मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

विज्ञान केंद्र दिंडाळा गजानन गोपेवाड

गजानन गोपेवाड

सयाजीराव गायकवाड

*🌹||||| लोकशाहीतही हवाहवासा वाटणारा राजा म्हणजे महाराजा सर सयाजीराव गायकवाड महाराज |||||🌹*

      महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्यात सुधारणा करताना हिंदुस्थानाबरोबरच जगभरातील लोकांच्या जीवनात बदल होण्यासाठी कार्य केले. अनेक जागतिक प्रश्नावर स्वतःच्या चिंतनाने भाष्य केले आणि त्यासाठी समर्पक पर्याय सुचविले. जागतिक पातळीवरील आपत्तीत सहाय्य केले. विचारवंत राजा सयाजीराव गायकवाड महाराजांना जागतिक मानववंश परिषद, ऑक्सफर्डचे अध्यक्षपद, दुस-या जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्ष पद, अमेरिकन सरकारने दिलेला गार्ड ऑफ ऑनर, वेगवेगळ्या देशांत सन्मानपुर्वक मानपत्रे, पहिल्या जागतिक शांतता परिषदेचे अध्यक्ष, पतितपावन पदवी, जागतिक लायब्ररी संघटनेने केलेला सन्मान, लंडन लायब्ररीचे उपाध्यक्ष, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद, अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषद आणि अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान अशा प्रकारचे जागतिक पातळीवरील अनेक सन्मान प्राप्त झाले.
      सयाजीराव महाराजांच्या जागतिक पातळीवरील कार्यामुळे वेगवेगळ्या देशांतील महनीय व्यक्तींनी त्यांच्यावर लेख लिहिले. यामधील काही लेखकांनी *एक राजा म्हणून नव्हे; तर एक माणूस म्हणून महानता स्पष्ट केलेली आहे.*
      अशा या आदर्श राजाचे दि. ०६ फेब्रुवारी १९३९ रोजी मुंबई येथे निधन झाले.

*हिज हायनेस सर सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.*

शिका शिकवा गजानन गोपेवाड

शिका-शिकवा. ऐकमेकांना प्रेरणा द्या : गजानन गोपेवाड

 यवतमाळ : दिनांक 22 जाने. रोजी जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आमचे गुरूजनवर्ग सज्ज प्रत्येक मुलांमध्ये नैसर्गिक गुणवत्ता हि वेगवेगळी असते. त्या सोबत प्रत्येक मुलांना नैसर्गिक कौशल्य जन्मजात असते. मुल परिसर, परिवारातुन सर्व प्रथम भाषा विकसित करून बाहेर पडते. शाळेत विद्यार्थ्यांना या देशाचे, जगाचे भविष्यातील सुजाण नागरिक घडविण्याचे काम आमचे गुरूजी करत आहे. अशा ज्ञानार्जन विकसित झालेल्या विद्यार्थ्यांना आपले जग स्विकरते. आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देणे आता काळाची गरज आहे. सोबतच जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडविणे हे सुद्धा काळाची गरज आहे. शिक्षण क्षेत्रातील ईयत्ता निहाय क्षमता त्या त्या विषयातील पण विकसित होणे गरजेचे आहे. आणि या क्षमता विकसित करतांना बहुतांश गुरूजींच्या कौशल्ये पणाला लागतात. घटकानुरूप शैक्षणिक साहित्य आहे त्या परिस्थितीत मिळेल ते साहित्य वापरून शैक्षणिक साहित्य जर अध्यापनात वापरून शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांना चिरकाल स्मरणात राहील. कारण शैक्षणिक साहित्य कसे बनवले. शैक्षणिक साहित्य बनवताना कुठल्या अडचणी आल्या. आलेल्या अडचणी विद्यार्थी कसे हाताळून शैक्षणिक साहित्य निर्माण केले. या स्वअनुभूतीतून विद्यार्थी शिकत असतो मुले स्वंयप्रेरणेतुन शिकत असतो. गुरूजी फक्त मार्गदर्शन करतो.सुलभक बनून राहतो. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचे सन्मान कसा करावा. सेल्फी विथ सक्सेस मधून विद्यार्थ्यांना कशी प्रेरणा देता येईल. वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंचा, शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक क्षमता विकसित करणे शक्य आहे. या साठी सुध्दा दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्माण करून जर आपण अध्यापन केले तर आपले अध्यापन दर्जेदार होईल. व विद्यार्थी चिरकाल स्मरणात राहील. हा आशावाद करायला काही हरकत नाही. आज वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळी समस्या आहे. पण समस्या जरी असेल तरीही आपण या समस्येवर तोडगा काढु शकतो. एक सुसज्ज शैक्षणिक संग्रहालय आपण आपल्या शाळेत ऊभे करू शकतो. ईथे आवशयक त्या ठिकाणी, समाज सहभागातून, लोकवर्गणीतून, ईतर दान दात्याकडून आपण आपल्या शाळेत शैक्षणिक संग्रहालय निर्माण करून विद्यार्थ्यांना या शैक्षणिक संग्रहालयात मुक्त संचार करू दिला पाहिजे. त्याच सोबत वाचणाची गोडी लागावी म्हणून शाळेत विविध प्रकारची पुस्तके पण आपण एक बालवाचनालय निर्माण करून ऊपलब्ध करून दिले तर विद्यार्थी वाचनाची गोडी निर्माण करायला काही वेळ लागणार नाही. यात गुरूजी फक्त योग्य वेळी योग्य तिथे मार्गदर्शन करावे. आज आपण पाहतो हे जग स्पर्धेचे आहे, आपला विद्यार्थी पण या जागतिक स्पर्धेत टिकला पाहिजे हि आपली पण जबाबदारी आहे. सोबत पालकांची पण तेवढिच जबाबदारी आहे. विद्यार्थी स्वंयप्रेरणेतुन शिकताना विद्यार्थ्यांना कडे लक्ष देणे गरजेचे आहे. असाच एक कार्यक्रम ऊमरखेड पंचायत समितीचे मा. सतिश दर्शनवाड गटशिक्षणाधिकारी यांनी ऊमरखेड पंचायत समिती मधील शाळेत राबविले. वाचन, लेख कार्यक्रम सुरू केले. त्या कार्यक्रमास गुणवत्तेचा पँटर्न म्हणून बरेच वरिष्ठ अधिकारी यांनी दखल पण घेतली. यात नक्कीच उपक्रमशील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा सहभाग तितकेच महत्त्वाचे आहे. त्याची फलनिष्पत्ती आज आपण सर्व बघत आहे. इथे फक्त ईच्छा शक्ती पाहिजे. अग्निपंख शैक्षणिक समुह पण असेच  विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरित करत असतो. आपणास एक आव्हान या निमित्ताने आपण आपल्या शाळेत नवनवीन शैक्षणिक साहित्य, व्हिडीओ निर्मिती, शैक्षणिक साहित्य विध्यार्थाना उपलब्ध करून दिले पाहिजे.

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

आजचे विज्ञान प्रश्न

💥 *अग्निपंख    शैक्षणिक समुहाचा     उपक्रम💥*
 
        ✍🏻 *विज्ञान प्रश्न 🖋️

१. शेतीचे प्रमुख हंगाम कोणते?

२. सेंद्रिय शेती कशाला म्हणतात?

३. भारताचा सुमारे किती टक्के भूभाग शेतीसाठी वापरला जातो?

४. जून ते ऑक्टोबर पर्यंत घेतल्या जाणाऱ्या पिकांना काय म्हणतात?

५. मार्च ते जून मध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांना काय म्हणतात?
उत्तरे:
१. खरीप हंगाम व रबी हंगाम 

२. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात.

३. ६० टक्के

४. खरीफ पिके.

५. उन्हाळी पिके.
💥एकाच घटकावर प्रश्न विचारून 
मुलांची ती संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ,त्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडून तो घटक ,उपघटक त्यांच्या नेहमीसाठी लक्षात राहील  .   
 "विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास".

     
       💎निर्मिती💎
💥 *अर्चना मेहरे💥*
( विषय शिक्षक)
*जि.प.कें. उच्च. प्राथमिक शाळा. माहुरगड जि.नांदेड*

बोधकथा

*************************
  *बोध कथा*
*************************
  *कर्म आणि भावना.*
----------------------------------------

  *कथा*

*एकदा एक बाई गायीला केळे खायला घालत होती.  पण गाय ते केळं खात नव्हती.  ती बाई परत -परत त्या गायी जवळ जाऊन केळे गायीच्या तोंडासमोर नेत होती पण गाय केळं खायला तयार नव्हती.*

 शेवटी गाय वैतागली आणि ती  बाईला शिंगाने मारायला धावली.  तशी ती बाई पळून गेली. 
त्या गायीच्या जवळच एक सांड उभा होता.  तो गायीच्या जवळ येऊन बोलला, ' ती बाई एव्हढं प्रेमाने खाऊ घालत होती तर तु का  नाही खालस? 
तेव्हा गाय म्हणाली, ' आज तिची एकादशी आहे म्हणून पुण्य कमावण्या साठी मला खाऊ घालत होती.  एरवी मी तिच्या घरासमोर जाऊन उभी राहते तर काठी घेऊन मारायला धावते आणि मला हाकलून देते. 

पुढे गाय बोलली,  ' *भुकेल्याला प्रेमाने सुखी भाकरी दिली तरी गोड  लागते.*  

जो स्वतःच्या स्वार्थासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो *दुर्योधन* आहे. 
जो केवळ आपल्या माणसांचे भले करण्यासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो *युधिष्टीर* आहे. 
आणि जो  सर्वांचे भले करण्यासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो  तो *श्रीकृष्ण* आहे. '

  *बोध*

 *तर लक्षात ठेवा पुण्य कर्म करण्याबरोबर भावना महत्वाच्या असतात*

⚡आजचे विज्ञान प्रश्न ⚡1)गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी------शतकात लावला. 2)वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास------ म्हणतात. 3)वस्तूवरील--------बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. 4)------- बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते. 5)शिलाई मशीन,विद्युत पंप,वाॅशिंग मशीन ही ------- बलाची उदाहरणे आहेत. ✨उत्तरे ✨1)17 व्या 2)बल 3)गुरूत्वीय 4)घर्षण 5)यांत्रिक 🪷निर्मिती 🪷 सौ अर्चना मेहरे

आजचे विज्ञान प्रश्न

⚡आजचे विज्ञान प्रश्न ⚡
1)गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी------शतकात लावला. 
2)वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास------ म्हणतात. 
3)वस्तूवरील--------बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. 
4)------- बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते. 
5)शिलाई मशीन,विद्युत पंप,वाॅशिंग मशीन ही ------- बलाची उदाहरणे आहेत. 
           ✨उत्तरे ✨
1)17 व्या 
2)बल 
3)गुरूत्वीय 
4)घर्षण 
5)यांत्रिक 
              🪷निर्मिती 🪷
              अर्चना मेहरे

गुरुवार, २० जुलै, २०२३

यवतमाळ जिल्ह्यातील माहिती

 #जिल्हा_माहिती


यवतमाळ जिल्हा


यवतमाळ जिल्हा पूर्वी येवतमाळ म्हणून ओळखला जायचा. हा राज्याच्या पूर्व-मध्य भागात विदर्भाच्या प्रदेशात आहे. नागपूर आणि अमरावतीनंतर हा विदर्भातला लोकसंख्येनुसार तिसरा सर्वात मोठा जिल्हा आहे. यवतमाळ शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

आर्णी, उमरखेड, कळंब, पांढरकवडा - केळापूर, घाटंजी, झरी जमनी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, महागाव, मारेगाव, यवतमाळ, राळेगाव, वणी हे या जिल्ह्यातले तालुके आहेत. 

 यवतमाळ पूर्वीच्या बेरार प्रांताचा भाग होता. बेरार सातवाहन राजघराण्याच्या (इ.स.पू. दुसरं शतक ते इसवी सन दुसरं शतक), वाकाटक राजवंश (तिसरं ते सहावं शतक), चालुक्य घराणं ( सहावं ते आठवं शतक), राष्ट्रकूट घराणं (आठवं ते दहावं शतक), चालुक्य (दहावं ते बारावं शतक), आणि शेवटी देवगिरीचे यादव (बारावं शतक ते चौदावं शतक) यांच्या अधिपत्याखाली होतं. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजी यानं हा प्रदेश जिंकला तेव्हा खिलजी राजवटीचा काळ सुरू झाला. चौदाव्या शतकाच्या मध्यात दिल्ली सल्तनतपासून हा प्रदेश विभक्त झाला आणि बहमनी सल्तनतचा भाग झाला. पंधराव्या शतकाच्या शेवटी बहमनी सल्तनतचे पाच तुकडे झाले. १५७२ मध्ये बेरार अहमदनगर इथल्या निजामशाही सल्तनतचा भाग बनलं. निजामशाहीनं १५९५ मध्ये बेरारला मुघल साम्राज्याच्या स्वाधीन केलं. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला मुघल राजवट कमकुवत झाल्यावर, हैदराबादचा निजाम असफ जाह पहिला, यानं १७२४ मध्ये साम्राज्याचा दक्षिणेकडचा प्रांत (बेरारसह) स्वतःच्या ताब्यात घेतला.

अबुल फजलच्या ऐन-इ-अकबरीमध्ये बेरारची तेरा सरकारांमध्ये किंवा महसूल जिल्ह्यांमध्ये विभागणी करण्यात आल्याचं नमूद आहे. यवतमाळ जिल्ह्यात अकबराच्या काळात कलाम (कळंब) आणि माहूरच्या सरकारांचा समावेश होता. या सरकारांचे काही मोजके महाल आताच्या यवतमाळ जिल्ह्यात होते. यवतमाळ हे यवत- लोहारा या नावाखाली परगण्याचं मुख्यालय म्हणून नोंदीमध्ये आढळतं. लोहारा हे यवतमाळच्या पश्चिमेला ५ किमी (३ मैल) अंतरावर असलेल्या गावाचं नाव आहे. यवत म्हणजे डोंगर, शिखर, पुडा. माळ हा प्रत्यय महाल (परगणा-नगर) चा अपभ्रंश आहे. अकबराच्या काळात या क्षेत्राचा जमीन महसुल दहा लाख रुपयांपेक्षा जास्त होता. 

१८५३ मध्ये बेरारच्या उर्वरित भागासह हा जिल्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाखाली आला. बेरारची विभागणी पूर्व बेरार आणि पश्चिम बेरारमध्ये करण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्ह्याचा समावेश पश्चिम बेरारमध्ये करण्यात आला. १८६४ मध्ये यवतमाळ आणि इतर काही तालुक्यांच्या प्रदेशाला सुरुवातीला आग्नेय बेरार आणि नंतर वणी असं नाव देण्यात आलं. १९०३ मध्ये बेरार हे हैदराबादच्या निजामानं भारताच्या ब्रिटिश सरकारला भाड्यानं दिलं असं म्हणतात किंवा ब्रिटिशांकडून भाड्यानं घेतलं असंही म्हणतात. 

