मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

सयाजीराव गायकवाड

*🌹||||| लोकशाहीतही हवाहवासा वाटणारा राजा म्हणजे महाराजा सर सयाजीराव गायकवाड महाराज |||||🌹*

      महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्यात सुधारणा करताना हिंदुस्थानाबरोबरच जगभरातील लोकांच्या जीवनात बदल होण्यासाठी कार्य केले. अनेक जागतिक प्रश्नावर स्वतःच्या चिंतनाने भाष्य केले आणि त्यासाठी समर्पक पर्याय सुचविले. जागतिक पातळीवरील आपत्तीत सहाय्य केले. विचारवंत राजा सयाजीराव गायकवाड महाराजांना जागतिक मानववंश परिषद, ऑक्सफर्डचे अध्यक्षपद, दुस-या जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्ष पद, अमेरिकन सरकारने दिलेला गार्ड ऑफ ऑनर, वेगवेगळ्या देशांत सन्मानपुर्वक मानपत्रे, पहिल्या जागतिक शांतता परिषदेचे अध्यक्ष, पतितपावन पदवी, जागतिक लायब्ररी संघटनेने केलेला सन्मान, लंडन लायब्ररीचे उपाध्यक्ष, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद, अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषद आणि अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान अशा प्रकारचे जागतिक पातळीवरील अनेक सन्मान प्राप्त झाले.
      सयाजीराव महाराजांच्या जागतिक पातळीवरील कार्यामुळे वेगवेगळ्या देशांतील महनीय व्यक्तींनी त्यांच्यावर लेख लिहिले. यामधील काही लेखकांनी *एक राजा म्हणून नव्हे; तर एक माणूस म्हणून महानता स्पष्ट केलेली आहे.*
      अशा या आदर्श राजाचे दि. ०६ फेब्रुवारी १९३९ रोजी मुंबई येथे निधन झाले.

*हिज हायनेस सर सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: