मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

शिका शिकवा गजानन गोपेवाड

शिका-शिकवा. ऐकमेकांना प्रेरणा द्या : गजानन गोपेवाड

 यवतमाळ : दिनांक 22 जाने. रोजी जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आमचे गुरूजनवर्ग सज्ज प्रत्येक मुलांमध्ये नैसर्गिक गुणवत्ता हि वेगवेगळी असते. त्या सोबत प्रत्येक मुलांना नैसर्गिक कौशल्य जन्मजात असते. मुल परिसर, परिवारातुन सर्व प्रथम भाषा विकसित करून बाहेर पडते. शाळेत विद्यार्थ्यांना या देशाचे, जगाचे भविष्यातील सुजाण नागरिक घडविण्याचे काम आमचे गुरूजी करत आहे. अशा ज्ञानार्जन विकसित झालेल्या विद्यार्थ्यांना आपले जग स्विकरते. आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देणे आता काळाची गरज आहे. सोबतच जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडविणे हे सुद्धा काळाची गरज आहे. शिक्षण क्षेत्रातील ईयत्ता निहाय क्षमता त्या त्या विषयातील पण विकसित होणे गरजेचे आहे. आणि या क्षमता विकसित करतांना बहुतांश गुरूजींच्या कौशल्ये पणाला लागतात. घटकानुरूप शैक्षणिक साहित्य आहे त्या परिस्थितीत मिळेल ते साहित्य वापरून शैक्षणिक साहित्य जर अध्यापनात वापरून शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांना चिरकाल स्मरणात राहील. कारण शैक्षणिक साहित्य कसे बनवले. शैक्षणिक साहित्य बनवताना कुठल्या अडचणी आल्या. आलेल्या अडचणी विद्यार्थी कसे हाताळून शैक्षणिक साहित्य निर्माण केले. या स्वअनुभूतीतून विद्यार्थी शिकत असतो मुले स्वंयप्रेरणेतुन शिकत असतो. गुरूजी फक्त मार्गदर्शन करतो.सुलभक बनून राहतो. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचे सन्मान कसा करावा. सेल्फी विथ सक्सेस मधून विद्यार्थ्यांना कशी प्रेरणा देता येईल. वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंचा, शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक क्षमता विकसित करणे शक्य आहे. या साठी सुध्दा दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्माण करून जर आपण अध्यापन केले तर आपले अध्यापन दर्जेदार होईल. व विद्यार्थी चिरकाल स्मरणात राहील. हा आशावाद करायला काही हरकत नाही. आज वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळी समस्या आहे. पण समस्या जरी असेल तरीही आपण या समस्येवर तोडगा काढु शकतो. एक सुसज्ज शैक्षणिक संग्रहालय आपण आपल्या शाळेत ऊभे करू शकतो. ईथे आवशयक त्या ठिकाणी, समाज सहभागातून, लोकवर्गणीतून, ईतर दान दात्याकडून आपण आपल्या शाळेत शैक्षणिक संग्रहालय निर्माण करून विद्यार्थ्यांना या शैक्षणिक संग्रहालयात मुक्त संचार करू दिला पाहिजे. त्याच सोबत वाचणाची गोडी लागावी म्हणून शाळेत विविध प्रकारची पुस्तके पण आपण एक बालवाचनालय निर्माण करून ऊपलब्ध करून दिले तर विद्यार्थी वाचनाची गोडी निर्माण करायला काही वेळ लागणार नाही. यात गुरूजी फक्त योग्य वेळी योग्य तिथे मार्गदर्शन करावे. आज आपण पाहतो हे जग स्पर्धेचे आहे, आपला विद्यार्थी पण या जागतिक स्पर्धेत टिकला पाहिजे हि आपली पण जबाबदारी आहे. सोबत पालकांची पण तेवढिच जबाबदारी आहे. विद्यार्थी स्वंयप्रेरणेतुन शिकताना विद्यार्थ्यांना कडे लक्ष देणे गरजेचे आहे. असाच एक कार्यक्रम ऊमरखेड पंचायत समितीचे मा. सतिश दर्शनवाड गटशिक्षणाधिकारी यांनी ऊमरखेड पंचायत समिती मधील शाळेत राबविले. वाचन, लेख कार्यक्रम सुरू केले. त्या कार्यक्रमास गुणवत्तेचा पँटर्न म्हणून बरेच वरिष्ठ अधिकारी यांनी दखल पण घेतली. यात नक्कीच उपक्रमशील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा सहभाग तितकेच महत्त्वाचे आहे. त्याची फलनिष्पत्ती आज आपण सर्व बघत आहे. इथे फक्त ईच्छा शक्ती पाहिजे. अग्निपंख शैक्षणिक समुह पण असेच  विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरित करत असतो. आपणास एक आव्हान या निमित्ताने आपण आपल्या शाळेत नवनवीन शैक्षणिक साहित्य, व्हिडीओ निर्मिती, शैक्षणिक साहित्य विध्यार्थाना उपलब्ध करून दिले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: