ बॅटनबर्ग (१८५१–१९२४) यांचा धाकटा मुलगा. प्रिन्स लूई १८६२ पासून ब्रिटिश नौदलामध्ये होते. स्वकर्तृत्वावर त्यांनी डिसेंबर १९१२ मध्ये ब्रिटिश नौदलामध्ये प्रमुखपद मिळविले पहिल्या महायुद्धाला तोंड फुटल्यानंतर ब्रिटिश नौदलाला पुरेसे यश मिळविता आले नाही. त्यामुळे प्रिन्स लूई यांच्यावर टीका होऊ लागली. बॅटनबर्ग ह्या जर्मन नावामुळे आणि लहानपण ऑस्ट्रियामध्ये गेलेले असल्यामुळे त्यांच्या राष्ट्रप्रेमा विषयी शंका घेतली जाऊ लागली. म्हणून ऑक्टोबर १९१४ मध्ये त्यांना नौदलप्रमुखपद सोडावे लागले. जर्मन द्वेषाची ही लाट पुढेही टिकून राहिल्याने राजाने आणि राजघराण्याशी संबंधितांनी आपली जर्मन नावे बदलावीत, असे शासनाने १९१७ मध्ये सुचविले. प्रिन्स लूई यांनी व्हिक्टोरिया राणीच्या नातीशी विवाह केल्यामुळे १९१७ मध्ये ते माउंटबॅटन बनले.


लूई (डिकी) माउंटबॅटन वयाच्या तेराव्या वर्षीच ऑझ्‌बर्न येथील रॉयल नेव्हल कॉलेजात दाखल झाले. जुलै १९१६ मध्ये त्यांनी प्रत्यक्ष नौदलात कॅडेट म्हणून प्रवेश केला. पुढे नौदलात त्यांना जे जे पद मिळाले, त्यावर आपल्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमटविला. मुख्यतः नौदलातील संदेशवहन आणि दूरसंदेश ह्यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला. दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा ‘केली’ (Kelly) ह्या जहाजाचा कॅप्टन म्हणून माउंटबॅटन काम पहात असत. युद्धात ते जहाज निकामी झाल्यानंतर काही काळ त्यांनी इलस्ट्रियस ही विमानवाहू नौका सांभाळली. येथून पुढे त्यांच्या उत्कर्षाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.


पंतप्रधान विन्स्टन चर्चिल ह्यांनी १९४१ मध्ये तिन्ही सेनादलांच्या संयुक्त हालचालींचे सूत्रधार म्हणून माउंटबॅटनना नेमले. ह्या काळात यूरोपातील त्यांच्या कर्तृत्वाचा आणि संघटना-कौशल्याचा प्रभाव अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅन्क्लिन रुझव्हेल्ट यांच्यावर पडला. त्यामुळेच पुढे १९४३ मध्ये दक्षिणपूर्व (आग्नेय) आशियामधील दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने सुप्रीम कमांडर म्हणून माउंटबॅटन यांची नेमणूक केली. 


आग्नेय आशियामध्ये दोस्त राष्ट्रांचे सैन्य सगळीकडे पराभूत होत होते. त्यावेळी माउंटबॅटननी सैन्यामध्ये विश्वास निर्माण करून त्याचे धैर्य वाढविले. त्याच प्रमाणे भर पावसाळ्यात ब्रह्मदेशात जपानच्या सैन्याशी मुकाबला करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविली. त्यामुळे आग्नेय आशियातील दोस्त राष्ट्रांच्या सैन्याची प्रतिमा खूपच उंचावली. मात्र ह्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याची त्यांची योजना पूर्ण झाली नाही कारण दोस्त राष्ट्रांनी अणुबॉम्बचा वापर करून युद्ध संपविण्याचा निर्णय घेतला. तरीही सिंगापूरमध्ये जपानी सैन्याची शरणागती माउंटबॅटननीच स्वीकारली. 


यशस्वी सेनानी म्हणून त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला. त्याचबरोबर बह्मदेश, सिंगापूर आणि इतर प्रदेशांच्या रहिवाशांशीही त्यांनी चांगले संबंध निर्माण केले. पश्चिमी साम्राज्यशाहीखाली असलेल्या देशांमध्ये युद्धानंतर राष्ट्रवादाला निर्णायक रूप आले आणि तेथील राष्ट्रवादी चळवळी प्रखर बनल्या. या चळवळींकडे पाहण्याचा माउंटबॅटन यांचा दृष्टिकोन उदार आणि समंजस होता. १९२० ते १९४५ या कालखंडात भारतात राष्ट्रवादी आंदोलन देशव्यापी झाले.


माउंटबॅटन यांच्या या उदार दृष्टिकोणामुळे महायुद्धानंतर निवडून आलेल्या क्लेमंट ॲटलींच्या मजूर पक्षाच्या शासनाने माउंटबॅटनना भारताचे व्हाइसरॉय म्हणून पाठविण्याचा निर्णय १९४७ मध्ये घेतला. सेनानी म्हणून यशस्वी ठरलेल्या माउंटबॅटनवर शासनप्रमुख होण्याची आणि भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्याची जबाबदारी पडली. 


मार्च १९४७ मध्ये माउंटबॅटन भारतात आले. ह्यावेळेस भारतातील परिस्थिती अत्यंत स्फोटक होती. हिंदु-मुस्लिम तणावांनी अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले होते. नौदलाचे बंड (१९४६), भारत छोडो आंदोलन आणि दुसऱ्या महायुद्धाचा ब्रिटनला बसलेला फटका यांमुळे भारतावर फार काळ नियंत्रण ठेवणे शक्य नाही, ह्याची जाणीव मजूर पक्षाच्या शासनाला झाली होती. म्हणूनच स्टॅफर्ड क्रिप्स-योजना व त्रिमंत्रि-योजना अयशस्वी झाल्यानंतरही ब्रिटिशांनी भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. माउंटबॅटन यांनी भारतातील जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ॲटलींच्या मागे लागून जून १९४८ पूर्वी स्वातंत्र्य देण्यात येईल, अशी घोषणा करवून घेतली.


प्रत्यक्षात स्टॅफर्ड क्रिप्स यांची आणि नंतरची त्रिमंत्रि-योजना ह्यांच्यावरील चर्चेतून काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र येणे अशक्य आहे, हे स्पष्ट झाले होते आणि फाळणीची अपरिहार्यता बहुतेक काँग्रेसने स्वीकारली होती. माउंटबॅटन यांनी प्रत्येक नेत्याशी स्वतंत्रपणे प्रदीर्घ चर्चा करून जवळजवळ सर्वच नेत्यांचा विश्वास संपादन केला. 


आकर्षक व्यक्तिमत्त्व, थंड डोक्याने युक्तिवाद करण्याची शैली, भारताच्या प्रश्नाबद्दलची कळकळ आणि इतर कोणत्याही व्हॉइसरॉयच्या तुलनेने माउंटबॅटन यांना मिळालेले विशेष अधिकार, यांमुळे त्यांना झटपट निर्णय घेणे शक्य झाले. 


भारतातील चिघळणारी परिस्थिती लक्षात घेऊन ३ जून १९४७ रोजी त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. इतक्या अल्प-मुदतीचे दडपण आल्याने काँग्रेस आणि लीगच्या नेत्यांना फाळणीच्या योजनेबद्दल शब्द फिरविता येणार नाही, अशी त्यांची अटकळ होती. फाळणी अटळ आहे, असे मत बनल्यानंतर अत्यंत धूर्तपणे, मुत्सद्देगिरीने आणि कार्यक्षम रीतीने त्यांनी संपूर्ण योजना राबवून १४ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र पाकिस्तान आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारत जाहीर करून सत्तांतर घडवून आणले. हे करीत असतानाच दोन्ही स्वतंत्र राष्ट्रे ब्रिटिश राष्ट्रकुलातच रहावीत, ह्यासाठी त्यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले.


काँग्रेस नेत्यांचा त्यांनी एवढा विश्वास संपादन केला, की स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली गेली (ऑगस्ट १९४७ - जून १९४८). भारताच्या फाळणीबद्दल माउंटबॅटन ह्यांची भूमिका नंतर वादाचा विषय झाली असली, तरी त्यांचे भारताविषयीचे प्रेम वादातीत होते. प्रत्यक्ष फाळणीचा अप्रिय निर्णय त्यांनी अत्यंत कौशल्याने राबविला. तो राबवीत असताना ब्रिटिशांच्या हितसंबंधांना संरक्षण देण्याचे धोरणही त्यांनी कटाक्षाने पाळले.


भारतातून परत गेल्यानंतर १९४८ च्या जूनमध्ये ते पुन्हा नौदलाच्या सेवेत रुजू झाले. १९५२ ते १९५५ ह्या काळात ते भूमध्य समुद्राच्या क्षेत्रातील नाटोच्या नौदलाचे कमांडर इन्-चीफ होते. १९५५ मध्ये ते ब्रिटिश नौदलाचे प्रमुख (फर्स्ट सी लॉर्ड) बनले. १९५९ ते १९६५ पर्यंत संरक्षण विभागाचे प्रमुख (चीन ऑफ डिफेन्स स्टाफ) ह्या नात्याने तिन्ही सैन्य दलांच्या सुसूत्रीकरणाची फार महत्त्वाची कामगिरी त्यांनी पार पाडली आणि मग ते सेवानिवृत्त झाले.


माउंटबॅटन यांना राजघराण्याशी असलेल्या आपल्या नात्याचा फार अभिमान होता. देखण्या व्यक्तिमत्त्वाच्या माउंटबॅटन ह्यांचा विवाह १९२२ मध्ये एड्‌विना ॲश्ली (१९०१-६०) ह्या श्रीमंत आणि सौंदर्यसंपन्न युवतीबरोबर झाला होता. माउंटबॅटन आणि एड्‌विना दोघेही त्याकाळी त्यांच्या उदार, काहीशा डावीकडे झुकलेल्या विचारांबद्दल प्रसिद्ध होते. प्रत्यक्षात त्यांचा विचार आणि कार्य दोन्ही जहाल किंवा समाजवादी नव्हे तर मानवतावादी स्वरूपाचे होते. 


माउंटबॅटन दांपत्य आणि पाट्रिशिया व पॅमेला ह्या त्यांच्या मुली. ह्यांनी भारतीय जनतेला आपलेसे करून टाकले होते. सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचा त्यांचा गुण हेच त्याचे मुख्य कारण. भारतात असताना लेडी एड्‌विना माउंटबॅटन व जवाहरलाल नेहरू यांच्यात अत्यंत उत्कट प्रेमसंबंध निर्माण झाला. माउंटबॅटन यांच्या चरित्रात या प्रणयाचा निर्देश सापडतो. 


पत्नीच्या मृत्यूनंतर आणि निवृत्तीनंतर काहीसे शांत आणि एकाकी जीवन कंठणाऱ्या माउंटबॅटनंना आयर्लंडमधील त्यांच्या डोनेगल उपसागरातील घराजवळ मासेमारी बोटीमध्ये आयरिश दहतशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटामध्ये मृत्यू आला.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

*************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,अश्विनी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, २७ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"कोई आहार में विष घोल दे तो उसका उपचार सम्भव है, किन्तु कोई विचार में विष घोल दे तो उसका उपचार सम्भव नहीं।*

*वातावरण में प्रदूषण का उपचार सम्भव है किंतु वैचारिक प्रदूषण का कोई उपचार नही।*

*अतः जहाँ भी कुत्सित अथवा दूषित विचारधारा दिखाई दे, उस स्थान एवं व्यक्ति से दूरी ही श्रेष्ठ है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

जेम्स वँटस संशोधक

*************************************

*२५ ऑगस्ट - संशोधक जेम्स वॅट स्मृतिदिन*

*************************************

🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

जन्म - ३० जानेवारी १७३६

स्मृती - २५ ऑगस्ट १८१९


*वाफेवर चालणार्‍या आगगाडीचा जनक*

🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

जेम्स वॅट हे स्कॉटिश संशोधक व उपकरणनिर्माते होते. त्‍यांच्या वडिलांचा जहाजबांधणीचा व बांधकामाचा व्यवसाय होता आणि त्यांची एक कार्यशाळा होती. जेम्स अशक्त असल्याने त्याचे आधीचे शिक्षण घरीच झाले. नंतर शाळेत जाऊन त्यांनी लॅटिन, ग्रीक व गणित या विषयांचे अध्ययन केले.


त्यांना यंत्रोपकरणात विशेष रुची असल्याने त्यांचे खरे शिक्षण वडिलांच्या कार्यशाळेत झाले. तेथे त्यांनी स्वतः यारीसारख्या यंत्राच्या प्रतिकृती बनविल्या; तसेच जहाजावरच्या उपकरणांची माहिती करून घेतली. आधीच्या इजिनात मूलभूत स्वरूपाच्या सुधारणा करून त्यांनी बनविलेले वाफेचे इंजिन हे शक्तिनिर्माणाचे साधन म्हणून सर्वत्र वापरले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातील हे सर्वांत महत्त्वाचे साधन ठरले.


वॅट यांनी त्यानंतर ग्लासगो व लंडन येथे वैज्ञानिक (गणितीय) उपकरणांच्या निर्मितीविषयीचे प्रशिक्षण घेतले. त्या काळी मुख्यतः सर्वेक्षण व मार्गनिर्देशन यांकरिता लागणारी उपकरणे बनवीत असत. १७५७ साली ग्लासगोला परत आल्यावर वैज्ञानिक उपकरणनिर्माते म्हणून त्यांनी ग्लासगो विद्यापीठात काम करण्यास सुरुवात केली. तेथे असताना त्यांनी चतुर्थ यंत्र, होकायंत्र, दाबमापक इत्यादी उपकरणे तयार केली. या काळात त्यांचा अनेक वैज्ञानिकांशी परिचय झाला. पैकी जोसेफ ब्लॅक यांच्याबरोबर त्यांची मैत्री जमली व त्या मैत्रीचा त्यांना वाफेच्या इंजिनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने खूप उपयोग झाला.


वाफेवर चालणार्‍या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅट यांना ओळखले जाते. जेम्स वॅट लहानपणी अतिशय आळशी होता, असे त्याच्या न बोलण्यामुळे तरी वाटत होते. तो स्वयंपाकघरात त्याच्या आत्या बरोबर बसलेला असताना, विस्तवावर एका किटलीमध्ये पाणी उकळत होते. त्या पाण्याची वाफ किटलीच्या तोंडातून बाहेर पडत होती. जेम्स त्या वाफेवर एकदा कप व एकदा चमचा धरत होता व तो कप व चमचा वाफेच्या जोराने कसा खालीवर होतो, याचे निरीक्षण करत होता. 


त्याच्या आळशीपणाबद्दल त्याची आत्या नेहमीच कानउघाडणी करत असे. एकदा योगायोगाने जेम्सच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेतील न्यूमनचे मॉडेल इंजिन जेम्सकडे दुरुस्तीला आले. इंजिन दुरुस्त करताना जेम्सच्या लक्षात आले, की हे इंजिन फक्त थोडाच वेळ काम देण्याच्या योग्यतेचे आहे. विचार केल्यावर त्याच्या ध्यानात आले, की न्यूमनचा बॉयलर फार लहान आहे. ज्यात दट्ट्या असतो त्या सिलिंडराच्या घनफळाच्या ३-४ पट वाफ असली, तरच तिच्यामार्फत दट्ट्या सिलिंडराच्या टोकापर्यंत लोटला जाऊ शकेल, असे त्यांना दिसून आले. अशा रीतीने या इंजिनात वाफ मोठ्या प्रमाणात वाया जाते, हे त्यांच्या लक्षात आले. 


न्यूमनच्या इंजिनमधील खाली-वर होणारा दांडा (दट्ट्या) जेव्हा खाली ओढला जाई, तेव्हा त्या सिलिंडरमधील पंपरॉड (दांडा) वर उचलला जाई. जेम्सने एका सिलिंडरमधील वाफ पंपाने दुसर्‍या सिलिंडरमध्ये नेऊन त्या सिलिंडरवर गार पाण्याचा मारा केला व त्या वाफेचे बाष्पीभवन करून, पोकळी निर्माण करायची असे ठरवले. त्यामुळे खर्च व वेळ वाचला. दोन सिलिंडरमध्ये त्याने एअरपंप बसवला. पुढे जेम्सने या इंजिनमध्ये पुष्कळ सुधारणा केल्या.


न्यूमनच्या इंजिनातील दोषांवर उपाय शोधताना जेम्सला अचानकपणे इंजिनाला स्वतंत्र असा संघनक (वाफेचे द्रवात-पाण्यात-रूपांतर करणारे साधन) जोडण्याची कल्पना सुचली व हा त्यांचा पहिला व सर्वांत महत्त्वाचा शोध ठरला. सिलिंडरात वाफेचे पाण्यात रूपांतर होताना जी सुप्त उष्णता लागते ती वाया जाणे हा न्यूमन इंजिनाचा सर्वांत मोठा दोष असल्याचे त्यांच्या ध्यानी आले होते. म्हणून वाफेच्या संघननाचे काम सिलिंडराऐवजी त्याला जोडलेल्या पण त्यापासून अलग असलेल्या कक्षात करण्याचे त्यांनी ठरविले. 


सिलिंडरातून बाहेर पडणारी वाफ सिलिंडरात नेऊन तेथे तिचे संघनन होते. यामुळे सिलिंडरात पाण्याच्या फवार्‍याने संघनन करताना सिलिंडर व दट्ट्या थंड होत असे आणि ते परत तापविण्याकरिता वारंवार जादा उष्णता लागते असे. संघनकामुळे ही उष्णता वाचते. याशिवाय सिलिंडर व दट्ट्या गरम राहण्यासाठी त्यांनी सिलिंडराभोवती आवेष्टन घालून त्यात वाफ सोडण्याची व्यवस्था केली. यामुळे उष्णतेची व पर्यायाने इंधनाची बचत होऊन इंजिन अधिक कार्यक्षम झाले. अशा रीतीने त्यांनी वाफ एंजिनात मूलभूत सुधारणा केल्या. मात्र वाफ एंजिनाचा शोध त्यांनी लावला हा लोकप्रिय (प्रचलित) समज चुकीचा आहे. कारण त्यांच्या जन्माच्या वेळीही वाफ एंजिने खाणीतील पाणी उपसण्यासाठी वापरात होती. 


वॅट यांच्या सुधारणांमुळे वाफ इंजिन चालवायला सोपे झाले; ते अधिक खात्रीशीर रीतीने वापरता येऊ लागले व अधिक शक्तिशाली वाफ इंजिने बनविता येऊ लागली. यामुळे कागद गिरण्या, कापड गिरण्या, पिठाच्या गिरण्या, लोखंडाचे कारखाने, भट्‌ट्या, पाणीपुरवठा इ. असंख्य ठिकाणी त्याचा उपयोग होऊ लागला. व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या या इंजिनाचे औद्योगिक क्रांतीला चांगलीच चालना मिळाली.


वॅट यांनी जॉन रोबक यांच्याबरोबर वाफेची इंजिने बनविण्याचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला (१७६८) आणि १७६९ साली त्यांनी या एंजिनाचे पेटंट घेतले. मात्र या धंद्यात त्यांना विशेष यश मिळाले नाही. दरम्यान अर्थार्जनासाठी त्यांनी चष्म्याच्या व्यापाऱ्या कडील नोकरी, कालव्यांचे सर्वेक्षण व खोदकाम, बंदरांतील सुधारणा वगैरे कामे केली. या कामांना कंटाळून ते १७७४ साली बर्मिगहॅमला गेले व तेथे त्यांनी मॅथ्यू बोल्टन यांच्या भागीदारीत नव्याने वाफ एंजिने बनविण्याचा उद्योग सुरू केला. त्यांची ही भागीदारी २५ वर्षे टिकली व उद्योग भरभराटीला आला. १७७६ साली त्यांनी दोन वाफ एंजिने उभारली. पैकी एक दगडी कोळशाच्या खाणीत व दुसरे लोखंडाच्या कारखान्यात उभारले. यामुळे वाफ एंजिनांना मागणी वाढली व धंद्याला ऊर्जितावस्था प्राप्त झाली.


पुढील पाच वर्षे म्हणजे १७८१ सालापर्यंत त्यांनी तांब्याच्या व कथिलाच्या खाणीतील पाणी उपसण्यासाठी असंख्य वाफ एंजिने उभारून त्यांच्या देखभालीचे काम केले. खाणव्यवस्थापकांना इंधनाच्या खर्चात बचत व्हावी असे वाटत होते. तसेच अन्य क्षेत्रांतूनही या एंजिनाला मोठी मागणी येण्याची चिन्हे दिसू लागली होती. म्हणून बोल्टन यांनी वॉट यांना एंजिनातील दट्ट्याच्या पश्चाग्र (पुढे-मागे होणार्‍या) गतीचे भुजादंडाच्या परिभ्रमी म्हणजे फिरत्या गतीत परिवर्तन करण्याची विनंती केली. वॉट यांनी हे काम १७८१ साली यशस्वीपणे साध्य केले. त्याकरिता त्यांनी तथाकथित ‘सूर्य व ग्रह दंतचक्र’ ही योजना केली. त्यामुळे एंजिनाच्या एका आवर्तनात भुजादंडाचे दोन फेरे होतात. १७८२ साली त्यांनी द्विक्रिय एंजिनाचे पेटंट घेतले. या एंजिनात दांडा रेटला व ओढलाही जातो. यासाठी दंड व दट्ट्या नव्या पद्धतीने दृढपणे जोडले जाणे आवश्यक होते. ही समस्या त्यांनी १७८४ साली समांतर गतीचा आपला शोध वापरून सोडविली. या दट्ट्याचा दांडा लंब दिशेत हालेल अशा रीतीने संयोगदांड्यांची मांडणी केली. बोल्टन यांच्या सूचनेवरून १७८८ साली वॉट यांनी एंजिनाची गती स्वयंचलितपणे नियंत्रित करणारा केंद्रोत्सारी गतिनियंता शोधून काढला व १७९० साली त्यांनी दाबमापक शोधला. यामुळे वॅट एंजिन जवळजवळ परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचले होते.


एंजिनाची शक्ती मोजण्यासाठी त्यांनी त्याची घोड्याच्या शक्तीशी तुलना केली. अशा प्रकारे हॉर्स पॉवर (अश्वशक्ती) ही संज्ञा प्रचारात आली. त्यानंतर एक अश्वशक्ती म्हणजे १ मिनिटात ३३,००० पौंड वजन १ फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती हे मूल्य निश्चित केले. दाबमापकाने एंजिनाची अश्वशक्ती मोजीत व अश्वशक्तीनुसार एंजिनाची किंमत ठरवीत.


वाफ एंजिनाशिवाय अभियांत्रिकी व रसायनशास्त्र या विषयांतही त्यांनी संशोधन केले होते आणि त्यांना भाषा व संगीत यांतही रस होता. त्यांचे काही महत्त्वाचे संशोधन पुढीलप्रमाणे आहे. 


आपले कार्यालय उबदार ठेवण्यासाठी त्यांनी वाफेच्या वेटोळ्यांचा वापर केला होता (१७८४). इंधनाची बचत करणारी भट्टी, दाब देऊन मजकुराच्या प्रती काढावयाचे यंत्र व प्रतिलिपी शाई, शिल्पाची (पुतळ्याची) पुनःनिर्मिती करणारे यंत्र, अम्लतेची चाचणी घेणारे दर्शक, नियामक झडप, क्लोरीनचा वापर करून विरंजन (रंग घालविण्याची क्रिया) करण्याचे तंत्र वगैरे त्यांचे शोध महत्त्वाचे आहेत. शिवाय पाणी हे मूलद्रव्य नसून संयुग आहे, असे सुचविणारे ते एक पहिले संशोधक होते. ग्लासगो वॉटर कंपनीचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले होते. विज्ञान व कला यांचा प्रसार करणार्‍या लूनर सोसायटीचे ते सदस्य होते.


वॅट यांना त्यांच्या संशोधनकार्याबद्दल पुढील अनेक मानसन्मान मिळाले होते. एडिंबरो व लंडन (१७८५) येथील रॉयल सोसायटीचे सदस्यत्व, ग्लासगो विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी (१८०६), फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्यत्व वगैरे. त्यांना जहागिरी देऊ करण्यात आली होती; पण ती त्यांनी स्वीकारली नाही. त्यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॉट (वॅट) हे नाव देण्यात आले असून वेस्ट मिन्स्टर ॲबे येथे त्यांचा पुतळा उभारला आहे. त्यांचा एक मुलगा (जेम्स) सागरी अभियंता होता व त्याने जहाजाकरिता वाफ एंजिनाचा वापर केला होता.


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

***********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,कृष्ण पक्ष, *तृतीय*,उ.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २५ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"धर्म में ही भारत की जीवन शक्ति निहित है और जब तक यह हिन्दू जाति अपने पूर्वजों की इस विरासत को नही भूलती, तब तक विश्व की कोई भी  शक्ति इसका विनाश नहीं कर सकती।”*


              *- स्वामी विवेकानन्द*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

HIV म्हणजे काय


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री.गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *एड्स म्हणजे काय ?* 📕


एड्स हा शब्द गेल्या काही वर्षांत वारंवार कानावर पडू लागलेला आहे. हा शब्द उच्चारताच एक भयंकर आजार, ज्याचा अंत केवळ मरणात आहे, आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. एड्स हा एक रोग आहे, हे तर आपल्यापैकी बऱ्याचजणांना एव्हाना माहीत झाले असेल. एड्सबद्दल आपण जास्त माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण आज नाही तरी अजून ५-१० वर्षांत आपल्या देशात भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांमध्ये एड्सचा समावेश नक्कीच झालेला असेल.


एड्स म्हणजे (AIDS) अॅक्वायर्ड अम्यूनो डेफिशियन्सी सिन्ड्रोम सर्वप्रथम १९८१ मध्ये अमेरिकेत ह्या रोगाचे निदान झाले. भारतात हा रोग १९८६ मध्ये आढळून आला. २००० पर्यंत भारतात एड्सचे काही हजार रुग्ण आहेत. एड्स हा विषाणूंमुळे होणार आजार आहे. या विषाणूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते शरीराच्या रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने अनेक बुरशी संवर्गातील परजीवी जंतू, काही विषाणू व काही सामान्यतः मनुष्याला रोग न करणारे जिवाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात व रोग होतात. या रोगांना संधीसाधू सांसर्गिक रोग असे म्हणतात.


एड्सचे विषाणू शरीरात शिरल्यापासून एड्स होईपर्यंत अनेक वर्षे लोटतात. एड्सचे निदान करणाऱ्या एलाइझासारख्या तपासण्या एड्स विषाणूच्या शरीरात प्रवेशानंतर शरीराने दिलेल्या अँटीबॉडीजरूपी प्रतिसादावर अवलंबून असतात. त्यामुळे एच.आय.व्ही. पॉझिटीव्ह (शरीरात एड्सचे जंतू असलेली) व्यक्ती एड्सचा रुग्ण होईल वा नाही, वा केव्हा होईल, हे नक्की सांगता येत नाही. एड्सच्या लक्षणांत महिन्याभराहून जास्त काळ खोकला, शरीरभर लिंफ ग्रंथीची वाढ, त्वचेचे दाह, महिन्याभराहून जास्त काळ ताप, जुलाब, तसेच वजनात दहा टक्क्यांहून जास्त घट इत्यादींचा समावेश होतो.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

अल्वा ऐडिसन पेटंट घेतले

 *************************************

📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️

*२४ ऑगस्ट - थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेर्‍याचे पेटंट घेतले*

*************************************

🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥

             *२४ ऑगस्ट १८९१*

🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️

थॉमस एल्वा एडिसन (११ फ़रवरी १८४७ - १८ अक्टूबर १९३१) हान अमरीकी आविष्कारक एवं विद्वान व्यक्ति थे। फोनोग्राफ एवं विद्युत बल्ब सहित अनेकों युक्तियाँ विकसित कीं जिनसे संसार भर में लोगों के जीवन में भारी बदलाव आये।


अमेरिका में अकेले १०९३ पेटेन्ट कराने वाले एडिसन विश्व के सबसे महान आविष्कारकों में गिने जाते हैं। एडीसन बचपन से ही जिज्ञासु प्रवृत्ति के थे।


एडिसन ने १८९१ में चलचित्र कैमरा पेटेंट कराया एवं इन चित्रों को प्रदर्शित करने के लिए किनैटोस्कोप का भी आविष्कार किया।

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

*************************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,कृष्ण पक्ष, *द्वितीय*,पू.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, २४ आॕगस्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"त्रुटियों को स्वीकार करने में एवं पाप का प्रायश्चित करने में कभी भी अनावश्यक विलम्ब न करें, क्योंकि यात्रा जितनी लम्बी होगी, वापसी भी उतनी ही कठिन होती जायेगी"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

विद्युत भाराच्या मुल्यमापन

 *चार्ल्स ऑगस्टिन डे कूलॉम*

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

*विद्युतभाराच्या गुणधर्माचे प्रत्यक्ष मापन*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*स्मृतिदिन - २३ आॕगस्ट १८०६*


चार्ल्स ऑगस्टीन डी कुलोम - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ कुलोम यांनी वेस्ट इंडिजमध्ये लष्करी अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १७७६ मध्ये ते पॅरिसला परतले आणि एक छोटी इस्टेट तयार करून एकट्याने आपल्या संशोधनाच्या कार्यास सुरुवात केली. 


विद्युतशक्तीची ओळख ही प्राचीन काळापासून असली, तरी विद्युतभाराच्या गुणधर्माचे प्रत्यक्ष मापन प्रथम फ्रान्सच्या चार्ल्स कुलोम याने १७८५-१७८७ या काळात केले. कुलोमने यासाठी वापरलेल्या  ‘टॉर्शन बॅलन्स’ या साधनात दोन्ही टोकाला गोळे जोडलेल्या एका लांब सुईचा वापर केला होता. ही सुई तिच्या मध्यावर रेशमी दोरा बांधून आडवी, संतुलित अवस्थेत लोंबकळत ठेवली होती. दोरा मध्ये बांधल्यामुळे ही सुई स्वतच्या मध्यातून जाणाऱ्या अक्षातून फिरू शकत होती. कुलोमच्या या साधनात सुईला जोडलेल्या एका गोळ्याच्या जवळ दुसरा एक गोळा आणता येत असे. कुलोमने प्रथम हे दोन्ही गोळे, ऋण किंवा धन अशा सारख्याच प्रकारे विद्युतभारित करून घेतले. सारख्याच प्रकारच्या विद्युतभारामुळे, या गोळ्यांत प्रतिकर्षण (रिपल्शन) निर्माण होऊन सुई स्वतच्या अक्षाभोवती फिरत असे. सुई किती अंश फिरली हे मोजून कुलोमला प्रतिकर्षणामागील विद्युत बल मोजता आले. कुलोमने या गोळ्यांवरील विद्युतभार बदलून, त्यांतील अंतरे बदलून वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यातील विद्युतबलाचे मापन केले.


पुढच्या प्रयोगात कुलोमला दोन्ही गोळ्यांवर, एकमेकांच्या विरुद्ध प्रकारचे विद्युतभार वापरून मापन करायचे होते. मात्र दोन्ही गोळ्यांत आता प्रतिकर्षणाऐवजी आकर्षण निर्माण होत असल्यामुळे, दुसरा गोळा जवळ आणला की सुईची, गोळा बांधलेली बाजू ही या गोळ्याजवळ येऊन स्थिर होत असे. या अडचणीवर मात करण्यासाठी कुलोमने सुई उभी टांगली. या सुईच्या टोकाला गोळ्याऐवजी एक विद्युतभारित पट्टी जोडली. कुलोमने आता या पट्टीजवळ विरुद्ध विद्युतभार असलेला गोळा आणला. टांगलेली सुई, तिच्यावरील विद्युतभारित पट्टीमुळे गोळ्याकडे खेचली जाऊ लागली. परंतु स्थिर होण्याच्या अगोदर ती काही काळासाठी लंबकासारखे झोके घेऊ लागली. या झोक्याचा कालावधी हा गोळा व पट्टीमधील विद्युतबलावर अवलंबून होता. झोक्याचा कालावधी मोजून कुलोमने दोन गोळ्यांतील विद्युतबलाचे पहिल्या प्रकाराप्रमाणेच वेगवेगळ्या परिस्थितींत मापन केले.


या सर्व प्रयोगांवरून कुलोमने, वाढत्या विद्युतभारानुसार दोन्ही गोळ्यांतील प्रतिकर्षण व आकर्षण वाढत असल्याचा व वाढत्या अंतरानुसार ते कमी होत असल्याचा निष्कर्ष काढून त्यामागील सूत्रही स्पष्ट केले. कुलोमच्या या विद्युतशास्त्रातील मूलभूत प्रयोगांचे निष्कर्ष पॅरिस अकॅडमी ऑफ सायन्सेसने १७८५ आणि १७८७ साली प्रसिद्ध केले.

 🙏🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,कृष्ण पक्ष, *प्रथम*,शतमिषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, २३ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *जीवन एक "प्रतिध्वनि" है। यहाँ सब कुछ वापस लौटकर आ ही जाता है,*

*अच्छा, बुरा, सत्य, असत्य...।*


*अतः  दुनिया को हम सबसे अच्छा देने का प्रयास करें। निश्चित ही सबसे अच्छा आपके पास वापस आएगा।*"

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

बिसमिल्ला खाँन सनयीवादक

 **************************************

*२१ ऑगस्ट - शहनाईवादक बिस्मिल्ला खाँ जयंती*

**************************************

🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺

🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷

२१ मार्च १९१६ -- २१ ऑगस्ट २००६


आपल्याला बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईचा आवाज रोज न चुकता रेडिओच्या सर्व केंद्रांवरून ‘मंगल प्रभात’ मध्ये ऐकायला येतो. अजूनही मंगल कार्यात शहनाई वाजवणारे मिळाले नाहीत तर खानसाहेबांच्या वादनाची सीडी मिळवून वाजवली जाते.


बज गई शहनाई, शादी अब होनेवाली है, असा संदेशा पोचविणाऱ्या ह्या शहनाईला बिसमिल्ला खाँ यांनी पारंपारिक शास्त्रीय संगीताच्या मैफलीच्या मखमली गालीचावर नेऊन बसविले. १९३६-३७ सालच्या सुमारास बनारस येथे ‘स्टार हिंदुस्थान’ लेबलवर त्यांनी पहिली ध्वनिमुद्रण केली ती सगळी रागदारीची होती. बिहाग, भैरवी, तोडी, दुर्गा, बागेश्री व जोनपुरी असे राग असून लेबलवर ‘विलायतू बिस्मिल्ला ऑफ बनारस’ असं लिहिलं आहे. १९४१ मध्ये ग्रामोफोन कंपनीनं लखनौ येथे तीन ध्वनिमुद्रिका केल्या, त्यात तोडी व मालकंस राग तसेच ठुमरी व दादरा हे सुगम संगीताचे प्रकार आहेत. लेबलवर ‘बिस्मिल्लाह अॅण्ड पार्टी’ असं छापलं असून त्यावर ‘सनई गत’ असं लिहिलं आहे.


ध्वनिमुद्रिकाप्रेमींच्या घरातून व सार्वजनिक उत्सव समारंभातून त्या रेकॉर्ड्स वाजवल्या जाऊ लागल्या. गुरूंचा रोष पत्करूनही सुगम संगीताच्या तीन मिनिटं वाजणाऱ्या रेकॉर्ड्स ते देतच राहिले. त्यांची लोकप्रियता पाहून जून १९५१ च्या दिल्लीतल्या ध्वनिमुद्रण सत्रात ‘बाबुल’ सिनेमातील दोन गाणी त्यांनी रेकॉर्ड केली- ‘छोडम् बाबुलका घर’ व ‘पंछी बनमे पिया पिया गाने लगा’. 


१९५७ पर्यंत रागदारी व सुगम संगीताच्या बरोबरीने ‘जीवन ज्योती’, ‘आवारा’, व ‘बसंत बहार’ सिनेमातली गाणी त्यांनी वाजवली. १९५९ च्या प्रकाश पिक्चर्सच्या ‘गूँज उठी शहनाई’ या बोलपटातल्या वादनानं तर खानसाहेबांना रसिक मनांत खास स्थान मिळवून दिलं. या बोलपटातील गाणी इतकी गाजली की ‘दिलका खिलौना हाये टूट गया’ व ‘जीवनमें पिया तेरा साथ रहे’ ही गाणी सनईवर वाजवून त्यांनी रेकॉर्डस केल्या. त्यात एकल वादन तर आहेच, पण उस्ताद अमीर खान साहेब यांच्या गायनाबरोबर जुगलबंदी व उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांच्या सतार वादनाबरोबरची जुगलबंदीही आहे. तसेच मा. व्ही.जी जोग जुगलबंदीही लोक अजून मेजवानी म्हणून ऐकतात. यांच्या बरोबरची पुढच्या काळात सतार, बासरी, सरोद जुगलबंदीची ही जणू मेजवानी होती. 


हिंदी चित्रपटसृष्टीतही शहनाईला श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले. सनई हे भारतीय सुशिर वाद्य जगप्रसिद्ध करण्यात सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांची महत्त्वाची भूमिका आहे. २००१ साली बिस्मिल्ला खान यांना सर्वोच्च असा ‘भारतरत्न’ पुरस्कार बहाल करण्यात आला. 


शहनाई वादक *बिस्मिल्ला खान यांचे २१ ऑगस्ट २००६ रोजी निधन झाले.*


बिस्मिल्ला खान यांना आदरांजली !

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

**************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *चतुर्दशी*,श्रवण नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, २१ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"आनंद का सबसे बड़ा शत्रु है- असंतोष.....। हम प्रगति के पथ पर उत्साहपूर्वक बढ़ें, परिपूर्ण पुरुषार्थ करें। आशापूर्ण सुंदर भविष्य की रचना के लिए संलग्न रहें, पर साथ ही यह भी ध्यान रखें कि असंतोष की आग में जलना छोड़ें। इस दावानल में आनंद ही नहीं, मानसिक संतुलन और सामर्थ्य का स्रोत भी समाप्त हो जाता है। असंतोष से प्रगति का पथ प्रशस्त नहीं, अवरुद्ध ही होता है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

लहान मुलांना व स्त्रीयांना दाढिमुशा का नसतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *लहान मुलांना व स्त्रियांना दाढी मिशा का नसतात ?* 📙 

स्त्री व पुरुषातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यात असणारी वेगळी जननेंद्रिये. पुरुषात पूबीज कोष शरीराच्या बाहेरचा भागात तर स्त्रियांमध्ये स्त्रीबीज कोष ओटीपोटात असतात. पौगंडावस्थेत वा वयात येत असताना मेंदूच्या नियंत्रणाखाली मुलांमध्ये टेस्टेस्टेरॉन, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स स्त्रवायला सुरुवात होते. या हार्मोन्समुळे मुलामुलींमध्ये दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात. त्यांच्या पूबीज व स्त्रीबीज कोषात पुनरुत्पादनासाठी आवश्यक असणारी पूबीजे (शुक्राणू) व स्त्रीबीजे (अंडी) अनुक्रमे तयार होतात.


दुय्यम लैंगिक लक्षणात आवाज फाटणे, कंठ फूटणे, काखेत व जननेंद्रियांवर केस येणे ह्यांचा समावेश मुले मुली या दोहोत होतो. मुलींमध्ये स्तनांची वाढ होते. मेदाचे साठे वाढतात. मासिक पाळी सुरू होते. मुलांमध्ये दाढी मिशा येऊ लागतात. बिजाची निर्मिती होऊ लागते. मुली मुलांमध्ये वेगवेगळे हार्मोन्स स्रवत असल्याने मुलींना दाढी मिशा येत नाहीत. तर मुलांमध्ये स्तनांची वाढ होत नाही. एक लक्षात घ्यायला हवे की मुलींमध्ये टेस्टेस्टेरॉन असतो. पण तो अत्यंत अल्प प्रमाणात असतो व मुलांमध्येही अत्यल्प प्रमाणात इस्टोजेन असतो. काही वैगुण्यांमुळे वा विकारांमुळे या हार्मोन्सचे प्रमाण वाढल्यास मुलींमध्ये दाढी मिशासारखी पुरुषी लक्षणे तर मुलांमध्ये स्तनांची वाढ होण्यासारखी बायकी लक्षणे दिसून येतात.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════


शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

ध्यान साधना

 *🌼जय सद्गुरु!!*🙏

             🔥🔥🔥

*💫भोग भोगावे लागणं, त्याचा ताप सहन करावा लागणं हे पूर्णतः प्रारब्धावर अवलंबून आहे. परंतु नाम हे त्या भोगावरील वेदनाशामक औषधी आहे. वेदनाशामक औषध वेदना कमी करत नाही तर तिचा तुम्हाला म्हणजेच मेंदूद्वारे शरीराला जाणवणारा दाह कमी जाणवेल याची काळजी घेतं. हेच कार्य नाम करतं. भगवंत जो अनेक रुपात वास करून आहे, तोच गुरुरूपात पुनः प्रकट होऊन कलियुगी जनसामान्यांना खडतर असणारं आयुष्य सुलभ करण्यासाठी उपस्थित झाला आहे. अनेक देही विस्तारलेला हा गुरुमहिमा मुळात एकाच मूळ तत्वापासून प्रकट झाला आहे. खरा गुरू हा भक्त, साधक वा शिष्यांजवळ फक्त आणि फक्त नाम, ईश्वरसेवा, हळूहळू प्राप्त होणारं निरिच्छत्व मागतो आणि कांक्षीतो. या व्यतिरिक्त जे मागणारे असतील ते बाह्य भाव भिन्न परी अंतरी भाव वेगळे असे समजावे.* 

*जर भोग भोगावे लागतातच, तर मग सद्गुरू, नाम, ईश्वर हवंच कशाला ? प्रश्न योग्य आहे. पण खोलात जाऊन विचार केला तर कळतं की, रोग झाल्यावर, सर्व रोग घरबसल्या बरे होत नाहीत. तर काहींसाठी डॉक्टरकडे जावं लागतं, आजाराप्रमाणे काही दिवस औषध घ्यावं लागतं, त्यानंतर सुधारणा होऊ शकते. तेदेखील प्रारब्धात लिहिलं असेल त्यानुसार. म्हणजे योग्य इलाज होणार असेल तेंव्हाच त्या डॉक्टरकडे जायची प्रेरणा होते.  तोपर्यंत भोग भोगूनच कमी करावे लागतात. परंतु भोग भोगत असताना ईश्वर हा नामरूपात सोबत असेल तर भोग सुसह्य होतात. त्यावरील औषध हे प्रारब्धात असेल तर मिळतं कसंही. परंतु ईश्वर सोबत असल्याने ताप सहन करण्याची शक्ती, जगण्याची प्रेरणा आणि झुजण्याची जिद्द मिळत जाते. म्हणून कठीण परिस्थितीत ईश्वराची प्रार्थना वा नामरूपात तो सोबत असणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.*🌹🙏


*जय जय आनंद सद्गुरु जय    जय आनंद सद्गुरु!!*

गजानन गोपेवाड 

ध्यान साधना

 प्रारब्ध शुद्धी


आध्यात्मात प्रगती करायची असेल, तर प्रथम प्रारब्धशुद्धी करावी लागते. प्रारब्ध शुद्ध केल्याशिवाय आध्यात्मात कधीही प्रगती होत नाही. प्रारब्धाचे मुख्य तीन मुख्य भेद आहेत.


||संचित||


मानवाच्या चित्तामध्ये पूर्वीच्या हजारो जन्मांचे संस्कार साठलेले असतात. त्याचप्रमाणे पूर्वीच्या हजारो जन्मांतील कर्माचे व वासनांचे गाठोडे या चित्तामध्ये साठलेले असते. या गाठोडयाला 'संचित' असे म्हणतात.


||प्रारब्ध||


संचितामधून या जन्मी जे काही मानवाने भोगायचे आहे त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. या प्रारब्धानुसारच माणसाला बुद्धी होत असते. म्हणून बुद्धिकर्मानुसारिणी म्हंटले जाते.


||क्रियामाण||


या जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे क्रियामाण कर्म पुन्हा संचितात जमा होत असते. व संचिताचे गाठोडे वाढतच असते. म्हणून प्रत्येक कर्म करतांना नीट विचार करून कर्म करावे व आपल्याला पाप लागणार नाही याची दक्षता घ्यावी.संचित, प्रारब्ध, आणि क्रियामाण यांचे कार्य कसे चालते ते पुढील उदाहरणावरुन लक्षात येईल.समजा, एखाद्या मनुष्याने त्याला आपण डॉक्टर व्हावे असे वाटू लागते. याला म्हणतात प्रारब्ध. हे प्रारब्धच त्याला डॉक्टर होण्याची प्रेरणा देत राहते व मला डॉक्टर व्हायचे आहे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण करते. डॉक्टर होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होतात. तो खुप मन लावून अभ्यास करु लागतो व एक दिवस डॉक्टर बनतो. याला म्हणतात 'क्रियामाण'.


आजही भारतात असे ज्योतिषी आहेत की, जे कुंडली पाहताच डॉक्टर होणार की, वकील होणार, इंजिनिअर होणार की, आचारी होणार, हे अचूक सांगतात. मानवी जीवनातील सर्व गोष्टी या प्रारब्धाधीन आहेत व आध्यात्मात प्रगती जर हवी असेल, तर मुळावर घाव घालणे अतिशय आवश्यक असते. ही प्रारब्धशुद्धी कशी करायची हे आता पाहूयात.दररोज किमान दोन तास जप किंवा एखाद्या स्तोत्राचे पाठ करायला हवेत. (एक तास सकाळी व एक तास संध्याकाळी.) या साधनेने हळूहळू प्रारब्धशुद्धी व्हायला सुरवात होते.


||दान||


आपल्या उत्पन्नातील किमान २० टक्के रक्कम दानधर्मात खर्च करायला हवी. याने प्रारब्धाची शुद्धी होते व लक्ष्मी स्थिर होते. दानाने धनाची वृद्धी होते व केलेल्या कार्यात यश प्राप्त होते. वेद शास्त्रे व अठरा पुराणे या सर्वांमध्ये दानाचा महिमा वर्णन केलेला आहे. सर्वसाधारण ईश्वरी महिमा असा आहे की, एखाद्या घराण्यामध्ये लक्ष्मी जास्तीत जास्त ६० वर्षे राहते. घराण्यातील पूर्वज जर जास्तच पुण्यवान असतील, तर लक्ष्मी ७५ वर्षांपर्यंतसुद्धा राहते. या कालावधीत पुण्याईचा क्षय होत असतो. घराण्यामध्ये कोर्ट-कचेऱ्या, भांडणे, कलह, पिशाच्च शक्तींचा उपद्रव, अशा प्रकारचे त्रास सुरु होतात. शेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते घराणे लोटले जाते. लक्ष्मी निघून जाते व अहंकार, दारिद्र्य व दुर्गुण घराण्यात शिल्लक राहतात. धन, यश, किर्ती, ऐश्वर्य, विद्या, सत्ता, सौंदर्य, सामर्थ्य या सर्व गोष्टी पूर्वपुण्याइने प्राप्त होत असतात व पूर्वपुण्याई ही दैनंदिन मानवी जीवणामध्ये रोजच खर्च होत असते. याकरिता पुण्याई सतत वाढवीत राहणे आवश्यक असते. ईश्वरचिंतन व दान याने पुण्याई वाढत राहते. म्हणून सतत ईश्वरचिंतन व दान करत राहायला हवे. धनवानांनो ! या चंचल लक्ष्मीवर कधीही विश्वास ठेवू नका. अहंकार, घमेंड, स्वार्थ व लोभ अशा अनेक दुर्गुणांना बरोबर घेऊन ही लक्ष्मी आपल्या घरी येते. व ती जेव्हा जाते तेव्हा अनेक दुर्गुणांना आपल्या घराण्यात सोडून जाते, असे विद्वान लोकांचे म्हणणे आहे; परंतु खरी गोष्ट अशी आहे की, अपुऱ्या पुण्याईमुळे धन आल्यानंतर माणसाला अहंकार होतो व अहंकार सर्व दुर्गुणांना जन्म देतो. भरपूर पुण्याई असेल, तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसन्न होते व लक्ष्मी प्रसन्न झाली असता ऐहिक, पारमार्थिक उन्नती होते.


||निरपेक्षता||


अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ आहे. कोणाकडून कसलीही अपेक्षा करु नये. अगदी परमेश्वराकडून कसलीही अपेक्षा करु नये. आध्यात्मात प्रगती होण्यासाठी निरपेक्षता या गुणाची जोपासना करणे अत्यंत आवश्यक असते. निःस्वार्थ बुद्धी जेव्हा परिपक्व होते. तेव्हा तिला निरपेक्षता म्हणतात. निरपेक्षतेने अखंड समाधान प्राप्त होते. अन्तःकरण इतके विशाल होते की, प्रत्यक्ष परमेश्वर ह्रदयात येऊन राहतो. अशा विशाल हृदयाच्या भक्तांविषयी श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात.....


ययापरी पार्था | माझिया भजनी आस्था || तरी तया ते मी माथा | मुकुट करी ||अथवा देखे साधक निघोनी जावे | मागा पाउलांची ओळ राहे || तेथे ठायी ठायी होये | आणिमादिक ||लेखन,, गजानन गोपेवाड 

विंचु चावल्यावर काय करावे लागेल?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *विंचू चावल्यास काय करावे ?* 📙 


शहरांमध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट, अंधाऱ्या जागी गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो. विंचू चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते. परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत.


विंचू चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर, मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला पेटके येणे, बेशुद्ध येणे अशी लक्षणे दिसून येतात. इंगळीच्या विषाने याहून गंभीर परिणाम होऊन मृत्यूही होऊ शकतो.


हाताला किंवा पायाला विंचू चावल्यास त्याच्या वरच्या बाजूस पट्टी बांधावी. गरज असल्यास चावलेल्या जागी छेद घ्यावा. जखम पाण्याने, अमोनिया किंवा पोटॅशियम परमँगनेटने धुवावी.


बधीर करण्यासाठी औषध उपलब्ध असल्यास ते टाकावे. चावलेल्या भागाची हालचाल शक्यतो करू नये. त्यामुळे वीज कमी शोषले जाते.


लक्षणांमध्ये वाढ होत गेल्यास तसेच इंगळीने म्हणजे लाल मोठ्या विंचवाने दंश केल्यास लहान मुलांना विंचू चावल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🚩🚩गाथा बलिदानाची🚩🚩*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

            मेवाड ची राणी

       *पद्मिनी उर्फ पद्मावती*


जन्म : २० आॕगष्ट -----

मृत्यू : २५ आॕगष्ट १३०३


जन्म : सिंहल द्वीप 

निधन : चित्तौड़

जीवनसाथी : राजा रत्न सिंह

वडिल  : राजा गंधर्व सेन 

आई : रानी चंपावती 

धर्म : हिन्दू


        राणी पद्मिनी ऊर्फ पद्मावती ही चित्तोडगढ राज्याची राणी व राजा रतनसिंह याची पत्‍नी होती, असे सांगितले जाते. मलिक मोहम्मद जायसी याने इ.स. १५४० च्या सुमारास तिच्यावर अवधी भाषेत पद्मावत नावाचे महाकाव्य लिहिले होते. या महाकाव्याने पद्मावती नावाच्या काल्पनिक पात्राला जन्म दिला. पद्मावतीचे नाव इतिहासात सापडत नाही.


सुलतानी परंपरेप्रमाणे आपला काका, सासरा आणि दिल्लीच्या गादीवरील खिलजी राजवंशाचा संस्थापक असणार्‍या जलालुद्दिन खिलजीचा कपटाने आणि अतिशय क्रूरपणे खून करुन, त्याचे मुंडके भाल्याच्या टोकात खूपसून पूर्ण सैन्यातून मिरवून, त्यानंतर आपले भाऊ व साल्यांचे मुडदे पाडून २१ ऑक्टोबर १२९५ रोजी अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीश्वर झाला. सत्तेसाठीचा रक्तपात आटोपून अल्लाउद्दीनने भारतातील इतर राज्यांवर आक्रमण करुन लूट मिळवण्याचे सत्र सुरू केले. चित्तोड(१३०३), गुजराथ (१३०४), रणथंबोर (१३०५), माळवा(१३०५), सिवाना(१३०८), देवगिरी(१३०९), वरंगळ (१३१०), जालोर(१३११), द्वारसमुद्र(१३११) आदि राज्यांवर आक्रमणे करुन अल्लाउद्दीनने परमार, वाघेला, चामहान(चौहान), यादव, काकाटीय, होयसाळ, पांड्य आदि साम्राज्ये उद्ध्वस्त केली. हजारोंचा नरसंहार केला, लाखोंचे धर्मपरिवर्तन केले, कोट्यवधींचीया संपत्ती व हत्ती-घोड्यांची लूट केली आणि अगणित हिंदुस्तानी माताभगिनींचा शीलभंग करून त्यांना आपल्या जनानखान्यात भरती केले वा बाजारात विकण्यास्तव गुलाम बनवून नेले. इतिहासकारांच्या लेखण्यांना लिहितानाही लाज वाटेल इतके रानटी व सैतानी अत्याचार अल्लाउद्दीन व त्याच्या सैनिकांनी केले.


अल्लाउद्दीन दिल्लीच्या गादीवर असतांना मेवाडात रावळ वंशाचा राणा रतनसिंह गादीवर होता व चित्तोडगड ही त्याची राजधानी होती. आणि रतिप्रमाणे अद्भूत,आरसपानी अशा लावण्याची खाण असलेली पद्मिनी मेवाडची महाराणी होती. सिंहली(श्रीलंकेचा) राजा गंधर्वसेन व राणी चंपावतीची रुपगर्विता राजकन्या असणारी पद्मिनी लहानपणापासून युद्धकौशल्यात निपुण होती. तिच्या स्वयंवराचा पण असा होता की जो कोणी तिने निवडलेल्या सैनिकाला लढाईत हरवेल, त्याच्याच गळ्यात ती वरमाला घालेल.आणि असे म्हणतात की तो सैनिक म्हणजे स्वतः पद्मिनीच असे. तर असा पण जिंकून राणा रतनसिंहाने पद्मिनीला वरले. रतनसिंह आपल्या प्रजाहितदक्ष राज्यकारभारासाठी आणि पद्मिनी आपल्या रूपासाठी त्याकाळी जगविख्यात होते.

              रतनसिंहाच्या दरबारी राघव चेतन नावाचा एक कलाकार होता. कसल्यातरी गुन्ह्यासाठी राण्याने राघव चेतनला अपमानित करून दरबारातून हाकलून दिले. सूडाग्नीने पेटलेला राघव चेतन दिल्ली राज्यातील एका वनात जाऊन बसला जेथे खिलजी नियमितपणे शिकारीला येत असे. एके दिवशी खिलजीचे शिकारी टोळके येताना पाहून राघव चेतनने सुंदर बासरी वाजवणे सुरू केले. बासरीचे सूर ऐकून अल्लाउद्दीनने त्याला आपल्यासमोर हजर करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने राणी पद्मिनीच्या अनुपम सौंदर्याचे रसभरित वर्णन करून सांगितले की, "तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाच्या जनानखान्यात पद्मिनी नसणे हा तुझ्या पराक्रमाचा अपमान आहे", हे ऐकून खिलजीच्या व्यभिचारी व लंपट मनात पद्मिनीच्या प्राप्तीची इच्छा बळावली. आणि पद्मिनीसाठी खिलजीने जानेवारी १३०३ मध्ये चित्तोडगडावर स्वारी केली व गडाला वेढा घातला. राजपुतांच्या चिवट प्रतिकारामुळे आठ महिने होऊनही खिलजीला काहीच यश मिळत नव्हते. तेंव्हा त्याने रतनसिंहाकडे निरोप पाठवला की, "मला जर राणी पद्मिनीचे दर्शन करविण्यात आले, तर मी दिल्लीला निघून जाईन." प्रजाहितास्तव राण्याने हे मान्य केले. परंतु यामागील कुटिल डाव ओळखून राणी पद्मिनीने स्वतः समोर न जाता आरशातून खिलजीला स्वतःचे प्रतिबिंब दाखवण्यात यावे, असे सुचविले. त्याप्रमाणे खिलजीला पद्मिनीचे प्रतिबिंब दाखवण्यात आले अन् कपटी,लंपट खिलजी राणीचे रुप पाहून आणखीनच चेकाळला. 'अतिथी देवो भव' या भारतीय मूल्याचे पालन करण्यास्तव (परंतु देश-काल-पात्राचा विवेक न केल्यामुळे जी आपल्याच अंगावर उलटून अनेकदा आपली 'सद्गुणविकृती' ठरली) रतनसिंह गडाच्या दरवाजापर्यंत गेला.मात्र खिलजी व त्याच्या सैनिकांनी कपटाने राजाला कैद करून खाली आपल्या पाडावात नेले आणि निरोप पाठवला की ,"राणा जिवंत हवा असेल तर पद्मिनीला आमच्या स्वाधीन करा."