यवतमाळ जिल्हा वर्धा आणि पैनगंगा-वैनगंगा खोऱ्याच्या नैऋत्य भागात वसलेला आहे. 

या जिल्ह्याचं क्षेत्रफळ १३,५८२ चौरस किमी (५,२४४ चौरस मैल) (राज्याच्या ४.४१ टक्के)  आहे. जिल्ह्याची एकूण लांबी १९० किलोमीटर (१२० मैल) आहे आणि उत्तर ते दक्षिण रुंदी १६० किमी (१०० मैल) आहे. त्याच्या उत्तरेकडच्या सीमेवर पाणिघाट आहे, ज्याला बेरारची दरी म्हणतात.

जिल्ह्यात पैनगंगा आणि वर्धा या दोन प्रमुख नद्या आहेत. वर्धा मध्य प्रदेशात उगम पावते. पैनगंगा नदी ही वर्धेची मुख्य उपनदी आहे आणि वर्धेत सामील होण्यापूर्वी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर वाहते. वर्धेच्या इतर उपनद्यांमध्ये यवतमाळ पठारावरच्या बेंबळा आणि निर्गुडा यांचा समावेश होतो. त्या फक्त पावसाळ्यात वाहतात. 

जिल्ह्याचं हवामान कोरडं आणि उन्हाळ्यात मध्यम थंड तर हिवाळ्यात गरम असतं. जिल्ह्यात सरासरी वार्षिक ९११.३४ मिमी (३६ इंच) पाऊस पडतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागात ८८९ मिमी (३५ इंच) आणि पूर्व भागात ११२५ मिमी (४४इंच) पाऊस पडतो. आहे. नैऋत्य मोसमी हंगामात जवळपास सर्वत्र पाऊस पडतो. अलीकडच्या वर्षांत अतिवृष्टीमुळं पिकांचा नाश होणं आणि जमीन लागवडीसाठी अयोग्य होणं, हा प्रकार वाढला आहे.

यवतमाळ शहर आणि जिल्ह्याची भारतातल्या सर्व प्रमुख शहरांशी आणि महाराष्ट्राशी वाहतुकीची चांगली जोडणी आहे. राष्ट्रीय महामार्ग ७ या जिल्ह्यातून जातो. तर राज्य महामार्ग ३६१ हा यवतमाळ शहर आणि जिल्ह्यातून जातो. खांडवा (म.प्र.) ते करंजी हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग परतवाडा, अमरावती, यवतमाळ मार्गे जाणार आहे. जिल्ह्यात जवाहरलाल दर्डा विमानतळ भरी इथं आहे. यवतमाळ-मूर्तिजापूर रेल्वे मार्ग आणि वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग, यांचं काम चालू आहे. भारतातली पहिली ब्रॉडगेज मेट्रो नागपूर ते यवतमाळपर्यंत धावणार आहे. 

ज्वारी आणि कापूस हे जिल्ह्याचं मुख्य उत्पादन आहे. कापूस आणि सागवान ही इथली प्रमुख निर्यात आहे. निर्यात होणाऱ्या इतर वस्तूंमध्ये चुना, लाकडी फर्निचर आणि संत्री यांचा समावेश होतो. सोयाबीन हे महत्त्वाचं पीक आहे. २००६ मध्ये पंचायत राज मंत्रालयानं यवतमाळला देशातल्या २५९ सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक मानलं आहे. 

या जिल्ह्याच्या जमिनीत डेक्कन ट्रॅप खडक आहे. लाव्हा बेड. त्यावर या जिल्ह्यात खाणकाम चालतं. हा जिल्ह्याच्या उत्पन्नाचा एक भाग आहे.

जिल्ह्यात बिटरगाव, टिपेश्वर, तिवसाळा आणि उंबर्डा इथं सामाजिक वनिकरण जंगलं आहेत. तिथल्या झाडांमध्ये साग, तेंदू, हिरडा, आपटा आणि मोहा, बांबू यांचा समावेश होतो. जंगलात आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये जंगली अस्वल, हरीण, नीलगाय, सांबर, हायना आणि मोर यांचा समावेश होतो. टिपेश्वर आणि पैनगंगा इथं वन्यजीव अभयारण्य आहेत. टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्प करण्याची तयारी सुरू आहे.

आर्णी आणि दिग्रस तालुका ही तीर्थक्षेत्रे आहेत. बाबा कंबलपोश आणि घंटीबाबा मंदिर यासाठी प्रसिद्ध आहेत. कळंबचं चक्रवती नदीच्या कधी चिंतामणी मंदिर, घाटंजीतलं मारोती महाराज मंदिर, रंगनाथ स्वामी, वणी, अंबा देवी, केळापूर आणि जांभोरा माहूर इथलं दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. नेर तालुक्यात धनज माणिकवाडा फकीरजी महाराज संस्थान आहे. 

जिल्ह्यात गोंड राजा, गोंड, गोंड परधान, कोलाम, आंध आणि बंजारा हे समुदाय आहेत. 

लाभ वन्यजीव अभयारण्य, सहस्त्रकुंड धबधबा, पेनगंगेच्या काठावर कपेश्वर जंगल आणि गरम पाण्याचे झरे आहेत. सहस्त्रकुंड धबधबा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. या धबधब्याच्या अलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात येतो तर पलिकडचा भाग यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यात आहे.

महाराष्ट्रावर सर्वाधिक काळ म्हणजे १९६३ ते १९७५ पर्यंत राज्य करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि अल्पकाळ मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राहिलेले सुधाकरराव नाईक, विदर्भाचा वाघ म्हटले जाणारे आणि विदर्भ जनता काँग्रेसचे संस्थापक जांबुवंतराव धोटे, भारतीय फील्ड हॉकी खेळाडू आकाश चिकटे, लोकमत दैनिकाचे संस्थापक आणि राज्याचे मंत्री जवाहरलाल दर्डा, क्रिकेटपटू अलिंद नायडू, ललित यादव, भौतिकशास्त्रज्ञ फहीम हुसेन, वकील आणि मराठी गझलकार वासुदेव वामन उर्फ भाऊसाहेब पाटणकर हे याच जिल्ह्यातले. लंडनमध्ये गाजलेल्या आजीबाई बनारसे याही याच जिल्ह्यातल्या.

यवतमाळ शहर नगरपरिषद आहे. हे यवतमाळ जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर एका पठारावर वसलेलं आहे, जे इतर तालुक्यांपेक्षा तुलनेनं जास्त उंचीवर आहे. पूर्वी येओती किंवा येवतमाळ म्हणून ओळखलं जाणारं यवतमाळ हे बेरार सल्तनतचं मुख्य शहर होतं आणि जुन्या लिखाणानुसार जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण होतं. १८६९ मध्ये यवतमाळ नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली, परंतु त्यानंतर लगेचच ती विसर्जित करण्यात आली. १८९४ मध्ये ती पुन्हा स्थापन झाली आणि जिल्ह्यातली सर्वात जुनी नगरपरिषद बनली. एलियट हे इथले पहिले महापौर होते आणि लेफ्टनंट डब्ल्यू. हेगे उपमहापौर होते. गोविंद पुनाजी बारी हे यवतमाळ नगरपरिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष होते. (२ जाने. १९१४ ते ३१ मे १९३२). २२ डिसेंबर १९३४ रोजी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी पहिली निवडणूक घेण्यात आली होती. त्यापूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात येत असे.

या जिल्ह्यात शकुंतला नावाची मिनी ट्रेन ही ब्रिटिश सरकारनं कापसाची वाहतूक करण्यासाठी बांधली होती. ती ऐतिहासिक ट्रेन आता बंद आहे.

या शहरात उष्णकटिबंधीय हवामान आहे. यवतमाळमध्ये वार्षिक सरासरी तापमान २६.८ अंश सेल्सिअस असतं. इथं सरासरी ९४६ मिमी पाऊस पडतो.

ब्रिटिश राजवटीत यवतमाळ शहर हिल स्टेशन म्हणून वर्गीकृत होतं. यवतमाळमध्ये कापूस-जिनिंग आणि प्रेसिंग दोन्ही चालतं. हे शहर जिल्ह्यातलं प्रमुख व्यापारी केंद्र आहे. तिथून २९ मैल (४७ किमी) अंतरावर असलेल्या धामणगाव स्टेशनशी रस्त्यानं जोडलेलं आहे. यवतमाळमधल्या प्रमुख उद्योगांमध्ये जीन्ससाठी डेनिम फॅब्रिक्स तयार करणाऱ्या रेमंड यूसीओ मिलचा समावेश आहे. 

लोहारा, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, उमरी, केळापूर, राळेगाव बाभूळगाव, नेर, आणि वणी-मारेगाव इथं प्रमुख औद्योगिक केंद्र आहेत. यवतमाळ शहर, आर्णी, वणी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, मोहडा, पुसद, उमरखेड आणि केळापूर  या मुख्य बाजारपेठा आहेत.

जिल्ह्यात पुसद हा तालुका आहे. पूस नदीच्या नावावरून हे नाव पडलं आहे. त्याचं प्राचीन नाव 'पुष्पवंती' होतं. पुसद हे यवतमाळ जिल्ह्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे. पुसद हा आदिवासी भाग आहे. बंजारांची संख्या जास्त आहे. १३ व्या शतकातली हेमाडपंती स्थापत्यकलेची दोन मंदिरं, १८७४ साली बांधलेली एक उत्तम टाकी इथं आहे.

इथली मुख्य पिकं बाजरी, गहू, तूर, कापूस, भुईमूग, सूर्यफूल आहेत. पुसद तालुक्यातील डोंगराळ भागात मातीचा प्रकार खडबडीत किंवा काळ्या रंगाचा सैल भुसभुशीत आहे. सिंचनासाठी पूस नदीवर मध्यम आकाराचं पुसद शहराच्या वायव्येला १८ किमी (११ मैल) वरचं पूस धरण १९७१ मध्ये बांधलं गेलं. नंतर १९८३ मध्ये पुसदच्या पूर्वेला ४० किमी (२५ मैल) महागावजवळ खालचं पूस धरण बांधलं गेलं. कार्प माशांचा मत्स्यपालनाच्या व्यवसाय इथं चालतो. १९५८ च्या पूर्वीपासून पुसदमध्ये कापूस जिनिंग आणि ऑइल प्रेस कारखाने आहेत.

उमरखेड हे पैनगंगा नदीजवळील नगरपालिकेचं शहर आहे. ते तालुक्याचं ठिकाण आहे. हे यवतमाळपासून ११० किमी अंतरावर आहे. हे तिन्ही बाजूंनी पर्वत आणि घाटांनी वेढलेलं आहे आणि त्याच्या एका बाजूनं सपाटी आहे. उमरखेड शहरापासून ३.६ किमी अंतरावर असलेल्या चुरमुरा गावाजवळ अंबोना तलाव हे पर्यटन स्थळ आहे. नौकाविहार आणि सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. उमरखेडपासून किमी अंतरावर जेवली गावाजवळ पैनगंगा नदीतला सहस्रकुंड धबधबा आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये इथं पर्यटक येतात.

उन्हाळ्यात इथलं तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढतं, तर हिवाळ्यात ८ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरतं.

पैनगंगा वन्यजीव अभयारण्य इथं आहे. पैनगंगा नदी या अभयारण्याच्या तिन्ही बाजूंनी वाहते. हे ३२५ चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेलं आहे. यात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आहेत. पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात मिश्र पानझडी जंगलं आणि सागवान जंगलं आहेत. प्राण्यांच्या असंख्य प्रजातींमध्ये कोल्हा, बिबट्या, जॅकल, हरे, चार शिंगांचा काळवीट, पोर्क्युपिन, सांबर, नीलगाय, काळवीट, चिंकारा आणि इतर अनेकांचा समावेश आहे. पक्षी निरीक्षकांसाठी गिधाड, बुलबुल, कबूतर, किंगफिशर, कोकिळ, पतंग आणि इतर आहेत. पैनगंगा वन्यजीव अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे जानेवारी ते जून. 

वणी तालुका यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व भागात असून चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. एक तालुका असूनही, वणी हे बाजारपेठेमुळं महत्त्वाचं व्यावसायिक केंद्र आहे. यवतमाळ शहर वणीपासून ११९ किमी आणि चंद्रपूर फक्त ५५ किमी अंतरावर आहे. पूर्वी वणीला 'वुन' म्हणून ओळखलं जात असे. शहराला निर्गुडा नदी आहे, जी पुढं वर्धा नदीत विलीन होते.

कोल इंडिया लिमिटेडची वेस्टर्न कोलफिल्ड्स ही उपकंपनी वणी शहराच्या परिसरात कोळसा खाण चालवते शहराजवळ उकनी, पिंपळगाव, जुनाड, कोलारपिंप्री, राजूर, कुंबरखणी, घोन्सा, नीलजाई, नायगाव या कोळसा खाणी आहेत.

तालुक्याची अर्थव्यवस्था मुख्यतः आजूबाजूच्या परिसरातली शेती आणि खाण व्यवसायांवर चालते. अनेक कापूस जिनिंग आणि प्रेसिंग युनिट्सदेखील कार्यरत आहेत. अलिकडच्या काळात कापूस बियाणं तेल मिलिंग युनिटदेखील सुरू झालीत. याशिवाय चुनखडीच्या उपलब्धतेमुळं वॉल पुटी उत्पादन युनिट्स इथं ग्रामीण भागात कार्यरत आहेत. एमआयडीसीमध्ये मेटल फॅब्रिकेशन युनिट, सिमेंट प्रीकास्ट आणि पाईप बनवण्याचं युनिट, डाळ मिल (पल्स प्रोसेसिंग फॅक्टरी) इ. आहेत.

कोळशाचे प्रचंड साठे आणि लगतच्या भागात असलेल्या अनेक कोळशाच्या खाणींमुळं या शहराला ब्लॅक डायमंड सिटी हे नाव पडलं आहे. कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख पिकं आहेत.

परिसरात चुनखडीची उत्खननही केली जाते.

रंगनाथ स्वामी मंदिर, जैताई माता मंदिर, जोड-महादेव मंदिर, जैन स्थानक, संभवनाथ जैन मंदिर, काळाराम मंदिर, साई मंदिर, जगन्नाथ महाराज मंदिर, हनुमान मंदिर, महाकाली माता मंदिर, गणपती मंदिर, शिवमंदिर, शनी मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, संत गाडगे बाबा मंदिर, जटाशंकर मंदिर, गजानन महाराज मंदिर, दत्त मंदिर, जगदंबा मंदिर, महादेव मंदिर, जामा मशीद, मस्जिद ई हयात, नगिना मशीद, मदिना मशीद, अक्सा मशीद, दर्गाह हजरत सय्यद मुराद अली शाह बाबा, दर्गा ख्वाजा मोहम्मद हयात, शीख गुरुद्वारा, सिंधी गुरुद्वारा, मेथोडिस्ट चर्च, नवीन मेथडिस्ट चर्च एवढं सगळं या शहरात आहे.