गडावर सैनिकी खलबते झडली. आणि गडावरून निरोप गेला की,"राणी पद्मिनी तिच्या पन्नास दासींसमवेत अल्लाउद्दीनच्या डेऱ्यात दाखल होईल, पण त्याबदल्यात राणा रतनसिंहास सोडून देण्यात यावे." ठरल्याप्रमाणे राणी व तिच्या दासी एका-एका पालखीत व त्या पालखी उचलणारे चार-चार पालखीचे भोई खिलजीच्या डेऱ्यात दाखल झाले.राणी पद्मिनीची पालखी खिलजीच्या शामियान्यासमोर थांबली. राणा रतनसिंहाला मोकळे करून घोड्यावर बसवण्यात आले. पद्मिनीच्या पालखीतून एक स्त्री उतरली.अन्य पन्नास पालख्यांतून पन्नास दासीही उतरल्या. संकेत झाला. आणि....आणि हे काय? क्षणात पद्मिनी, त्या दासी व त्या भोयांच्या हातात पालखीत लपवून ठेवलेल्या तलवारी तळपायला लागल्या. राणीचा मामा गोराच पद्मिनीचा वेश घेऊन आणि त्याचा पुतण्या बादल (ही गोरा-बादलची काका-पुतण्याची जोडगोळी राजस्थानी लोकगीतांमध्ये फार प्रसिद्ध आहे). काही निवडक सैनिकांना घेऊन स्त्रीवेश धारण करून खिलजीच्या डेऱ्यात घुसले होते. काही कळायच्या आतच सपासप कत्तल सुरू झाली. गोरा तर खुद्द अल्लाउद्दीनच्या तंबूत शिरला व त्याची गर्दन उडवणार तो त्याने आपल्या दासीला समोर केले. स्त्रीवर वार न करण्याच्या राजपूत बाण्यामुळे गोरा थांबला अन् मागून आलेल्या खिलजीच्या सैनिकांनी गोराचे मुंडके धडावेगळे केले. आपल्या स्वामीचे प्राण वाचविण्यासाठी गोराने हौतात्म्य पत्करले.बादल व अन्य राजपूत सैनिक आपल्या राण्याला घेऊन झपाट्याने गडावर निघून गेले अन् खिलजी हात चोळत राहिला.


आता मात्र झालेल्या प्रकाराने डिवचलेला हा विषारी भुजंग व्देषाने चालून गेला. काही दिवस गड झुंजविल्यानंतर गडावरील रसद संपत आली आणि अंतिम युद्धासाठी राणा रतनसिंह व राजपूत वीर सिद्ध झाले. २५ ऑगस्ट १३०३ रोजी गडाचे दरवाजे उघडून, 'जय एकलिंग,जय महाकाल' चे नारे देऊन राजपूत सेना खिलजीच्या सेनासागराशी भिडली. परंतु संख्याबळात कमी असल्यामुळे लढाईचा अपेक्षितच निर्णय आला. दहा-दहा सुलतानी सैनिकांना लोळवून एक-एक राजपूत मृत्युमुखी पडला..लढाई संपली. राण्यासहित सर्व राजपूत मारले गेले. अन् वखवखलेले सुलतानी लांडगे आपल्याला सोळा हजार राजपूत जनानींची शिकार करायला मिळणार, म्हणून गडात घुसले.


पण गडावर शिरताच पाहतात तर काय, एकही स्त्री दिसेल तर शपथ. थोडे पुढे जाऊन चित्तोडगडावरील जगप्रसिद्ध 'विजयस्तंभ' ओलांडल्यावर लागणाऱ्या विस्तीर्ण मैदानावर, जिथे आज 'जौहर स्थल' म्हणून पाटी लागलेली आहे, तिथे राजपूतांच्या पराभवाची वार्ता मिळताच, खिलजीचे सैन्य गडावर शिरण्यापूर्वीच राणी पद्मिनी व सोळा सहस्र वीरांगनांनी ज्या अग्निसाक्षीने आपल्या प्राणनाथांना वरले होते, त्याच अग्नीत उड्या घेतल्या. स्वतःच्या शीलाचे व देव, देश अन् धर्माचे रक्षण करण्यास्तव या सोळा हजार तेजस्वी अग्निशलाका आगीत जळून भस्म झाल्या..तसे चित्तोडगडाने यानंतरही दोन मोठे जोहार अनुभवले, पण हा जोहार युगानुयुगे या देशाला प्रेरणा देणारा ठरला.


लढाई संपल्यावर सुमारे ३०,००० निष्पाप नागरिकांची अल्लाउद्दीनने कत्तल केली, असे त्याच्याच दरबारातील लेखक अमिर खुस्रोने लिहून ठेवले आहे.


ता घटनेवरचा महाराणी पद्मिनी हा हिंदी चित्रपट इ.स. १९६४ मध्ये आला होता. त्यानंतर संजय लीला भन्साळीचा पद्मावत नावाचा हिंदी सिनेमा २०१८ साली 'पद्मावती' चित्रपटगृहांत लागला.


         🙏 *जयहिंद* 🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌸🦢🛕🦢🌸🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *त्रियोदशी*,उ.षा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, २० आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"यह एक अकाट्य एवं शास्वत सत्य है और साथ ही हमारा परम् विश्वास है कि हिंदुत्व विचार से विश्व में सुख-शान्ति सम्भव है। हमारे घोष वाक्य हमारे विश्वास को व्यक्त करते हैं -*


*"सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः, वसुदैव कुटुम्बकम्, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, कृण्वन्तो विश्वमार्यम्। सर्वभूत हिते रताः, आत्मवतः सर्व भूतेषु, सत्यमेव जयते आदि....ये सब हिंदुत्व दर्शन है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

विमान संशोधन राईट बंधु यांचा जन्मदिवस

 *************************************

🛬🛫🛬🛫🛬🛫🛬🛫🛬🛫🛬

*१९ ऑगस्ट - विमान संशोधक राईट बंन्धू मे से एक ऑर्विल राईट का जन्मदिन*

*************************************

✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️

*विल्बर राईट* 

जन्म -) १६ एप्रिल १८६७


मृत्यू -) ३० मे १९१२

🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️

*ऑर्विल राईट* 


  *जन्म -) १९ आॕगस्ट १८७१*


  मृत्यू -) ३० जानेवारी १९४८


ऑर्विल राईट और विल्बर राईट को राईट बंधू कहा जाता है जो सयुंक्त राज्य अमेरिका के रहने वाले थे। इन्हें हवाई जहाज का अविष्कारक कहा जाता है। राईट बंधुओ ने १७ दिसम्बर १९०३ को हवा में भारी विमान को कुछ समय तक उड़ाकर इतिहास रचा दिया।


विल्बर राईट का जन्म १६ अप्रैल १८६७ और ऑर्विल राईट का १९ अगस्त १८७१ को डॉयटन मे हुआ।


इनके पिता बिशप मिल्टन राईट इनके लिए तरह तरह के खिलौने लाते थे। एक बार वे मशीनी हेलीकाप्टर लेकर आये, जिसे देखकर राईट बन्धु बहुत प्रभावित हुए। कुछ समय ऑर्विल ने पतंग बनाने का काम किया और उडन मशीन बनाने के बारे में सोचने लगे। उन्होंने अपना एक अख़बार निकाला और इसी दौरान ऑर्विल ने अपनी डिजाईन की एक प्रिंटिंग प्रेस बना डाली।


सन १८९२ में अमेरिका में साइकिल बहुत लोकप्रिय थी। राईट बन्धु स्वयं अच्छे चालक और मैकेनिक भि थे। उन्होंने साइकिल के धंधे में हाथ आजमाने की सोची और आर्डर पर खुद साइकिल बनाकर बेचने लगे। उनकी साइकिल ब्रैंड 'वैन क्लीव', 'राईट स्पेशल' और 'सेंट क्लेयर' नाम से खूब बिकी और सपने साकार करने के लिए उन्होंने पर्याप्त धन इकठ्ठा कर लिया।


इसके बाद वे पक्षी उड़ान, ग्लाइडिंग इत्यादि पर अध्ययन करने लगे। उन्होंने हवाई जहाज के कई डिजाईन भी बनाये। १७ दिसम्बर १९०३ को ऑर्विल ठीक १० बजकर ३५ मिनट पर सुबह अपने बनाये वायुयान में सवार हुए। उन्होंने १२ सैकंड तक उसे उड़ाया और १२० फीट की दूरी तय की। उसी दिन चौथी टेस्ट लाइट में विल्बर ५९ सैकंड तक हवा में रहे और उन्होंने ८५२ फीट की दूरी तय की।


राईट बंधुओ ने अपने प्रयोग जारी रखे और राईट कम्पनी की स्थापना की। ३० मई १९१२ को विल्बर की मृत्यु हो गई। अपनी विरासत को आगे बढाते हुए ऑर्विल ने उड़ान व्यवसाय लगा दिए। १९१६ में उन्होंने अपनी राईट कम्पनी बेच दी और स्वयं को वायुयान से जुड़े अविष्कारों में लगा दिया, जिनसे उन्हें पहचान मिली थी। उन्होंने एक एयरोनाटिक लैब भी स्थापित की। ऑर्विल राईट National Advisory Committee for aeronautics के संस्थापक सदस्य थे। उन्होंने २८ साल तक वहा नौकरी की। सन १९५८ में NACA का नाम बदलकर NASA (National Aeronautics and Space Agency) कर दिया गया।


वैज्ञानिकी के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य के लिए ऑरविल को अनेक पुरुस्कार मिले। प्रथम डेनिएल गुगेनहेम मेडल उन्हें ०८ अप्रैल १९३० को दिया गया। राईट बंधुओ को वैज्ञानिक जगत सदा उनका आभारी रहेगा। वे डॉयटन, ओहियो के जिस घर में रहे उसका डिजाईन भी दोनों भाइयो ने मिलकर तैयार किया था, लेकिन दुर्भाग्य से उसके पूरा होने से पहले ही विल्बर की मृत्यु हो गयी। इसी घर में ३० जनवरी १९४८ को ऑर्विल राईट ने अंतिम सांस ली।

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

**********************

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           *डाॕ. शंकर दयाळ शर्मा*


      (भारताचे नववे राष्ट्रपती)

            *कार्य काल*

२५ जुलै १९९२–२५ जुलै १९९७


पूर्ववर्ती : रामस्वामी वेंकटरमण

उत्तरावर्ती : कोच्चेरी रामण 

                  नारायणन


*जन्म :-)  १९ आॕगष्ट १९१८*

        (भोपाल, मध्यप्रदेश, भारत)


*मृत्यु :-)  २६ दिसंबर १९९९*

           (नई दिल्ली, भारत)


राजनितिक पार्टी : भारतीय राष्ट्रीय कांग्रेस

वडिल : खुशीलाल शर्मा

आई : सुभद्रा शर्मा

पत्नी : विमला शर्मा

धर्म : हिन्दू


डाॕ. शंकर दयाळ शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ३ एप्रिल १९८६ रोजी पदग्रहण केले. डॉ.शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म दि. १९ ऑगस्ट १९१८ रोजी भोपाळ येथे श्री. खुशीलाल शर्मा आणि श्रीमती सुभद्रा शर्मा यांच्या पोटी झाला.दि. ०७ मे १९५० रोजी श्रीमती विमला शर्मा (विमलाजी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले व दोन मुली अशी अपत्य प्राप्ती झाली. एका मुलीचा १९८५ मध्ये मृत्यू झाला.

          डॉ.शंकर दयाळ शर्मा यांनी सेंट जॉर्ज कॉलेज, आग्रा, अलाहाबाद विद्यापीठ, लखनऊ विद्यापीठ, फिट्झविल्यम कॉलेज, केंब्रिज विद्यापीठ, हार्वर्ड लॉ स्कूल, झ्यूरीच विद्यापीठ, पॅरिस विद्यापीठ, लंडन विद्यापीठ आणि लिंकन इन ( कायदा विद्यालय ) येथे शिक्षण घेतले.

           त्यांनी इंग्रजी वाङमय, हिंदी आणि संस्कृत या विषयांमध्ये एम.ए. ची पदवी घेतली आणि विद्यापीठातून पहिले आले. त्यांनी आपली एल.एल.एम. ची पदवी लखनऊ विद्यापीठातून मिळविली आणि पुन्हा एकदा विद्यापीठातून पहिले आले. त्यांनी पी.एच.डी. केंब्रिज विद्यापीठातून केली आणि लंडन विद्यापीठाकडून त्यांना   "लोकप्रशासनातील पदविकेद्वारे सन्मानित करण्यात आले. डॉ.शर्मा यांनी नऊ वर्षे लखनऊ विद्यापीठात आणि नंतर केंब्रिज विद्यापीठात ( १९४६ ते १९४७) कायदा हा विषय शिकवला लिंकन इन मधून (कायदा विद्यालयातून) त्यांनी बार-अक्ट-लॉ (बॅरिस्टरची पदवी घेतली) नंतर ते हार्वर्ड लॉ स्कूलचे ( १९४७ -१९४८) सन्मान्य सदस्य बनले.

                       डॉ.शर्मा यांना सामाजिक सेवेसाठी लखनऊ विद्यापीठाने `चक्रवर्ती सुवर्ण पदक` देऊन सन्मानित केले होते. विक्रम विद्यापीठ आणि भोपाळ विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांनी त्यांना एल.एल.डी (सन्मान्य कारणाने) ही पदवी प्रदान केली. ते सागर विद्यापीठाचे प्रतिकुलपती  (१९५६-५९) देखील होते.


💎 *विशेष आवडीची क्षेत्रे*


          परराष्ट्र व्यवहार; ग्रामीण विकास; विधि; तत्त्वज्ञान, धर्म व शिक्षण यांचा तौलनिक अभ्यास. 


🏊🏻 *क्रीडा*


                    डॉ.शर्मा त्यांच्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय कारकीर्दी दरम्यान, त्यांनी व्यायामाचे खेळ, नौकानयन आणि पोहणे या क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करून, क्रीडापटू म्हणून विशेष प्राविण्यही प्राप्त केले.


🎸 *आवडता विरंगुळा व मनोरंजन*

                राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हितसंबंधांवरील विविध विषयांवर वाचन करणे आणि लिहिणे आणि भाषा, इतिहास, कला व संस्कृती, तौलनिक, धर्म, तत्त्वज्ञान, काव्य, वाङमय आणि भारतीय शास्त्रीय संगीत व पाश्चिमात्य संगीत यांचा अभ्यास.


*कारकीर्द*


          डॉ.शर्मा यांनी १९४० मध्ये लखनऊ येथे आपल्या वकिलीच्या व्यवसायास सुरूवात केली. मुरब्बी स्वातंत्र्य सैनिक असलेल्या डॉ.शर्मा यांनी स्वातंत्र्य संग्राम, भोपाळ मधील विलिनीकरण चळवळ आणि त्यानंतर १९७८ मध्ये कारावास भोगला. ते भूतपूर्व भोपाळ राज्याचे मुख्यमंत्री (एप्रिल १९५२ ते नोव्हेंबर १९५६) होते. मध्य प्रदेश सरकार मध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून त्यांनी शिक्षण, विधि, सार्वजनिक बांधकाम, उद्योग आणि वाणिज्य, राष्ट्रीय संसाधने आणि स्वतंत्र महसूल या विभागांचा कार्यभार सांभाळला (१९५०-१९६७) आणि त्यानंतर ते केंद्रीय दूरसंचार मंत्री (१० ऑक्टोबर १९७४ ते २४ मार्च १९७७) होते. ते, आंध्र प्रदेशाचे (२९ ऑगस्ट १९८४ ते २५ डिसेंबर १९८५) आणि पंजाबचे राज्यपाल (२६ नोव्हेंबर १९८५ ते २ एप्रिल १९८६) होते.


💁‍♂ *सार्वजनिक आयुष्य*


             डॉ.शर्मा, भोपाळ काँग्रेस समितीचे (१९५०-१९५२) अध्यक्ष; ३२ वर्षांपेक्षा जास्त काळ अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य (१९५२-१९८४); मध्य प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष (१९६७-१९६८); जवळपास २० वर्षे काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य; भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस (१९६८-१९७२) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष (१९७२-१९७४) होते. कायदेमंडळाचा सभासद आणि संसदपटू म्हणून त्यांना ३० वर्षांहून अधिक काळ एवढा प्रदीर्घ अनुभव आहे. ते राज्य विधानमंडळाचे सदस्य (१९५२-१९७१)होते आणि त्यानंतर संसदेचे सदस्य (पाचवी लोकसभा : १९७१-१९७७ आणि सातवी लोकसभा: जानेवारी १९८० ते ऑगस्ट १९८४) होते.


*वाङमयीन आणि पत्रकारीय कर्तृत्वावर दृष्टिक्षेप*


*(अ) प्रकाशने*

१.  परराष्ट्र व्यवहारांकडे बघण्याचा  

        काँग्रेसचा दृष्टिकोन

२.  क्रांती दृष्ट

३.  इंडो - रशियन संबंध 

४.  कायद्याचे राज्य आणि 

       पोलिसांची भूमिका


*(ब) संपादकीय कामगिरी*

१. लखनऊ विधि पत्रिका 

                 (१९४१-१९४३)

२. लाईट अन्ड लर्निंग  

                  (१९४२-१९४३)

३.  ईल्म - ओ - नूर (ऊर्दू)

४.  ज्योति (हिंदी)

५.  समाजवादी भारत  

                    (१९७१-१९७४)


*(क) लेख*

                  त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये मोठ्या प्रमाणावर लेख लिहिले आहेत.


*(ङ) भाषणे*

मद्रास विद्यापीठासह इतर अनेक विद्यापीठांत त्यांनी दीक्षांत भाषणे केली आहेत, तसेच राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैद्राबाद येथे दुसरे सरदार पटेल स्मृती वार्षिक व्याख्यान दिले आहे.


 ✈  *विदेश प्रवास*

ते जगभरात खूप फिरले आहेत आणि अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यात पुढील देशांचा समावेश आहे - अफगाणिस्तान, ऑस्ट्रीया, बांग्लादेश, बेल्जियम, बल्गेरिया, कॅनडा, चीन, डेन्मार्क, इजिप्त, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी, फिनलँड,फान्स,ग्रीस,हाँगकाँग, हॉलंड,हंगेरी,इराक,इटली, जपान,केनिया,कोरीआ,कुवेत, लक्झेंबर्ग,मलेशिया,मॉरिशस, नॉर्वे, पाकिस्तान,सिंगापूर, दक्षिण येमेन,स्वीडन,स्विझर्लंड,थायलंड, इंग्लंड,अमेरिका,रशिया.


*कायमचा पत्ता*

ई २/६६, अरेरा कॉलनी, भोपाळ, मध्य प्रदेश.


*स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन* 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *द्वादशी*,पू.षा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, १९ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                      *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


दानं भोगो नाश: तिस्त्रो 

             गतयो भवन्ति वित्तस्य।

यो न ददाति न भुङ्क्ते 

             तस्य तॄतीया गतिर्भवति॥


भावार्थः - *"धन की तीन गति बताई गई हैं. .. दान, उपभोग तथा नाश... जो व्यक्ति दान नहीं करता एवं न ही स्वयं उसका उपभोग करता है, उसका धन नष्ट हो ही जाता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

ध्यान साधना

 *कशी येते मॅच्युरिटी ?*


*"परिपक्व व्यक्तिमत्व"*


*१) माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*२) माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*३) माणूस त्याच्या समोरचे लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*४) प्रत्येक माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा असा विशिष्ट दृष्टिकोन असतो हे समजायला लागते तेव्हा माणसाकडे मॅच्युरिटी येते.*


*५) प्रत्येकवेळी आपणच शहाणे असल्याचा आविर्भाव आणणे माणूस जेव्हा बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*६) माणूस काळानुसार बदल स्विकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*७) माणूस आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानून तक्रारी करणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*८) माणूस जेव्हा जबाबदाऱ्या घ्यायला आणि चुकांमधून पुढे जायला शिकतो, तसेच आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*९) माणूस इतरांवर जळण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*१०) माणूस इतरांची स्वतःसोबत तुलना बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*११) माणूस रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारीने वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*१२) माणूस निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे राहायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारीने निर्णय घेणे*


*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा  आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.

संकलन,,,,,गजानन गोपेवाड *


मीठा जहर म्हणजे काय?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *'मीठा जहर' म्हणजे काय ?* 📕 


गोड बोलून विश्वासघात करणे, म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. अशीच एक वनस्पती आहे. जिचे मूळ गोड लागते, पण खाल्ल्यास प्राणावर बेतते. या विषाला त्यामुळेच 'मीठा जहर' असे म्हणतात. अॅकोनिटम नॅपेल्स नावाचे हे झाड हिमालयाच्या प्रदेशात आढळून येते. तसे या झाडाचे सर्वच भाग विषारी असतात; परंतु मूळ जास्त विषारी असते. मुळात अॅकोनिटीन हा अत्यंत विषारी असा घटक असतो. हे एक शोभेचे झाड आहे.


पानात वा इतर पदार्थात मिसळून हे विष खायला देतात. यामुळे ओठ, घसा, जीभ बधिर होणे, लाळ सुटणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, खूप घाम येणे, चक्कर येणे, दृष्टी व वाचा यावर दुष्परिणाम होणे, हातापायातील त्राण जाणे इत्यादी लक्षणे दिसू येतात. अखेर हृदयाच्या स्नायूवर परिणाम होऊन किंवा श्वसन थांबून मृत्यू होतो. १ ग्रॅम वजनाइतके मूळ वा २५० मि.ग्रॅ. इतके अॅकोनाईट खाल्ल्यास सुमारे सहा तासात मृत्यू होतो.


वन्य प्राण्यांना मारण्यासाठी बाणाला लावायच्या विषात याचा उपयोग केला जातो. तसेच खून करण्यासाठी गुन्हेगार याचा वापर करतात. स्वस्त व सहजगत्या उपलब्ध असल्याने विषप्रयोगासाठी याचा जास्त वापर केलाजातो.


पोटात गेलेले विष टॅनिक अॅसिडचे द्रावण प्यायला देऊन वा पोटॅशियम परमॅगनेटचे द्रावण प्यायला देऊन पोटाच्या बाहेर काढतात. हृदय व श्वसनसंस्था यांचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी उपचार करावे लागतात. कृत्रिम श्वसन यंत्र व प्राणवायूचा पुरवठा यांचाही उपयोग करतात. असे आहे हे 'मीठा जहर'; चवीला गोड, पण भयंकर.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

18 आँ श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती

 *श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

______________🌹_______________

*जन्म   :  इ.स. १८ ऑगस्ट १७००*    

 *मृत्यू   :  इ.स. २८ एप्रिल १७४०*


         बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा. तर चिमाजी आप्पा धाकटा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. मात्र, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते. वयाच्या तेराव्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). बाजीरावांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला.समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला.आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या.  त्यात 

माळवा (डिसेंबर १७२३),

धर (१७२४), 

औरंगाबाद (१७२४), 

पालखेड (फेब्रुवारी १७२८),

अहमदाबाद (१७३१) 

उदयपुर (१७३६), 

फिरोजाबाद (१७३७),

दिल्ली (१७३७), 

भोपाळ (१७३८), 

वसईची लढाई (मे १७३९) या  मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले.


             बाजीरावांना हरवणं त्याच्या काळातल्या शत्रूंनाही जमलं नाही.  मराठेशाहीला नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती. चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच.  दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. भीमथडीची तट्टे नर्मदेपार नेल्यामुळे उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत येण्याचे बंद झाले.  बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले. भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले. त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली.


             बाजीरावांची देशभर मोठी दहशत होती. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला.  पराक्रमासाठी आणि विजयासाठी ‘बाजी’ हा शब्दप्रयोग तेव्हापासून रुढ झाला असावा.   बाजीरावाने शनिवारवाडा बांधला आणि साताºयाच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले.


*॥ श्रीशाहूनरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ मुख्यप्रधान॥*


अशी बाजीरावांची मुद्रा होती.