दारव्हा हा तालुका आहे. यवतमाळ जिल्ह्यातलं एक शहर आणि नगरपरिषद आहे. रंगो बापूजी गुप्ते हे स्वातंत्र्यसैनिक शहरात गुप्तपणे राहत होते, असं इथं सांगितलं जातं. हे शहर 'गोळीबार चौक' या चौकासाठीदेखील प्रसिद्ध आहे. इथं ब्रिटिश सैनिकांनी निशस्त्र मेळाव्यावर गोळीबार केला होता.

दारव्हा इसवी सन १८०० ते १९०० या काळात शेंगदाणा तेल आणि कापसाच्या मोठ्या बाजारपेठांपैकी एक होतं. तिथं ८ जिनिंग आणि २०९ तेल घाणी होत्या. सातवाहन काळात दारव्हा हे गुरं, दुग्धजन्य पदार्थ, कापूस आणि कापूस बियाण्यासाठी प्रसिद्ध बाजारपेठ होतं.

दारव्हा शहरापासून दोन किमी अंतरावर दिग्रस रस्त्यावर बैरागी बाबा मठ आहे. त्याची स्थापना रंगो बापूजी गुप्ते यांनी केली होती. ब्रिटिश शासकांपासून ते इथं लपून राहिले होते. 

जिल्ह्यातलं महागाव हे कॉटन टाउन म्हणून ओळखलं जाणारं छोटं तालुक्याचं गाव आहे. महागाव जवळपास सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. पूस नदी इथून वाहते. ती पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचाही स्रोत आहे.

महागाव गावात साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. महागाव गावाचा साक्षरता दर महाराष्ट्राच्या ८२.३४% च्या तुलनेत ८५.५४% आहे. महागावमध्ये पुरुष साक्षरता ९१.३१% आहे, तर महिला साक्षरता दर ७९.६८% आहे.

महागाव आणि आजूबाजूचा परिसर बहुतांशी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून शेतीवर अवलंबून आहे. पूस धरण, वेणी धरणामुळं या भागातली जमीन चांगली सिंचनाखाली आहे. पूस नदीतून शेतीला थेट सिंचनाचं पाणीही मिळतं. 

इथल्या मुख्य पिकांमध्ये ऊस, कापूस, सोयाबीन, बंगाल हरभरा, ज्वारी आणि गहू यांचा समावेश होतो. शहरात कापूस आणि धान्याची बाजारपेठ आहे. महागावची मुख्य पिकं कापूस व ऊस ही असल्यानं वसंत सहकारी साखर कारखाना, वसंतनगर आणि पुष्पवंती सहकारी साखर कारखाना, सवना हे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. पिंपळगाव इथं बाबासाहेब नाईक कॉटन मिल आहे.

जिल्ह्यात तालुका असलेलं आर्णी हे गाव अरुणावती नदीच्या काठावर वसलेलं आहे.आर्णी कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापूस पिकाची शेती आहे. इथं मोठा धान्य बाजार आहे आणि ३ उप-धान्य बाजार आणि एक खाजगी धान्य बाजारदेखील आहे.

आर्णी यवतमाळनंतर जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शहरात ५ कापूस जिनिंग आणि प्रेसिंग मिल्स, २ पीनट मिल्स आणि एक डाळ मिल आहेत.

तालुका केळापूर (ज्याला पांढरकवडा असंही म्हणतात.) हे भारताच्या हे श्रीनगर - नागपूर - हैदराबाद - बंगलोर - कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर आहे.

मल्लिकार्जुन मंदिर, घंटी बाबा मंदिर, भवानी देवी मंदिर, रामानंद महाराज मठ, शनी मंदिर, नगिना मशीद, लाल इमारत इथं प्रसिद्ध आहेत.

जिल्ह्यात घाटंजी हे खूप जुनं शहर आणि नगरपरिषद आहे. या भागात शेतकरी दर्जेदार कापसाचं उत्पादन घेत असल्यानं याला 'कॉटन सिटी' असंही म्हणतात. हे तालुक्याचं ठिकाण वाघाडी नदीच्या काठी आहे. वाघाडी नदी आणि तिच्या धरणामुळं पाण्याची सोय आहे. सागवान लाकूड, निलगिरीची झाडं आणि इतर अनेक मसाल्यांच्या झाडांचा समावेश असलेलं भरपूर वनक्षेत्र इथं आहे. या जंगलांमध्ये विविध प्रकारचे प्राणी राहतात.

नेर यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. फकीरजी महाराज मंदिर, गणपती मठ नावाचं गणेश मंदिर, सोमेश्वर मंदिर, जामा मशीद, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कापूस बाजार यांचा समावेश आहे.

राळेगाव यवतमाळ जिल्ह्यातलं तालुक्याचं ठिकाण आहे. राळेगाव कापूस उत्पादनात आणि सोयाबीन आणि इतर डाळींच्या उत्पादनात विशेष आहे. हे महाराष्ट्राची कापसाची राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. या तालुक्यात दहाहून अधिक जिनिंग व प्रेसिंग व एक रॉ ऑइल मिल आहे. 

पूर्वी हे शहर यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा तालुक्याचा भाग होता आणि नंतर तो तालुका झाला. 

तालुका कळंब गणेश आणि मुस्लिम विद्वान बाबा बासुरीवाले यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. कळंबकचं गणेश मंदिर हे विदर्भातल्या अष्टविनायकापैकी एक आहे. 

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला हे गाव मुघल साम्राज्याच्या अंतर्गत त्याच नावाच्या सरकारची (सुभा) राजधानी होतं. एक महत्त्वाचं महसूल गाव होतं. त्याचं नाव पूर्वी 'कलाम' असं होतं.

बाभुळगाव हा यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. यवतमाळपासून २२ किमी अंतरावर आहे.

झरी जमनी हाही यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे.

मारेगाव हा यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. मारेगाव हे एक लहान गाव आहे. इथं २०१५ मध्ये नगर पंचायत घोषित करण्यात आली. हे वणी यवतमाळ रस्त्यावर वणीपासून १८ किमी अंतरावर आहे.

इथला प्रमुख व्यवसाय शेती आहे. कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही महत्त्वाची पिकं आहेत. काळी माती आहे. मारेगाव इथं तहसील कचेरी, पंचायत समिती, दिवाणी न्यायालय व इतर कार्यालयं व बँका आहेत. मार्डी रस्त्यावर चार किमीवर सिमेंट कारखाना, नवरगाव इथं धरण, नरसाळा इथं स्टोन व क्रशर खाणी, वणी रस्त्यावर गौराळा इथं चुनखडीच्या खाणी आहेत.

दोन जिनिंग आणि प्रेसिंग कारखाने आहेत. लोकसंख्येमध्ये बहुतेक आदिवासींचा समावेश आहे. त्यात गोंड आणि कोलाम जमाती आहेत. या तालुक्याचं विभाजन करूनच ‘झरी-जमनी’ हा दुसरा तालुका तयार करण्यात आला आहे. या भागात अलीकडच्या काळात नवीन कोळशाच्या खाणींचा शोध लागला आहे. लोअर पूस धरण, फॉक्सटेल इको रिट्रीट, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य इथं आहे.

बोरेगाव बांध - यवतमाळपासून ५ कि.मी. अंतरावर बोरेगाव बांध हे लोकांच्या पाहण्याचं ठिकाण आहे. 

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य - यवतमाळमधल्या सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांमधे या अभयारण्याचा समावेश होतो. १४८.६३ वर्ग किलोमीटर परिसरात पसरलेल्या या अभयारण्याला निसर्गाचं वरदान आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी आहेत. या जंगलात वाघ, जंगली डुक्कर, चित्ता, हरिण, ब्ल्यू बेल, एंटीलोप्स, बाइसन पाहायला मिळतात.

यवतमाळ जिल्ह्यातून संत्रा, लिंबू आणि लाकडाचं फर्निचर यांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते.

संकलन:-गजानन गोपेवाड

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*

 *🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳

                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : gajanan gopewad

                                                   

➿➿➿➿➿➿➿➿➿

🚩🤺🚩🇮🇳👳‍♀️🇮🇳🚩🤺🚩


                   *नरवीर*

    *तानाजी काळोजीराव मालुसरे*

         ( शिवरायांचे सरदार )


       *जन्म : इ.स. १६२६*

*(जावळी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत)*


       *वीरमरण : ४ फेब्रुवारी १६७०*

   *(सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत)*


टोपणनाव : तान्हाजी

अपत्ये : रायबा


तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सरदार होते. त्यांनी स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.


🙎‍♂️ *बालपण*

                   सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडवली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले.


🤺 *कामगिरी*

         अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.


🤺 *नरवीर तानाजी मालुसरेची एक अपरिचित लढाई*

                  तानाजी मालुसरे असे नाव घेतले की लोकांना त्याच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवण होते. सर्वसामान्यांसाठी त्यांचे चरित्र या एकट्या प्रसंगापुरतेच मर्यादित झाले आहे. परंतु त्याने केलेल्या इतर पराक्रमांविषयी सर्व सामान्यांना अजिबातच माहिती नाही. तानाजी मालुसरेचे संगमेश्वरचे युद्ध हे असेच अपरिचित युद्ध आहे. या युद्धाला हवे आहे तेवढे महत्त्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडले नाही. हा तानाजींवर झालेला अन्यायच आहे.


संगमेश्वरी असतांना शत्रूने केलेल्या अकस्मात हल्ल्यादरम्यान तानाजीने कमालीचे धाडस दाखविले होते. त्या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन पुढीलप्रमाणे :


दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर काबीज झाले, राजापूर लुटले गेले. ह्या बातम्या धडाधड आदिलशाहाच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच शृंगारपूरच्या सूर्याजीस आदेश केला. तो त्याला म्हणाला_ "तो (शिवाजी महाराज)आमचा उघड शत्रू, राजापुरावर चालून जात असताना त्यास तू का अडविले नाहीस? असो ते जाऊ दे, तो आता परत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हा त्यास तेथे अडव व त्याच्याशी युद्ध कर,'. आदिलशाहाच्या दबावाखाली सूर्याजीने शिवाजी महाराजांच्या विरोधात उघडउघड शत्रुत्व धारण केले.

                        तेव्हा सूर्याजीं सुर्वे शृंगारपूरला होता. त्याने लगेच शिवाजी राजांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोलला. संगमेश्वरी शिवाजी राजांचे सैन्य अल्पसे होते. या अल्पशा सैन्याला सूर्याजीच्या सैन्याने चोहो बाजूंनी घेरले. शिवरायांनी या सैन्याचे नेतृत्व तेव्हा पिलाजी निळकंठरावाकडे दिले होते. आपले सैन्य शत्रूने चारही बाजूंनी घेरले आहे, असे जेव्हा पिलाजीला समजले तेव्हां पिलाजीं फ़ार भयभीत झाला. शत्रूला सामोरे जाऊन त्याच्याशी युद्ध करण्यापेक्षा युद्धातून पळून जाणेच त्यांनी योग्य ठरवले. ते आपला जीव वाचवण्याच्या भीतीने संगमेश्वरहून पळून जाऊ लागले. तोच भीतीने कापणाऱ्या त्या पिलाजीला आपल्या लोकांना मागे सोडून पळून जातांना तानाजी मालुसरेने पाहिले. तानाजींसारख्या प्रतापी पुरुषाला हे अजिबात खपणारे नव्हते. तानाजीने भ्याड पिलाजीला पळताना पाहताच त्याचा पायीच पाठलाग करून त्याला हातात धरले आणि त्याचा उघड धिक्कार केला. तानाजी मालुसरे पिलाजीस म्हणाला_ "या युद्धात मी तुझा साह्यकर्ता आहे. तू आपल्या लोकांना संकटात टाकून पळून जातोयस, ही खरच खेदाची गोष्ट आहे. आजपर्यंत तू तुझ्या परराक्रमांच्या एवढ्या बढाया मारत होतास त्या सगळ्या बढाया कुठे गेल्या? ज्या शिवाजी महाराजांनी तुला मोठेपण व सन्मानाची देऊन सांभाळले, तू त्यांचा सरदार असतांनाही सैन्य टाकून स्व:तच पळून जातोयस? आणि याची तुला खंतही वाटत नाही...." असे कित्येक कठोर शब्द बोलून तानाजीने पिलाजीला कैद केले. पिलाजीं घाबरलेला पाहुन तानाजीला वाटले की पिलाजीची ही दशा पाहून इतर मावळ्यांचीही हिंमत खचेल. त्यामुळे पिलाजीला मोकळे सोडण्यापेक्षा कैदेतच ठेवणे योग्य असा विचार करून तानाजीने पिलाजीला जवळच असलेल्या एका दगडाला दोरखंडाने बांधून ठेवले. पिलाजीला दगडाला बांधुू ठेवल्यानंतर तानाजी मालुसरेने स्व:तच सैन्याचे नेतृत्व केले.

                     तानाजीने व त्याच्या सोबती मावळ्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. शत्रूनेही तानाजीस रोखण्याच्या दिशेने पुढे सरसाव केला. आता दोन्ही सैन्य एकमेकांना भिडणार आणि रक्ताच्या चिळकांड्या उडणार तोच मराठ्यांच्या मागच्या तुकडीने तानाजीच्या रक्षणासाठी शत्रूवर बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे तानाजीच्या समोर येणारी शत्रुची तुकडी घायाळ झाली आणि याचा फ़ायदा उचलत तानाजीच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी शत्रुची दाणादाण उडवली. तानाजीची मागची तुकडी शत्रूच्या पुढे सरसावणाऱ्या तुकड्यांवर बाणांचा वर्षाव करी व बाणांनी जखमी झालेल्या शत्रुच्या सैन्याला तानाजी सोबती मावळे कापून काढीत. मावळ्यांनी तानाजीच्या नेतृत्वाखाली शत्रूशी रात्रभर झुंज दिली व शत्रूच्या हातपाय कापलेल्या व धडापासून मुंडके वेगळे पडलेल्या शवांचे ढीगच्या ढीग मावळ्यांनी रणांगणात रचले. शेवटी सूर्याजीला या युद्धात मोठे नुकसान सोसावे लागले. त्याला त्याच्या सैन्याची सर्वत्र दशा झालेली दिसताच त्याने युध्दातुन पळ काढला. शेवटी वीर तानाजी मालुसरेंचा व सोबती मावळ्यांचा या युध्दात विजय झाला.

संदर्भ - शिवभारत

            स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन तो राहिला होता. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्याने सहभागी करून घेतले.


🤺 *कोंढाण्याची लढाई*

                स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा तो स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होता. त्याने ती तयारी अर्धवट सोडली. स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेऊन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. तो कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाला. *"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."*  हे त्याचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत.

                      कोंढाणा गडावरचा किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे याच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजीने गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.

           तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजीला त्याच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले  *"गड आला पण सिह गेला".* अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठे' 

 (पोलादपूरजवळ)  या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले.


🗽 *तानाजीची स्मारके*

                    तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.

पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.

रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.


📚 *पुस्तक*


दुर्ग सिंहगड - आनंद पाळंदे

गड आला पण सिंह गेला - ह.ना. आपटे

नरवीर तानाजी मालुसरे (बालसाहित्य) - पंडित कृष्णकांत नाईक

तानाजी (अमर चित्र कथा -६८२)

मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण भोसले, नरसिंह पब्लिकेशन्स

राजाशिवछत्रपती - ब.मो. पुरंदरे, पुरंदरे प्रकाशन

सिंहगड - पुरंदरे प्रकाशन

सिंहगड - प्र. के. घाणेकर

सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे - दत्ताजी नलावडे


🎖️ *पुरस्कार*


तानाजीच्या नावे शिवाजी ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.


🎞️ *चित्रपट*


▪️"तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर" (हिंदी चित्रपट, सन २०२०, तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण); दिग्दर्शक - ओम राऊत.

▪️यापूर्वी १९५२ साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 'नरवीर तानाजी' हा मराठी चित्रपट निघाला होता. चित्रपटात दुर्गा खोटे आणि मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या.


 🚩 *हर हर महादेव....!* 🚩


                                                                                                                                                                                                                                                            ➖➖➖➖➖➖➖➖➖  

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

३ फेब्रुवारी संशोधक जोहान्स गुटेनबर्ग स्मृतिदिन


३ फेब्रुवारी 

संशोधक जोहान्स गुटेनबर्ग स्मृतिदिन


जन्म - २४ फेब्रुवारी १३९८ (जर्मनी)

स्मृती - ३ फेब्रुवारी १४६८


सतत पुढे जाणाऱ्या आजच्या आधुनिक संगणकीय जगात छापील पुस्तके, वृत्तपत्रे यांचे स्थान किंचित कमी झाल्या सारखे वाटले तरी आपल्या दैनंदिन जीवनात ती अजूनही कायम आहेत. पुस्तकांच्या आणि वृत्तपत्रांच्या इ-आवृत्त्या आल्या तरी पुस्तकांचे मुद्रण पूर्वीसारखे चालू आहे. सर्वसामान्य माणूस आजही छापलेले पुस्तक आणि वृत्तपत्र हातात धरत आहे. हा लेख अत्याधुनिक मुद्रण यंत्राच्या साह्याने प्रत्यक्ष कागदावर छापला न जाता तुमच्या समोर आलेला आहे आणि मग तो आंतरजालाच्या माध्यमातून आज तुम्हाला संगणकाच्या पडद्यावर दिसत आहे. पण त्याचे मूळ कागदावर होते हे विसरून चालणार नाही.


कल्पना करा की आजचे मुद्रण तंत्र जन्मास येण्यापूर्वी काय परिस्थिती होती? पुस्तक ही एक अत्यंत महागडी व हाताने बनवण्याची बाब असल्यामुळे ती एक दुर्मिळ आणि तरीही सर्वांना हवीहवीशी वाटणारी चीज होती. मुद्रण तंत्रच अस्तित्वात नव्हते. म्हणून हातांनी लिहिलेल्या अक्षरांची पुस्तके बनवणे आणि मागाहून ती नकलून घेणे देशोदेशात होत असे. आपल्याकडे जे जे प्राचीन ग्रंथ, पोथ्या व पुराणे होती, ती सारी हस्तलिखिते होती. या अशा हाताने लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रतींची संख्या कितीशी असणार? त्या अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत असत आणि त्यांचे जतन जीवापाड हिऱ्या मोत्यांच्या मोलाने केले जात असे. भारतात सर्व धार्मिक ग्रंथ हातानेच केले जात आणि त्यासाठी लागणारा कागदही कुठे उपलब्ध असे? लिहिण्यासाठी ताडपत्रांचा उपयोग केला जात असे. प्राचीन काळी भूर्जपत्रे वापरली जायची.


त्याहीपूर्वीची  पुस्तके कशी असत बरे? मध्य आशियातील प्राचीन राजवटीत ओल्या विटांवर अक्षरे कोरून मग त्या भाजून विहिरी भोवती ओळीने लावून ठेवल्या जात असत, असे नमूद केलेले आहे.।इजिप्तची संस्कृती फार प्राचीन. त्या वेळची पुस्तके तर जुन्या पिरामिडस मधून प्रत्यक्ष पाहायला मिळाली आहेत. ती झाडांच्या सालीच्या लांबलचक पट्ट्यावर लिहिलेली आहेत. त्यांना पपाइरस (Papyrus) असे नाव होते. नुसती कल्पना करून बघा. एकेक पान नव्वद ते शंभर फूट लांब एका काठी सारख्या हाडा भोवती गुंडाळलेले उलगडत जायचे, वाचीत जायचे आणि दुसऱ्या हाडाभोवती मिटत जायचे. ही पुस्तके अर्थातच प्रचंड लाकडी पेट्यात ठेवली जात. आणि पुस्तकाचे कव्हर? ते चामड्याचे असे. बकऱ्याच्या नाहीतर कोकराच्या पातळ चामडीचे हे आवरण असे. प्राचीन मठातले भिक्षु पुस्तकाच्या प्रती नकलून काढायचे. अशा एकेका प्रतीला सात-सात आठ-आठ महिने लागत असत. अशा आहेत प्राचीन हस्तलिखित पुस्तकांच्या गोष्टी.


थोडक्यात ज्या काळात पुस्तकांचे दुर्भिक्ष्य असायचे, त्या काळात बुद्धी व अलौकिक चिकाटी यांच्या जोरावर ज्याने मुद्रणाचे तंत्र शोधून काढले आणि जगातील पहिले छापलेले पुस्तक निर्माण केले, त्या जर्मनीच्या योहान गुटेनबर्ग (Johannes Gutenberg) या महापुरुषाला आपण कदापि विसरू शकत नाही. 


आजच्या आधुनिक मुद्रण तंत्राचा तो आद्य जनक मानला जातो. दुर्दैवाने आज गुटेनबर्ग विषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्याचे व्यक्तिमत्व म्हणजे एक गूढ आहे. तो केव्हा जन्मला तसेच त्याचे निधन कधी झाले हे नक्की कुणालाच माहीत नाही. त्याचे असे रेखाचित्र त्याच्या सबंध आयुष्यात काढलेले नाही. गुटेनबर्गच्या विषयीची माहिती गोळा करण्यासाठी लेखक व इतिहासकार यांना गुप्तहेराच्या भूमिकेत जावे लागले.


नैऋत्य जर्मनीत ऱ्हाईन नदीच्या काठावर वसलेल्या मेंझ (Mainz) या गावात गुटेनबर्ग जन्माला आला. त्याची नेमकी जन्मतारीख अद्यापही अज्ञात आहे. इ.स.१३९४ ते १३९९ या काळात तो जन्मला असावा. मूळात गुटेनबर्ग हे त्याचे आडनाव नाही. त्याचे गेन्सफ़्लाईश कुटुंब हे मेंझ गावातील खानदानी घराण्यातील होते. ते ज्या वाड्यात रहात होते, त्याचा उल्लेख डोंगरावरील घर गुटेनबर्ग हॉफ असा होत असे, त्यावरून त्याला योहान गुटेनबर्ग असे नाव पडले असावे. अर्थातच ज्याची व्यक्तीशः माहिती आपल्याला फार थोडी ठाऊक असली, तरी त्याची महान कामगिरी आपल्याला ज्ञात झालेली आहे. आजच्या मुद्रण तंत्राचा तोच खरा जन्मदाता आहे.


इ.स.१४०० च्या सुरुवातीस पुस्तके अजिबात नव्हती, असे नव्हे, ती दुर्मिळ असत आणि ती मिळवायला खूप वेळ व पैसा खर्चावा लागे. तेव्हाचे प्रत्येक पुस्तक हे हातांनी बनवलेले असे. अक्षरन् अक्षर लिहून काढलेले असे. १४१०-११ च्या हिवाळ्यात दहा बारा वर्षे वयाचा योहान खूप अस्वस्थ असे. बाहेर हिम वादळाने थैमान घातलेले असायचे. त्यामुळे योहान बाहेर जाउन खेळू शकत नव्हता. जवळच्या जंगलातही फिरायला जाणे मुश्कील झाले होते. कधी कधी सर्व रस्ते व झाडे बर्फाच्छादित झाल्यामुळे त्याची शाळा बंद होती. सुदैवाने घरात थोडी पुस्तके होती आणि योहान ती वाचू शकत होता. 


घरातली सर्व पुस्तके वाचून झाल्यावर तो मित्रांकडून पुस्तके आणत असे. जवळच्या चर्च मधली पुस्तकेही त्याला वाचायला मिळत असत. पण काही मौल्यवान पुस्तके तेथील टेबलांना साखळीने बांधून ठेवलेली असत. त्या काळातली सर्व पुस्तके धर्म, तत्वज्ञान, कायदा आणि तत्सम विषयांना वाहिलेली असत. छोट्या मुलांसाठी पुस्तके तर विरळाच. या दिवसात योहानचा थोरला भाऊ घरात बुद्धीबळाचा पट मांडून बसत असे, तर बहीण विणकामात मग्न असे. 


योहानला वडलांच्या संग्रहातली पुस्तके, मग ते इतिहासावरचे ग्रंथ असो, की महत्वाच्या घटनांची नोंद असलेल्या बखरी असो, त्या चाळण्याशिवाय गत्यंतर नसे. या ग्रंथातून मात्र त्याला भूतकाळातील घटना, थोर लोकांची वचने, त्यांच्या त्यांच्या कामगिरीची माहिती होत असे.


जर्मनीतील हे मेंझ शहर तत्कालीन रोमन साम्राज्याचा एक भाग होता. जर्मनीपासून उत्तर इटलीतील अनेक छोटी छोटी राज्ये व शहरे या साम्राज्यात सहभागी होती. ऱ्हाईन नदीवरील मेंझ हे शहर त्या काळी एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र होते. युरोप व बाहेरच्या प्रांतातील व्यापारी तेथे येऊन सौदे करत. योहानचे कुटुंबीय त्यांच्याकडून अनेक महागड्या चीजा, उदा. इटलीच्या काचा, चीनमधून आणलेले कागद, हिंदुस्थानातून आयात केलेले मसाले, युरोपातील इतर देशातून आलेली उत्तमोत्तम सुंदर पुस्तके खरेदी करत.


हे सर्व ग्रंथ म्हणजे लॅटिन भाषेतील धार्मिक ग्रंथ असायचे. ते लेखणी व शाईने लिहिलेले असत. हे अत्यंत सुबक अक्षरात लिहिलेले ग्रंथ पूर्ण होण्यास काही महिने लागत आणि अर्थातच ते खूप महाग असत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सहाशे वर्षां पूर्वीच्या एकेका उत्तम पुस्तकाची किंमत चक्क एखाद्या बऱ्या पैकी आकाराच्या शेतजमिनीइतकी असे. त्याशिवाय योहानचे पिताश्री स्थानिक लेखनिकांना पैसे मोजून काही ग्रंथांच्या नकला करून घेत. हे नकला केलेले सुटे कागद मग नीटस व सुंदर अशा शीर्षकांनी नटलेल्या आवरणात काळजीपूर्वक ठेवले जात.


कागदाचा शोध लागण्यापूर्वी बकरे, मेंढ्यांच्या कातडी पासून बनवलेल्या चर्मपत्रांवर हे लेखन केलेले असे. ही कातडी व्यवस्थितरित्या कमवून घेऊन हवी तशी ताणली जात आणि त्यांचा पृष्ठभाग गुळगुळीत केला जाई. असे हे चर्मपत्रांचे पुस्तक पूर्ण होण्यापूर्वी त्यावर अनेक कारागीर काम करत असत. योहानला आपल्या घरातील प्रत्येक पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण झाली. ते कसे कसे तयार झाले, त्याच्या हरएक प्रक्रियांचे त्याने बारीक निरीक्षण केले. ही लिहून झालेली सुटी चर्मपत्रे एका लेखनिकाकडून दुसऱ्या लेखानिकाकडे सोपवली जात. तो त्यावर प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक, मथळे, उपमथळे लाल रंगाच्या शाईच्या अक्षरात लिहित असे. ही लाल रंगातील अक्षरे काळ्या अक्षरांहून उठून दिसत. काही वेळा हे लेखनिक लाल रंगाच्या शाईने पहिल्या ओळीतील अक्षर अधोरेखित करत. या चर्मपत्राच्या शेवटी थोडी जरी जागा शिल्लक राहिली तरी लेखनिक आपले पुढील प्रकरण अगोदरच्या प्रकरणानंतर लगेच सुरू करत असे. 


एकूण काय, चर्मपत्रावरील इंच न इंच जागेचा उपयोग केला जाई. यासाठी हे लेखनिक आपले लेखन कौशल्य पणाला लावीत. यानंतर ही चर्मपत्रे सजावट काराला दिली जात. तो पत्रांवरील समासात छोटी छोटी चित्रे, भूमितीच्या आकृत्या, पानाफुलांच्या सीमारेषा रेखाटून चर्मपत्रे सुशोभित करत असे. आकर्षक रंगीत चित्रे व प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभीचे मोठे अक्षर काढण्यासाठी जादा आकार द्यावा लागे. पुस्तक अधिक आकर्षक दिसण्यासाठी पातळ असे सोनेरी आवरण घालण्यात येई. मग हे पुस्तक बांधणीसाठी दिले जाई. तो कारागीर सर्व चर्मपत्रे एकत्र करून काळजीपूर्वक एकात एक  शिवून दोन पातळ लाकडी तुकड्यांमध्ये बांधत असे. या तुकड्यांवर कापडी, चामड्याचे अथवा अगदी सोनेरी, रुपेरी एवढेच नव्हे तर हस्तिदंती कोरीव काम केलेले आवरण घालण्यात येई. काही पुस्तकांच्या सजवलेल्या आवरणावर पुस्तकाचे शीर्षक पितळी अक्षरात बसवले जाई. अशा प्रकारे बनवलेली ही पुस्तके इतकी महाग असत, की  ती हाताळताना पुष्कळ काळजी घ्यावी लागे. ती कशीही हाताळणे परवडणारे नव्हते.


अशी ही पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत योहान वाट पाहत बसलेला असे. शेवटी शेवटी तर तो अगदी उतावीळ झालेला असे. कधी हे पुस्तक पूर्ण होते, याची त्याला घाई झालेली असे. पुस्तकाच्या प्रती नकलून देणारे लोक ते पुस्तक काही आठवड्यात देत असले, तरी सजावटकार पुस्तक पूर्ण करून द्यायला काही महिने तरी लावत असत. या सगळ्या लांबच लांब लागणाऱ्या प्रक्रियेवर काही तरी उपाय असला पाहिजे, असे योहानला राहून राहून वाटत असे. आणि खरोखर, एके दिवशी तो उपाय तोच शोधून काढणार होता.


हे सारे चालले असताना योहानच्या मागे त्याची शाळा, खेळ, सण, इतर काही कामे असत. त्याच्या वडिलांनी ठरवले होते की त्याच्या भावाला आणि त्याला उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. त्या काळात मुले चर्चने चालवलेल्या शाळात जात. तिथे धर्मगुरु त्यांना सर्वात कठीण असा लॅटिन हा विषय शिकवत. शाळेच्या वेळात शिक्षक व मुले त्याच भाषातून वाचत व बोलत. एखाद्या परकीय भाषेतून व्याकरण, भूगोल, अंकगणित शिकणे म्हणजे सोपे नव्हते.