            *कुशल सेनापती*


         बाजीरावाच्या युद्धकौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही. पण अमेरिकन लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहे. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावाने निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची  १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावाने निजामाला पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं याचा ‘स्ट्रॅटेजिक वॉरफेअर’च्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं. बाजीराव शत्रूला स्वत:च्या स्थळी आणून मात देत असे. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर वाट पाहून कसलेल्या शिकाºयाप्रमाणे हमला करायचा. कदाचित पुढील काळात या युद्धतंत्राचा विसर पडल्यामुळे ‘पानिपता’सारखा प्रसंग ओढावला.  बाजीराव हे मोठे युद्धनीतीज्ञ होते.  म्हणूनच ते अजेय राहिले. त्यांच्या कारकीर्दीतली एकही लढाई ते हरले नाही. म्हणून त्यांची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते. युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला आपल्या सोयीच्या व मोक्याच्या ठिकाणी आणून हरविणे, त्यासाठी दबा धरून बसणे, सक्षम गुप्तचर यंत्रणा वापरणे आदी तंत्र छत्रपती शिवाजीमहाराजांसारखेच वापरले असल्याचे दिसून येते. बाजीराव पराक्रमात शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा होता की नाही याबाबत नक्कीच वाद नाही. शिवाजीमहाराजांच्या युद्धतंत्राचा ठसा बाजीरावांवर नक्कीच पडलेला होता.


             घोडदळ ही बाजीरावांची सर्वात मोठी ताकद होती. बाजीरावाने पायदळ आणि तोफखाना बाळगणेच सोडले होते. त्या काळाच्या लढाईचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सशक्त घोडदळ. बाजीराव घोड्यावर लहानाचा मोठा झाला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.  सहा फुट उंची असलेले बाजीराव हे उत्तम सेनापती होते.  बुद्धी आणि शक्तीचा अद्वितीय संगम म्हणजे बाजीराव. घोड्यावरच्या बांधलेल्या  पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खात खात दौड करीत, सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही. त्यांच्याबरोबर जेवण करत असे. त्याच्या फौजा ७५ किलोमीटर प्रतीदिन या वेगाने जायच्या. घोड्यावर मोजकीच शिधा व शस्त्र असल्याने मराठा सैन्याची गतिमानता जास्त होती. सैन्याचा अंतर कापण्यासाठीचा हा वेग त्या काळातला सर्वोत्तम वेग होता.  त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत असत. शत्रूला सुगावा लागायच्या आतच हल्ला झालेला असायचा. बाजीरावांची गुप्तचर यंत्रणा ही त्याची दुसरी मोठी बाजू. शत्रुच्या हालचालींबाबतची क्षणाक्षणांची माहिती त्यांना मिळायची. मार्गात येणाºया नद्या, नद्यांचे चढ, उतार, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती असायची.


*रावेरखेडी :*


            *२८ एप्रिल १७४० ला (वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२) मध्य प्रदेशातील नर्मदेकिनारी असलेल्या रावेरखेडी येथे ज्वर आल्याने बाजीरावांचे निधन झाले.*  बाजीरावांना केवळ ४० वर्षांचे आयुष्य मिळाल. तिथे पुढे नर्मदातटावर नानासाहेबांनी ग्वाल्हेर संस्थानच्या देखरेखीखाली बाजीरावांची समाधी बांधली. उत्तरेत जाण्यासाठी नर्मदा नदी ओलांडावी लागे.  हे मोठे सैनिकी ठिकाण होते. नर्मदेच्या तटाजवळ असलेली ही समाधी महेश्वर धरण प्रकल्पामुळे पाण्याखाली जाणार असल्याचे मध्यंतरी वाचण्यात आले. रावेरखेडी हे बुडित क्षेत्रात येत असून समाधीसह इतर अनेक भाग पाण्याखाली जाणार आहे.  महाराष्ट्रापासून एवढ्या लांब ठिकाणी त्याकाळात घोडेस्वारी करत बाजीराव कसे गेले असतील याचं आश्चर्य वाटते. घोडेस्वारीचं त्याचं कौशल्य अफाट असावं.


आपल्या घरातील व जातीपंथातील लोकांशी मानसिक युद्ध खेळून हरलेला? तरीही जिंकलेला हा ‘राऊ’ रावेरखेडीस चिरविश्रांती घेत खरा यौद्धाच ठरला. बाजीराव पेशव्यांचा हा इतिहास दैदिप्यमान आणि गौरवशाली आहे. हा इतिहास आपण दुर्लक्षित केला नाही तर चिरंतन टिकणारा आहे.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज स्मृतिदिन

 *नेताजी सुभाषचंद्र बोस*

     *जन्म : २३ जानेवारी १८९७*

        (कटक,ओडिशा,भारत)


*अपघाती निधन :१८ ऑगस्ट १९४५*

                         (वय ४८)

                     ( तैहोको, तैवान)


टोपणनाव : नेताजी

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना :

              अखिल भारतीय काँग्रेस 

              फॉरवर्ड ब्लॉक 

              आझाद हिंद फौज


प्रमुख स्मारके : पोर्ट ब्लेर येथील 

                       स्मारक

धर्म : हिंदू

पत्नी : एमिली शेंकल

अपत्ये : अनिता बोस फफ

आवाहन : तुम मुझे खून दो,

               मै तुम्हे आझादी दूँगा !


                   हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला *जय हिन्द* चा नारा हा आज *भारताचा राष्ट्रीय नारा* बनला आहे.

              १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.

             नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखील असेच मानत होते.


👨‍👩‍👧 *जन्म व कौटुंबिक जीवन*


               सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.

             जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.

          प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.

       प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे नववे अपत्य व पाचवे पुत्र होते.

            आपल्या सर्व भावांपैकी सुभाषना शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.


🎓 *शिक्षण व विद्यार्थी जीवन*


लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.

                वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.

             महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.

               १९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.


🇮🇳 *स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य*

          १९३९च्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनासाठी उपस्थित बोस.छायाचित्र:टोनी मित्रा

कोलकात्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची, दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

           रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे जुलै २०, १९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.

               गांधींजीनी देखिल कोलकत्याला जाऊन दास बाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्त्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.

            १९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.

              लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.

               १९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.

            जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.


🏛 *कारावास*

आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.

         १९२५ साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी, कोलकात्त्याचे पोलिस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्‍नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.

                  नोव्हेंबर ५, १९२५ च्या दिवशी, देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली.

                 मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासले. परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे. पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले.

          १९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले.

              १९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.


🗽  *युरोपातील वास्तव्य*


१९३३ पासून १९३६ पर्यंत सुभाषबाबूंचे युरोप मध्ये वास्तव्य होते.

          युरोप मधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच, आपले कार्यही सुरूच ठेवले. त्यांनी इटली चे नेते मुसोलिनी ह्यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांना, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. आयर्लंड चे नेते डी व्हॅलेरा सुभाषबाबूंचे चांगले मित्र बनले.

                सुभाषबाबू युरोप मध्ये असताना, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्‍नी कमला नेहरू ह्यांचे ऑस्ट्रियामध्ये निधन झाले. सुभाषबाबूंनी तिथे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे सांत्वन केले.

              पुढे सुभाषबाबू युरोप मध्ये विठ्ठलभाई पटेल ह्यांना भेटले. विठ्ठलभाई पटेल ह्यांच्यासह सुभाषबाबूंनी पटेल-बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली. त्यानंतर विठ्ठलभाई पटेल आजारी पडले, तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांची खूप सेवा केली. पण विठ्ठलभाई पटेलांचे निधन झाले.

               विठ्ठलभाई पटेलांनी आपले मृत्युपत्र बनवून आपली करोडोंची संपत्ती सुभाषबाबूंच्या नावे केली. पण त्यांच्या निधनानंतर, त्यांचे बंधू सरदार वल्लभभाई पटेलांनी हे मृत्युपत्र स्वीकारले नाही व त्यावर न्यायालयात खटला चालवला. हा खटला जिंकून, सरदार वल्लभभाई पटेलांनी ती सर्व संपत्ती, गांधीजींच्या हरिजन सेवा कार्याला भेट म्हणून देऊन टाकली.

         १९३४ साली सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्युशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने कराची मार्गे कोलकात्त्याला परतले. कराचीला पोचल्यावरच त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कोलकात्त्याला पोचताच, इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरूंगात ठेवून, पुन्हा युरोपला धाडले.


📿 *हरीपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद*


१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले. ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत ५१ बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले.

                   ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल.

             आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली.

           १९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी जनतेला साहाय्य करण्यासाठी, डॉ द्वारकानाथ कोटणीस ह्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जपानची मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले. पण वरील घटनेवरून हे सिद्ध होते की सुभाषबाबू न जपानचे हस्तक होते, न ही फॅसिस्ट विचारसरणीशी सहमत होते.


🥊 *काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा*

          १९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते.

             १९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण गांधीजी आता ते नको होते. गांधीजीनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या ह्यांची निवड केली. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली.

          सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली.

      पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. पट्टाभि सितारामैय्यांची हार ही आपली स्वतःची हार मानून, गांधीजींनी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले.

          १९३९ सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन त्रिपुरी येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले. गांधीजी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही.

                 अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्‍न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.


🎓 *फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना*


मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.

                  दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.


🏃🏽 *नजरकैदेतून पलायन*


नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.

              काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओर्लांदो मात्सुता नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले.


👬 *नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट*


बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.

             अखेर मार्च २९, १९४२ रोजी, सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.

           काही वर्षांपूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना माइन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी भारत व भारतीयांविषयी अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले.

               शेवटी, सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे मार्च ८, १९४३ रोजी, जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत, जपानी पाणबुडी गाठली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली, नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल. ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली.


💎 *पूर्व आशियातील वास्तव्य*


पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.

             नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले.

              ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले.

              आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली.

             पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा असा नारा दिला.

               द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.

            आझाद हिंद फौज माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.

          जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.


⌛ *बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी*


दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.

            ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.

            ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

               अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.

               स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.

                  १९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

             ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.

        सुभाषचंद्र बोसांशी संबंधित शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या.२०१५ सालच्या शेवटी त्यांतल्या बर्‍याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या आहेत.


🏅 *भारतरत्‍न पुरस्कार*


१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे.


*सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्या बद्दल महत्वाचे मुद्दे*


सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला.

सुभाषबाबू १९२० मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.

सुभाषबाबू १९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

नेताजींनी १९४० मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.

डिसेंबर १९४० मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.

जानेवारी १९४१ मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.

नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.

नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.

सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.

आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.

सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.

आझाद हिंद सेनेने १८ मार्च १९४४ रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.

१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.


📕 *चरित्रे*


अनेक लेखकांनी मराठीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांतली काही चरित्रे ही :-


गरुडझेप (कादंबरी, वि.स. वाळिंबे)

जयहिंद आझाद हिंद (कादंबरी, वि.स. वाळिंबे)

नेताजी (वि.स. वाळिंबे)

नेताजी सुभाष (मूळ इंग्रजी Subhash - a Polytical Biography, लेखक : सीतांशू दास; मराठी अनुवाद : श्रीराम ग. पचिंद्रे)

नेताजींचे सीमोल्लंघन (एस.एम. जोशी)

नेताजी सुभाषचंद्र बोस (रमेश मुधोळकर)

No Secrets (अनुज धर)

महानायक (कादंबरी, लेखक : विश्वास पाटील)


📚 *नेताजींवरील अन्य पुस्तके*


नेताजींची सुवचने आणि संदेश (य.ना. वालावलकर)

नेहरू व बोस (मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी; मराठी अनुवाद - अवधूत डोंगरे)

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳


*स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन* 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संकलन) ::गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा-) यवतमाळ ४४५२०६