शाळेत योहानने आपले योहान गुटेनबर्ग हे नाव धारण केले. त्याचा भाऊ व इतर कुटुंबीय मात्र गेन्सफ़्लाईश  (Gensfleisch) हे नाव लावत असत. गेन्सफ़्लाईश हे मोठे कुटुंब होते आणि मेंझ मधील अनेक व्यक्तींनी त्या वेळी ग्लेनफ़्लाईश हे नाव लावले होते. म्हणून कदाचित योहानने गुटेनबर्ग (Good Hill चांगली टेकडी ) हे नाव धारण केले असावे. (गेन्सफ़्लाईश याचा अर्थ Goose flesh हंसाचे मांस असाही होतो).


मध्ययुगीन काळातील घरांची रचना म्हणजे मध्यभागी आवार आणि सभोवार खोल्या असत. हिवाळ्यात वादळी हिमवर्षाव होत असे. त्या पासून बचाव करण्यासाठी कित्येक घरांच्या खिडक्यांना काचा लावलेल्या असतच असे नसे. तसेच प्रकाशासाठी मेणबत्या सर्वांना परवडत नसत. याचा परिणाम असा, की घराच्या अंतर्भागात काळोख व धुराचे राज्य असे. दिवसा जो काही प्रकाश छोट्या खिडक्यातून आलाच, तर तो खिडक्यांवरच्या तेल लावलेल्या फडक्यांमुळे अडत असे. रात्रौ आणि अति थंड तपमानामुळे दिवसाचा सारा काळ नैसर्गिक प्रकाश हा कधीच घरात येत नसे. घरात उबदारपणासाठी पेटवलेली शेकोटी हाच काय तो प्रकाशाचा मार्ग होता. स्त्रियांचा स्वयंपाक हा शेकोटीपाशी चाले आणि घरात सर्वत्र साचलेल्या धुरामुळे श्वास घेणे कठीण होउन  बसे.


गुटेनबर्ग कुटुंबाच्या घरातील स्नानघर घराच्या मागील बाजूस असलेल्या खोलीत होते. सर्व मंडळी स्नाना साठी त्या खोलीचा वापर करीत. फक्त अतिथंड दिवसात आणि रात्रीच्या वेळी घरात एक मोठे घंगाळ ठेवले जाई. त्या काळात गावात सर्वजनिक स्नानगृहे होती. घरोघर रोजच्या रोज स्नानाची तितकीशी कुणाला सवय  नसे. गावातील रस्ते अरुंद व नागमोडी असत. शाळेत जाताना योहान रस्त्याने चालत जात असे. रस्त्यावर दुतर्फा ओळीने घरे असून तळमजल्या वर दुकाने असत. तीन चार मजल्यांच्या इमारती उंच असल्या तरी त्या प्रशस्त नव्हत्या. त्यांचे वरचे मजले रस्त्यावर पुढे झुकलेले असत. योहानेस रस्त्यावरून चालत जाताना त्याला जी अनेक दुकाने दिसत ती सारी कारागीर व व्यापा-यांच्या संघाची असत. या संघांना गिल्ड असे म्हणत. सुवर्णकारांचे, विणकरांचे, सुतारांचे संघ असत. व्यापा-यांचे संघ त्या त्या क्षेत्रातील कारागीरांना कच्चा माल पुरवीत. उदा. जड जवाहीर बनवणा-यांना सोने चांदी, विणकरांना कापड इ. व्यापा-यांच्या संघाकडूनच विकत घ्यावे लागे.


योहानचे कुटुंबीय मात्र कुठल्याही संघाचे सभासद नव्हते. ते खानदानी घराण्यातले असल्यामुळे त्यांच्यापाशी वडिलोपार्जित पैसाअडका आणि स्थावरजमिनी होत्या. त्यांना पोटापाण्यासाठी काम करण्याची आवश्यकता नव्हती. तरी त्यांच्यापैकी अनेक लोक शहराच्या कारभारात काम पाहत. 


योहानच्या कुटुंबाची गणना उच्च स्तरावरील लोकांमध्ये होत असे. त्यांचे कुटंब मेंझमध्ये कित्येक पिढ्यान पिढ्या असल्याने त्यांच्याकडे शहराच्या व्यवहारासाठी लागणाऱ्या चलनातली नाणी बनवणाऱ्या टांकसाळीची व्यवस्था होती. शहराचे व्यवस्थापन जे लोकांकडून करवसुली करत असे, त्याची जबाबदारी टांकसाळीकडे सोपवलेली होती.


त्या काळीही करवसुलीचे काम करणाऱ्या विषयी जनतेत अप्रियता असे. १४१० मधील हिवाळ्यात या खानदानी घराण्याच्या लोकांविषयी सर्व संघात असंतोष निर्माण झाला. कारण एकच होते, करवसुलीची सक्ती.


योहानचे पिता हे मेंझ नगरपरिषदेचे एक सदस्य होते. संघाचे प्रतिनिधी या नगरपरिषदेवर असूनही खानदानी घराण्याच्या मताधिक्यामुळे मेंझची सत्ता त्यांच्याकडे होती. परिषदेने बीअर, मद्य व धान्यावर कर बसवल्यामुळे संघाचे प्रतिनिधी संतापले.


१४११ च्या प्रारंभी मेंझच्या नागरिकांची परिस्थिती  खालावली. हिवाळा लांबल्याने लोकांना आपले पोट भरणे कठीण होउन बसले होते. त्यातच नगरपरिषदेने करवाढीचा प्रस्ताव मांडला. अगोदर रुष्ट असलेल्या संघाच्या प्रतिनिधींनी परिषदेवरची खानदानी लोकांची सत्ता हिसकावून घेतली. योहानचा पिता काळजीत पडला. मेंझचे काय होणार याची त्याला भीती वाटत होती. कारण गिल्डच्या सभासदांना कामकाजाची तितकीशी माहिती नव्हती. त्यांच्यातील अनेक तर निरक्षर होते.


या सत्ताबदलामुळे खानदानी घराण्यातील लोकांबरोबर योहानच्या पित्याचे टांकसाळीतले काम गेले. कुटुंबीय रस्त्यातून जाता येतांना लोकांकडून त्यांची अवहेलना होऊ लागली. योहानचे वय त्या वेळी अवघे तेरा असूनही त्याची या प्रकारातून सुटका झाली नाही. या कारणामुळे १४११ मध्ये योहानच्या कुटुंबीयांनी मेंझ सोडून अन्यत्र स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. एल्टविले  (Eltville) या मेंझपासून साडेसात मैलांवर असलेल्या गावी त्यांचे आपले असे एक घर होते, तेथे ते सारे राहण्यास गेले.


मेंझच्या गढूळलेल्या वातावरणापासुन दूर अशा एल्टविले येथे योहानने तीन वर्षे काढली. १४१४ मध्ये गिल्ड व खानदानी लोकांमध्ये समेट झाला. गेन्सफ़्लाईश कुटुंब पुनः गुटेनबर्ग वाड्यात परतले. योहानच्या पित्याचे परिषदेचे सदस्यत्व गेले. मोठ्या मुश्किलीने त्याला टांकसाळीची नोकरी मिळाली.


आता योहान सोळा वर्षांचा झाला होता. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण होउन तो आपल्या पित्याबरोबर काम करू लागला होता. त्याला टांकसाळीतील कामात रस उत्पन्न झाला. तेथे मेंझसाठी नाणी बनवण्याबरोबर सरकारी शिक्के, सोन्याचांदीचे दागिने आणि चित्रांच्या चौकटी यांचे काम चालत असे. टांकसाळीतील सुवर्णकार व जवाहिरे यांच्याकडून योहानेसने तेथील कामाचे तंत्र शिकून घेतले.


सुवर्णकार मंडळी ही त्या काळातील शहरातली महत्वाच्या कारागीर संघापैकी मानली जात असत. ते काम शिकण्यासाठी खूप उमेदवारी करावी लागे. शिकाउ उमेदवार हे मुख्य कारागीराच्या घरी राहत असत. व्यवसायाच्या खाचाखोचा शिकत असताना त्याना बरीच वर्षे कोणतेही वेतन असे मिळत नसे. योहानला मात्र तो खानदानी घराण्यातला असल्यामुळे त्याला उमेदवारी करावी लागली नाही. तसे पाहता खानदानी लोक हे गिल्डचे सभासद कधीच नव्हते.


नाणी पाडण्याच्या कामासह सोन्याचांदीचे दागिने बनवण्याच्या तंत्रात योहान वाकबगार झाला. त्यात मौल्यवान रत्ने कशी कापावी व त्यांना पैलू कसे पाडावेत, हा महत्वाचा भाग असतो. उत्तमरित्या पैलू पाडलेला हिरा, मणी हा आकर्षकपणे चमकतो. योहानेसला या कामात उत्तम सराव होण्यासाठी आपल्या कुटुंबाकडे  जडजवाहीर असलेली रत्ने, माणके मिळाली होती.


नाणे व दागिन्यांचे काम करत असताना योहानच्या मनात अचानक एक कल्पना आली. पुस्तकाची बांधणी करणारे कारागीर ग्रंथांच्या कव्हरवर शीर्षकाची पितळी अक्षरे वापरत असत. साच्यातून बनवलेली ही अक्षरे पाहून योहानला वाटले, की हे तंत्र वापरून जलद गतीने पुस्तके का  बनवू नयेत? मग पुस्तके पुष्कळ संख्येने निर्माण होउ शकतील. ज्याचे स्वप्न योहान लहानपणापासून पहात आला होता, त्याचे भविष्य त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. यातून आपल्याला अगणित पैसे मिळतील. योहानने ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे मनावर घेतले.

    संकलनातून 

बुधवार, २५ जानेवारी, २०२३

*@ २५ जानेवारी @* *राष्ट्रीय मतदार दिवस*


*@ २५ जानेवारी @*

*राष्ट्रीय मतदार दिवस*

********************************


२०११ सालापासून दरवर्षी २५ जानेवारीला भारतात ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला जात आहे. २५ जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. या दिवशी आयोजित विविध कार्यक्रमामधून विशेषत: नवीन पात्र मतदारांची नोंदणी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवशी निवडणूक प्रक्रियेतील प्रभावी सहभागासाठी मतदारांमध्ये जागृती निर्माण केली जाते. भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही भारतीय संविधानाद्वारे स्थापित केलेले एक स्वायत्त प्राधिकरण आहे आणि हे देशातील लोकसभा, राज्यसभा, राज्याच्या विधानसभा आणि राष्ट्रपती व उप-राष्ट्रपती यांची कार्यालये यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असते. 


१९६२ साली मतदानाची प्रक्रि‍या कागदी मताद्वारे केले जात होते. वर्ष २००४ पासून मतदानासाठी इलेक्‍ट्रॉनि‍क व्होटर यंत्रांचा (EVM) वापर होत आहे. ECI ची अधिकृत स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून ही तारीख घोषीत केली गेली. याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे. सुनील अरोरा हे वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त आहे.


निवडणूक जगतातली व्यवस्थापनेसंबंधी सर्वात मोठी घटना म्हणजे, एप्रिल-मे २००९ मध्ये पार पाडलेल्या १५ व्या लोकसभेच्या निवडणुकीत ७१४ दशलक्ष मतदार, ८.३५ लक्ष मतदान केंद्र, १२ लक्ष EVM आणि ११ दशलक्ष मतदान कर्मचार्‍यांनी भाग घेतला होता. आयोगाला असे आढळून आले की, मतदारांच्या यादीतून १८ वर्षांच्या नव्या मतदारांची नावे वगळली गेलीत. या समस्येला पाहता तेव्हापासून देशभरात ८.५ लक्ष मतदान केंद्रांवर दरवर्षी १ जानेवारीला १८ वर्ष पूर्ण करणार्‍या सर्व मतदारांची ओळख केली जाते आणि त्यांचे नोंदणी केली जाते.


*संकलन : गजानन गोपेवाड*


*संदर्भ : इंटरनेट*


********************************

२५ जानेवारी @* *राष्ट्रीय पर्यटन दिवस*

 ********************************

*@ २५ जानेवारी @*

*राष्ट्रीय पर्यटन दिवस*

********************************


आज राष्ट्रीय पर्यटन दिवस (National Tourism Day ) !


जगभरातील भारतातील पर्यटन स्थळांचा प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताला नैसर्गिक सौंदर्याची भूमी म्हटले जाते. २७ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक पर्यटन दिन' म्हणून जगभरात साजरा होतो. मात्र, २५ जानेवारी हा 'राष्ट्रीय पर्यटन दिवस' त्या प्रमाणावर साजरा होताना दिसत नाही. जगभरात २७ सप्टेंबरला 'जागतिक पर्यटन दिन' साजरा केला जात असला तरी भारतात आपला पर्यटन दिवस २५ जानेवारीला साजरा केला जातो. 


या दिवसाची सुरुवात १९४८ मध्ये झाली, जेव्हा देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन परिवहन समितीची स्थापना करण्यात आली. तीन वर्षांनंतर, म्हणजे १९५१ मध्ये दिल्ली, मुंबई व्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नई येथे पर्यटन कार्यालये सुरू करण्यात आली. वर्ष १९९८ मध्ये, पर्यटन आणि दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पर्यटन विभाग जोडण्यात आला.



*संदर्भ : इंटरनेट*


*संकलन : गजानन गोपेवाड ********************************

*❀ २५ जानेवारी ❀*

*रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉयल जन्मदिन*

********************************


जन्म - २५ जानेवारी १६२७ (आयर्लंड)

स्मृती - ३१ डिसेंबर १६९१ (इंग्लंड)


राबर्ट बॉयल (Robert Boyle) आधुनिक रसायनशास्त्र का प्रवर्तक, अपने युग के महान वैज्ञानिकों में से एक, लंदन की प्रसिद्ध रॉयल सोसायटी का संस्थापक तथा कॉर्क के अर्ल की १४वीं संतान था। बॉयल का जन्म आयरलैंड के मुंस्टर प्रदेश के लिसमोर कांसेल में हुआ था। घर पर इन्होंने लैटिन और फ्रेंच भाषाएँ सीखीं और ईटन में तीन वर्ष अध्ययन किया। 


१६३८ में इन्होंने फ्रांस की यात्रा की और लगभग एक वर्ष जेनेवा में भी अध्ययन किया। फ्लोरेंस में इन्होंने गैलिलियों के ग्रंथों का अध्ययन किया। १६४४ में जब ये इंग्लैंड पहुँचे, तो इनकी मित्रता कई वैज्ञानिकों से हो गई। ये लोग एक छोटी सी गोष्ठी के रूप में और बाद को ऑक्सफोर्ड में, विचार-विनियम किया करते थे। यह गोष्ठी ही आज की जगतप्रसिद्ध रॉयल सोसायटी है। 


१६४६ से बॉयल का सारा समय वैज्ञानिक प्रयोगों में बीतने लगा। १६५४ के बाद ये ऑक्सफोर्ड में रहे और यहँ इनका परिचय अनेक विचारकों एवं विद्वानों से हुआ। १४ वर्ष ऑक्सफोर्ड में रहकर इन्होंने वायु पंपों पर विविध प्रयोग किए और वायु के गुणों का अच्छा अध्ययन किया। वायु में ध्वनि की गति पर भी काम किया। बॉयल के लेखों में इन प्रयोगों का विस्तृत वर्णन है। धर्मसाहित्य में भी इनकी रुचि थी और इस संबंध में भी इन्होंने लेख लिखे। इन्होंने अपने खर्च से कई भाषाओं में बाइबिल का अनुवाद कराया और ईसाई मत के प्रसार के लिए बहुत सा धन भी दिया।


रॉबर्ट बॉयल की सर्वप्रथम प्रकाशित वैज्ञानिक पुस्तक न्यू एक्सपेरिमेंट्स, फ़िज़िको मिकैनिकल, टचिंग द स्प्रिंग ऑव एयर ऐंड इट्स एफेक्ट्स, वायु के संकोच और प्रसार के संबंध में है। १६६३ में रॉयल सोसायटी की विधिपूर्वक स्थापना हुई। बॉयल इस समय इस संस्था के सदस्य मात्र थे। बॉयल ने इस संस्था से प्रकाशिल शोधपत्रिका "फिलोसॉफिकल ट्रैंजैक्शन्स" में अनेक लेख लिखे और १६८० में ये इस संस्था के अध्यक्ष निर्वाचित हुए। पर शपथसंबंधी कुछ मतभेद के कारण इन्होंने यह पद ग्रहण करना अस्वीकार किया। 


कुछ दिनों बॉयल की रुचि कीमियागिरी में भी रही और अधम धातुओं को उत्तम धातुओं में परिवर्त्तित करने के संबंध में भी इन्होंने कुछ प्रयोग किए। चतुर्थ हेनरी ने कीमियागिरी के विरुद्ध कुछ कानून बना रखे थे। बॉयल के यत्न से ये कानून १६८९ में उठा लिए गए।


बॉयल ने तत्वों की प्रथम वैज्ञानिक परिभाषा दी और बताया कि अरस्तू के बताए गए तत्वों, अथवा क़ीमियाईगरों के तत्वों (पारा, गंधक और लवण) में से कोई भी वस्तु तत्व नहीं है, क्योंकि जिन पिंडों में (जैसे धातुओं में) इनका होना बताया जाता है उनमें से ये निकाले नहीं जा सकते। तत्वों के संबंध में १६६१ में बॉयल ने एक महत्वपूर्ण पुस्तिका लिखी "दी स्केप्टिकल केमिस्ट"। 


रसायन प्रयोगशाला में प्रचलित कई विधियों का बॉयल ने आविष्कार किया, जैसे कम दाब पर आसवन। बॉयल के गैस संबंधी नियम, उसके दहन संबंधी प्रयोग, हवा में धातुओं के जलने पर प्रयोग, पदार्थों पर ऊष्मा का प्रभाव, अम्ल और क्षारों के लक्षण और उनके संबंध में प्रयोग, ये सब युगप्रवर्तक प्रयोग थे जिन्होंने आधुनिक रसायन को जन्म दिया। 


बॉयल ने द्रव्य के कणवाद का प्रचलन किया, जिसकी अभिव्यक्ति डाल्टन के परमाणुवाद में हुई। उनके अन्य कार्य मिश्रधातु, फॉस्फोरस, मेथिल ऐलकोहल (वुड स्पिरिट), फॉस्फोरिक अम्ल, चाँदी के लवणों पर प्रकाश का प्रभाव आदि विषयक हैं।


बॉयल जीवन भर अविवाहित रहे। बेकन के तत्वदर्शन में उन्हें बड़ी आस्था थी। अमर वैज्ञानिकों में उनकी आज तक गणना होती है। १६६० के बाद में उनका स्वास्थ्य गिरने लगा, किंतु रसायन संबंधी कार्य इस समय भी बंद न हुआ। १६६१ में उनका देहांत हो गया।


*संकलन : गजानन गोपेवाड


*संदर्भ : विकिपीडीया ********************************

*❀ २५ जानेवारी ❀*

*सुधारक रमाबाई रानडे जन्मदिन स्मृतिदिन*

********************************


जन्म - २५ जानेवारी १८६२ (सातारा)

स्मृती - २५ जानेवारी १९२४ (पुणे)


रमाबाई रानडे या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुनाबाई कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म सातारा जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. 


महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्‍नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदी आणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले.


न्यायमूर्ती रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतले. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी 'हिंदू लेडीज सोशल क्लब'ची मुंबईमध्ये स्थापना केली. पुण्यातील 'सेवा सदन' या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुण्यात मुलींसाठी 'हुजुरपागा' शाळेची स्थापना केली. त्यांनी आपला जीवनपट 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवला आहे.


१९०१ मध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या मृत्यूनंतर त्यांनी आपले जीवन पूर्णपणे राष्ट्र्कार्याला अर्पण केले. त्या सतत पुण्याच्या येरवडा येथील मानसिक रुग्णालयाला आणि मध्यवर्ती तुरुंगाला स्वेच्छेने भेट देऊ लागल्या. स्त्री कैद्यांच्या सामुदायिक प्रार्थना सभांना हजर राहून त्यांचे मनोबळ वाढवून जीवनाचा एक नवीन मार्ग दाखवण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. मनोरुग्णांच्या इस्पितळाच्या कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहून रुग्णालयाच्या समस्यांकडे त्या लक्ष देत असत. याशिवाय, रमाबाई सामाजिक बांधिलकी म्हणून अन्य रुग्णालयांनाही भेट देत, रुग्णांची आपुलकीने चौकशी करत व त्यांच्यासाठी फळे, फुले आणि पुस्तके घेऊन जात असत. रमाबाई बालसुधारगृहांना भेट देऊन मुलांशी गप्पा मारत आणि सणासुदीच्या दिवशी खाऊ आणि मिठाई वाटत असत.


रमाबाईंची दानशूर वृत्ती भौगोलिक सीमा जुमानणारी नव्हती, त्यांनी १९१३ मध्ये गुजरात आणि काठेवाड येथील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन दुष्काळ पीडितांना मदत केली. आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये त्या आपल्या सेवा सदनच्या कार्यकर्त्यांसोबत आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी आळंदीला जात असत. तेथे सेवा सदनच्या कार्यकर्त्या वारीला आलेल्या स्त्री वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करीत असत. त्यांच्या अशा सामाजिक कार्यांतून समाजसेवेच्या कार्यांत एकूणच स्त्रियांचा सहभाग वाढत गेला. 


१९०४ मध्ये जेव्हा रामकृष्ण गोपाळ भांडारकर, श्री. भाजेकर आणि सामजिक चळवळीतील नेत्यांनी अखिल भारतीय महिला परिषद आयोजित करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी रमाबाईंकडे या कार्याची सूत्रे सपूर्द केली. रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे पहिले अधिवेशन डिसेंबर १९०४ रोजी मुंबई येथे भरले होते.


१९०८ मध्ये बी.एम. मलबारी आणि दयाराम गिडुमल हे रमाबाईंकडे स्त्रियांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण देऊन समाजात रुग्णसेविका निर्माण करण्याची कल्पना घेऊन आले. त्यातूनच मग रमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली सेवा सदन, मुंबईची स्थापना झाली. १९१५ साली, सेवा सदन, पुणे उदयास आली आणि मग अनेक शाखांमार्फत संस्था विस्तारत गेली. मुलींचे प्रशिक्षण केंद्र, तीन वसतीगृहे असे अनेक उपक्रम सेवा सदनमार्फत राबवले गेले.


१९२४ मध्ये, रमाबाईंच्या मृत्यूसमयी पुण्याच्या सेवा सदनमधील विविध उपक्रमांमध्ये १०००हून अधिक महिला प्रशिक्षण घेत होत्या. सेवा सदनचा झपाट्याने झालेला विस्तार आणि प्रसार हा रमाबाईंच्या ध्यासाचेच द्योतक आहे. समाजातील रूढ समजुतींच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन समाजाचे मतपरिवर्तन करून सेवेचे अखंडित व्रत सुरू ठेवण्यातच रमाबाईंच्या जीवनाची इतिकर्तव्यता होती. 


रमाबाईंच्या आयुष्यातील अजून दोन अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे, स्त्रियांसाठी अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची मागणी करण्यासाठी केलेले आंदोलन आणि १९२१-२२ मध्ये मुंबई प्रांतात स्थापन केलेली पीडित महिलांची संघटना. रमाबाईंच्या समाजातील अतुलनीय कामगिरीची दखल खुद्द महात्मा गांधीनी घेतली. 


गांधीनी लिहिलेल्या शोकसंदेशाचा मजकूर, "रमाबाई रानडे यांचा मृत्यू ही राष्ट्राची मोठी हानी आहे. हिंदू विधवांसाठी रमाबाई या मोठा आधारस्तंभ होत्या. त्यांच्या नामांकित पतीच्या सामाजिक चळवळीत एका सच्च्या सहधर्मचारिणी प्रमाणेच त्या नेहमी वागल्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी सामाजिक चळवळीलाच आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले. न्यायमूर्ती रानडे हे एक क्रांतिकारी विचारवंत आणि भारतीय स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेची कळकळ असणारे असे होते. ते त्यासाठी सतत झटत राहिले. रमाबाईंनी सेवा सदन मध्ये आपले आयुष्य ओतले. मनापासून आपल्या सर्व शक्तीनिशी त्यांनी सेवा सदन उभे केले. सेवा सदन ही संपूर्ण भारतातील या धर्तीची एकमेव संघटना आहे." भारतीय डाक आणि तार विभागाने रमाबाईंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याच्या गौरवाप्रीत्ययर्थ खास पोस्टाचे तिकीट काढले होते.


*ठळक घटना* :


रमाबाई या आधुनिक स्त्री चळवळीच्या अग्रणी नेत्या होत्या. स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या खंबीर आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्‍न केले.


महादेव रानडे हे पुण्यात उपन्यायाधीश होते. अतिशय पारदर्शी न्यायनिवाडा करणारे आणि मानवतावादी दृष्टिकोन असणारे न्यायाधीश असा त्यांचा लौकिक होता. समाजातील वाईट रूढी, परंपरा यांना विरोध करत त्यांनी अस्पृश्यता, बालविवाह आणि सती या प्रथांविरोधात आवाज उठवला. मुंबई प्रांतात पहिला पुनर्विवाह संमत करून तो पार पाडणारे ते प्रथमच. त्यांनी स्त्री शिक्षण आणि समान अधिकाराची मागणी पुढे करण्यासाठी अनेक सार्वजनिक सभा आणि चळवळी उभारल्या. महाराष्ट्रातील विचारवंत मंडळींमध्ये महादेव रानडे हे नाव, त्यांच्या ऐन तिशी मध्येच दाखल झाले.


आपल्या पतीच्या सामजिक आयुष्याचा भाग बनून त्यांची मदत करण्याच्या ध्यासाने रमाबाईंनी शिक्षणाची कास धरली. त्या सर्वप्रथम एक उत्तम विद्यार्थी बनल्या, मग हळूहळू त्या महादेव रानड्यांच्या सचिव झाल्या, आणि शेवटी त्या एक उत्तम सहकारी व मित्र झाल्या. महादेवराव सुरुवातीला रमाबाईंना साधी अक्षर ओळख, मराठी वाचन करवून घेत. मग इतिहास, भूगोल, गणित आणि इंग्रजीचेही धडे त्यांनी रमाबाईंना दिले. पुढे रोजचे वर्तमानपत्र ते रमाबाईंना वाचावयास लावून घडलेल्या घटनांवर त्यांच्याशी चर्चा करत. रमाबाईंना इंग्रजी वाङ्मयाची विशेष गोडी निर्माण झाली होती.


रमाबाईंनी स्वतःच्या आयुष्यातील घटना शब्दरूप करून मराठी वाङ्‌मयाला एक मोठी देणगी दिली आहे. तसेच त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांची धर्मशास्त्रावरील अनेक भाषणे प्रकाशित केली.


रमाबाईंनी सर्वप्रथम जाहीर भाषण नाशिक हायस्कूल मध्ये एका कार्यक्रमात केले. रमाबाईंनी मराठी आणि इंग्रजी भाषेवर नैपुण्य मिळवले होते. त्यांची भाषणे ही अत्यंत साध्या भाषेतली, श्रोत्यांच्या मनाला भिडणारी असत. त्यांनी मुंबई मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली. १८९३ ते १९०१ या काळात त्यांच्या सामाजिक कर्तृत्वाचा आलेख हा सतत उंचवणारा होता. त्यांनी हिंदू लेडीज सोशल आणि लिटररी क्लबची मुंबईत स्थापना केली, तसेच महिलांना भाषा, सामान्य ज्ञान, शिवणकाम आणि हस्तकला यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले.


पतीच्या निधनानंतरचा काही काळ हा दु:खादायक आणि निराशाजनक होता. त्या मुंबई सोडून पुण्याला परत गेल्या आणि फुले मंडई जवळच्या आपल्या जुन्या वाड्यात राहू लागल्या. सुमारे एक वर्ष त्यांनी एकाकी आयुष्य व्यतीत केले. स्वतःवर लादलेल्या या एकांतवासानंतर त्या सामाजिक आयुष्यात सक्रिय झाल्या आणि त्यांनी भारत महिला परिषदेचे मुंबई मध्ये आयोजन केले. पतीच्या मृत्यूनंतर आयुष्याची २४ वर्षे रमाबाईंनी समाज जागृती आणि सेवा सदन सारख्या पीडित महिलांना सशक्त बनवणाऱ्या सामाजिक चळवळी उभारण्यात वाहून घेतली.


रमाबाई स्त्री शिक्षण, न्याय्य हक्क, समान अधिकार आणि समाज सुधारणेसाठी अविरत झटल्या. त्यांनी स्त्रियांना प्रशिक्षित रुग्णसेवा ही केवळ एक सेवा नव्हे तर उपजिवीकेचे साधन म्हणून स्वीकारण्यास सांगितले. त्या काळी रुग्णसेवा ही व्यावसायिकदृष्ट्या समाजात रूढ नव्हती आणि स्त्रियांसाठी तर ही दारे नेहमीच बंद होती. महिलांना धीर देऊन या क्षेत्रात पुढे आणण्यासाठी त्या विचारत, "तुम्ही तुमच्या आजारी वडील किंवा भावाची सेवा करता ना? सगळे पुरुष रोगी हे आपल्या भावासमान आहेत आणि त्यांची सेवा हे आपले कर्तव्यच आहे." त्यांचे विचार ऐकून अधिकाधिक महिला पुढे आल्या. 


रुग्णसेवेच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी अतुलनीय आहे. सेवा सदन मधूनच पहिली भारतीय नर्स समाजात वावरू लागली. समाजाच्या रूढींना झुगारून स्त्रीस्वावलंबनासाठी रुग्णसेवेची दारे उघडून अनेक गरजू महिलांना नवा मार्ग दाखवला. तरूण मुली आणि विधवांसाठी सेवा सदन एक मोठा आधार होता.


सेवा सदनच्या एका वार्षिक समारंभात एका विधवेला बक्षिस जाहीर झाले होते. अळवण नेसलेली ती विधवा जेव्हा पुढे आली तेव्हा उपस्थित विद्यार्थ्यांनी आवाज केला. हे त्यांचे वागणे रमाबाईंना मुळीच आवडले नाही. समारंभाच्या शेवटी आभाराचे भाषण करताना त्या म्हणाल्या, "तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात पण मी तुम्हाला सुशिक्षित कसे म्हणू? समाजातील अनिष्ट रूढींना बळी पडलेल्या आपल्या भगिनींबद्दल ज्यांच्या मनात साधी माणुसकी नसून त्या केवळ एक थट्टेचा विषय वाटतात त्यांना मी सुशिक्षित कसे मानू? तुमच्यातील प्रत्येकाच्या घरी एखादी अशीच अभागी विधवा असू शकते, ती तुमची बहीण, चुलती, तुमची आत्या किंवा तुमची स्वतःची आई देखील असू शकते. ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही असे वागणार नाही." त्यांचे हे कठोर शब्द उपस्थितांना फटकाऱ्यांसारखे लागले.


त्यांनी बालविवाहाच्या अनिष्ट रूढीविरोधात अविरत मोहीम चालवली. मध्यम वर्गातील अनेक अभागी निराधार महिलांना सेवासदनमार्फत त्यांनी मदत केली. पुण्यातील आपल्या वडिलोपार्जित वाड्यातून सुरू केलेले सेवा सदन हे उत्तरोत्तर वाढतच गेले. रमाबाईंनी जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी फिजी आणि केनिया मधील भारतीय मजुरांच्या समस्यांवर देखील आवाज उठवला.


समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्या कार्याचा गौरव झाल्यानंतर देखील आपण केवळ आपल्या पतीची सावली बनण्याचा प्रयत्‍न करीत असल्याचे त्या नम्रपणे सांगत असत. रमाबाई रानडे यांनी १९ व्या शतकामध्ये स्त्री शिक्षणावर आपली स्वतंत्र मते व्यक्त करून स्त्री सुधारणा करण्यास मोलाची मदत केली. रमाबाईंच्या सन्मानाप्रीत्यर्थ भारतीय टपाल खात्याने १५ ऑगस्ट १९६२ ला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले.


*संदर्भ : विकिपीडिया*


******************************** ********************************

*@ २५ जानेवारी @*

*राष्ट्रीय मतदार दिवस*

********************************


२०११ सालापासून दरवर्षी २५ जानेवारीला भारतात ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला जात आहे. २५ जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. या दिवशी आयोजित विविध कार्यक्रमामधून विशेषत: नवीन पात्र मतदारांची नोंदणी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवशी निवडणूक प्रक्रियेतील प्रभावी सहभागासाठी मतदारांमध्ये जागृती निर्माण केली जाते. भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही भारतीय संविधानाद्वारे स्थापित केलेले एक स्वायत्त प्राधिकरण आहे आणि हे देशातील लोकसभा, राज्यसभा, राज्याच्या विधानसभा आणि राष्ट्रपती व उप-राष्ट्रपती यांची कार्यालये यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असते. 


१९६२ साली मतदानाची प्रक्रि‍या कागदी मताद्वारे केले जात होते. वर्ष २००४ पासून मतदानासाठी इलेक्‍ट्रॉनि‍क व्होटर यंत्रांचा (EVM) वापर होत आहे. ECI ची अधिकृत स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून ही तारीख घोषीत केली गेली. याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे. सुनील अरोरा हे वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त आहे.


निवडणूक जगतातली व्यवस्थापनेसंबंधी सर्वात मोठी घटना म्हणजे, एप्रिल-मे २००९ मध्ये पार पाडलेल्या १५ व्या लोकसभेच्या निवडणुकीत ७१४ दशलक्ष मतदार, ८.३५ लक्ष मतदान केंद्र, १२ लक्ष EVM आणि ११ दशलक्ष मतदान कर्मचार्‍यांनी भाग घेतला होता. आयोगाला असे आढळून आले की, मतदारांच्या यादीतून १८ वर्षांच्या नव्या मतदारांची नावे वगळली गेलीत. या समस्येला पाहता तेव्हापासून देशभरात ८.५ लक्ष मतदान केंद्रांवर दरवर्षी १ जानेवारीला १८ वर्ष पूर्ण करणार्‍या सर्व मतदारांची ओळख केली जाते आणि त्यांचे नोंदणी केली जाते.


*संकलन :गजानन गोपेवाड


*संदर्भ : इंटरनेट*

२५ जानेवारी रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉयल वाढदिवस


  २५ जानेवारी 

 रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉयल वाढदिवस

 ,


 जन्म - 25 जानेवारी 1627 (आयर्लंड)

 मेमरी - ३१ डिसेंबर १६९१ (इंग्लंड)


 रॉबर्ट बॉयल हे आधुनिक रसायनशास्त्राचे संस्थापक, त्यांच्या काळातील महान शास्त्रज्ञांपैकी एक, लंडनच्या प्रसिद्ध रॉयल सोसायटीचे संस्थापक आणि अर्ल ऑफ कॉर्कचे 14 वे मूल होते.  बॉयलचा जन्म लिस्मोर कॉन्सेल, मुन्स्टर काउंटी, आयर्लंड येथे झाला.  घरी, तो लॅटिन आणि फ्रेंच शिकला आणि तीन वर्षे इटनमध्ये शिकला.


 1638 मध्ये त्यांनी फ्रान्सला प्रवास केला आणि जिनिव्हा येथे सुमारे एक वर्ष अभ्यास केला.  फ्लॉरेन्समध्ये त्यांनी गॅलिलिओच्या कामांचा अभ्यास केला.  1644 मध्ये जेव्हा ते इंग्लंडला पोहोचले तेव्हा त्यांची अनेक शास्त्रज्ञांशी मैत्री झाली.  हे लोक एका छोट्या गटाच्या स्वरूपात आणि नंतर ऑक्सफर्डमध्ये विचारांची देवाणघेवाण करायचे.  ही परिषद म्हणजे आजची जगप्रसिद्ध रॉयल सोसायटी.


 1646 पासून, बॉयलचा सर्व वेळ वैज्ञानिक प्रयोगांमध्ये घालवला जाऊ लागला.  1654 नंतर, ते ऑक्सफर्डमध्ये राहिले आणि येथे त्यांची अनेक विचारवंत आणि विद्वानांशी ओळख झाली.  ऑक्सफर्डमध्ये 14 वर्षे राहून त्यांनी हवेच्या पंपांवर विविध प्रयोग केले आणि हवेच्या गुणधर्मांचा चांगला अभ्यास केला.  हवेतील आवाजाच्या वेगावरही काम केले.  बॉयलच्या लेखनात या प्रयोगांचे तपशीलवार वर्णन केले आहे.  त्यांना धार्मिक साहित्यातही रस होता आणि त्यांनी या संदर्भात लेखही लिहिले.  त्यांनी स्वखर्चाने बायबलचे अनेक भाषांमध्ये भाषांतर करून घेतले आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी भरपूर पैसाही दिला.


 रॉबर्ट बॉयलचे पहिले प्रकाशित वैज्ञानिक पुस्तक म्हणजे न्यू एक्सपेरिमेंट्स, फिजिको-मेकॅनिकल, टचिंग द स्प्रिंग ऑफ एअर अँड इट्स इफेक्ट्स, ऑन द कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपेन्शन ऑफ एअर.  1663 मध्ये रॉयल सोसायटीची औपचारिक स्थापना झाली.  यावेळी बॉयल केवळ या संस्थेचे सदस्य होते.  या संस्थेतून प्रकाशित होणाऱ्या ‘फिलॉसॉफिकल ट्रान्झॅक्शन्स’ या जर्नलमध्ये बॉयलने अनेक लेख लिहिले आणि 1680 मध्ये ते या संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.  मात्र शपथेशी संबंधित काही मतभेदांमुळे त्यांनी हे पद घेण्यास नकार दिला.


 काही दिवसांपासून बॉयलला रसायनशास्त्रातही रस होता आणि त्याने मूळ धातूंचे उदात्त धातूंमध्ये रूपांतर करण्याच्या संदर्भात काही प्रयोगही केले.  चौथ्या हेन्रीने किमयाविरुध्द काही कायदे केले होते.  बॉयलच्या प्रयत्नांमुळे हे कायदे १६८९ मध्ये उठवण्यात आले.


 बॉयलने मूलद्रव्यांची पहिली वैज्ञानिक व्याख्या दिली आणि निदर्शनास आणून दिले की अॅरिस्टॉटलने वर्णन केलेले कोणतेही मूलद्रव्य किंवा अल्केमिस्टचे मूलद्रव्य (पारा, गंधक आणि क्षार) मूलद्रव्ये नाहीत, कारण ज्या शरीरात ते अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते (जसे. धातू म्हणून) हे त्यांच्यापासून काढले जाऊ शकत नाहीत.  1661 मध्ये, बॉयलने घटकांबद्दल "द स्केप्टिकल केमिस्ट" एक महत्त्वपूर्ण पुस्तिका लिहिली.


 बॉयलने रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत वापरल्या जाणार्‍या अनेक पद्धतींचा शोध लावला, जसे की कमी दाबाखाली ऊर्धपातन.  बॉयलचे वायूचे नियम, त्याचे ज्वलनाचे प्रयोग, हवेतील धातू जाळण्याचे प्रयोग, पदार्थांवर उष्णतेचा परिणाम, आम्ल आणि क्षारांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या संबंधात केलेले प्रयोग, हे सर्व युगप्रवर्तक प्रयोग होते ज्यांनी आधुनिक रसायनशास्त्राला जन्म दिला.


 बॉयलने पदार्थाचा कणवाद मांडला, जो डाल्टनच्या अणुवादात व्यक्त झाला होता.  त्यांची इतर कामे मिश्र धातु, फॉस्फरस, मिथाइल अल्कोहोल (वुड स्पिरिट), फॉस्फोरिक ऍसिड, चांदीच्या क्षारांवर प्रकाशाचा प्रभाव इत्यादींशी संबंधित आहेत.


 बॉयल आयुष्यभर ब्रह्मचारी राहिला.  त्यांचा बेकनच्या तत्त्वज्ञानावर प्रचंड विश्वास होता.  आजपर्यंतच्या अमर शास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना होते.  1660 नंतर त्यांची तब्येत ढासळू लागली, परंतु रासायनिक कार्य यावेळीही थांबले नाही.  

    ✍️  संकलन .....गजानन गोपेवाड




 ,

बुधवार, ४ जानेवारी, २०२३

गुरु गोविन्द सिंह*

 


*🇮🇳 आझादी का अमृत महोत्सव 🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳

                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : गजानन गोपेवाड                                                   

➿➿➿➿➿➿➿➿➿

⚜️📚✍️🇮🇳👳‍♂️🇮🇳🏇🤺⚜️     


            *गुरु गोविन्द सिंह*

            *दशम सिख गुरु,*

        *खालसा के संस्थापक*


       *जन्म : गोविन्द राय*

        *5 जनवरी 1666*

         (पटना बिहार, भारत)


     *मृत्यु : 7 अक्टूबर 1708*

       (नांदेड़, महाराष्ट्र, भारत)


पदवी : सिखों के दसवें गुरु

प्रसिद्धि कारण : दसवें सिख गुरु,     

                     सिख खालसा सेना  

                     के संस्थापक 

                      एवं प्रथम सेनापति

पूर्वाधिकारी : गुरु तेग बहादुर

उत्तराधिकारी : गुरु ग्रंथ साहिब

जीवनसाथी : माता जीतो, 

                   माता सुंदरी,

                   माता साहिब दीवान

बच्चे : अजीत सिंह, जुझार सिंह,      

          जोरावर सिंह, फतेह सिंह

माता-पिता : गुरु तेग बहादुर, 

                   माता गूजरी


गुरु गोबिन्द सिंह सिखों के दसवें गुरु थे। उनके पिता गुरू तेग बहादुर की मृत्यु के उपरान्त ११ नवम्बर सन १६७५ को वे गुरू बने। वह एक महान योद्धा, कवि, भक्त एवं आध्यात्मिक नेता थे। सन १६९९ में बैसाखी के दिन उन्होने खालसा पन्थ की स्थापना की जो सिखों के इतिहास का सबसे महत्वपूर्ण दिन माना जाता है।


      *सिख सतगुरु एवं भक्त*


सतगुरु नानक देव · सतगुरु अंगद देव

सतगुरु अमर दास  · सतगुरु राम दास 

सतगुरु अर्जन देव  ·सतगुरु हरि गोबिंद  

सतगुरु हरि राय  · सतगुरु हरि कृष्ण

सतगुरु तेग बहादुर  · सतगुरु गोबिंद सिंह

भक्त कबीर जी  · शेख फरीद

भक्त नामदेव


             *धर्म ग्रंथ*


आदि ग्रंथ साहिब · दसम ग्रंथ

सम्बन्धित विषय

गुरमत ·विकार ·गुरू

गुरद्वारा · चंडी ·अमृत

नितनेम · शब्दकोष

लंगर · खंडे बाटे की पाहुल

गुरू गोबिन्द सिंह ने सिखों की पवित्र ग्रन्थ गुरु ग्रंथ साहिब को पूरा किया तथा उन्हें गुरु रूप में सुशोभित किया। बिचित्र नाटक को उनकी आत्मकथा माना जाता है। यही उनके जीवन के विषय में जानकारी का सबसे महत्वपूर्ण स्रोत है। यह दसम ग्रन्थ का एक भाग है। दसम ग्रन्थ, गुरू गोबिन्द सिंह की कृतियों के संकलन का नाम है।


उन्होने मुगलों या उनके सहयोगियों (जैसे, शिवालिक पहाडियों के राजा) के साथ १४ युद्ध लड़े। धर्म के लिए समस्त परिवार का बलिदान उन्होंने किया, जिसके लिए उन्हें 'सरबंसदानी' (सर्ववंशदानी) भी कहा जाता है। इसके अतिरिक्त जनसाधारण में वे कलगीधर, दशमेश, बाजांवाले आदि कई नाम, उपनाम व उपाधियों से भी जाने जाते हैं।


गुरु गोविंद सिंह जहां विश्व की बलिदानी परम्परा में अद्वितीय थे, वहीं वे स्वयं एक महान लेखक, मौलिक चिंतक तथा संस्कृत सहित कई भाषाओं के ज्ञाता भी थे। उन्होंने स्वयं कई ग्रंथों की रचना की। वे विद्वानों के संरक्षक थे। उनके दरबार में ५२ कवियों तथा लेखकों की उपस्थिति रहती थी, इसीलिए उन्हें 'संत सिपाही' भी कहा जाता था। वे भक्ति तथा शक्ति के अद्वितीय संगम थे।


उन्होंने सदा प्रेम, एकता, भाईचारे का संदेश दिया। किसी ने गुरुजी का अहित करने की कोशिश भी की तो उन्होंने अपनी सहनशीलता, मधुरता, सौम्यता से उसे परास्त कर दिया। गुरुजी की मान्यता थी कि मनुष्य को किसी को डराना भी नहीं चाहिए और न किसी से डरना चाहिए। वे अपनी वाणी में उपदेश देते हैं भै काहू को देत नहि, नहि भय मानत आन। वे बाल्यकाल से ही सरल, सहज, भक्ति-भाव वाले कर्मयोगी थे। उनकी वाणी में मधुरता, सादगी, सौजन्यता एवं वैराग्य की भावना कूट-कूटकर भरी थी। उनके जीवन का प्रथम दर्शन ही था कि धर्म का मार्ग सत्य का मार्ग है और सत्य की सदैव विजय होती है।


🤱🏻 *गुरु गोबिन्द सिंह का जन्म* ( *पटना साहिब*)


गुरु गोविंद सिंह का जन्म नौवें सिख गुरु गुरु तेगबहादुर और माता गुजरी के घर पटना में 05 जनवरी १६६६ को हुआ था। जब वह पैदा हुए थे उस समय उनके पिता असम में धर्म उपदेश को गये थे। उनके बचपन का नाम गोविन्द राय था। पटना में जिस घर में उनका जन्म हुआ था और जिसमें उन्होने अपने प्रथम चार वर्ष बिताये थे, वहीं पर अब तखत श्री पटना साहिब स्थित है।

            १६७० में उनका परिवार फिर पंजाब आ गया। मर्च १६७२ में उनका परिवार हिमालय के शिवालिक पहाड़ियों में स्थित चक्क नानकी नामक स्थान पर आ गया। यहीं पर इनकी शिक्षा आरम्भ हुई। उन्होंने फारसी, संस्कृत की शिक्षा ली और एक योद्धा बनने के लिए सैन्य कौशल सीखा। चक नानकी ही आजकल आनन्दपुर साहिब कहलता है।

               गोविन्द राय जी नित्य प्रति आनंदपुर साहब में आध्यात्मिक आनंद बाँटते, मानव मात्र में नैतिकता, निडरता तथा आध्यात्मिक जागृति का संदेश देते थे। आनंदपुर वस्तुतः आनंदधाम ही था। यहाँ पर सभी लोग वर्ण, रंग, जाति, संप्रदाय के भेदभाव के बिना समता, समानता एवं समरसता का अलौकिक ज्ञान प्राप्त करते थे। गोविन्द जी शांति, क्षमा, सहनशीलता की मूर्ति थे।


काश्मीरी पण्डितों का जबरन धर्म परिवर्तन करके मुसलमान बनाये जाने के विरुद्ध शिकायत को लेकर तथा स्वयं इस्लाम न स्वीकारने के कारण ११ नवम्बर १६७५ को औरंगजेब ने दिल्ली के चांदनी चौक में सार्वजनिक रूप से उनके पिता गुरु तेग बहादुर का सिर कटवा दिया। इसके पश्चात वैशाखी के दिन २९ मार्च १६७६ को गोविन्द सिंह सिखों के दसवें गुरु घोषित हुए।


१०वें गुरु बनने के बाद भी उनकी शिक्षा जारी रही। शिक्षा के अन्तर्गत लिखना-पढ़ना, घुड़सवारी तथा धनुष चलाना आदि सम्मिलित था। १६८४ में उन्होने चंडी दी वार कि रचना की। १६८५ तक वह यमुना नदी के किनारे पाओंटा नामक स्थान पर रहे।


गुरु गोबिन्द सिंह की तीन पत्नियाँ थीं। 21जून, 1677 को 10 साल की उम्र में उनका विवाह माता जीतो के साथ आनंदपुर से 10 किलोमीटर दूर बसंतगढ़ में किया गया। उन दोनों के 3 पुत्र हुए जिनके नाम थे – जुझार सिंह, जोरावर सिंह, फ़तेह सिंह। 4 अप्रैल, 1684 को 17 वर्ष की आयु में उनका दूसरा विवाह माता सुंदरी के साथ आनंदपुर में हुआ। उनका एक बेटा हुआ जिसका नाम था अजित सिंह। 15 अप्रैल, 1700 को 33 वर्ष की आयु में उन्होंने माता साहिब देवन से विवाह किया। वैसे तो उनका कोई संतान नहीं था पर सिख धर्म के पन्नों पर उनका दौर भी बहुत प्रभावशाली रहा।


🎠 *आनन्दपुर साहिब को छोड़कर जाना और वापस आना*


अप्रैल 1685 में, सिरमौर के राजा मत प्रकाश के निमंत्रण पर गुरू गोबिंद सिंह ने अपने निवास को सिरमौर राज्य के पांवटा शहर में स्थानांतरित कर दिया। सिरमौर राज्य के गजट के अनुसार, राजा भीम चंद के साथ मतभेद के कारण गुरु जी को आनंदपुर साहिब छोड़ने के लिए मजबूर किया गया था और वे वहाँ से टोका शहर चले गये। मत प्रकाश ने गुरु जी को टोका से सिरमौर की राजधानी नाहन के लिए आमंत्रित किया। नाहन से वह पांवटा के लिए रवाना हुऐ| मत प्रकाश ने गढ़वाल के राजा फतेह शाह के खिलाफ अपनी स्थिति मजबूत करने के उद्देश्य से गुरु जी को अपने राज्य में आमंत्रित किया था। राजा मत प्रकाश के अनुरोध पर गुरु जी ने पांवटा में बहुत कम समय में उनके अनुयायियों की मदद से एक किले का निर्माण करवाया। गुरु जी पांवटा में लगभग तीन साल के लिए रहे और कई ग्रंथों की रचना की। 


सन 1687 में नादौन की लड़ाई में, गुरु गोबिंद सिंह, भीम चंद, और अन्य मित्र देशों की पहाड़ी राजाओं की सेनाओं ने अलिफ़ खान और उनके सहयोगियों की सेनाओ को हरा दिया था। विचित्र नाटक (गुरु गोबिंद सिंह द्वारा रचित आत्मकथा) और भट्ट वाहिस के अनुसार, नादौन पर बने व्यास नदी के तट पर गुरु गोबिंद सिंह आठ दिनों तक रहे और विभिन्न महत्वपूर्ण सैन्य प्रमुखों का दौरा किया।


भंगानी के युद्ध के कुछ दिन बाद, रानी चंपा (बिलासपुर की विधवा रानी) ने गुरु जी से आनंदपुर साहिब (या चक नानकी जो उस समय कहा जाता था) वापस लौटने का अनुरोध किया जिसे गुरु जी ने स्वीकार किया। वह नवंबर 1688 में वापस आनंदपुर साहिब पहुंच गये।


1695 में, दिलावर खान (लाहौर का मुगल मुख्य) ने अपने बेटे हुसैन खान को आनंदपुर साहिब पर हमला करने के लिए भेजा। मुगल सेना हार गई और हुसैन खान मारा गया। हुसैन की मृत्यु के बाद, दिलावर खान ने अपने आदमियों जुझार हाडा और चंदेल राय को शिवालिक भेज दिया। हालांकि, वे जसवाल के गज सिंह से हार गए थे। पहाड़ी क्षेत्र में इस तरह के घटनाक्रम मुगल सम्राट औरंगज़ेब लिए चिंता का कारण बन गए और उसने क्षेत्र में मुगल अधिकार बहाल करने के लिए सेना को अपने बेटे के साथ भेजा।


🔱 *खालसा पंथ की स्थापना*


गुरु गोबिंद सिंह जी का नेतृत्व सिख समुदाय के इतिहास में बहुत कुछ नया ले कर आया। उन्होंने सन 1699 में बैसाखी के दिन खालसा जो की सिख धर्म के विधिवत् दीक्षा प्राप्त अनुयायियों का एक सामूहिक रूप है उसका निर्माण किया।


सिख समुदाय के एक सभा में उन्होंने सबके सामने पुछा – "कौन अपने सर का बलिदान देना चाहता है"? उसी समय एक स्वयंसेवक इस बात के लिए राज़ी हो गया और गुरु गोबिंद सिंह उसे तम्बू में ले गए और कुछ देर बाद वापस लौटे एक खून लगे हुए तलवार के साथ। गुरु ने दोबारा उस भीड़ के लोगों से वही सवाल दोबारा पुछा और उसी प्रकार एक और व्यक्ति राज़ी हुआ और उनके साथ गया पर वे तम्बू से जब बहार निकले तो खून से सना तलवार उनके हाथ में था। उसी प्रकार पांचवा स्वयंसेवक जब उनके साथ तम्बू के भीतर गया, कुछ देर बाद गुरु गोबिंद सिंह सभी जीवित सेवकों के साथ वापस लौटे और उन्होंने उन्हें पंज प्यारे या पहले खालसा का नाम दिया।


उसके बाद गुरु गोबिंद जी ने एक लोहे का कटोरा लिया और उसमें पानी और चीनी मिला कर दुधारी तलवार से घोल कर अमृत का नाम दिया। पहले 5 खालसा के बनाने के बाद उन्हें छठवां खालसा का नाम दिया गया जिसके बाद उनका नाम गुरु गोबिंद राय से गुरु गोबिंद सिंह रख दिया गया। उन्होंने पांच ककारों का महत्व खालसा के लिए समझाया और कहा – केश, कंघा, कड़ा, किरपान, कच्चेरा।


इधर 27 दिसम्बर सन्‌ 1704 को दोनों छोटे साहिबजादे और जोरावर सिंह व फतेह सिंहजी को दीवारों में चुनवा दिया गया। जब यह हाल गुरुजी को पता चला तो उन्होंने औरंगजेब को एक जफरनामा (विजय की चिट्ठी) लिखा, जिसमें उन्होंने औरगंजेब को चेतावनी दी कि तेरा साम्राज्य नष्ट करने के लिए खालसा पंथ तैयार हो गया है।


8 मई सन्‌ 1705 में 'मुक्तसर' नामक स्थान पर मुगलों से भयानक युद्ध हुआ, जिसमें गुरुजी की जीत हुई। अक्टूबर सन्‌ 1706 में गुरुजी दक्षिण में गए जहाँ पर आपको औरंगजेब की मृत्यु का पता लगा। औरंगजेब ने मरते समय एक शिकायत पत्र लिखा था। हैरानी की बात है कि जो सब कुछ लुटा चुका था, (गुरुजी) वो फतहनामा लिख रहे थे व जिसके पास सब कुछ था वह शिकस्त नामा लिख रहा है। इसका कारण था सच्चाई। गुरुजी ने युद्ध सदैव अत्याचार के विरुद्ध किए थे न कि अपने निजी लाभ के लिए।


औरंगजेब की मृत्यु के बाद आपने बहादुरशाह को बादशाह बनाने में मदद की। गुरुजी व बहादुरशाह के संबंध अत्यंत मधुर थे। इन संबंधों को देखकर सरहद का नवाब वजीत खाँ घबरा गया। अतः उसने दो पठान गुरुजी के पीछे लगा दिए। इन पठानों ने गुरुजी पर धोखे से घातक वार किया, जिससे 7 अक्टूबर 1708 में गुरुजी (गुरु गोबिन्द सिंह जी) नांदेड साहिब में दिव्य ज्योति में लीन हो गए। अंत समय आपने सिक्खों को गुरु ग्रंथ साहिब को अपना गुरु मानने को कहा व खुद भी माथा टेका। गुरुजी के बाद माधोदास ने, जिसे गुरुजी ने सिक्ख बनाया बंदासिंह बहादुर नाम दिया था, सरहद पर आक्रमण किया और अत्याचारियों की ईंट से ईंट बजा दी।


गुरु गोविंदजी के बारे में लाला दौलतराय, जो कि कट्टर आर्य समाजी थे, लिखते हैं 'मैं चाहता तो स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, परमहंस आदि के बारे में काफी कुछ लिख सकता था, परंतु मैं उनके बारे में नहीं लिख सकता जो कि पूर्ण पुरुष नहीं हैं। मुझे पूर्ण पुरुष के सभी गुण गुरु गोविंदसिंह में मिलते हैं।' अतः लाला दौलतराय ने गुरु गोविंदसिंहजी के बारे में पूर्ण पुरुष नामक एक अच्छी पुस्तक लिखी है।


इसी प्रकार मुहम्मद अब्दुल लतीफ भी लिखता है कि जब मैं गुरु गोविंदसिंहजी के व्यक्तित्व के बारे में सोचता हूँ तो मुझे समझ में नहीं आता कि उनके किस पहलू का वर्णन करूँ। वे कभी मुझे महाधिराज नजर आते हैं, कभी महादानी, कभी फकीर नजर आते हैं, कभी वे गुरु नजर आते हैं। सिखों के दस गुरू हैं।


एक हत्यारे से युद्ध करते समय गुरु गोबिंद सिंह जी के छाती में दिल के ऊपर एक गहरी चोट लग गयी थी। जिसके कारण 7अक्टूबर, 1708 को 42 वर्ष की आयु में नान्देड में उनकी मृत्यु हो गयी।


📝 *रचनायें*


दशम ग्रन्थ की पाण्डुलिपि का प्रथम पत्र। दशम ग्रन्थ में प्राचीन भारत की सन्त-सैनिक परम्परा की कथाएँ हैं।

जाप साहिब : एक निरंकार के गुणवाचक नामों का संकलन

अकाल उस्तत: अकाल पुरख की अस्तुति एवं कर्म काण्ड पर भारी चोट

बचित्र नाटक : गोबिन्द सिंह की सवाई जीवनी और आत्मिक वंशावली से वर्णित रचना

चण्डी चरित्र - ४ रचनाएँ - अरूप-आदि शक्ति चंडी की स्तुति। इसमें चंडी को शरीर औरत एवंम मूर्ती में मानी जाने वाली मान्यताओं को तोड़ा है। चंडी को परमेशर की शक्ति = हुक्म के रूप में दर्शाया है। एक रचना मार्कण्डेय पुराण पर आधारित है।

शास्त्र नाम माला : अस्त्र-शस्त्रों के रूप में गुरमत का वर्णन।

अथ पख्याँ चरित्र लिख्यते : बुद्धिओं के चाल चलन के ऊपर विभिन्न कहानियों का संग्रह।

ज़फ़रनामा : मुगल शासक औरंगजेब के नाम पत्र।

खालसा महिमा : खालसा की परिभाषा और खालसा के कृतित्व।

        

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳


🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

*२२ जुलै - भारतीय राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला*

 ********************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*२२ जुलै - भारतीय राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला*

********************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. 


२४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख होते. त्यांनी ठरवले की कॉंग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.


भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा आणि निळा. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. 


एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४  आरे आहेत. 


मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण २:३ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.


ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.


मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य व पावित्र्याचा बोध होतो.


खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.


निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.


*फडकवण्याची नियमावली :*


भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मान पूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही,यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी भारतीयांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. 


राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की,तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोच. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.


संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो.प्लॅस्टिकचा ध्वज वापरण्यास मनाई असते.


राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की,मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.


संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात असावा.जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला,मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.


राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही,अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.त्यानुसार राजकीय व्यक्ती,केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.ध्वज कुठलेही वाहन,रेल्वे,जहाजावर लावला जाऊ शकत नाही.


ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये.कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.तसेच राष्ट्रध्वज गादी,रुमालावर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.


केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्यात ठेवून फडकविला जातो.राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल.सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

*******************************

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६